प्रतिमंत्रिमंडळ- संकल्पना

Submitted by चंपक on 15 November, 2009 - 18:14

भारत देशाची राज्यघटना लिहिताना घटनाकारांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास करुन त्यातील चांगले मुद्दे आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केले होते. परंतु मुलत: इंग्लंड च्या राज्यपद्धतीमधे असलेल्या प्रतिमंत्रिमंडळाच्या संकल्पनेला आपल्या देशाच्या राज्यघटनेत का सामावले गेले नाही? हा एक प्रश्नच आहे.

जबाबदार विरोधी पक्ष असणे हे सुदृढ लोकशाही साठी आवश्यक आहे. विधीमंडळांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी अभ्यासु लोकांची एक टीम असावी हा प्रतिमंत्रीमंडळा चा उद्देश आहे.
दुर्दैवाने आपल्या देशात वा राज्यात विरोधी पक्षांनी ह्या संकल्पनेला जास्त महत्व दिले नाही. किंवा ह्या संकल्पनेचे महत्व त्यांना कळले नाही. या संकल्पनेचे बीज आपल्या देशात रुजवावे अशी अपेक्षा बाळगुन हा उपक्रम सुरु करत आहोत.

इंग्लंड (व ऑस्ट्रेलिया) तसेच इरर अनेक देशांमध्ये राज्यकारभारात प्रतिमंत्रिमंडळ अर्थात शॅडो कॅबिनेट ला मानाचे स्थान आहे. सत्ता बदल झाल्यास विरोधी पक्षात एखादा प्रती-मंत्री ज्या खात्याचा कारभार पाहत असतो, तेच खाते त्याला प्राधान्याने दिले जाते! http://en.wikipedia.org/wiki/Shadow_Cabinet

सुरुवातीला महाराष्ट्र राज्य स्तरावर हे काम सुरु करत आहोत. राज्य मंत्रिमंडळाच्या धरतीवर मायबोलीवर देखील ४३ लोकांची एक टीम असावी कि ज्यामध्ये एका सदस्याने (अथवा दोन वा तीन चा एक गट, असे ४३ गट असावेत) प्रत्येक मंत्र्याच्या कामावर लक्ष ठेवुन असावे. दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. त्यात झालेले निर्णय दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रांमधुन अथवा शासनाच्या प्रसिद्धी विभागाकडुन प्रसिद्ध केले जातात. तसेच मंत्री महोदय त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये देखील अनेक निर्णय जाहीर करत असतात. ते निर्णय प्रसारमाध्यमातुन आपल्या पर्यंत पोहचत असतात. असे हे सर्व निर्णय अभ्यासुन त्यावर या ग्रुप च्या सदस्यांनी चर्चा / भाष्य करावे. उत्तेजन्/टीका/ सुचना अश्या सर्व बाजुंनी त्याचा विचार व्हावा.

या उपक्रमाचे पुढील पाऊल म्हणजे, इथे चर्चेच्या माध्यमातुन एखाद्या विषयावर/ निर्णयावर तयार केलेले मुद्दे (मायबोली गटाच्या नावे) सरकारच्या संबंधीत खात्याशी (संबंधित मंत्री अथवा त्या खात्याचे सचिव)
पत्रव्यवहारा द्वारे कळवले जातील.

मायबोली परिवारामध्ये जगभर विविध देशांमध्ये राहणारे सुशिक्षित लोक आहेत. हे लोक जरी प्रत्यक्ष मतदानामध्ये भाग घेउन भारतातील राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होउ शकत नसले, तरी त्यांच्या परदेशातील वास्तव्य, शिक्षण, कामकाजाच्या अनुभवाचा फायदा भारतातील राजकीय निर्णय प्रक्रियेवर त्यांनी व्यक्त केलेल्या मत्-मतांतरातुन मिळावा अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला एखादा निर्णय जगाच्या विविध देशांमध्ये/राज्यांमध्ये पुर्वी घेतला गेला आहे का? असेल तर त्याचे तेथील परिणाम काय होते, ह्याचे अनुभव सांगणे अपेक्षित आहे. (अर्थात शासनाची हे काम करण्याची स्वतःची देखील एक यंत्रणा असते, पण ती यंत्रणा दरवेळी बरोबर/योग्य निष्कर्ष काढतेच असे नाही!)
मायबोलीवर वावरणार्‍या अनेक चौकस, सामाजिक बांधिलकी जपणार्‍या अन राजकारण-प्रशासनाची आवड असणार्‍या लोकांनी ह्यावर जरुर विचार करावा ही विनंती. आपल्या सुचानांचे स्वागत!

