आपल्या घराची व तदनुषंगाने घरातल्यांची सुरक्षितता कशी जपावी?

Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2010 - 03:12

मित्रांनो, ह्या मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता, घरात कामाला येणारे व बिल घ्यायला येणारे यांच्याशी कसे वागावे, वाहन असेल तर त्याची सुरक्षितता इत्यादी बद्दल चर्चा करूया. सिक्युरिटी गार्ड किंवा एजन्सी वगैरे इथे अपेक्षित नाही. आणि घर म्हणजे अगदी सदनिकेपासून ते बंगल्यापर्यंत अभिप्रेत आहे. चला कुणीतरी सुरवात करा बरं Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवडाभरात आमच्या घराची रस्त्यावरुन "टेहळणी" केली जात्ये असे तिच्या लक्षात आलय, आजही तिने दोन जणान्ना हटकले होते!
बघू, काय असेल ते! Happy

बरं केलस Happy त्या दाराला आम्ही २ कड्या लावल्यात - १ वर आणि १ जरा खालच्या बाजुला, अनोळखी लोकांशी कडी न उघडता बोलायचं, कुरीयर वगरै पण तसच घ्यायचं.

एक अत्यंत महत्वाची सूचना (ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी):

आमच्या कडे आज फायर-ड्रिल झालं आणि नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी काही माहिती दिली त्यातली एक अत्यंत महत्वाची सूचना:

रात्री झोपण्याआधी जर आपण आधी गॅस शेगडीचा रेग्युलेटर बंद करत असू आणि मग सिलेंडरचा नॉब बंद करत असू तर असे करणे अत्यंत धोकादायक आहे. कारण सिलेंडर ते शेगडी या दरम्यान ट्युब मध्ये गॅस साठलेला असतो. त्यामुळे ट्युब तर हळू हळू खराब होतेच, पण झुरळं, उंदीर अशा अनेक कारणांनी ट्युब जर का कधी फाटली, तर त्या साठलेल्या गॅस मुळे आग लागण्याची शक्यता असते.

रात्री शेवटचा वापर झाल्यावर सर्वप्रथम सिलेंडरचा नॉब बंद करावा आणि ज्योत विझली की मग शेगडीचा रेग्युलेटर.

मंदारजी काही वेळा काही अनावश्यक व चुकीची माहिती दिली जाते. ( हा शेरा आपल्यासाठी नसुन आमच्या कडे आज फायर-ड्रिल झालं आणि नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी काही माहिती दिली त्यातली यांच्यासाठी आहे.

१) माझ्या मते काही गॅस कंपन्या २ वर्षांनी रबरी नळी बदलावी हा सल्ला देतात तो योग्य असावा. गॅसची नळीचे आयुष्य आत गॅस असताना किंवा नसताना बदलत नाही हे अनुभवाअंती / प्रयोगाअंती गॅस कंपनीने ठरवले असावे. त्यामुळे आधी सिलेंडर वरचा रेग्युलेटर नंतर गॅस शेगडीचा व्हॉल्व्ह बंद करणे हा द्रविडी प्राणायाम अनावश्यक आहे.

जाणकारांनी आपले म्हणणे लिहावे.

२) गॅस शेगडीचा व्हॉल्व्ह व सिलेंडर वरचा रेग्युलेटर यात एल.पी.जी. ट्रॅप होणे याने काही मोठ्ठा स्फोट होणे अपेक्षीत नाही. कारण यात ट्रॅप झालेल्या एल.पी.जी.चे आकारमान अल्प आहे. गॅस चा मोठ्ठा स्फोट तेव्हाच होतो जेव्हा नळी फाटलेली असते व रात्रभर गॅस लिक होतो कारण सिलेंडर्वरचा रेग्युलेटर बंद नसतो. स्वयंपाकघराच्या खिडक्या बंद असतात किंवा स्वयंपाकघरात खिडकीच नसते. सकाळपर्यत संपुर्ण स्वयंपाकघरात गॅस भरतो व पहाटे इलेट्रीकल दिवा ऑन चे बटण दाबताच इग्नेशन मिळुन स्फोट होतो. अश्या अपघातात अनेक वेळा सदर व्यक्ती भाजुन दगावते तसेच स्वयंपाकघराचे मोठे नुकसान होते.

