अबु आझमींचं खरंच चुकलं का?

Submitted by kanchankarai on 9 November, 2009 - 06:32

मला वाटतं घटनेनुसार जवळजवळ २२ संमत भाषांमधून आमदार शपथ घेऊ शकतात. अबू आझमींनी ’त्या’ प्रसंगानंतर पत्रकारांसमोर असे सांगितले आहे की, काही आमदारांनी इंग्रजीतून शपथा घेतल्या. जर ’ते’ चालते तर ’हे’ का नको? हे जर खरं असेल तर आझमींचं काहीच चुकलं नाही. कारण आग्रह मराठीचा आहे, त्यामुळे विरोध इंग्रजी भाषेलाही व्हायला हवा होता. वक्तव्य केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार हे मनसेचं तत्व आहे त्यामुळे ’मनसे’ने थोडं धिराने घ्यायला हवं.

मात्र, आझमींच्या शपथविधीच्या वेळची चित्रफित पाहिली तर लक्षात येतं की खुद्द आझमींची देहबोली देखील हेच दर्शवत होती की, "घेणार मी शपथ हिंदीतून. बघू राज ठाकरे काय करतो ते?" त्यामुळे असं वाटतं की केवळ ’मनसे’ला विरोध करण्यासाठी म्हणूनच अबू आझमींनी हिंदीतून शपथ घेण्याचा आग्रह धरला असावा. कारण राज मसल पॉवर दाखवणार, हे त्यांना माहित असावं.

http://bit.ly/i551U

तिकडे लालूप्रसाद यादव यांना आपण कोणत्या पक्षाविषयी बोलतोय याचं भान आहे की नाही कुणास ठाऊक? आधी त्यांनी आबू आझमींच्या घटनेमुळे ’मनसे’चा धिक्कार केला. मग महाराष्ट्राबद्दल बोलताना त्यांनी शिवसेनेलाही मधे घेतलं. त्यांचं म्हणणं असं आहे की देश तुटला तर तो महाराष्ट्रामुळेच तुटणार!

नि हिंदीला सारखं सारखं राष्ट्रभाषा का म्हणतात? खरंच ती राष्ट्रभाषा आहे का??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो योगेश तो कालचा निखिल वागळेचा अवतार राग आणणाराच होता, अरे कुणाचि मुल कुणि कोणत्या माध्यमात शिक्षणा साठि घालावित हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे!
तुझि पोस्ट पटली Happy

बासुरी,
प्रश्न अनिर्णित असण्यापेक्षाही जास्त गंभीर आहे ते यापुढच्या काळात असे अनेक अनिर्णित प्रश्न उभे राहणार आहेत. राजकारणाचा दर्जा खालावलाय. मतदार जागरूक नाहीत आणि जिथे पाहावे तिथे व्यवस्थापन व शिस्तीचा अभाव. आपण जर भावनात्मक दृष्टीने कालच्या घटनेकडे पाहिले तर कदाचित उत्तर मिळणार नाही. पण तटस्थपणे प्रत्येकाच्या कृती तपासल्या तर त्यांचे हेतूही समजून येतील. म्हणून कोण चुकले, असा निरागस विचार करण्यात अर्थ नाही. राजकारणात वर दिसते त्यापेक्षाही अकल्पित असे पडद्याआड घडत असते. आपण समोर दिसणार्‍या गोष्टींवर चर्चा करत राहतो.
तुझ्या विचारणेला साधे उत्तर देऊ का? रस्त्यावर दोन टग्यांची मारामारी चालली आहे. आपल्याला ठाऊक आहे दोघेही पोचलेले आहेत. मग काय करायचे? पिक्चर एन्जॉय करायचा. सिनेमातील हाणामारीवर आपण घरी येऊन विचारमंथन करतो का? तसेच. चाललीय ती गंमत बघायची. Happy