या उपक्रमाच्या माध्यमातुन : सुशिक्षित लोकांनी राजकिय प्रक्रियेत सामील व्हावे, आपल्या दैनंदिन आयुष्यात सरकारी निर्णयांचे किती परिणाम होतात ह्याची जाणीव व्हावी, आपल्या छोट्या मोठ्या अनुभवांचा इतरांना लाभ व्हावा, तसेच सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणारा एक सामान्य नागरिकांचा दबाव गट निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे.

भारतीय संसदीय राजकारणामध्ये प्रतिमंत्रिमंडळ या संकल्पनेचा उदय व्हावा ह्यासाठी हे एक पहिले पाउल ठरावे ही अपेक्षा! Happy

मुंबई दिल्ली त आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार! Happy

*** सुरुवातीला कृषी, शिक्षण अन आरोग्य ह्या तीन खात्याच्या निर्णायावर चर्चा करण्यासाठी प्रत्येकी एक नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. मायबोलीकरांनी आपले विचार त्या धाग्यावर मांडावेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

email ids can be untracable. But maayboli should have the ip addresses of computers from where members make each post. It may or may not be needed here, but it will be worth knowing what maayboli's policy is if they are requested to release this information. Do they periodically get rid of that information? Do they keep it permanently?

Many public forums have 3 topics as taboo: religion, sex and politics. If so, those forums, and their members, don't have to care about such things.

But I do think that these things will evolve. The suggested idea is a good one and we need to start. You can not decide all the rules before you start. They have to evolve.

उदय अन अशिष च्या मुद्द्यांना अनुमोदन.

मुद्दाला सोयइस्कर रित्या बग ल देण्यात आले आहे>>>
जबाबदारी ही अशी गोष्ट आहे कि जी कुणीही घेउ शकतो असे सर्वांना वाटते पण कुणीतरी दुसरा घेइल, म्हणुन सर्वांपैकी कुणीच घेत नाही!!! दुसर्‍याने जबाबदारी घ्यावी ही आपली अपेक्षा असते, पण आपण स्वतः ती घेतो का? हे आत्मपरिक्षण आपण केंव्हा करणार.
'दुसरे जबाबदारी घेत नाहीत' असे ओरडणार्या अन स्वतः बेजबाबदार पणे वागणार्या लोकांसाठी जे लोक जबाबदारी घेउ शकतात त्यांनी किती म्हणुन वेळ वाया घालवायचा? अन का?

हिंदु पेपर मध्ये>>>>>>> व्रुत्तपत्रे अन चॅनेल वाल्यांबद्दलचे निरिक्षण नोंदवले आहे. त्याच बातमीत १९५२ च्या पहिल्या निवडणुकीपासुन सुरु असलेले, काही कमी झालेले अन काही वाढलेले गैरप्रकार नोंदवलेले आहेत. जसा काळ बदलत जातो तसे गैरप्रकार करण्याचे अन त्याला आवर घालण्याचे मार्ग ही सुचत जातात हेच त्या लेखात नमुद केलेले आहे. (अन जनता इतकी मुर्ख नसते कि तिला पेपरात आलेली बातमी अन पेपरात आणलेली बातमी ह्यात फरक कळत नाही! अगदी ग्रामीण भागत गेला तरी लोकांना हा फरक कळतो!)

मला वाटतं ज्याना या संकल्पनेमधे इंटरेस्ट आहे त्यानी चर्चा करायला सुरूवात करावी.

लाल टोंमॅटो या आयडीला सीरीयसली विचारात घ्यायचे काही कारण नाही, कारण त्यानी स्वतःची काहीही माहिती दिलेली नाही, मायबोलीवर या आयडीने आतापर्यंत काही "लिखाण" केलेले दिसले नाही..

त्यामुळे "दुर्लक्ष" अथवा "इग्नोर" करणे जास्त चांगले!

चंपक, तू हा ग्रूप सध्यातरी "फक्त सदस्यासाठी" चालू ठेव. सदस्य कुणाला करायचे हे तुझ्यावर अवलंबून असेल..

