अबु आझमींचं खरंच चुकलं का?

Submitted by kanchankarai on 9 November, 2009 - 06:32

मला वाटतं घटनेनुसार जवळजवळ २२ संमत भाषांमधून आमदार शपथ घेऊ शकतात. अबू आझमींनी ’त्या’ प्रसंगानंतर पत्रकारांसमोर असे सांगितले आहे की, काही आमदारांनी इंग्रजीतून शपथा घेतल्या. जर ’ते’ चालते तर ’हे’ का नको? हे जर खरं असेल तर आझमींचं काहीच चुकलं नाही. कारण आग्रह मराठीचा आहे, त्यामुळे विरोध इंग्रजी भाषेलाही व्हायला हवा होता. वक्तव्य केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार हे मनसेचं तत्व आहे त्यामुळे ’मनसे’ने थोडं धिराने घ्यायला हवं.

मात्र, आझमींच्या शपथविधीच्या वेळची चित्रफित पाहिली तर लक्षात येतं की खुद्द आझमींची देहबोली देखील हेच दर्शवत होती की, "घेणार मी शपथ हिंदीतून. बघू राज ठाकरे काय करतो ते?" त्यामुळे असं वाटतं की केवळ ’मनसे’ला विरोध करण्यासाठी म्हणूनच अबू आझमींनी हिंदीतून शपथ घेण्याचा आग्रह धरला असावा. कारण राज मसल पॉवर दाखवणार, हे त्यांना माहित असावं.

http://bit.ly/i551U

तिकडे लालूप्रसाद यादव यांना आपण कोणत्या पक्षाविषयी बोलतोय याचं भान आहे की नाही कुणास ठाऊक? आधी त्यांनी आबू आझमींच्या घटनेमुळे ’मनसे’चा धिक्कार केला. मग महाराष्ट्राबद्दल बोलताना त्यांनी शिवसेनेलाही मधे घेतलं. त्यांचं म्हणणं असं आहे की देश तुटला तर तो महाराष्ट्रामुळेच तुटणार!

नि हिंदीला सारखं सारखं राष्ट्रभाषा का म्हणतात? खरंच ती राष्ट्रभाषा आहे का??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नगरी बोलायला चुकलात (अबु ला सान्गा कि "बाबरि वापस तोदेन्गे") म्हणजे तुम्ही श्रीराम मंदिर तोडायची वाट बघणार, मग बाबरी बांधल्यावर तोडणार?
त्याला सांगा की, राम मंदिर तोडण्यासाठी मुंबईतुन निघुन दाखव महाराष्ट्रा बाहेरही जिवंत जाणार नाहीस, ही धमकी नाही, चॅलेंज......

<<अबु ला सान्गा कि "बाबरि वापस तोदेन्गे">>
<<त्याला सांगा की, राम मंदिर तोडण्यासाठी मुंबईतुन निघुन दाखव महाराष्ट्रा बाहेरही जिवंत जाणार नाहीस, ही धमकी नाही, चॅलेंज......>>

परत तेच. आम्ही बोलणार. कृति मात्र दुसर्‍या कुणितरी करायची. मीच त्याचा इ-मेल पत्ता शोधून काढून त्याला एक इ-मेल पाठवतो.

<<अबु ला सान्गा कि "बाबरि वापस तोदेन्गे">>
<<त्याला सांगा की, राम मंदिर तोडण्यासाठी मुंबईतुन निघुन दाखव महाराष्ट्रा बाहेरही जिवंत जाणार नाहीस, ही धमकी नाही, चॅलेंज......>>

परत तेच. आम्ही बोलणार. कृति मात्र दुसर्‍या कुणितरी करायची. मीच त्याचा इ-मेल पत्ता शोधून काढून त्याला एक इ-मेल पाठवतो.

नात्या, हे सगळे चांगले लिहीले आहे. पटण्याजोगे, खरेहि असेल.
पण त्या दगड अबूला यातले एकहि अक्षर कळणार नाही. त्याला नि त्याच्या अ-मराठी भाषिक लोकांच्या टाळक्यात एक भला मोठा धोंडा घालून ते शुद्धीवर आल्यावर त्यांना सांगा मराठी शिका नि बोला नाहीतर दररोज एक धोंडा बसेल डोक्यात!!

http://amrutmanthan.wordpress.com/

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी)
इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)

हे दोन लेख मला खुप छान वाटले. ईतरही अनेक लेख आहेत. वाचले नसतील तर जरूर वाचावे
मला असे वाटते की जर मराठी भाषेला चांगले दिवस आणायचे असतील तर हिंदी भाषेशी स्पर्धा न करता ेंग्रजी भषेशी स्पर्धा करावी लागेल.

Happy

Pages