भारत देशाची राज्यघटना लिहिताना घटनाकारांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास करुन त्यातील चांगले मुद्दे आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केले होते. परंतु मुलत: इंग्लंड च्या राज्यपद्धतीमधे असलेल्या प्रतिमंत्रिमंडळाच्या संकल्पनेला आपल्या देशाच्या राज्यघटनेत का सामावले गेले नाही? हा एक प्रश्नच आहे.
जबाबदार विरोधी पक्ष असणे हे सुदृढ लोकशाही साठी आवश्यक आहे. विधीमंडळांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी अभ्यासु लोकांची एक टीम असावी हा प्रतिमंत्रीमंडळा चा उद्देश आहे.
दुर्दैवाने आपल्या देशात वा राज्यात विरोधी पक्षांनी ह्या संकल्पनेला जास्त महत्व दिले नाही. किंवा ह्या संकल्पनेचे महत्व त्यांना कळले नाही. या संकल्पनेचे बीज आपल्या देशात रुजवावे अशी अपेक्षा बाळगुन हा उपक्रम सुरु करत आहोत.
इंग्लंड (व ऑस्ट्रेलिया) तसेच इरर अनेक देशांमध्ये राज्यकारभारात प्रतिमंत्रिमंडळ अर्थात शॅडो कॅबिनेट ला मानाचे स्थान आहे. सत्ता बदल झाल्यास विरोधी पक्षात एखादा प्रती-मंत्री ज्या खात्याचा कारभार पाहत असतो, तेच खाते त्याला प्राधान्याने दिले जाते! http://en.wikipedia.org/wiki/Shadow_Cabinet
सुरुवातीला महाराष्ट्र राज्य स्तरावर हे काम सुरु करत आहोत. राज्य मंत्रिमंडळाच्या धरतीवर मायबोलीवर देखील ४३ लोकांची एक टीम असावी कि ज्यामध्ये एका सदस्याने (अथवा दोन वा तीन चा एक गट, असे ४३ गट असावेत) प्रत्येक मंत्र्याच्या कामावर लक्ष ठेवुन असावे. दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. त्यात झालेले निर्णय दुसर्या दिवशी वृत्तपत्रांमधुन अथवा शासनाच्या प्रसिद्धी विभागाकडुन प्रसिद्ध केले जातात. तसेच मंत्री महोदय त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये देखील अनेक निर्णय जाहीर करत असतात. ते निर्णय प्रसारमाध्यमातुन आपल्या पर्यंत पोहचत असतात. असे हे सर्व निर्णय अभ्यासुन त्यावर या ग्रुप च्या सदस्यांनी चर्चा / भाष्य करावे. उत्तेजन्/टीका/ सुचना अश्या सर्व बाजुंनी त्याचा विचार व्हावा.
या उपक्रमाचे पुढील पाऊल म्हणजे, इथे चर्चेच्या माध्यमातुन एखाद्या विषयावर/ निर्णयावर तयार केलेले मुद्दे (मायबोली गटाच्या नावे) सरकारच्या संबंधीत खात्याशी (संबंधित मंत्री अथवा त्या खात्याचे सचिव)
पत्रव्यवहारा द्वारे कळवले जातील.
मायबोली परिवारामध्ये जगभर विविध देशांमध्ये राहणारे सुशिक्षित लोक आहेत. हे लोक जरी प्रत्यक्ष मतदानामध्ये भाग घेउन भारतातील राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होउ शकत नसले, तरी त्यांच्या परदेशातील वास्तव्य, शिक्षण, कामकाजाच्या अनुभवाचा फायदा भारतातील राजकीय निर्णय प्रक्रियेवर त्यांनी व्यक्त केलेल्या मत्-मतांतरातुन मिळावा अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला एखादा निर्णय जगाच्या विविध देशांमध्ये/राज्यांमध्ये पुर्वी घेतला गेला आहे का? असेल तर त्याचे तेथील परिणाम काय होते, ह्याचे अनुभव सांगणे अपेक्षित आहे. (अर्थात शासनाची हे काम करण्याची स्वतःची देखील एक यंत्रणा असते, पण ती यंत्रणा दरवेळी बरोबर/योग्य निष्कर्ष काढतेच असे नाही!)
मायबोलीवर वावरणार्या अनेक चौकस, सामाजिक बांधिलकी जपणार्या अन राजकारण-प्रशासनाची आवड असणार्या लोकांनी ह्यावर जरुर विचार करावा ही विनंती. आपल्या सुचानांचे स्वागत!
या उपक्रमाच्या माध्यमातुन : सुशिक्षित लोकांनी राजकिय प्रक्रियेत सामील व्हावे, आपल्या दैनंदिन आयुष्यात सरकारी निर्णयांचे किती परिणाम होतात ह्याची जाणीव व्हावी, आपल्या छोट्या मोठ्या अनुभवांचा इतरांना लाभ व्हावा, तसेच सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणारा एक सामान्य नागरिकांचा दबाव गट निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे.
भारतीय संसदीय राजकारणामध्ये प्रतिमंत्रिमंडळ या संकल्पनेचा उदय व्हावा ह्यासाठी हे एक पहिले पाउल ठरावे ही अपेक्षा! 
मुंबई दिल्ली त आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार! 
*** सुरुवातीला कृषी, शिक्षण अन आरोग्य ह्या तीन खात्याच्या निर्णायावर चर्चा करण्यासाठी प्रत्येकी एक नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. मायबोलीकरांनी आपले विचार त्या धाग्यावर मांडावेत.
मायबोलि तिच्या मुळ कल्पनेला
मायबोलि तिच्या मुळ कल्पनेला डावलुन राजकारणात शीरतेय तेहि काहि सभासदान्च्या हट्टामुळे, आता हेच बघा ना, वर आरति २१ चा प्रतिसाद,जमल तर जमल नाहितर नाहि..............why to anticipate problems at this moment?
सभासद लिहिताना शुचिता पाळेल याचि शाश्वती काय?
आणी त्याचा फरक सभासदाला काय पड्णार तो तर टोपण नावाने वाट्टॅल ते लिहु शकतो, खरि ओळख कोणाला माहित आहे?
Why not these people are helping to NGO who are working in this area or to people like Kiran Bedi, She has her own organisations meant for same type of cause,
का काहि लोक स्वतः चि पोळी भाजुन घ्यायला मायबोलि चा वापर करु पहात आहेत?
या उपक्रमात कसं सह्भागी होता
या उपक्रमात कसं सह्भागी होता येइल?
योग, छान सुचना!
योग, छान सुचना!
मलातर ती सकाळमधली बातमी वाचून
मलातर ती सकाळमधली बातमी वाचून हसू आले. अहो, ती संकल्पना मायबोलीवर मांडली जाऊन फक्त एक आठवडा झाला आहे, आणि तिकडे ते सकाळमध्ये बातमी देऊन मोकळे! एखादा महिना थांबून पहायचं तरी की हे लोक कशाप्रकारे काम करतायेत, इथे मायबोलीवर नक्की काय लिहितायेत, वगैरे.