गॅस चे आकारमान १ व हवेचे आकारमान ३० असता गॅस जळतो स्फोट होत नाही . हे प्रमाण गॅसच्या शेगडीतल्या बर्नरमध्ये प्रमाणीत केले जाते. गॅस चे आकारमान १ व हवेचे आकारमान ५० असता गॅस स्फोट होतो. असा स्फोट इग्नेशन मिळाल्याशिवाय होत नाही. कितीही झोपेत असताना स्वयंपाकघरतला दिवा लावताना सावध असावे. जर गॅस गळतीचा वास आल्यास एक्झॉस्ट फॅन सुध्दा ऑन करु नये. खिडक्या दारे उघडुन गॅस बाहेर जाउ द्यावा. दोन चार वेळा खात्री झाल्यावरच पुढील काम करावे.

३) गॅस शेगडीचा व्हॉल्व्ह व सिलेंडर वरचा रेग्युलेटर दोन्हीही रात्री बंद असणे व गॅस ची रबरी नळी कंपनीच्या म्हणण्यानुसार बदलणे हे सुरक्षादृष्टीने आवश्यक आहे.

घरातील फर्निचर्स चे कोपरे शक्यतो round असावेत. म्हणजे लहान मुलांच्या डोक्याला खोक पडणे, जाता येता कुणालाही गुडघ्याला इजा होणे हे टाळले जाईल.

इलेक्ट्रिक सॉकेट्स जमिनीच्या जवळ असल्यास त्यावर बसवण्याची कॅप मिळते ती लावावी जेणे करून लहान मूल त्यात हात घालणे किंवा कागद्/कापूस/काडी कोंबणे असे उद्योग करू शकणार नाही.

इलेक्ट्रीकल सॉकेट जमिनीजवळ कशासाठी बसवतात? >>

हल्लीच फॅशन आलीये तशी!! आमच्या घरी नाहिये. पण अमेरीकेत असतात अशी सॉकेट्स.

मोठ्या जागेत (हॉल, विमान तळ, कार्यालयातील मोठा हॉल), मध्यभागी विजेचा प्रवाह हवा असेल, आणि वायर कुणाच्याही नजरेत 'पडायला' नको असेल तर जमीनीत सॉकेटस असतात.

||(बीदेव प्रसन्न)||

अम्रेरिकेतील पोरे त्या भोकात अनुक्रमे त्यात हात घालणे किंवा कागद्/कापूस/काडी कोंबणे असे उद्योग करीत नाहीत का? करीत असतील तर त्यांच्या पालकाना अक्कल नाही का? तिथली पोरे तसे करीत नसतील तर भारतातील पोरे का करतात तसे.? वायर कोणाच्या नजरेला 'पडल्याने' वायरला दृष्ट लागते की भूकम्प होतो. ?

तिथली पोरे तसे करीत नसतील तर भारतातील पोरे का करतात तसे.
--- त्याच्यावर व्यावस्थित झाकण असते. तुम्ही त्यावर चालल्यावर कळणारी नाही. सॉकेटच्या live neutral पिना चपट्या असतात, लहान मुलाची करंगळी पण जाणार नाही. लहान मुलगा अपघातानेच उघडेल पण तसे सोपे नाही. वय ४ नंतर कळायला लागते (विस्तवाला हात लावू नये त्या प्रमाणे).

भारतात तिनही (L, N, G) पिना गोल मोठ्या असतात, अपघाताच्या दृष्टिने तुलनेने जास्त धोकादायक आहेत. त्यावर झाकण ठेवायची प्रथा अजुन नाही, बहुतेक जागी ते अगदी उघडे असते.

मग भारतात त्या तशा चपट्या पिना का बनवत नाहीत?::राग:
एरवी अमेरिकेचे अ.न्धानुक्रण करणारे सॉकेटच्या दिझाईनचे अनुकरण का करीत नाहीत

अमेरिकेत सॉकेट्स जमिनीजवळ बहुधा व्हीलचेअर वापरणार्‍यांचा हात पोहोचावा म्हणून बनवतात. चपट्या पिना भारतातही बनवायला हव्यात. तसेच मुलांनी त्यात काही घालू नये म्हणून त्यात चपखल बसणारे प्लॅस्टिक चे झाकण असते - ते नुसत्या हाताने ओढायला अवघड असते.