नंदिनी ला अनुमोदन.
चंपक,
उगाच उत्तरे देण्यात वेळ वाया घालवू नकोस. ईथे एकच आयडी (लालभाईंची आठवण आली Happy मुद्द्याला बगल द्यायचा प्रयत्न करत आहे.

>>तू हा ग्रूप सध्यातरी "फक्त सदस्यासाठी" चालू ठेव. सदस्य कुणाला करायचे हे तुझ्यावर अवलंबून असेल..
हे मात्र लवकर करायला हवे रे.. पण वेब्मास्टरच्या पोस्ट नुसार सध्ध्या सदस्यत्व व नोंदणी "स्थगित" आहे ना? Sad

माझा, प्रतिसाद,
चक्क delete मारला आहे, मायबोलि प्रशाशन, क्रुपया दखल घ्यावि, कुटल्याहि प्रकारे
वादाचा प्रतिसाद नसुन सुधा तो delete करण्या त आलेला आहे. मायबोलिवर योग्य
विरोधि प्रतिक्रिया देणे पण चुकिचे आहे का?

कोण म्हणतय त्या पेक्षा काय म्हणतय हे मह्त्वाच नाही का? ड्यु आयडी घेउन प्र.म.म बनवले तर काय बिघडते? इथे जे निर्णय ख.म.म घेते त्याचा निरपेक्ष (शास्त्रोक्त) आढावा घेणे व सुचना / प्रस्ताव देणे अपेक्षित आहे असे वाटते. असे असताना ते विवेचन (शास्त्रोक्त) अस्चिग कडुन आले काय किंवा लिंब्या कडुन काय फरक पडतो? तुम्हला माहीति असते का कुठला बाबु त्या मंत्र्याला सल्ल देतो त्यारायला करता हेन्काम करतो... लटो कायच्या काय फाटे काहूनह्फोडु रायला ?

ह्यात वैयक्तीक जबाब्दारीचा प्रश्ण येतोच कुठे. हा वैचारिक गट आहे / असेल असे वाटते. विचारांची कसली आलिये इतर जबाब्दारी? तो शास्त्रोक्त पुर्ण अभ्यासांती दाखले देउन मांडला व मत्दारां पर्यंत पोचवला की संपली जबाब्दारी.

चंपका होउन जाउ दे...

पेशवे साहेब,
वैयक्तीक जबाब्दारीचा प्रश्ण का येत नाहि, भारतात ल्या राज्किय परिणा मान्चि काय परिस्थिति आहे हे सर्वाना माहिति आहे, जेव्हा परिणा म भो गाय्चि वेळ येइल तो भोग्ण्यचि पण तयारि पण टेवलि पाहिजे. मला इथे मुम्बित बसुन Aus chya राज्किय परिस्थिति वर लिहाय्ला मला काय जाते हो ? होउन जाउद्या न मग स्वतः चे ख्ररे नाव व ख्ररा पत्ता publish करुन परिणामाना सामोरे जा न.....

ईतर ख्ररे माय्बोलि कर,
अहो माय्बोलि चे अस्तितव धोक्यात येत आहे आणि आपण गप्प बसाय्चे का ?का मायबोलि ला सुध्हा negative publicity havi aahe?
राज्किय प्रक्शोभ हि mob mentality अस्ते तिथे खरे काय आनि खोठे काय हे सम्जुन घेण्याइत्कि कुवत सगल्या न्मधे नस्ते,।हे सर्व महिति अस्लयने हे सर्व लोक ख्ररे नाव आणी पता ध्याय्ला तयार नहित, याबाबत कोणि हि समोर आलेले नाहि जो आला तो कोणिहि भारतात रहात नाहि. उलट हे लोक ख्ररे नाव पता धाय्ला नेहमि
विरोध्च करत आहेत. आहो वैचारिक लेखनाच्य नावाखा लि जरि काहि विवादित काहि लिहले तर त्याचे सामाजिक परिणा म काय होतात ते तुम्ह्ल्आला माहिति नाहित का? म्हणुन तर हे लोक ख्ररे नाव आणि पत्ता देत नाहित्....हे सम्जुन घेणे किवा सम्जुन न समजलल्या साऱखे करणे याचि जबाब्दारि मात्र आपलिच!

