आपल्या घराची व तदनुषंगाने घरातल्यांची सुरक्षितता कशी जपावी?

Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2010 - 03:12

मित्रांनो, ह्या मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता, घरात कामाला येणारे व बिल घ्यायला येणारे यांच्याशी कसे वागावे, वाहन असेल तर त्याची सुरक्षितता इत्यादी बद्दल चर्चा करूया. सिक्युरिटी गार्ड किंवा एजन्सी वगैरे इथे अपेक्षित नाही. आणि घर म्हणजे अगदी सदनिकेपासून ते बंगल्यापर्यंत अभिप्रेत आहे. चला कुणीतरी सुरवात करा बरं Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सदनिकेत राहणार्‍या सर्वांनी... बाहेरून कुणालाही कडी लावता येनार नाही याची व्यवस्था करावी. काही बिल्डिंगस मधे घडलेल्या भीषण गुन्ह्यामधे आजूबाजूंच्या सर्व शेजारांच्या घरांना बाहेरून कड्या घालण्यात आल्या होत्या. जेणेकरून मदतीला कुणी पटकन धाउन येउ शकणार नाही.

वरच्या मजल्यावरील फ्लॅट्सना सहसा हा प्रॉब्लेम नस्तो कारण जे काय रक्षण करायचे ते एकाच दरवाजाचे
>> हा हा हा.. एका मैत्रिणीच्या घरात एक माणूस प्लंबिंगच्या पाईपवरून ५ मजल्यावर चढून घरात आलेला (त्याचा उद्देश्श चोरी करण्याचा नव्हता मात्र!)

<< त्याचा उद्देश्श चोरी करण्याचा नव्हता मात्र! >> रॉक क्लाईंबिंगची प्रॅक्टिस करत असणार, दुसरं काय ? Wink Light 1

इंजिनियरींग्चे दिवस होते, परीक्षेपुर्व सुट्ट्या चालु होत्या, त्यामुळे झोपायला रात्री २ -३ सहज वाजत.
आमच्या फ्लॅट्ला दोन दरवाजे, तर असाच आभ्यास चालु होता (:अओ: !), रात्री दिड एक वाजला असेल, सगळे रुममेट हळुहळू पेंगुळले, साधारण २ पर्यंत सगळ्यांची विकेट पडली असेल. गर्मी मुळे आम्ही मागचा दरवाजा उघाडा ठेवत असु, नेमके त्या दिवशी तो दरवाजा बंद करायचा विसरलो.
सकाळी सर्व रुममेट्स आरामात उठ्ले, आंघोळी वैगरे झाल्यावर मी जेंव्हा कपडे शोधत होतो, तर पँट्च सापडत नव्ह्ती, "कमाल झाली बुवा कालच तर अडकवुन ठेवली होती हँगरला" मनातल्या मनात मी.
संपुर्ण रुम चेक केली, बॅग चेक केली पण काही पत्ता नाही, मित्रानां सांगितले "अरे शोधा रे त्यात माझे पाकीट आणि पाकीटात ५०० रु आहेत", लेकाचे मलाच सुचना करत बसले इकडे बघ-तिकडे बघ. मग मी निष्कर्ष काढ्ला "घरात चोरी झाली आहे!" सगळे अवाक्. मग पटपटा आपापल्या वस्तु चेक करू लागले.
आणि गंमत म्हणजे सगळ्यांच्या शर्ट-पँटी चोरीला गेल्या होत्या. आणि मग एकच हशा, चोरी झाली तरी सगळे मस्त खुश होउन टींगल (एक्मेकांचा हिशेब करत Happy ) करत बसले.
त्या चिंदी-चोराने दुसर्‍या दिवशी रात्री कपडे अंगणात आणुन टाकले. (पाकीट मात्र नाही मिळाले Sad )

निष्कर्ष - घरात जास्त कॅश ठेवु नये. दार उघडे ठेवु नये. मित्रांवर(घरात्ल्यांवर) भरोसा ठेवु नये, आपण आपला कडी-कोंडा लावावा/चेक करावा.