बातमीतही अगदी मोठमोठे शब्द वापरले आहेत 'आंतरराष्ट्रीय दबावगट', 'साप्ताहिक बैठकीतील प्रत्येक निर्णयाचा कसून अभ्यास करणार', वगैरे. आणि असेही लिहिले आहे की मायबोलीकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ह्या पोष्टीच्या आधी फक्त ३३ प्रतिसाद आहेत ह्या बाफवर.
दिनेश गुणे हे एक ज्येष्ठ मायबोलीकर आहेत. त्यांच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती.
ही संकल्पना मांडायच्या आधीच
ही संकल्पना मांडायच्या आधीच गुंडाळली जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. कारण, तिला मूर्त रूप आल्यावर त्यातून जे बाहेर येईल, ते नक्कीच चांगले, स्तुत्य असेच असेल. या संकल्पनेचा गैरफायदा घेतला जाईल, अशी भीतीही व्यक्त होतेय. पण तो कश्या पद्धतीने ते लक्षात येत नाहीये. उलट मला वाटते, अगदी गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने कुणी काही विधायक सहभाग दिला, तरी ते या संकल्पनेपुरते उपयुक्त ठरेल. म्हणजे, समजा, एखादी योजना सुचवून कुणाला वैयक्तिक लाभ होणार असेल, आणि ती योजना राज्यासाठी त्या व्यक्तिगत लाभापेक्षा लाभदायक असेल, तर ती योजना ही संकल्पना पोषक ठरविण्यासाठी हातभारच लावेल. महाराष्ट्रातच नव्हे, तर जगातही, विकासाच्या योजनांतून वैयक्तिक लाभ उपटल्याची अनेक उदाहरणे असतील. पण, त्यातून होणारा विकास दृष्य आणि सामान्यांच्या हिताचाही असतो. (उड्डाण पूल, एक्सप्रेस वेज, विशेश आर्थिक क्षेत्रे, इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स, अशा अनेक योजनांच्या मुळाशी गेले तर, कुठे ना कुठे कुणाच्या ना कुणाच्या वैयक्तिक लाभाचा वास येऊ शकतो.)
आंतरराष्ट्रीय दबावगट, साप्ताहिक बैठकीतील निर्णयांचा कसून अभ्यास, हे बातमीतले शब्द, म्हणजे ही संकल्पना माडताना व्यक्त झालेल्या अपेक्षा आहेत. याअधीचे एक्दोन प्रतिसाद सोडले, तर बाकीचे प्रतिसाद उत्साहवर्धकच आहेत. (मागचे पान पाहा)
यात कुणीही काय वाट्टेल ते लिहील, आपली पोळी भाजून घेतील, अशाही शंका घेतल्या जातायत. पण, ही संकल्पना मॉडरेट होईल, आणि हा विषय जबाबदारीने हाताळायचाय याची जाणीव असणे हे गृहित असल्याने किमान एव्हढी काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
कुणीतरी चांगल्या उद्देशाने पुढे येतायत. त्यांना प्रोत्साहन मिळाले, तर ही संकल्पना प्रत्यक्षात यायला काहीच अडचण नाही.
किमानपक्षी एक चांगलं विचारमंथन तरी सुरू झालंय. सुरुवात करू या.
`दबावगट' आपोआप तयार होत नाहीत. त्यासाठी त्या गटातली ताकद दाखवून दिली पाहीजे. सुरुवातीला हा नुसता गट असेल. जगभरातील अनुभवी मराठी माणसं एकत्र येतायत, ही सुरुवात तरी चांगलीच आहे. या अनुभवाचा योग्य वापर झाला, तर ही एकत्र आलेली माणसं म्हणजेच `दबावगट' ठरेल.
फक्त `हास्यास्पद' वगैरे समजून उडवून लावली जाऊ नये.
भूतकाळात अशक्य, कल्पनातीत वाटलेल्या, असंख्य गोष्टी आज प्रत्यक्षात आलेल्या आपण सगळेच अनुभवतो आहोत.
त्यासाठी कुणीतरी पुढाकारच घेतलेला असतो...
`आपल्याच घरात शिवाजी जन्माला यावा' असं आता कुणाला वाटायला लागलं असेल, तर बाकीच्यांनी निदान त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे?
मला स्वतःला ही संकल्पना
मला स्वतःला ही संकल्पना आवडली. हा विचार आत्ता पुढे आला आहे, त्यावर विचार करून कार्य सुरू करायला बराच काळ जावा लागेल तसच बरेच लोक, बराच वेळ द्यावा लागेल. कुठल्याही गोष्टीची सुरूवात त्याबद्दलचा विचार मनात येवुनच होते. मी सकाळमधल्या बातमीकडे सकारात्मक नजरेने बघेन की ज्या लोकांना असे काही करावेसे वाटते पण माहित नव्हते नक्की काय आणि कसे करायचे त्यांना ही बातमी कळली, ते लोक मायबोलीचे सदस्य होतील आणि या उपक्रमात सामील होतील. जसे संयुक्ताबद्दल लोकसत्तामध्ये बातमी आली आणि ते वाचुन बर्याच स्त्रिया या उपक्रमात सहभागी झाल्या आणि अजूनही होताहेत.
सगळ्या जत्रेत जसे हौसे, नवसे, गवसे लोक असतातच तसच इथेही होणार हे गृहीत धरले तरी काही सकारात्मक होणार असेल तर नक्कीच तो उपक्रम सुरू करावा. A journey of a thousand miles begins with a single step. अर्थात यासाठी सगळ्यांना काय काय कष्ट घ्यावे लागतील हे पण लक्षात घ्यावे लागेल
मला स्वतःला शिक्षण खात्यात काम करायला आवडेल.
>>>वर आरति २१ चा प्रतिसाद,जमल
>>>वर आरति २१ चा प्रतिसाद,जमल तर जमल नाहितर नाहि...<<<
माझी प्रतिक्रिया पुढील प्रतिक्रियेला होती.
>>> सत्यवादी | "अतिशय चांगली कल्पना आहे.पण खरोखर तुम्ही म्हणता तसा दबावगट निर्माण होईल का? आणि या प्रती मंत्रीमंडळाच्या सूचनांची दखल शासन घेईल का? आजच्या सकाळमधे वरील उपक्रमाबाबत बातमी आहे. मला नाही वाटत वरील कल्पना समजून घेण्याइतपत आपले शासन, राजकारणी लोक आणि सचिवस्तरावरील लोकदेखील प्रगल्भ विचारांचे आणि उदारमतवादी आहेत".<<<
>>>का काहि लोक स्वतः चि पोळी भाजुन घ्यायला मायबोलि चा वापर करु पहात आहेत?<<< असे तुम्ही का म्हणता आहात हे कळेल का?
झुलेलाल, रुनी, उपक्रम नक्कीच
झुलेलाल, रुनी,
उपक्रम नक्कीच चांगला आहे. मी उपक्रमाला वाईट म्हटलेले नाही. अहो पण पेपरात बातमी द्यायच्या आधी थोडं थांबायला नको का? 'हे प्रतिमंत्रीमंडळ हे करणार आहे, ते करणार आहे' असल्या बातम्या देण्यापेक्षा त्यांनी ते करायला सुरू केल्यावर 'असा उपक्रम यशस्वीरित्या सुरू झाला आहे, आणि ते असं असं करतात' अशी बातमी देणं जास्त योग्य नाही का?