>>ह्यात वैयक्तीक जबाब्दारीचा प्रश्ण येतोच कुठे. हा वैचारिक गट आहे / असेल असे वाटते.<<

म्हणजे "गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर..."

हीच भावना सगळ्यांची असेल तर तुमच्या विचारांची दखल कोण घेणार? राज्यकर्त्यांकडुन तुम्ही accountability ची अपेक्षा ठेवता मग तोच नियम तुम्हाला लागु होत नाही?

अहो माय्बोलि चे अस्तितव धोक्यात येत आहे >>

मायबोलीचे अस्तित्व धोक्यात आणण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाहीये. झालेच तर मायबोलीवर एक जिव्हाळ्याचा विषय /उपक्रम सुरु करुन तिच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेमध्ये कणभर वाढ करण्याचाच प्रयत्न आहे..... आपण निस्चिंत असा. गेली अनेक (किंवा एक) वर्षे ज्या प्रमाणे आपण मायबोलीला सक्रिय पाठिंबा दिलात, उपक्रमांत सहभागी झालात, अन मायबोलीवरील साहित्याचा अन उपक्रमांचा आस्वाद/सहभाग घेतला, तसाच पुढे अनंत काळ आपल्याला मायबोलीचा सहवास लाभेल ह्याचा भरवसा बाळगा!

ज्या तळमळीने आपण मायबोलीचे अस्तित्व टिकवु पाहत आहात, त्याच तळमळीने आपण महाराष्ट्राचे, त्यातील सामान्य जनतेचे अस्तित्व टिकवणे अन त्यांचे जीवन थोडेफार/ यथाशक्ती सुसह्य करणे ह्या कार्यात देखील आपला भक्कम सहभाग द्याल ही अपेक्षा!

*******

"गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर..."
>>>>>
उपक्रमाची संकल्पना संपुर्ण वाचली, तर आपल्याला उपक्रमाची सुरुवात, त्याचे पुढचे पाउल, अन भविष्यात होणारे थोडे सकारात्मक परिणाम कळु शकतील.

कुठेही सगळ्या विचारवंतांची identity reveal करु असे ठोस वाक्य आढळले नाही. असेल तर दाखवा.

माझी comment संदर्भ दिलेल्या वाक्याच्या context मध्ये वाचली गेली असे ग्रहीत धरतो. त्यात जर तुम्हाला काहीही तथ्य वाटत नसेल तर सोडुन ध्या. उपक्रमासाठी माझ्या शुभेच्छा!

राज , ह्या सदंर्भात आधीच काय काय खबरदारी घेता येईल Including Name , Phone ई.ई. ची चर्चा सुरु आहे . कृपया गैरसमज नसावा.

या उपक्रमात सहभागी होणारांचे विचार जास्त महत्वाचे आहेत! त्या विचारांत एखादा वादग्रस्त मुद्दा असेल तर त्यातुन होउ शकणार्‍या संभाव्य दुष्परिणामांमुळे मायबोली परिवाराला हानी होऊ नये, यासाठी काय करता येईल? हाच या चर्चेचा विषय आहे.

तो मुद्दा कोणी मांडला,हे गौण आहे. (कारण सगळे मायबोलीकर हे एकाच परिवाराचे सदस्य आहेत असे एकमेकांशी वागत असतात, अन वेळोवेळी ही भावना व्यक्त झालेली आहेच.) उडदामाजी काळे गोरे.. नुसार काही खोडसाळ संगणक चाचे असतील, तर त्यांना प्रतिबंध कसा करावा यावर तज्ञांनी आपण आपले मत मांडावे!

याउपर, मायबोलीवर वावरणार्या कोणाची ओळख दाखवणे, न-दाखवणे हा या चर्चेचा विषय नाही. तो मुद्दा वेगळ्या बीबीवर चर्चेला घ्यावा ही विनंती.

मी महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राच्या वेबसाईट वर एकदा पोस्ट केले होते (मुंबई पोलीस आयुक्तांना थेट प्रश्न) तेंव्हा त्यांनी, ते पोस्ट लगेच न दाखवता, मॉडरेट करुन मग पोस्ट केले जाईल असे कळवले. असे काही इथे करता येईल का? --माझे स्वतःचे ज्ञान ह्यात कमी असल्याने मी त्यावर जास्त भाष्य करु शकत नाही.