गर्मी मुळे आम्ही मागचा दरवाजा उघाडा ठेवत असु
>> मी चुकून गुर्मी वाचलं Lol

<< त्याचा उद्देश्श चोरी करण्याचा नव्हता मात्र! >> रॉक क्लाईंबिंगची प्रॅक्टिस करत असणार, दुसरं काय ?
>> हे हे हे. आता बस्सा- आता सगळी ईष्टोरी सांगणार मी! (बाफला अनुसरून नाहीये- त्याबद्दल खेद! Wink )
सकाळी १०.३० ची वेळ. तिचा नवरा ऑफिसला गेलेला.. ती आईशी फोनवर बोलत बोलत बाल्कनीत गेली.. बोलता बोलता नकळत मागे काचेचा दरवाजा ओढून घेतला - त्याला लॅच होतं -- दार बंद झालं!
मग तिनं नवर्‍याला फोन केला.. तो किल्ली घेऊन जायला विसरलेला! Proud
आता काय करणार! ती तर पाचव्या मजल्यावर!! तीनं बराच वेळ हाका मारून खालच्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं - आता वरती तिच्या डोक्यात आणि खालती खालच्यांच्या डोक्यात "काय करावं" ह्याची चक्र फिरत होती. एका चाललेल्या माणसानं ते पाहिलं. तो प्लंबर होता.. त्यानं कुणाशीही काहिही सल्ला मसलत केली नाही आणि तो डायरेक्टली पाईपवरून चढून तिच्या स्वैपाकघरात आला (मुलीला काहीच कल्पना नाही!) - मधल्याकाळात तिची ही झटापट चालू होती दाराशी - तर ते अचानक उघडलं (लूज होतं!)
ती स्वैपाकघरात आली तर हा माणूस! मग काय आहाहा किंचाळा किंचाळी झाली आहे!!!
त्याचा हेतू फक्त मदत करायचा होता तेव्हा.. त्यामुळे ठीक! नाहितर रिस्की!
(आम्ही स्वैपाकघराच्या खिडक्यांनाही गज बसवून घेतले ही कथा ऐकून!)

आपण कधी कधी डुप्लिकेट चाव्या शेजारी अथवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडे ठेवतो. चावी हरवल्यास विसरल्यास कामी यावे म्हणून. दुर्दैवाने चोरी झालीच तर पोलीस हा प्रश्न विचारतात्. याच्या चाव्या कोणाकोणाकडे आहेत? पोलीसाना चुकूनही चाव्या कोणाकडे आहेत ते सांगू नये. त्या लोकाना पोलीसांचा खूप त्रास होतो. एक लक्षात घ्या अत्यन्त श्रीमन्त घरातल्या मुलानीही चोर्‍या केल्याची उदाहरणे पोलीसाना माहीत असतात त्यामुळे ते सगळ्या शक्यता लक्षात घेऊन तपास करतात . त्याना दोष देण्यात अर्थ नाही. त्यामुळे ' ती फार चांगली माणसे आहेत , ते कशी चोरी करतील' अशा आर्ग्युमेन्टला काही अर्थ नाही. पोलीस त्याना 'ग्रिल' करतात्च. चोरीच्या वेळी आपल्या कडे नेहमी येणार्‍या लोकांची नावे पोलीस विचारतात. कधी कधी त्यांच्याकडे देखील पोलीस तपासाला जातात....
शिवाय आपण ठेवायला दिलेल्या चाव्या त्यांच्या कडे येणार्या नोकरमाणसांच्या लक्षात आल्या तर ते ही काही 'उद्योग' करू शकतात. आपल्या स्नेह्यांच्या नकळत. कारण ह्या चाव्या रोजच्या रोज हाताळल्या जात नाहीत . शेजार्‍यांच्या ही माहीत नसते चावी कुठे कशी आहे ते. आपल्याला कधी लागली तरच शोधून देतात ते....

परवाच्या सकाळ मध्ये वाहन चोरीबाबत पुण्यातला सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे. त्यात ७० टक्के दुचाक्या सोसायटीच्या पार्किंगम्मधून रात्री जातात. बहुसंख्य दुचाक्याना फक्त हॅन्डल लॉक असते. व ते तोडणे म्हनजे केळे सोलण्याइतके सोपे. त्यामुळे आण्खी साखळी व लॉक लावावे . म्हणजे ते तोडायला आण्खी वेळ आणि आवाज लागू शकतो. माझ्या स्कूटरला मी सिक्युरिटी अलार्म लावून घेतला होता. तो ऑन केल्यावर गाडीला साधा स्पर्श केला तरी सायरन वाजत असे. रात्री आम्ही तो ऑन करून ठेवत असू. तर सोसायटीतल्या पोरांचा चुकून हात लागला तरी अलार्म वाजे. नन्तर नतर तर ही कार्टी मुद्दाम हात लावून घरात पळून जात Angry चौथ्या मजल्यावरून खाली येई पर्यन्त सगळे चिडीचूप घरात. त्यामुळे ते काढून टाकावे लागले....