वरती ते वेबमास्टर म्हणतात तसे उद्या त्यांनी असे ठरवले की मायबोलीच्या माध्यमातून हे करायचे नाही, तर काय करणार? म्हणजे बातमीही फुकट गेली आणि एवढ्या लोकांचा उत्साहही फुकट गेला.
माझा आक्षेप फक्त पेपरात बातमी देण्याला होता. किमान सुरूवात होईपर्यंततरी वाट पहायला हवी होती.
सँटी हे नवीन तंत्र आहे
सँटी
हे नवीन तंत्र आहे दबावगटावर काम करण्यासाठी दबाव आणण्याचे, ओबामाला नाही का त्याने काही करायच्या आधीच शांततेचे नोबेल दिले आता त्याच्यावर काहीतरी चांगले काम करायचा दबाव आलाच ना. तसच हे पण.
झुलेलाल, तुम्हि जर या ग्रुप
झुलेलाल,
तुम्हि जर या ग्रुप वर पहिले काहि पोस्ट पाहिले तर ख्रर् या अर्थाने हे महाराष्ट्राच्या नविन मंत्रिमंडळासारखे चालु आहे,प्रत्येकाने राजकिय लोकानसारखे आपल्याला कोणते खाते हवे हेच सान्गितले. कल्पनेवर चर्च्या होण्या आधिच खात्याबद्द्ल मागण्या सुरु झाल्या.......
अहो लालटमाटो किवा झुलेलाल अश्या नावाने लिहण्यात तुमचे किवा माझे काय जाते हो, हे तुम्चे किती मन्त्रि स्वतःचि खरि Identity द्यायला स्वतःच्या नाव/पत्ता निशि ध्यायला तयार होतिल? अहो US, AUS, Can मधुन तुम्हा ला किवा मला टिका करायला काय जाते हो? सगळ्या राज़किय पक्षाबद्द्ल चान्गले आणी वाइट मते असणारि लोक असतात ति वयक्तिक असतात. मायबोलि सारख्या स्तुत्य उपक्रमा चा उपयोग अश्या विवादित गोष्टि साटी होउ नये.
का काहि लोक स्वतः चि पोळी
का काहि लोक स्वतः चि पोळी भाजुन घ्यायला मायबोलि चा वापर करु पहात आहेत? >>> मला पण ह्या वाक्याचा अर्थ नाही कळला , इथे विचार मांडणे , त्यावर चर्चा करणे ह्यात कसला स्वार्थ ? जरा उलगडुन सांगितलत तर आम्हालाही कळेल .
मंत्रीमंडळ घेत असलेले सगळेच निर्णय काही महाराष्ट्राच्या विकासाला पोषक नसतात , तसं असतं तर औद्योगीक , शेती , सामाजीक प्रगतीत महाराष्ट्राची एवढी पीछेहाट झाली नसती .
थोडसं वेगळं उदाहरण द्यायचं तर प्रत्येक जिल्ह्याला गावातील अंतर्गत रस्ते , गटार सुधारणासाठी विशेष पॅकेज मिळतं पण त्यातला ९५% निधी त्या जिल्ह्यातल्या सर्वात ताकतवान पुढार्याच्या गावांकडे वळता केला जातो व उरलेल्या ५% वाटाण्याच्या अक्षता इतर गावांच्या/ तालुक्यांच्या नशीबी पडतात . ( थोडक्यात ५० कोटी पैकी ४८ कोटी दोन गावांना आणि २ कोटी १०० गावांना)
( त्यातला किती भाग प्रत्यक्षात सत्कारणी लावला जातो तो भाग वेगळा)
मग हे सगळं , आपण एक सुजाण नागरीक म्हणुन फक्त बघतचं बसायचं का ???
>मग हे सगळं , आपण एक सुजाण
>मग हे सगळं , आपण एक सुजाण नागरीक म्हणुन फक्त बघतचं बसायचं का ???
नाही पण आकडेवारी व ईतर अभ्यास पुराव्याच्या सहाय्याने नेमकी हीच तफावत निदर्शनास आणून द्यायची. अर्थातच आकडेवारी अन त्याचा दृष्य परिणाम ईतपत जरी तपशील दिला तरी कोण किती खातं अन कुणापर्यंतं किती पोचतं हे वेगळं लिहायची गरज ऊरत नाही. प्रत्त्येक पॅकेज चा लेखाजोखा अन ऑडीट हे फायनान्स खात्याला अहवालाच्या स्वरूपात द्यावं लागतं अशा वेळी अशा आकडेवारीमूळे नेमके गैरव्यवहार वा गैरवापर वर बोट ठेवता येतं. पण यासाठी अशी माहिती काढून घेवून त्याखेरीज आव्श्यक तर फिल्ड इंटर्व्यू वगैरे करून माहिती मिळवता येते. नाहीतर किमान अशा पॅकेजची विभागवारी अन त्याचा विनिमय फक्त यावर देखिल चर्चा केली तरी त्याचा रोख नेमक्या दिशेने ठेवता येईल.
असो. वर म्हटल्याप्रमाणे आधी सुरुवात तर व्हायला हवी. सकाळ मधे दिलेली बातमी थोडी premature निश्चीत आहे पण आज ना ऊद्या ईथे हे काम चालू झाल्यावर त्याची प्रसिध्धी होणारच होती. तेव्हा काही बिघडत नाही.
ज्यांना निव्वळ शंकेच्या पोळ्या भाजायच्या आहेत त्यांन्ना भाजूद्यात...... तवा गरम व्हायला मदत होईल
अशा चर्चेत मूळ विषयाचा रोखच
अशा चर्चेत मूळ विषयाचा रोखच दुसरीकडे वळणार नाही, हेही पाहू या!
झुलेलाल, तुमचा आणि तुमच्या
झुलेलाल,
तुमचा आणि तुमच्या लेखनाचा (मायबोली आणि मायबोलीबाहेरच्या) मी चाहता आहे. पण तुम्ही दिलेली बातमी, त्यातला मजकूर, भाषा, त्याची वेळ यातलं काहीच आवडलं नाही. स्पष्ट सांगायचं तर एखाद्या नुकतीच नोकरी लागलेल्या नवशिक्या वार्ताहराने उत्साहाच्या भरात बातमी मिळतेय म्हटल्यावर त्यावर अधिक माहिती न गोळा करता बातमी देवून टाकली असे वाटतेय. "मला सगळ्यात आधी बातमी द्यायला मिळालीय" या भावनेने, तुमच्यातल्या परीपक्व विचारांवर, जुन्या जाणत्या पत्रकारावर मात केली का?