>>कृपया गैरसमज नसावा.<<
गैरसमज अजीबात नाही. फक्त खुंटी हलवून बळकट करण्याचा माझा एक अयशस्वी प्रयत्न... Happy

फारच सुंदर संकल्पना आहे. शिक्षण किंवा सामाजिक न्याय, भट्क्या विमुक्त व इतर मागासवर्गीयांचे कल्याण सहभाग घ्यायला आवडेल.

चंपक,
या संकल्पनेबद्द्ल सगळ्यात प्रथम तुझे अभिनंदन Happy
मला या उपक्रमात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल... मला काम करण्याची इच्छा असलेले क्षेत्र आहे उद्योग, रोजगार आणि स्वयंरोजगार!

मायबोली प्रशासकांच्या मायबोली संकेतस्थळाच्या धोरणानुसार अन मायबोली हितचिंतकांच्या शंकांचे गांभीर्य लक्षात घेता, प्रतिमंत्रिमडळ गट यापुढे मायबोलीवर कार्यरत असणार नाही. परंतु, इंटरनेट वर इतरत्र, जसे याहु, गुगल, ऑर्कुट इ. इ. वर जर हा गट स्थापन होउ शकला, तर त्याबद्दल ची माहीती मायबोलीवर प्रकाशित कराण्यास मायबोली प्रशासनाने परवानगी दिली आहे. (उदा, सुपंथ हा गट).

प्रतिमंत्रिमंडळ गटामध्ये काम करु इच्छिणार्या सर्वांनी आता याहु, गुगल ग्रुप, ऑर्कुट कम्युनिटी वा इतर मर्ग सुचवावेत. सध्या मी असा एक गट तयार केला आहे.
http://groups.google.com/group/maharashtra-shadow-cabinet
(ज्यांना सामील व्हायचे आहे, त्यांनी इ मेल पत्ता कळवावा.)

तज्ञ मंडळींच्या सल्ल्याची अन मदतीची अपेक्षा आहे.

सदर उपक्रमाला सुरुवातीच्या काळात केलेल्या मदतीबद्दल अन यापुढे ही मदत करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मी व्यक्तीशः मायबोली प्रशासनाचा आभारी आहे.

धन्यवाद!

यापुढे मायबोलीवर कार्यरत असणार नाही>>> म्हणजे माबोच फोरम वापरता येणार नाही असंच ना? जर फो र म वापरता येणार नसेल इतरत्र स्थापन झालेल्या गटाची माहीती मायबोलीवर प्रकाशित कशी काय केली जाऊ शकते?

याहु, गुगल ग्रुप, ऑर्कुट कम्युनिटी>> ह्यावर खरेखुरे लोक/ आयडी सहभागी होतील कशावरून??

हा फोरम दुसरीकडे हलवल्याचा निर्णय घेतला आहे तेंव्हा आता परत त्याच विषयांवर अडकून पडण्यात काही अर्थ नाही. ज्याना यात सहभागी होण्याची इच्छा आहे ते वर लिहिल्याप्रमाणे सहभागी होऊ शकतात. ज्याना त्यात कोण सहभागी होणार याची शंका आहे त्यानी भाग घेऊ नये.

हा गट पूर्णपणे स्वतंत्र असून मायबोलीशी त्याचा काही संबंध नाही. मायबोलीशी संबंधीत नसलेल्या कितीतरी संकेतस्थळाची/ब्लॉगची/गटाची लिंक (तिथला प्रत्यक्ष मजकूर नाही) मायबोलीकर वेगवेगळ्या पद्धतीने देत असतात इतराना सांगत असतात त्यात काही वावगे नाही आणि या गटासाठी काही वेगळे धोरणही नाही.

कृपया इथे तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा लिहू नये. २-३ दिवसात इथली प्रतिक्रिया लिहण्याची सोयही बंद केली जाईल.

आणि आशा प्रकारे चांगले उपक्रम चालु होण्यापुर्वीच बारगळण्याची पुर्नावृत्ती झाली! भारतात असेच होते. त्यामुळे आपल्या देशात चांगले विचारवंत असुन ही भारतापेक्षा पाश्चिमात्य देश त्याच उपयोग करुन आपल्या पुढे आहेत.:( Angry

अरेरे Sad .. छावा बरोबर बोललात. इतका चांगला ऊपक्रम आहे. निदान प्राथमीक विचारप्रक्रिया तरी मायबोलीवर सफल होऊ शकली असती आणि जेव्हा ठोस कृती करायची वेळ येइल तेव्हा गुगलवर वगैरे नक्की बोलता आले असते पण ते ही होऊ शकले नाही.

good job चंपक!! उपक्रमाला मनापासुन सदिच्छा !! ..