घराला/ फ्लॅटला ' युरोपा'ची कुलुपे व लॅच अत्यन्त सुरक्षित. या कुलपांचा जो स्टील बार आहे तो अलॉयचा असल्याने कापता येत नाही. (हा कापला गेल्यास कम्पनी ५०००० रु. ची भरपाई देइल असा प्रवाद आहे शहानिशा नाही ) पण कुलुप खुप मजबूत पण स्लीक आहे ४०० रु. पर्यन्त मिळते.(मी युरोपाचा एजन्ट नाही. एक संतुष्ट ग्राहक आहे......)

लाडकीला या बीबीचा पत्ता द्यायला हवा... चोर पकडायची भरपूर प्रॅक्टिस आहे तिला.... Proud

आमच्या बंगल्याला ९ खिडक्या आणि पाच दरवाजे आहेत फक्त. खालच्या मजल्यावर तीन रूमचा आणि दोन रूमचा असे दोन ब्लॉक आणि वरच्या मजल्यावर चार रूमचा एक ब्लॉक असे घर बांधले आहे. आम्ही हे घर आयते विकत घेतले. आधीच्या मालकाने खालचे ब्लॉक भाड्याने देण्यासाठी बाधलेले होते. साधारण सात वर्षापूर्वीची गोष्ट.. . ममी पप्पा व लहान भाऊ वरच्या मजल्यावर झोपायचे. मी "अभ्यासू" मुलगी असल्याने दोन रूमच्या ब्लॉकमधे माझी बेडरूम आणि स्टडीरूम होती. Happy आणि तीन रूमवाला ब्लॉक भाड्याने द्यायचा नसल्याने बंद ठेवला होता आणि त्यात अडगळीचे भरपूर सामान टाकलेले होते.

दिवाळीच्या आधीची एक दोन दिवस असतील.. मध्यरात्री एक स्वपन पडले आणि मला जाग आली. इतक्यात "धाडकन" असा जोरात आवाज झाला. मम्मी पप्पाच्या बेडरूमच्या बाल्कनीचे दार कधीतरी असे वार्‍याने जोरात धडकायचे. मला वाटलं पप्पाच उठले आहेत. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक माणूस बॅटरी घेऊन फिरत होता. मी हाक मारली :पप्पा..पप्पा" अशी... तर तो माणून पळून गेला.

पप्पा असे का निघून गेले असा विचार करत करत मी झोपी गेले. दिसर्‍या दिवशी उठून नेहमीप्रमाणे वर येत असताना मला बाजूअच्या ब्लॉकचे दार उघडे दिसले. आतील सर्व सामान अस्ताव्यस्त Happy तेव्ह्या मला रात्रीचा प्रकार लक्षात आला.. मग मात्र एकदम घाबरले. Proud नशीब, रात्री दोन वाजता पप्पा उठून गार्डनमधे का फिरतायत हे बघायला मी दरवाजा उघ्डून बाहेर आले नाही.

यानंतर आम्ही त्या ब्लॉकमधे भाडेकरू ठेवला.. खूप दिवस ब्लॉक बंद असेल तरीदेखील चोरी होते ... आणि माझ्या रूममधून वरच्या बेडरूमधे एक बेल बसवून घेतली Happy

घराचे पार्किंग कितीही सुरक्षित वाटले तरी गाडीत मौल्यवान वस्तू विसरू / ठेवू नये. आमच्या सहा बिल्डिंग असलेल्या सोसायटीत रात्री बारा रखवालदार असतात. तरीही असुदे म्हणून आमच्या विंगने अजून एक खाजगी रखवालदार ठेवला आहे, जो माझ्याच पार्किंगमध्ये बसायचा रात्री. पार्किंगच्या बरोबर वर पहिल्याच मजल्यावर आमचा फ्लॅट. तरीही गाडीची काच फोडून माझा लॅपटॉप गेला. पोलिसांनी तक्रार लिहून घेण्याआधी मला बरेच सुनावले. दोन महिन्यात लॅपटॉप परत मिळवून दिला मात्र Happy