ही बातमी द्यायच्या अगोदर याच ग्रूपमधल्या किती जणांशी तुम्ही संपर्क साधून ते सगळे डुप्लिकेट आयडी नाहीत (एकाच व्यक्तीची अनेक रुपे) याची तुम्ही खात्री करून घेतली? मी ग्रूपचा सभासद नाही पण या ग्रूपमधल्या किती जणानी स्वतःचे नाव देखील त्यांच्या प्रोफाईलमधे लिहिले आहे? आणि नावे लिहिली असली तरी मीच १० वेगवेगळी नावे घेऊन असा गट तयार झाला आहे असे भासवत नसेन कशावरून. मला या ग्रूपच्या सभासदांवर, त्यांच्या हेतूबद्दल आरोप करायचा नाही. कृपया त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. या ग्रूपचा दुरुपयोग कसा करणे शक्य आहे याबद्दल सुचलेले हे उदाहरण आहे.
हा प्रतिसाद मूळ विषयाला धरूनच आहे. इथे नुकत्याच सुरु झालेल्या चर्चा, वैयक्तिक मतं यावर जर इतर माध्यमात हे असेच ठरले आहे, झाले आहे अशा बातम्या येत असतील तर केवळ अशा बातम्या येतात म्हणून इथे सवंग, भडकावून टाकणारे लेखन झाले, एखाद्या मंत्र्याबद्दलच्या वैयक्तिक आकसापोटी उथळ आरोप झाले तर ते या ग्रूपच्या मूळ हेतूला बाधा आणणारे नाही का?
रविवारी मला इंटरनेट सुवीधा
रविवारी मला इंटरनेट सुवीधा उपलब्ध नसते ...त्यामुळे मी शनिवारी वाचणालयातुन काही पुस्तके वाचायला घेउन येतो. गेल्या महिन्यात बराक ओबामा, मिशेल ओबामा, बेनझीर भुत्तो, गोल्डा मेयर, हेन्री किसिंजर, मार्टीन ल्युथर किंग (ज्यु.) ह्याच्या बद्दलची पुस्तके वाचली. कालच्या रविवारी घरी कार्ल मार्क्स चे कॅपीटल हे पुस्तक आणले आहे. त्याची सुरुवात आहे...Every Beginning is Difficult...!
त्यातला काही भाग वाचुन सोमवारी ऑफीसात आलो, अन मायबोली साईट उघडली, तर मी सुरु केलेल्या प्रतिमंत्रिमंडळ संकल्पना धाग्यावर अनेक पोस्ट पडल्याचे पाहुण आश्चर्य वाटले! कारण इतका प्रतिसाद मला अपेक्षित नव्हताच मुळी! वाचकवर्गाकडुन एका नव्याने मांडल्या जात असलेल्या सामाजिक/राजकीय मुद्द्यांवर इतक्या लवकर इतका मोठा प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते...... पण!!! जसे एक एक नवीन पोस्ट वाचत गेलो, तसे तसे उलगडा झाला कि हे करायला गेलो गणपती अन झाला मारुती ह्या नाटकाचा पहिला अंक सुरु होत आहे! असो.
प्रतिमंत्रिमंडळ ही संकल्पना काय आहे? त्याचे कार्य कसे चालले पाहिजे? त्यात कोण असले पाहिजे? ते कुणाला जबाबदार असले पाहिजे? त्याला काही वैधानिक महत्व आहे का? खरे मंत्रिमंडळ ह्याची दखल घेईल का? ह्या संकल्पनेला पाठिंबा देणार्यांचे हेतु काय आहेत/ कसे असावेत? त्यासाठी आचारसंहिता असावी का? मायबोली संकेतस्थळाचा वापर काही लोक स्वार्था साठी करत आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न पाहुण मी तर गडबडुन गेलो...अन Every Begining is Defficult... ह्याची प्रत्यक्ष जाणीव झाली!
मुळात ही संकल्पना आपल्या राज्यात / देशात नवीन आहे, म्हणुन त्या अनुशंगाने प्रश्न उपस्थित होणे सहाजिक आहे. पण म्हणुन सुरुवातच करु नये का? पोहायला आल्याशिवाय पाण्यात पाय ठेवणार नाही...असे म्हणण्याचा हा प्रकार झाला!!! कि कुणी सुरुवात केली कि त्याला मोडता घालण्याचा आसुरी आनंद मिळवणे हाच काही लोकांचा उद्योग आहे?
नकारार्थी मुद्दे वाचुण मनस्ताप नक्कीच झाला, पण ह्या उपक्रमला ज्या मायबोलीकरांनी पाठिंबा दिला, त्यांचे ही कौतुक वाटले. अन ह्याच उत्साही मायबोलीकरांच्या पाठिंब्यावर हा उपक्रम चालु राहील ह्यात शंका नाही! उपक्रमाचे स्वरुप थोडेफार बदलु शकते.....कारण उपक्रम सुरु करणारे अन त्यात सहभाग घेणारे सर्वच नवीन लोक आहेत. केदार, योग, नंदिनी, झुलेलाल, उदय, श्री, अन इतर सदस्य हा उपक्रम पुढे कसा चालु ठेवावा ह्यावर विचार मांडतीलच.
मुळात मी हा उपक्रम सुरु करण्या मागची माझी भुमिका जरा अजुन स्पष्ट करतो. संकल्पनेच्या पहिल्या पोस्ट मध्ये मी जे लिहिले, कि सरकारी निर्णय जरी अभ्यासपुर्ण रितीने घेतले जात असले, तरी त्या प्रक्रियेतील त्रुटी लक्षात घेता, हे निर्णय जगभरातील (आपल्या माहितीतील) तज्ञ लोकांकडुन जर तपासुन घेतले गेले, तर एक नवीन विचार आपल्याला मिळु शकतो. अन तो विचार/सुचना/ उत्तेजनपर दोन शब्द/ टीका करणार्या दोन ओळी जर आपण सरकारी यंत्रणेला कळवु शकलो अन त्यांनी त्यावर काही कृती केली, तर काही बदल घडवण्याची प्रक्रिया आपण सुरु करु शकतो. (बी द चेंज्...असा काही सा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष च्या निवडणुकीताल स्लोगन प्रमाणे) स्मित मला स्वतःला असे वाटते, की जर एखादी गोष्ट एका मोठ्या समाजगटाला अडचणीची वाटत असेल तर ती बदलण्यासाठी तिच्या मुळाशी गेले पाहिजे! अन मध्ये अध्ये कमी अधिकार क्षमतेच्या लोकांकडे गार्हाणी मांडण्यापेक्षा सर्वोच्च क्षमतेच्या अधिकार्याकडे एकदाच न्याय मागितला जायला पाहिजे.
उदा.१- परदेशी शिकणार्या विद्यार्थ्यांना काही देश भारतातील प्रमाणपत्रे नवी दिल्लीतील मनुष्यबळ विकास मंत्रालय अन नंतर परराष्ट्र मंत्रालय अन नंतर त्या देशाची भारतीय वकिलात अशा तीन ठिकाणा हुन साक्षांकित (अटेस्ट) करायला सांगते. भारताच्या कुठल्याही कोपर्यातुन थेट दिल्लीत जाणे, तिथे पातियाला हाउस, बदोदा हाउस, मग चाणक्यपुरी अशा चकरा मारणे...ही प्रक्रिया किचकट आहे. मी स्वतः त्याचा त्रास सहन केलेला आहे. म्हणुन मी २००४/२००५ साली आमच्या तत्कालीन खासदारांच्या माध्यमातुन परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क केला. अन त्यांना हा प्रकार कळवला. काही वर्षानंतर, आता हे सर्व अटेस्टेशन परराष्ट्र मंत्रालयाच्या पातीयाला हाउसच्या एकाच कार्यालयातुन मिळतात! एक खिडकी जिंदाबाद
मी असा दावा करीत नाही की हा बदल फक्त माझ्या एकट्यामुळे घडला, पण माझा दावा असा आहे, की मी त्या बदला च्या प्रक्रियेचा एक भाग होतो!