दुसरे म्हणजे अमेरिकेत ११०व्होल्ट असते. त्याचा शॉक कमी अपायकारक असतो का?. नक्की माहीत नाही. म्हणजे २४० पेक्षा ११० कमी आहे, पण जसे ५००० डिग्री तपमान आणि ४९०० डिग्री यातील फरक आपल्या दृष्टीने उपयोगाचा नाही तसे आहे का विचारतोय Happy

फारएण्ड, बरोबर आहे २३० पेक्षा ११० कमी धोकादायक, पण हे अगदीच दगडापेक्षा वीट मउ सारख. बट इट इज फॅटल. योग्य प्लगच आत जाईल अशी सॉकेटस् हे यावरच उत्तर, उदयने सांगितल्याप्रमाणे. या प्रकारची सॉकेटस आपल्याकडेही मिळतात. किंबहूना हल्ली सर्रास वापरली जातात.

पण शेवटी अवेअरनेस सगळ्यात महत्वाचा. त्याशिवाय सुरक्षा नाही.

नितीन १०१% बरोबर आहे तुमचं.

>>अम्रेरिकेतील पोरे त्या भोकात अनुक्रमे त्यात हात घालणे किंवा कागद्/कापूस/काडी कोंबणे असे उद्योग करीत नाहीत का? करीत असतील तर त्यांच्या पालकाना अक्कल नाही का? तिथली पोरे तसे करीत नसतील तर भारतातील पोरे का करतात तसे.? वायर कोणाच्या नजरेला 'पडल्याने' वायरला दृष्ट लागते की भूकम्प होतो. ?<<

अमेरीकेत होम डिपो किंवा वॉल मार्ट मध्ये घर चाइल्डप्रुफ करायचं किट मिळतं. त्यात इलेक्ट्रिक आउट्लेट सील करण्यापासुन ड्रॉवर्स, कॅबीनेट डोअर्स लॉक करण्यापर्यंत लागणारं सामान असतं. तुमची मुलं कितीही अतरंगी असली तरी या बॅरीयर्स पुढे त्यांचा निभाव लागत नाही. Happy

मुंबईतल्या घरफोड्यांच्या बातम्या वाचल्या तर बहुतेक ठिकाणी रंगकाम, सुतारकाम, किंवा गवंडीकाम करून घेतले होते. असे काम करून घेताना विशेषतः आणि तसे नेहमीच घरातल्या किमती वस्तू जसे दागिने बँक लॉकर मधे ठेवावेत. कामगारांना आपली भाषा समजत नाही असे मानून त्यांच्यासमोर अशा गोष्टींची किंवा आपले घरे कसे केव्हा रिकामे (माणूस रहित) असेल याची चर्चा टाळावी.
आपल्या घराच्या सुरक्षेबरोबरच शेजारीही लक्ष ठेवावे. आजकाल बर्‍याच घरात दिवसा किंवा अगदी २४ तास वृद्ध जोडपी वा एकटी व्यक्ती असते, तर त्यांच्याकडे कोण येते जाते यावर ही लक्ष असू द्यावे. नेबरहूड वॉच सारखे.
केबलवाला, पेपरवाला,दूधवाला यांसाठी सेफ्टी डोअर न उघडणे ठीक, पण आमचा तुमच्यावर अविश्वास आहे असे त्यांना जाणवू देवू नये.