>>मतदार जागरूक नाहीत आणि जिथे पाहावे तिथे व्यवस्थापन व शिस्तीचा अभाव. >> हे Statement म्हणजे relative terminology आहे असं मला वाटतं. राज्यव्यवस्थापना विस्कटलेली आहे म्हणून मतदारराजा नाराज आहे आणि म्हणून तो जागरूक नाही, आणि ही जागरूकता नसल्यानेच व्यवस्थापनेचा आणखिन बोजवारा उडाला आहे. त्यामुळे दोष कुणा एकाला देणं मुश्किल आहे. कुणितरी एकाने पुढे येऊन सुधारणेला हात पुढे केला तरंच या देशाचं काहीतरी होईल अन्यथा योगेश म्हणतो तसं आपण फक्त अशा लढाया सिनेमातल्या म्हणून पाहात बसायचं.... या शिवाय दुसरं करणार तरी काय? कारण एकटे सिस्टिमला चॅलेंज नाहीच करू शकत... Sad

राजकारणात वर दिसते त्यापेक्षाही अकल्पित असे पडद्याआड घडत असते. आपण समोर दिसणार्‍या गोष्टींवर चर्चा करत राहतो.
>>> तुला हवे तितके उकडीचे मोदक.

baasuree

संस्कृत मधुन शपथ घेणार्‍यांना मला सांगावेसे वाटतेय की सगळे व्यवहार आता संस्कृत मधुनच करा केवळ शपथ का संस्कृत मधुन? ..भाषणे करा , मते मागा पण संस्कृत मधुन. रोजचे सगळे व्यवहार संस्कृत भाषेतुन करा.

सहीय....

थोड थांबा... तो दिवसपण दूर नाही...

फ्रेंचमधून? जरा अशक्य आहे... ते आपल्यापेक्षा पुढारलेले आहेत...

<<माझ्यामते आजघडीला महाराष्ट्रात काय भारतातही महाराजांची तुलना करता येइल या लायकीचा माणुस नाही>>

अनुमोदन.

खरे तर मला असे वाटते, आता भारतात एक महाभारतातल्या सारखे महायुद्धच करून टाकावे. कायदा, शिस्त, घटना सगळ्यांना गुंडाळून ठेवून काम चालले आहे! मारामारी हा एकच उपाय! मग लहान सहान मारामार्‍या करण्यापेक्षा एक जंगी महायुद्ध करून टाका. लोकसंख्या तरी कमी होईल.

>>कुणि बिहारीतून शपथ नाही का घेतली? तामिळमधून, मलयालम मधून? फ्रेंचमधून?<<

आणि क्रिस्तीत का नको?
गुओ चिंग्लान जर निवडणूक लढवू शकल्या असत्या अन् निवडूनही आल्या असत्या, तर त्यांनी चिनीत शपथ घ्यायचीये असं म्हटलं असतं. मग तेही चाललं असतं नाही का? Happy (तसंही हल्ली मायबोलीवर काही लोक चिनीत लिहू लागले आहेत. :फिदी:)

वृत्तपत्र वाचुन कळालेल्या माहीतीनुसारः शपथ ही इंग्रजी अथवा मातृभाषेतुन घ्यावी लागते. अर्थात ती भाषा अधिकृत भाषांपैकी असावी लागते.
त्यामुळे फेंच, चायनीज चालतील असे वातत नाही. त्या आमदारमहोदयांनी मातृभाषा ही संस्कृत असे जाहीर केले नसल्यामुळे त्यांना अध्यक्ष महाराजांनी आक्षेप घेतला असावा.

झक्की, आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे.
लोकशाहीच्या आधी अशीच परिस्थिती होती,

जिसकी लाठी उसकी भैंस,
जिसकी फौज, उसका राज.
आता मराठीत,
ज्याची काठी त्याची म्हैस,
ज्याचे नाही सैन्य, त्याचे दैन्य

रस्त्यावर उतरून राडे करण्यापेक्षा
भिमाने जसे जरासंधाला द्वंद्व युद्धाचे आवाहन केले,
तसे फक्त नेत्या नेत्यांमधे युद्ध झाले तर Happy
दंगलींचा सामान्य जनतेला होणारा त्रास तरी वाचेल.