उदा.२- मला एम एस्सी ला असताना, १९९९, नेवासा तालुक्यातुन श्रीरामपुर तालुक्याला एस.टीं. ने जावे लागे. त्यासाठी मी पास काढत असे. पण अचानक एक दिवस एका तालुक्यातुन दुसर्या तालुक्याला जायला पास दिला जाणार नाही, असा अजब नियम लागु झाला. मी तालुक्याच्या एस टी अधिकार्यांना विचारले, ते म्हणाले कि राज्यभर असे करणार आहेत. मग मी थेट एस टी मंहामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष श्री गिरिष बापट ह्यांना एक पत्र लिहिले. अन त्याची प्रत जिल्हा नियंत्रक, एस टी आगार अहमदनगर ला पाठवली. दोन आठवड्यात जिल्हा नियंत्रकांनी मला संपर्क करुन समक्ष भेटायला बोलावले अन, असा नियम चुकुन केला गेला आहे, अन तो रद्द करत आहोत असे सांगितले. तालुक्यातील बर्याच विद्यार्थ्यांची अडचण दुर झाली!)
छोट्या गोष्टी करायला ही तेवढाच वेळ अन श्रम लागतात अन अजुन थोडे श्रम केले तर तीच गोष्ट मोठ्या प्रमाणावर आपण राबवु शकतो.अन म्हणुन आपण एक जिल्हा, महसुल विभाग वा भौगोलिक विभाग वा एक मंत्री असा छोटा कॅनव्हास न घेता, संपुर्ण महाराष्ट्र राज्याचे एक युनिट मानुन प्रतिमंत्रिमंडळ स्थापण करायचे ठरवले. (आपल्या मायबोलीवर बहुतांश लोक मराठी असल्याने आपण महाराष्ट्र हे युनिट मानले. अजुन एखाद्या साईट वर जर सर्व भारतभरातील लोक जमत असतील, तर तिथे भारत देश युनिट मानता येईल
ही संकल्पना आपल्या राजघटनेतील इतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांप्रमाणेच परकीय असल्याने, परकीय म्हणुन तीवर टीका होणार नाही अशी अपेक्षा होती. ती बहुतांश सफल झाली. कारण मुळ संकल्पनेला सर्वांनीच पाठिंबा दिला! फक्त ती राबवायची कशी ह्यावर विचारमंथन करुयात अन एक सुवर्णमध्य असलेला मार्ग काढुन पुढे वाटचाल करुयात! काय करायचे हे ठरले कि कसे करायचे हे ठरवायला थोडा कमी वेळ लागेल अशी अपेक्षा. मायबोली प्रशासन अन अनुभवी व तज्ञ मायबोलीकरांचे सहकार्य ह्या उपक्रमाला असेच पुढे लाभत राहील ही अपेक्षा.
*******
उपक्रमाला प्रसिद्धी दिली म्हणुन श्री. झुलेलाल ह्यांच्यावर काही मायबोलीकरांनी टीका केली आहे. त्यांना फक्त एकच सांगावेसे वाटते, कि चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळणे खुप अवघड असते. आपल्याकडे वाईट घटना घडली कि पहिल्या पानावर येते, पण चांगल्या घटनेला मात्र पेपर मध्ये छापले जायला अनेक अडथळे पार करावे लागतात. एक छोटे उदा. स्पर्धा परिक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या माझ्या काही मित्रांचा सत्कार मी माझ्या गावी आयोजित केला होता. गावाकडील विद्यार्थ्यांना अन विशेषतः त्यांच्या पालकांना स्पर्धा परिक्षांची माहिती व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणुन मी तो उपक्रम राबवला होता. पण, त्याची बातमी पेपरमध्ये छापुन आणायला मला किती त्रास झाला हे मलाच माहीती! शेवटी, एका मित्राच्या नातेवाईक असलेल्या पत्रकारांनी या उपक्रमाला प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करुन दिली. म्हणुनच श्री झुलेलाल ह्यांनी स्वयंस्फुर्तीने जी बातमी एका दैनिकाला दिली, ते मलातरी नक्कीच कौतुस्कापद वाटले. (फक्त मायबोलीशी संबंधित बातमी असताना, त्यांनी मायबोली प्रशासनाला अगोदर सुचित करायला हवे होते, असे ही वाटते. पुढील वेळी ते ही काळजी घेतील अशी अपेक्षा. कारण काल परवाच अश्या एक बातमीने महाराष्ट्रात मोठा गजहब झाला आहे. मुद्राराक्षसाच्या भितीने का होईना आपण ताक देखील फुंकुन पिले पाहीजे!
यामधये बरेच काहि करन्या
यामधये बरेच काहि करन्या सारखे आहे पण विचार करुन योग्य लोकान्ना मदातिला घेताले पाहिजे ..... अनि काहि मान्यावर मड्ळिचि अवशक्ता आहे.
चंपक, तुम्ही म्हणता,
चंपक, तुम्ही म्हणता, "...मायबोलीशी संबंधित बातमी असताना, त्यांनी मायबोली प्रशासनाला अगोदर सुचित करायला हवे होते". असे नाही करता येणार. मायबोली हे खुले व्यासपीठ आहे. इथे जे होईल त्याची बातमी होऊ शकते आणि तशी ती होत असल्यास त्याची प्रशासनाला पूर्वकल्पना वगैरे देण्याची गरज नाही. इथे असा उपक्रम (संस्थळ नव्हे) सुरू होतो आहे ही बातमी आहे आणि झुलेलाल यांनी ती दिली. ती प्रसिद्ध झाली. इथे सुरू असलेला वाद थोडा वेगळाच आहे. खुले व्यासपीठ म्हटल्यावर तो होतोच. मायबोलीसारखी कम्युनिटी संकेतस्थळे भविष्यात कशा प्रकारे माध्यम म्हणून भूमिका बजावतील त्याची हा उपक्रम, त्यावरून झालेली बातमी आणि त्या बातमीवरून झालेली चर्चा ही एक चुणूक आहे. अधिक परिपक्व सार्वजनिक वावराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ते पुरेसे ठरावे.
>चंपक, तुम्ही म्हणता,
>चंपक, तुम्ही म्हणता, "...मायबोलीशी संबंधित बातमी असताना, त्यांनी मायबोली प्रशासनाला अगोदर सुचित करायला हवे होते". असे नाही करता येणार.