प्रशासकीय कामात माझा किती उपयोग होइल माहीत नाही, पण ग्रुप मधे सामील होण्यास नक्की आवडेल. त्या साठी मेल आयडी पाठवत आहे.

ईच्छा तिथे मार्ग..... एक मार्ग बंद झाला कि दुसरा सापडतो! Happy (ओपन द डोअर्स ऑफ विंडो!)

उपक्रम सुरु करणे महत्वाचे होते. अन तो सुरु देखील झाला आहे. सर्वप्रथम त्याला स्पेस मिळवुन देण्याचे काम मायबोली प्रशासन अन मायबोलीकरांनी केले आहेच! ब्रावो! Happy

आपल्या देशात चांगले विचारवंत असुन ही भारतापेक्षा पाश्चिमात्य देश त्याच उपयोग करुन आपल्या पुढे आहेत>>>
......... हि खरी शोकांतिका आहेच. या उपक्रमाची सुरुवात देखील जगभरात असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांनी महाराष्ट्रासमोर असलेल्या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल/समस्येबद्दल मत व्यक्त करावे ह्या भावनेनेच केली आहे. अन त्यात बरेच यश देखील मिळाले आहे. गुगलग्रुप वर आजवर १३ लोकांनी सहभाग नोंदवला आहे. (सभासद संख्या हे अश्या उपक्रमाच्या यशाचे मोजमाप ठरु शकत नाही, हे माहीती असुनही ही माहीती देतो आहे)

मी ज्या काही दोन चार देशात राहिलो, फिरलो, तेंव्हा असे जाणवले कि, विकसित देशातही हाडामासाची माणसेच असतात अन अविकसित देशातही तशीच हाडामासाची माणसेच असतात. एकाच सृष्टीनिर्मात्याने बनवलेली हि प्रजा! पण एकमेकांपासुन काही शे/हजार मैलावर राहत असताना, त्यांना मिळणार्‍या भौतिक, मानसिक सुखामध्ये मात्र जमीन आसमान चा फरक का? हा फरक कमी करण्याचा आपण एक सामान्य नागरिक म्हणुन प्रयत्न करु शकु का? असा प्रश्न जेंव्हा जेंव्हा मला पडतो, तेंव्हा मी खुप अस्वस्थ होतो... पण प्रश्नाचे उत्तर नेहमीच सकारात्मक असते! हम होंगे कामयाब!:)

ऑडॅसिटी ऑफ होप वाचताना पण हेच लक्षात येते कि विकसित म्हणवल्या जाणार्‍या अमेरिकेत देखील दोन अमेरिका आहेत. अन त्यांना एकत्र करण्यासाठी, विकासाच्या वाटेवरचे सह प्रवाशी बनण्यासाठी, माणसाला माणसासारखी वागणुक मिळावी म्हणुन झटण्यासाठी मार्टीन ल्युथर किंग पासुन रोजा पार्क्स ते बराक ओबामा पर्यंत अनेक सामान्य लोकांनी प्रयन केले अन करत आहेत. कारण उम्मीद पे दुनिया कायम है! आपल्या भारत देशातही अशी असंख्य उदाहरणे आपल्या समोर आहेतच!

***प्रतिमंत्रिमंडळ ग्रुप मायबोलीवरुन हलवल्याच्या निषेधार्थ, राज्य मंत्रिमंडळाने त्यांच्या या सप्ताहातील बैठकीचे निर्णय अजुन जाहेर केलेले नाहीत! दखल घेणारेच कोणी नसेल, तर आम्ही निर्णय का जाहीर करायचे असा त्यांचा सवाल आहे! ... दिवा Happy

जबाबदार विरोधी पक्ष असणे हे सुदृढ लोकशाही साठी आवश्यक आहे
चंपक जी ......आपल्या राज्यात विरोध कधी तरी दिसतो ...कारण त्यांना कधिच दाबलं गेलय ...

Pages