माझ स्पष्ट मत अस आहे की जर तुम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या पदांसाठी शपथ घेताय तर मग त्या राजयाची भाषा कोणती? त्या भाषेत घ्या ना...
जर लोकशाहीचा अर्थ लोकांचे, लोकांनी चालवलेले, लोकांसाठीचे राज्य असा आहे तर मग त्या राज्याची जी लोकभाषा आहे त्या भाषेतच घ्या ना शपथ!..सरळ आणि सोप

मला वैयक्तिक असे वाटते ,म्हणजे बीबी चे जे टायटल आहे त्यानुसार म्हणतोय मी, अबु आझमींचं खरंच चुकलं का?, या प्रश्नाचं उत्तर दुर्दैवाने नाही असेच आहे. ह्या विषयाचे त्याचे सभागृहाबाहेरचे आणि सभागृहातील 'प्रेझेन्टेशन ' मात्र चुकले आहे. आणि ते तसे प्रेझेन्टेशन हेच त्याचे निवडून येण्याचे भांडवल आहे. (आणि मनसेचेही :))त्यामुळे त्याचे वर्तन हे 'प्रोफेशनल' आहे. मनसेने जे धोरण अवलम्बले आहे , म्हणजे शिवसेने पासून वेगळे पणा दाखवण्यासाठी ,ते भविषकाळात त्याना पाळता येईलच असे नाही. सेनेने मराठी मराठी करता करता किती अमराठी लोकाना सर्वदृष्टीने उपकृत करून ठेवले ते पुन्हा सांगायची गरज नाही. अगदी चंद्रिका केनिया पासून तर संजय दत्तपर्यन्तची उदाहरणे आहेत,. त्यामुळे उद्या पाया 'व्यापक' करण्यासाठी मनसे काय भूमिका घेईल याचा नेम नाही. भावनेचे राजकारण फार टिकत नाही. तेलंगण राज्य परिषदेच्या उमेदवाराची डिपॉझिटे चालू निवडणुकीत तेलंगनातच जप्त झाली आहेत. तसेच कन्नड चळवळी गारू चे वट्टल नागराज हे तर निवडून देखील येत नाहीत....

अबु आझमींचं खरंच चुकलं का? >>> आयला ह्या प्र श्नाच उत्तर हो किंवा नाही एवढं सरळ सोप्प आहे. आणि उत्तर चुकलं नाही असंच आहे Sad

<<तसे फक्त नेत्या नेत्यांमधे युद्ध झाले तर >>
मग तेच नाही का झाले विधानसभेत?

फक्त जरासंध नि भीम यांच्या वेळी इंटरनेट नव्हते, वर्तमानपत्रे, टीव्ही वगैरे काही नव्हते. सरळ सगळे साधे सुधे, रोख ठोक. भीम जिवंत आहे, जरासंध मेला. कोण चुकले नि कोण नाही हे कुणि विचारलेच नाही. शिवाय भीमाला 'तुझे चुकले' हे सांगायची ताकद फक्त कुंति, कृष्ण, धर्मराज, भीष्म, नि फारतर द्रोण इतक्यांनाच होती, नि ते सर्व भीमाच्या पक्षातले किंवा युतीतले!
प्रश्न मिटला.

महायुद्धाचा एक फायदा असतो. अगदी आजकालच्या युगात सुद्धा. हिटलरचे चुकले नि इंग्लंड अमेरिकेचे बरोबर. सद्दाम चूक, अमेरिका बरोबर! आहे का कुणाचा आव्वाज? नि असला तरी लक्ष कोण देतो?

आपण घटना केली, कायदे केले, पण नेतेच ते पाळत नाहीत. त्यांना युद्धच हवे आहे, मग त्यांच्या अनुयायांना घेऊन एक जोरदार महायुद्धच होऊन जाऊ दे. जो जिंकेल तो बरोबर. मधल्यामधे लोकसंख्या कमी झाली तर सभ्य नि शहाण्या लोकांना भारत सुधारण्याची संधि आहे.