श्रावण,
मला वाटतं चंपक असे म्हणत आहे की झुलेलाल हे मा.बो. चे सदस्य असल्याने बातमी देण्या आधी प्रथम व्यवस्थापनाशी संपर्क साधणे त्यांन्ना शक्य होते किंव्वा तशी अपेक्षा असू शकते, जे एक तिर्हाईत वा मा.बो सदस्य नसलेल्या पत्रकाराला करणे/सुचणे/वा तशी अपेक्षा ठेवणे तितकेसे obvious वाटत नाही.
असो. कुठल्याही परिस्थीत या ऊपक्रमाची आज ना उद्या "विशेष बातमी" होणारच होती कारण चंपक ने म्हटल्याप्रमाणे अजूनही प्रतिमंत्रिमंडळ ही कल्पना देखिल भारतात अभिनव आहे.
तेव्हा मला वाटतं बातमी झाली वा का झाली कशी झाली या वादात न पडता या ऊपक्रमाला योग्य ते रूप, चालना अन कार्यरूप कसे देता येईल याबद्दल विचार मांडले जावेत.
मायबोली प्रशासनाने या गोष्टीचा बाऊ न करता त्यांच्या एकंदर फ्रेमवर्क मधे हा ऊपक्रम कसा निर्धोकपणे चालू करता येईल याबाबत लवकरात लवकर आचारसंहिता व मार्गदर्शक तत्वे ठरवली तर खूप बरे होईल. ईथे विविध क्षेत्रातील अनुभव असलेल्या विविध लोकांन्नी यात काम्/अभ्यास करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे त्याची मा.बो. प्रशासनाने जरूर दखल घ्यावी.
(मा. बो. वरील या ऊपक्रमातील लिखाण/काम यासाठी लागणारा वेळ, श्रम, शक्ती ई. सर्व गोष्टि ईथले सर्व सहभाग घेणारे लोक हे वैयक्तीक, व्यावसायिक, व कौंटुंबीक वेळ काढून "चकटफू" करणार असल्याने त्याला स्वताची पोळी भाजून घेणे असे म्हणणे हे अत्यंत संकुचीत मनोवृत्तीचे निदर्शक आहे.)
उपक्रम छान आहे. सहभागी
उपक्रम छान आहे. सहभागी व्हायला आवडेल.
मला ही संकल्पना आवडली. सहभागी
मला ही संकल्पना आवडली. सहभागी व्हायला आवडेल.
प्रति सर् कार म्ह्न्जे गम्म्त
प्रति सर् कार म्ह्न्जे गम्म्त नाहिये...माय् बोलि वर केले ल्या लिखाना ला ज् बाब् दार कोण? कोणि का हि पण लिहु शकते.. इथे लेखन करणार्या व्यक्तिची जबाबदारी काय,लेखनामागचा खरा हेतू काय यावर कोण लक्ष ठेवणार? >>> यासाठी नियम/आचारसंहिता बनवण्याचे काम सुरु आहे. सर्व मायबोलीकरांनी आपल्या सुचना मांडाव्यात ही विनंती. हे पोस्ट देखील, अश्या शंकांचे माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यासाठीच लिहित आहे.
गेल्या काही दिवसात प्रसिद्धी माध्यमावर होणारे हल्ले पाहता या गोष्टीचे गांभीर्य सगळ्यांच्या लक्षात यावे. >>> नक्कीच. कारण पत्रकार, प्रसारमाध्यमे ह्यावर हल्ले ही नेहमीच घडणारी घटना आहे. परंतु परदेशातही अनेक ठिकाणी प्रसारमाध्यमांवर बंधने आहेत, मानवी हक्कांची गळचेपी होत आहे. संपुर्ण जगभरच राजकीय गुंडगिरि अन झुंडशाही वर नेहमीच चर्चा होत असते. परंतु, हे दबाव झुगारुन जनजागृती करणे, स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे हे प्रसारमाध्याचे कामच आहे. आपण त्यात किती सहभाग घ्यायचा हा आपण स्वतःच निर्णय घ्यायचा आहे.
अतिशय चांगली कल्पना आहे.पण खरोखर तुम्ही म्हणता तसा दबावगट निर्माण होईल का? आणि या प्रती मंत्रीमंडळाच्या सूचनांची दखल शासन घेईल का? आजच्या सकाळमधे वरील उपक्रमाबाबत बातमी आहे.
मला नाही वाटत वरील कल्पना समजून घेण्याइतपत आपले शासन, राजकारणी लोक आणि सचिवस्तरावरील लोकदेखील प्रगल्भ विचारांचे आणि उदारमतवादी आहेत. .>>>>>
ही संकल्पना आपल्या देशात अगदीच नवीन आहे. त्यामुळे हा प्रश्न पडणे, सहाजिक आहे. पण ज्या देशात ही संकल्पना मुळ धरुन आहे, तिथली परिस्थिती पाहिली, तर असे प्रश्न पडणार नाहीत. तशी वेळ यायल फार काळ लागेल हे नक्कीच, अन म्हणुन तर कधीतरी सुरुवात ही करावीच लागणार.
मायबोलि तिच्या मुळ कल्पनेला डावलुन राजकारणात शीरतेय तेहि काहि सभासदान्च्या हट्टामुळे, >>>>>>>
मायबोलीचा मुळ हेतु हा एकमेकांना सकारात्मक सहकार्य करणे असा आहे, असे मला वाटते. अन ह्या उपक्रमाचा हेतु देखील तज्ञ, अभ्यासु, अनुभवी मायबोलीकरांच्या ज्ञानाच/माहितीचा उपयोग सरकारी/सामाजिक उपक्रमांना व्हावा, असाच आहे. इथे कुठे ही राजकारण नाहीये. इथे कुणीही वेगळा राजकीय पक्ष स्थापन केलेला नाही. हा एक सामाजिक उपक्रम आहे.
सभासद लिहिताना शुचिता पाळेल याचि शाश्वती काय?.....आणी त्याचा फरक सभासदाला काय पड्णार तो तर टोपण नावाने वाट्टॅल ते लिहु शकतो, खरि ओळख कोणाला माहित आहे?>>>>>>>
सगळ्या जत्रेत जसे हौसे, नवसे, गवसे लोक असतातच तसच इथेही होणार हे गृहीत धरले तरी काही सकारात्मक होणार असेल तर नक्कीच तो उपक्रम सुरू करावा.
Why not these people are helping to NGO who are working in this area or to people like Kiran Bedi, She has her own organisations meant for same type of cause,>>>>>
अनेक मायबोलीकर अश्या उपक्रमात सहभागी आहेतच. अन सगळ्यांनी एकाच वाटेने जावे, इतर मार्ग शोधुच नयेत असे का वाटावे?
का काहि लोक स्वतः चि पोळी भाजुन घ्यायला मायबोलि चा वापर करु पहात आहेत?>>>>>
माझी राजकीय पोळी (असेल तर!) भाजायला मी समर्थ आहे. माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ह्याची मी नक्कीच काळजी घेत आलेलो आहे, अन घेत राहिल. (नथिंग पर्सनल!)
मलातर ती सकाळमधली बातमी वाचून हसू आले. >>>>>>
का? हे अगदीच संकल्पना मांडणार्या वा तिची बातमी करणार्या बातमीदाराशी वैयक्तीक वाद असल्या सारखे वाटले.