१) अगदी दोन मिनिटे देखिल क्याश किंवा दागिने गाडीत किन्वा स्कूटर च्या डिकीत ठेवून जावू नये.
२) अंगावर कचरा टाकून/ १० रु ची नोट टाकून लक्ष डायवर्ट करणारे चोर असतात.
३) क्याश भरताना/ आणताना दोन लोक असावेत. एकटा माणूस पळून जावू शकतो.
४) वाहन चालकावर जरूरी पेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. मुलांना एकटे गाडीतून पाठ्वू नये.
५) घरात रंगकाम सुतारकाम चालू असताना लेबर लोकांचे फोटो घ्यावेत. ते सर्व बघून मग चोर्‍या करू शकतात. ( असे इथे घड्ले आहे)
६) दिवाळी लग्न अश्या वेळी बँकेतून दागिने आणले जातात अश्या वेळी सोसायटीचे वॉचमन, वाहनचालक वगैरे लोक ड्ल्ला मारू शकतात. ते जर नेपाळ, उत्तर प्रदेश अश्या ठिकाणचे असतील तर चोरीचा माल मिळणे अशक्य आहे केवळ.
७) सहली वर वगैरे जाताना रोज बाहेर पड्ताना हॉटेलचा, जवळ्च्या भागाचा फोटो घ्यावा मोबाइलवर.
पत्ता चुकल्यास कामी येतो.
८) मुलांचा पण सहलीच्या ठिकाणी रोज बाहेर पड्ताना फोटो घ्यावा व रात्री रूमवर आल्यावर डिलीट करावा. ती बाय चान्स हरवली तर पोलिस ला देता येतो लगेच. ( ही नेट वरील टिप आहे आपण मुलांकडे लक्ष देतोच. प्रश्नच नाही. )
९) मुले घरी कामवाली बरोबर असली तर वेबकॅम लावून सोडून द्यावे. सिस्टिम हायबरनेट होते मेड च्या लक्षात येत नाही. सर्व रेकॉर्डिन्ग घरी आल्यावर बघावे.
१०) मुलांना एक याहू मेसेन्जर वर आइ बाबांशी बोलण्यापुरतेच अकाउंट उघडावे व वेबकॅमतंत्र समजावून द्यावे. म्हण्जे ते इमरजन्सीत आपल्याला मेसेज देऊ शकतात. अर्थात हे चॅटिन्ग चे धोके माहित असलेल्या मुलांनाच करू द्यावे. पण आज काल घरी नातेवाइक नसतात मग काय करायचे.

मामी, हुड मस्त माहिती Happy
अजुन एक महत्वाचे म्हणजे.. कधी दोन-तीन दिवसांसाठी सुद्धा बाहेर गावी वैगेरे जायचे असले तरी शेजारी ओळखिच्या ठिकाणी सांगून जावे..अर्थात शेजारी हे चांगले आणि खात्रिचे असतील तरच.. पण त्याचा खुप उपयोग होतो.. आमच्या बंगल्यात दोन-तीन वेळेला चोरीचा प्रयत्न झाला होता.. पण शेजार्‍यानी सतर्कतेने आरडा-ओरडा केला.. शेवटी एकमेका साह्य करु.. धोरण अवलंबावे.

मुलांचा पण सहलीच्या ठिकाणी रोज बाहेर पड्ताना फोटो घ्यावा व रात्री रूमवर आल्यावर डिलीट करावा. >>>

मामी, रोज कशाला? Uhoh
टाइमस्टँप यावा म्हणून का?

दिवाळीला गावी गेलेलो असताना आमच्याकडे चोरी झाली. दुपारी १२ वाजता ! त्या आधीच काही महीने घरात फर्निचरचे काम केलेलं होतं बहूतेक त्यांच्यापैकीच असावा कुणीतरी. सोसायटीत १२ फ्लॅट पैकी फक्त ३ घरांतच लोकं होती. हा दुपारी १२ ला आला साधारण ,लॉक तोडले , लॉक तोडताना काहीही आवाज आला नाही शेजारच्यालाही ! फॅन लावला ५ वर , टीव्ही लावला व दार फक्त लोटले. वरच्या लोकांना वाटले की आम्हीच आलो गावावरुन म्हणून त्यांनी काही चौकशी केली नाही. वॉचमन तेंव्हा सोसायटीत नव्हता. आणि त्याने नेमके बायकोचेच कपाट फोडले. त्यात ५-६ ग्राम सोने मिळाले त्याला. चांदी भरपूर होती कपाटात पण त्याने चांदीला हात ही लावला नाही. देवघरात सगळे चांदीचेच देव होते. सगळ्या साड्या कॉटवर टाकल्या होत्या. तो जाताना काही लोकांनी त्याला पाहीले पण.... पोलीस कंप्लेन केली पण काही झाले नाही पुढे.... लॅच लावून घेतले दुसरे. खरं तर वरच्या शेजार्‍यांना आम्ही कधी परत येणार हे जर सांगून ठेवले असते तर कदाचित त्यांनी त्याला हटकले असते... पण बरीच अक्कल विकत घेतली ह्या प्रकाराने. त्याच काळात माझ्या मित्राचे वडील वारले म्हणून तो अचानक गावी गेला व जाताना आमच्याकडे त्याचे २० तोळे सोने ठेवतो म्हणत होता ... आमचे नशिब चांगले म्हणून मी त्याला स्पष्ट नकार दिला! नाहीतर कल्पनाही करवत नाही.

