जरा विसावू या वळणावर - मायबोली वर्षाविहार २०१०

Submitted by जिप्सी on 19 July, 2010 - 00:09

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर
या वळणावर . . . . . . . . . .

मायबोलीचा यंदाचा वर्षाविहार दणक्यात पार पाडला. सर्व मायबोलीकर आणि संयोजकांचे मनापासुन आभार. सविस्तर सचित्र वृतांत येतीलच, तोपर्यंत हि एक छोटी "चित्रझलक".

नाश्ता Happy

थोडी फोटुगिरी

महिला स्पेशल ट्रेन

ज्युनिअर मायबोलीकर

खाद्ययात्रेचा अंतिम भाग प्रदर्शित केल्याने "लंच"चे फोटो काढले नाहीत, पण सगळ्यांसाठी हि स्वीट डिश Happy

यो रॉक्स पारंपारीक पोझ मध्ये Happy

मायबोलीकर (हम साथ साथ है.....)

==================================================
सगळ्यांचा आग्रहाखातर आणि यो च्या परवानगीने "लावणीसम्राट" यो रॉक्स यांच्या अदाकारीचा नमुना Happy Light 1
==================================================

==================================================
घारूअण्णांची सामुहिक धुलाई कौतुकाने पाहताना लिंबुदा Happy
घारूअण्णा/लिंबुदा Light 1 घ्या.
==================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईशप्पथ, लयच भारी. आज थोडीशी उशीरा आले माबोवर तर वविची प्रचि अशी पहिल्याच पानावर दिसली हा एक सुखद धक्का. पण ती योग्या कडूनच येणार हे वाटलंच होतं. आणि खरंच यो-रॉक्स च्या लावणीचं व्हिडिओ शूटिंग कोणाकडे असेल तर ते नाही का टाकता येणार इथे??

योगेश मस्तच रे....

मायबोलीवरील दोन महान विभुती... Wink वलका बगु? (कै च्या कै, कोणी पण ओळखेल!)

IMG_5339.JPGIMG_5421.JPG

काय मिसलं ते दिसलं आता वृ बघू तपशीलवार !
योगेश मस्त फोटो !
>>>खाद्ययात्रेचा अंतिम भात <<< अजून ववितून बाहेर आला नाहीस बरं का तू Happy

आनंद केळकर आणि लिंबुभाऊ..... !

केळकरसाहेबांनी आमची मुंबई ते खोपोली आणि परत अशी बसयात्रा मात्र समृद्ध करून सोडली Proud

काय हे किरु ? अनंत कोटी गानगायक, भितीदायक, पिकनीकसॉन्गनायक, महालायक संतश्रेष्ठ श्रीमंत आनंदझुझू महाराज आहेत ते.... मोठा Light 1 घे रे...

ना..... Biggrin

मंजीरी सहमत आहे. आहे का कोणाकडे व्हीडीओ क्लीप ? योगेशच्या लावणी नृत्याची मजा नुसत्या फोटोने येणार नाही.

पदार्थांचे फोटॉ बघून एकदम खूप भूक लागली. असले पदार्थ अमेरिकेतल्या भारतियांना सुद्धा खायला मिळावे म्हणून २५ लाख रुपयांची देणगी द्याल अशी अपेक्षा होती.
पण असो.
तसेहि ते सगळे इथे मिळते, पण तुम्हालाच बरे वाटले असते की महाराष्ट्राचे नाव परदेशातहि झाले म्हणून.

वा, वा. मस्त फोटो. Happy
काही मोठ्या छोट्या मंडळींना ओळखले.
पोहे कमी तिखट होते का? मिरच्या फारश्या दिसत नाहीत.

सगळ्यांचा आग्रहाखातर "लावणीसम्राट" यो रॉक्स यांच्या अदाकारीचा नमुना अपलोड केला आहे Happy
शेवटचे तीन अधिक फोटो Happy

Pages