मयेकर , मुम्बैत आणि पुण्यातही शेजारी कोण राहतेय याची कोणी उचापत करतेय का? कुबेरा पार्क कोंढवा रोड येथे मिप्त्राकडे गेलो होतो. लोणकर ह्या मूळ जमीनमालकाव्यतिरिक्त इतर राहणार्‍या व्यक्तीची नेमप्लेत पाहिल्यावर ती माणसे भारतातली तरी आहेत का असा प्रश्न पडला. सम्पूर्ण बिल्डिन्गमद्ये लोणकर आणि मित्रच महाराष्ट्रीयन. मायकेल रॉड्रिग्ज, गमाल इझिकेल, हसन मोम्बासावाला , टी. स्टालिन कुमार, एम. लाल ठाण ल्युएंगा (हे नागा ल्यांडमधले) असली नावे त्या सोसायटीत होती. त्यांच्याकडे कोण येते त्याकडे लक्ष ध्यायचे म्हणजे फारच. हाच प्रकार आता नव्या टाऊन्शिप मध्ये दिसतो. ज्याच्या कडे पैसे आहेत असा कोणीही तुमच्या शेजारी येऊ शकतो. आपण कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही हे आता कौतुकाने सांगितले जाते. माझ्या शेजारी चार पाच भाडेकरू येऊन गेले . सगळे परप्रांतीय. मुले , तरुण जोडपी, कोणीहे ओळख करून घेतली नाही की जाइपर्यन्त कोणी बोलले नाही. काहींकडे छोटी मुले ही होती. कसला नेबरहूड वॉच अन कसले काय.

कामवालीचे नातेवाईक डेंजरस असू शकतात मात्र. पुण्यातल्या डेक्कनवरील एका प्रसिद्ध डोक्टरचा खून कामवालीच्या नातेवाईक मुलानेच चोरी करण्यासाठी आल्यावर केला होता. तिचे ट्रॅक रेकॉर्ड पाहण्याची सूचनाही केली जाते. पण शक्य आहे का ते? एकतर बाया मिळता मिळता मुष्किल आणि त्यात तिची चौकशी सुरू केली तर ती येणारच नाही.
सराइत चोराला ५ ते ७ मिनिटे पुरतात चोरी करायला.

खरं आहे हो. चांगला (विश्वासू) शेजार मिळणे मुश्कील झाले आहे अगदी.

>>भारतात तूर्त उपयोगात नसलेल्या प्लगात चुना भरतात

tonaga त्या गांधील माशा भरतात, माणसे नव्हे Happy

US मध्ये सगळ्यात भन्नाट प्रकार म्हणजे सगळे प्लग (काही अपवाद वगळता) always on असतात. मला त्याचे प्रयोजनच कळले नाही. कित्येकदा त्यात प्लग घालताना स्पार्क देखील पडतो. (विशेषत: इस्त्री साठी).

दक्षिणाची पोस्ट वाचली की ती एकटी असताना रात्री उशीखाली काठी वैगेरे ठेवते. नॉट सेक्युर इनफ !
एक स्विस आर्मी नाईफ घेऊन ठेवावा घरात. माझ्याकडे सोल्जर नाईफ आहे. मस्त असतात.

रच्याकने ... मी सध्या छंद म्हणून लॉकपिकिंग शिकतोय. (का विचारू नका ... शुद्ध छंद ! नो किडिंग !)
घर / ऑफिस मधले सगळे वेफर लॉक्स तर उघडलेत. आता पिन टंबलर लॉक्स ट्राय करीन.
कोणाला लॉक्स टेस्ट करायचे असतील तर मला सांगा .. अजून थोडे शिकून झाल्यानंतर मदत करू शकेन.

वेफर लॉक्स म्हणजे Drawers ना ज्या प्रकारची लॉक्स असतात ना ती ! (अजून भरपूर जागी असतात .... Just imagine !)
आणि अहो मदत चांगल्या लोकांनाच करणार .. म्हणजे एखादे लॉक वापरावे की नाही हे मी टेस्ट करून सांगू शकीन.
माझा छंद / तुमची मदत एकदम होऊन जाईल. सिम्पल !

निळूभाऊ,
त्ये तिकडं काम्पुटर की काय म्हन्तात थितं पन तुमी कुल्पं तोडाय्चा 'येथिकल ह्याकिन्ग' चा कोर्स केला म्हन्ताव.
हितं डायरेट कपाटं कुपाटं तोडाया लाग्लात.. लै भारि. चालू द्या. शिकोनी घ्येनार का लोकांची? Wink

Pages