तुम्हि जर या ग्रुप वर पहिले काहि पोस्ट पाहिले तर ख्रर् या अर्थाने हे महाराष्ट्राच्या नविन मंत्रिमंडळासारखे चालु आहे,प्रत्येकाने राजकिय लोकानसारखे आपल्याला कोणते खाते हवे हेच सान्गितले. कल्पनेवर चर्च्या होण्या आधिच खात्याबद्द्ल मागण्या सुरु झाल्या.......>>>>>>
मी स्वतः मायबोलीकरांना त्यांच्या त्यांच्या अभ्यासाचे /आवडीचे खाते निवडा असे सांगितले होते. कारण खर्या मंत्रिमंडळात अन प्रशासनात ही आवड/अभ्यास /कुवत लक्षात न घेता खाते/पदे दिली जातात, अन म्हणुनच गोंधळ होतो. तो गोंधळ इथे होउ नये, लोकांना आपल्या आवडीच्या विषयात काम करायला उत्साह अन आनंद वाटावा हा हेतु आहे. अन ह्यात गैर असे काही नाही.
हे तुम्चे किती मन्त्रि स्वतःचि खरि Identity द्यायला स्वतःच्या नाव/पत्ता निशि ध्यायला तयार होतिल? अहो US, AUS, Can मधुन तुम्हा ला किवा मला टिका करायला काय जाते हो? सगळ्या राज़किय पक्षाबद्द्ल चान्गले आणी वाइट मते असणारि लोक असतात ति वयक्तिक असतात. मायबोलि सारख्या स्तुत्य उपक्रमा चा उपयोग अश्या विवादित गोष्टि साटी होउ नये.>>>>>>>>>
शक्यतो सर्व सभासदांची ओळख तपासण्याचा प्रयत्न केला जाईल. जर संकल्पना माझी आहे, तर मला जर ह्या पुर्ण उपक्रमाची जबाबदारी घ्यायला आवडेल. असे करायला मायबोली प्रशासनाची तयारी असेल तर मीही तयार आहे. माझे खरे नाव पत्ता (देश , विदेशातील) जाहीर करायला माझी हरकत नाही. इतर कुणा ग्रुप मेंबर ची ओळख देणे मग बंधनकारक राहणार नाही.
आता मी हे का करतोय.....माझे काही व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत का? अशी शंका आली तर?.. <<<<<<< एक सामाजिक उपक्रम म्हणुनच मी ह्याकडे बघतो. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. पण अनेक पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते माझे मित्र आहेत. माझी राजकीय पोळी (असेल तर!) भाजायला मी समर्थ आहे. माझ्यामुळे इतरांना त्रास होणार नाही ह्याची मी नक्कीच काळजी घेत आलेलो आहे, अन घेत राहिल. (नथिंग पर्सनल!)
"मला सगळ्यात आधी बातमी द्यायला मिळालीय" या भावनेने, तुमच्यातल्या परीपक्व विचारांवर, जुन्या जाणत्या पत्रकारावर मात केली का? >>>> चांगल्या उपक्रमाला लगोलग प्रसिद्धी मिळणे हा आश्चर्याचा धक्काच होता. मी माझ्या वरील पोस्ट मध्ये ही चांगले उपक्रम अन त्यांची प्रसिद्धी यावर लिहिले आहेच.
या ग्रूपचा दुरुपयोग कसा करणे शक्य आहे याबद्दल सुचलेले हे उदाहरण आहे.>>>>>>
धन्यवाद. गृप च्या सदुपयोगाबद्दल ही आपली मते मांडा. आपल्या सुचनांचे स्वागत आहे. फक्त दुरुपयोगच होइल, असे ग्रुहित धरुनच चालु नका ही विनंती.
या ग्रूपच्या मूळ हेतूला बाधा आणणारे नाही का?>>>>>>
ग्रुप चा मुळ हेतु हा समाजहित साधले जात आहे कि नाही, हे बघणे आहे. एका विशिष्ठ गटाचे हित साधणे हा नाही. या शंकेची काळजी घेतली जाईल.
अधिक परिपक्व सार्वजनिक वावराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ते पुरेसे ठरावे.
>>>>>>
ही जबाबदारी वावरणार्या सर्वांचीच आहे. अन ती नाकारणार्यांना शिक्षा देणारी सक्षम यंत्रणा उभारणे ही जबाबदारीही आपली सर्वांचीच आहे.
मलातर ती सकाळमधली बातमी वाचून
मलातर ती सकाळमधली बातमी वाचून हसू आले. >>>>>>
का? हे अगदीच संकल्पना मांडणार्या वा तिची बातमी करणार्या बातमीदाराशी वैयक्तीक वाद असल्या सारखे वाटले.
>>
चंपक, नाही हो. कृपया गैरसमज करून घेऊ नका. संकल्पना तर तुम्हीच मांडली आहे. तुम्हाला राजकारणाची जाण आहे हे माहित आहे मला. तुमचा आणि माझा कुठे काय वाद आहे? तसेच झुलेलाल हे जाणकार पत्रकार आहेत. ते मायबोलीवरही नेहमी लिहितात. त्यांचा आणि माझा कोणताही वैयक्तिक वाद नाहीये.
मला खरंतर अगदी तसेच वाटले होते जे मानेगुरूजी यांनी लिहिले आहे. पण तितके स्पष्टपणे लिहिणे योग्य वाटले नाही, म्हणून मग हसू आले असे लिहिले. हसू म्हणजे गालातल्या गालात हसू, खो-खो हसू नाही. अगदी पुणेरी भाषेत सांगायचे झाले तर एखादी बातमी वाचून आपण म्हणतो ना "अरे आवरा यांना!" तशी प्रतिक्रिया झाली माझी.
संकल्पना नक्कीच चांगली आहे. मलाही आवडली. पण नक्की काय करायचे आहे ह्याविषयी शंकाच जास्त होत्या. अजूनही नक्की काय करायचे आहे हे कळलेले नाही. महत्वाचे म्हणजे हे सगळे घरी बसून इंटरनेटच्या आधाराने करायचे आहे. तुम्ही ती आचारसंहिता तयार करताय अजून. मायबोली ह्याला परवानगी देईल की नाही ह्याची शाश्वती नाही. एवढ्याशा भांडवलावर पेपरात बातमी देऊन टाकली ह्याचे खरोखर आश्चर्य वाटले.
लालटोमॅटो म्हणाले तसे बरेच लोक इथे खाती मागून मोकळे झाले. काही जाणकार लोक सोडले (केदार वगैरे) तर इतरजणांनी फक्त भावनेच्या भरात खाती मागितली असे वाटते. उपक्रमात सहभागी होण्याच्या हेतूबद्दल अजिबात शंका नाही. हेतू नक्कीच मदत करणे हा आहे. योग यांनीतर अगदी 'कोण किती पैसे खातो हे निदर्शनास आणून देऊ' वगैरे लिहीले. ह्या सगळ्या कल्पनेच्या भरार्या आहेत असे एक क्षण वाटून गेले.
