Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54
लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेंजामीन बटन आणि त्याची आई.
बेंजामीन बटन आणि त्याची आई.
4 between 5 please answer
4 between 5
please answer
vakadi tikadi vat madhi
vakadi tikadi vat madhi khankul
एका वनात एक हत्ति हरवला किति
एका वनात एक हत्ति हरवला किति रहिले ?
५०
५०
काळी गाय काटे खाय, पाणी बघुन
काळी गाय काटे खाय,
पाणी बघुन उभी राय.
सांगा पाहू.
वळणावळणाची वाट, मधेच भोगदा.
वळणावळणाची वाट, मधेच भोगदा.
१)सीतेने सारवलेली जमीन कधीच
१)सीतेने सारवलेली जमीन कधीच सुकत नाय.
२)सीतेची गादी कधीच भिजत नाय.
काळी गाय काटे खाय, पाणी बघुन
काळी गाय काटे खाय,
पाणी बघुन उभी राय.
वहाण
सीतेने सारवलेली जमीन कधीच
सीतेने सारवलेली जमीन कधीच सुकत नाय. <<< जीभ?
सीतेची गादी कधीच भिजत नाय. <<< अळूचे पान?
एव्ह्डसं तळ त्यात झिंग्रुबाइ
एव्ह्डसं तळ त्यात झिंग्रुबाइ खेळं!
ओळ्खा काय?
याचं पण उत्तर जीभच ना?
याचं पण उत्तर जीभच ना?
काळी गाय काटे खाय, पाणी बघुन
काळी गाय काटे खाय,
पाणी बघुन उभी राय.<<<वहाण
सीतेने सारवलेली जमीन कधीच सुकत नाय. <<< जीभ
सीतेची गादी कधीच भिजत नाय. <<< अळूचे पान
अगदी बरोबर. धन्यवाद
वळणावळणाची वाट, मधेच
वळणावळणाची वाट, मधेच भोगदा.
हे ओळखुन दाखवा.
लाल आहे पण रंग नाही, कृष्ण
लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही. ओळखा.
हे सांगतो, पण त्या वळणावलणाचे
हे सांगतो, पण त्या वळणावलणाचे तुम्ही सांगा.
याचं उत्तर - लालकृष्ण आडवाणी.
लाल आहे पण रंग नाही, कृष्ण
लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही. >>आयला ! मला वाटलं होत कि याच उत्तर कोणाला येणार नाही पण इथे सगळे हुशार लोक भरली आहेत.
"गजानन" तुम्हाला कठीण
"गजानन" तुम्हाला कठीण कोड्यांची उत्तर येतात,पण सोप्प्या कोड्यांची उत्तर येत नाहीत कमाल आहे.
वळणावळणाची वाट, मधेच
वळणावळणाची वाट, मधेच भोगदा.
उत्तर - कान
सोप्पं होत कि नाही.
साता समुद्रापार रामाने घातलं
साता समुद्रापार रामाने घातलं अळं
त्याला दोनच फळं!
उत्तर - कान <<< भारी होतं हे
उत्तर - कान <<< भारी होतं हे कोडं.
गडगडतो पण गाडा नव्हे, सरसरतो
गडगडतो पण गाडा नव्हे,
सरसरतो पण साप नव्हे,
नव्हे इंद्र, नव्हे चंद्र,नव्हे तळिचा मासा,
पृथ्वीला पडला फासा.
सोप्प आहे. ओळखा पाहू.
रहाट
रहाट
उत्तर - कान <<< भारी होतं हे
उत्तर - कान <<< भारी होतं हे कोडं.
मग काय ,कोडं घातलेलं कोणी !
<<साता समुद्रापार रामाने
<<साता समुद्रापार रामाने घातलं अळं
त्याला दोनच फळं!>>
आता हे सांगा ना! सोप्पं आहे.
आज्जी वनात तीन भाकर्या घेवुन
आज्जी वनात तीन भाकर्या घेवुन गेली दोन आज्जीने खाल्ल्या मग,एक कोणी खाल्ली.
अरे यार! सगळे गायब कुठे झाले. पटापट कोडी सोडवा ना!
दोनच फळं << डोळे का? (खात्री
दोनच फळं << डोळे का? (खात्री नाही)
तिसरी भाकरी नातीने खाल्ली.
एक तशीच राहीली रात्रीला.
एक तशीच राहीली रात्रीला.
चला आता पुन्हा पैल्यापास्नं..
चला आता पुन्हा पैल्यापास्नं..
<<एक तशीच राहीली
<<एक तशीच राहीली रात्रीला.>>जागू

Pages