दिप्या, काळजी घे रे भो! त्यातुन शाहुनगर कुदळवाडीजवळच आहे!
आमच्याकडे तर चोरान्चा सुळसुळाट विचारू नका Sad मी जर्मन शेफर्ड पाळण्याच्या गम्भिर विचारात आहे!

जर्मन शेफर्ड चोरून नेत नाहीत अस म्हणायचय का एल टी? Happy
आमच्या घरमालकांचा मोठा अल्सेशीयन कुत्रा पळवुन नेला होता.

आर्फी ही टिप मेन ते फॉरिनर्स मुले हरवतात ना परदेशात त्यांच्या साठी होती. म्हणे मुले हरवली की आयत्या वेळी फोटो नसतो, मग जुना कुठला तरी देतात. मग पोलिसांना त्रास शोधायला. ती ज्या कपड्यात हरवली त्याच कपडयातला फोटो रिलीज करता येतो.

या बाबतीत आपल्या भारतीय आया ग्रेट मुले नजरेआड होउच देत नाहीत.अगदी ३५ -४० ची झाली तरी! दिवे दिवे.

रुनी! Lol
ए, पण चांगली माहिती मिळतेय इथे. मला पार्किंगमधल्या नव्या टू व्हीलर्स, सायकलींची फार काळजी वाटते. साखळ्या लावून, ती चाकातली लॉकवाली रबरी रिंग लावून तरी काय उपयोग? ते रबर कापताअ येतं सहज, साखळ्यांची कुलुपं तोडण्यात चोरांचा हातखंडा! काय करावे? Uhoh

आपल्या भारतीय आया ग्रेट मुले नजरेआड होउच देत नाहीत.अगदी ३५ -४० ची झाली तरी! >>>

>>>
किंवा दुसरी एक बाई आणून ठेवतात वॉचमन म्हणून Proud

तरीही असुदे म्हणून आमच्या विंगने अजून एक खाजगी रखवालदार ठेवला आहे, जो माझ्याच पार्किंगमध्ये बसायचा रात्री. >> तो इथे पण येतो का रखवाली करत? असुदे? Proud Light 1

मी सकाळी खाली येऊन बघतो. गाडी आहे का? असल्यास जीव भांड्यात पडतो. नाही त्या दिवशी नाही. काय करणार? आमच्याकडे दुचाकी चोरीला गेली की २-४ तासाच्या आत एका विशिष्ट एरियात जायचे. तिथे चोरीच्या गाड्या विक्रीला ठेवलेल्या असतात. तुमची गाडी जर तिथे असेल तर ती 'विकत घ्यायची' म्हनजे ५०००० ची १०००० ला वगैरे अक्कलखाती. आणि घरी घेऊन यायचे. तिथे अजिबात सांगायचे नाही की ही गाडी माझी आहे वगैरे. उशीर झाला की गाडी डिस मॅन्टल करून तिचे सुटे भाग करून ठिकठिकाणी विकले जातात आणि चॅसी फेकून दिली जाते.

काही मुले केवळ गम्म्त म्हणून गाड्या पळवतात पेत्रोल सम्पले की तिथेच सोडून देतात . अशा गाड्या बहुधा सापडतात आणि परत मिळतातही. बालेवाडी क्रीदासंकुलात राहात असताना मी रोज चान्दनी चौकात जयचो तेव्हा एका वळणावर एक हीरो होन्डा महिनाभर उभी होती . सुस्थितीत. ती असलीच. सोडून दिलेली. आमच्या सोसायटीतून दुपारी बारा वजता स्कूटी गेली ती मिळाली नाही. पन पल्सर गेली ती चार महिन्यानन्तर पोलीसांकडून मिळाली. कधी कधी पोलीसाना वाहने पळवणारी , चोरणारी एखादी टोळी सापडते मग काही वाहने त्यांच्याकडून मिळतात. अशी वाहने बहुदा परत मिळतात. त्यासाठी मात्र पोलीस कम्प्लेन्ट आधी नोन्दलेली असावी लागते.

आं ? हा असुदे दिवसा कम्पनीत आणि रात्री जी एसच्या सोसायटीत रखवालदार म्हणून काम करतो? मनोरंजन मधला संजीवकुमार किंवा इर्मा मधला जॅक लेमन आठवला.

Pages