नावं ठेवणे किंवा वैयक्तिक टिका करणे हा माझा हेतू अजिबात नव्हता. पुढे हा उपक्रम व्यवस्थित सुरू झाला आणि मलाही काहीतरी जमेल असे वाटले तर मीसुध्दा जरूर सहभागी होईन.
लालटोमॅटो म्हणाले तसे बरेच
लालटोमॅटो म्हणाले तसे बरेच लोक इथे खाती मागून मोकळे झाले. काही जाणकार लोक सोडले (केदार वगैरे) तर इतरजणांनी फक्त भावनेच्या भरात खाती मागितली असे वाटते. उपक्रमात सहभागी होण्याच्या हेतूबद्दल अजिबात शंका नाही. हेतू नक्कीच मदत करणे हा आहे. योग यांनीतर अगदी 'कोण किती पैसे खातो हे निदर्शनास आणून देऊ' वगैरे लिहीले. ह्या सगळ्या कल्पनेच्या भरार्या आहेत असे एक क्षण वाटून गेले.?>>> माफ करा. पण कुणाचा कुठल्या विषयात किती अभ्यास आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का??
केदार माय्बोलीवर अर्थ शास्त्राच्या संदर्भात लिहितो. इतर लोक लिहत नाहीत म्हणजे ते "भवनेच्या भरात??"
>योग यांनीतर अगदी 'कोण किती
>योग यांनीतर अगदी 'कोण किती पैसे खातो हे निदर्शनास आणून देऊ' वगैरे लिहीले. ह्या सगळ्या कल्पनेच्या भरार्या आहेत असे एक क्षण वाटून गेले.?
nothing personal!
संतीनो,
तुमचा गैरसमाज झालाय. माझी पोस्ट नीट वाचा पाहू. मी ऊलट असे म्हटले आहे की आकडेवारी, अन पाठपुरावा दिला की कुणी किती खाल्ले वगैरे अशी टीका करायची गरज रहात नाही. किंबहुना वैयक्तीक/राजकीय टीका नकोत असेच मी म्हटले आहे.
बाकीच्यांचं राहू द्यात पण तुमचा ज्या विषयात "अभ्यास" आहे त्यावरील मते मांडा ना.
अन्यथा आम्हालाही म्हणावे लागेल "आवरा यांन्ना"...
आचारसंहिता नियम ई. ठरे पर्यंत
आचारसंहिता नियम ई. ठरे पर्यंत शांत रहायची गरज नाही.
> दर बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. त्यात झालेले निर्णय दुसर्या दिवशी वृत्तपत्रांमधुन अथवा शासनाच्या प्रसिद्धी विभागाकडुन प्रसिद्ध केले जातात. तसेच मंत्री महोदय त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये देखील अनेक निर्णय जाहीर करत असतात. ते निर्णय प्रसारमाध्यमातुन आपल्या पर्यंत पोहचत असतात. असे हे सर्व निर्णय अभ्यासुन त्यावर या ग्रुप च्या सदस्यांनी चर्चा / भाष्य करावे. उत्तेजन्/टीका/ सुचना अश्या सर्व बाजुंनी त्याचा विचार व्हावा.
जर, चंपक यांनी, किंवा त्यांनी सजेस्ट केलेल्या कोणी २-३ जाहीर निर्णय येथे चर्चेस आणले तर त्याबद्दल काय करता येऊ शकेल ते आपण पाहु शकु.
मंत्रीमंडळावर जरब वगैरे खुप दुरची गोष्ट आहे, पण या प्रकल्पामुळे लोक निदान डोळसपणे गोष्टी पाहु लागले तर तेही नसे थोडके. होताहोता प्रतिमंत्रिमंडळ पण बनेल. Failure is not a crime, but low aim is.
स्तुत्य उपक्रम! यात पुढे कशा
स्तुत्य उपक्रम! यात पुढे कशा प्रकारचे काम होईल व त्याचा विधायक उपयोग कसा करता येईल याबद्दल उत्सुकता आहे. काही प्रशासकीय मदत लागली तर करायला आवडेल.
नंदिनी >>> माफ करा. पण कुणाचा
नंदिनी >>> माफ करा. पण कुणाचा कुठल्या विषयात किती अभ्यास आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का??<<< अनुमोदन !
चंपक नी नेमक त्याना काय
चंपक नी नेमक त्याना काय अपेक्षित आहे या संकल्पनेत ते लिहिलय. आता "बातमी" का दिली इ चा मुद्दा बाजुला ठेवुन पुढे नाही का जाता येणार?. निदान चर्चे पुरत तरी. कल्पना खरच अतिशय चांगली आहे. कोण काय म्हटल,माझच कस बरोबर या वादातुन एक स्तुत्य उपक्रम रखडला जाउ नये अस वाटत.
चपक शक्यतो...................
चपक
शक्यतो........................ सर्व सभासदांची ओळख तपासण्याचा प्रयत्न................... केला जाईल. जर संकल्पना माझी आहे, तर मला जर ह्या पुर्ण उपक्रमाची जबाबदारी घ्यायला आवडेल. असे करायला मायबोली प्रशासनाची तयारी असेल तर मीही तयार आहे. माझे खरे नाव पत्ता (देश , विदेशातील ......................) जाहीर करायला माझी हरकत नाही. इतर कुणा ग्रुप मेंबर ची ओळख देणे मग बंधनकारक राहणार नाही......................................................
हे असे का? स्व तः चे ख्र रे नाव व पता दयायला एत् रान्वर बंधनकारक का राहणार नाही? इथे मुळ वादाच्या मुद्दाला सोयइस्कर रित्या बग ल देण्यात आले आहे. टोपण ना व का? ख्ररे नाव व पत्ता न देण्याचि त्या जोगे विवादित मुद्दे व त्याचे राजकीय व सामाजिक परिणामाचि जब्बाब दारि घेण्याचि हिम त सगल्याणि का दाख्वु नये?
>>>का काहि लोक स्वतः चि पोळी भाजुन घ्यायला मायबोलि चा वापर करु पहात आहेत?<<< असे तुम्ही का म्हणता आहात हे कळेल का?
Please check the following article about mis use media and people trying new avenues for such mis use,
http://beta.thehindu.com/opinion/columns/article41912.ece
लालटमाटो , आर्टिकल नक्कीच
लालटमाटो , आर्टिकल नक्कीच चांगलं आहे पण ह्या आपल्या उपक्रमात आणि इतर प्रिन्ट मिडिया/ न्युज चॅनल ह्यात एक जमीन आसमानाचा फरक आहे .
न्युज वाल्यांना त्यांचा टीआरपी वाढवायचा असतो जेणेकरुन त्यांना आर्थीक लाभ होईल.
इथे ना तर आपल्याला आपला टीआरपी वाढवायचा आहे आणि आर्थीक लाभाचा तर प्रश्नचं नाही उलट प्रत्येक सदस्याला त्यांचा बहुमुल्य वेळ द्यावा लागणार आहे .
आणि मायबोलीवरच्या प्रत्येक सदस्याचा ईमेल आयडी मायबोली प्रशासकांकडे आहे.
मला तर ह्या गोष्टीचा इतका बाऊ का केला जातोय तेच कळत नाही.
Pages