अबु आझमींचं खरंच चुकलं का?>>>
कोण चुकलं कोण बरोबर सगळ्यानी मते नोंदवली आहेतच मी पमराने काय लिहावे.
पण शिवसेने साठी खड्डा खोदला जतोय एवढे मात्र नक्की.

एका ईमेल मध्ये मला हे मिळाले :

शांता शेळके, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची क्षमा मागून)
(कालच्या विधानसभेतील प्रसंगानंतर अबू आझमी असंच काही म्हणत असावेत)

मनसेच्या कदमांनी,
आणि शिशिर शिंद्यांनी,
कानाखाली आवाज ऐसा काढीला…
हात नका लावू माझ्या दाढीला…

पर्वा केली नाही मी विनंतीची,
मतं मोठी माझ्यासाठी हिंदीची.. हिंदीची बाई हिंदीची
धावला वसंता पुढे, वांजळेही जोडीला…
हात नका लावू माझ्या दाढीला…

निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात.
चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात.
नऊ डबे अजुन बाकी “इंजिनाच्या” गाडीला…
हात नका लावू माझ्या दाढीला…

मने जिकली मराठी माणसाची,
मती गुंग झाली सेना भाजपाची… भाजपाची बाई भाजपाची
काय म्हनु दादरच्या राजा, तुमच्या कुरघोडीला…
हात नका लावू माझ्या दाढीला…

(या घटनेतून काहीतरी शहाणपण शिकुन आझमी असंअही म्हणतील अशी आशा करतो)

धन्य धन्य भाषा ज्ञाना- तुकयाची…
तीच बोली महाराष्ट्राच्या हृदयाची.. हृदयाची बाई हृदयाची…
मराठीत बोलीन मीही, हिंदीहट्ट सोडीला..!
हात नका लावू माझ्या दाढीला..!

– अभिजीत दाते

मूळ गीत — रेशमाच्या रेघांनी
कवयित्री — शांता शेळके
प्रेरणा — मनसेचा विधानसभेतील राडा

निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात.
चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात.
नऊ डबे अजुन बाकी “इंजिनाच्या” गाडीला…
हात नका लावू माझ्या दाढीला… >>>

हे कडवे लै भारी लिहिलेय... भन्नाट Happy

(कानफटात) देणार्‍याने देत जावे, (शपथ) घेणार्‍याने घेत जावे,
एक दिवस, दोघानाही जनतेने (पार्श्वभागी) फोक ओढावे!

राष्ट्रवाद की प्रांतवाद ? या पार्श्वभुमीवर आर्य चाणक्याचे विचार आजही आवश्यक आहेत असे वाटते.
एवढ्या प्रदिर्घ कालानंतरही या विचारांची आवश्यकता भासावी, हे भारताचे दुर्दैव म्हणावे की काय ?

http://www.youtube.com/watch?v=YPOygiEpE4I&feature=related

दिपा, अगदी बरोबर, हे असले मग्रूर, मस्तवाल बरळणे चालते.
मराठी माणसाच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेणारी प्रवृत्ती आहे ही.
पुढे असेही विधान आहे की, महाराष्ट्राच्या विधानसभेतले कामकाज पण हिंदीतुनच व्हावे अशी मागणी आहे.
दुसर्‍या कोणत्या राज्यात असे चालवून घेतील का ? मुळात परभाषीय लोक निवडून येण्याचे प्रमाण नगण्यच असणार.
कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक निवडून आले तर त्यांना तिकडे मराठीत बोलू दिले असेल का ?
कानडीतच बोलावे लागले असेल ना विधानसभेत...
स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना केली गेली आणि ती अजुनही अस्तित्वात आहे, तर त्या त्या राज्याच्या भाषेचा मान इतर भाषिकांनी मान्य केलाच पाहिजे. निदान राज्यकारभारात तरी...
नाहीतर सरळ कायद्यात बदल करून, संस्थाने जशी विलिन केली तशी राज्ये पण विलिन करून फक्त केंद्र सरकार सगळा कारभार पाहिल असे तरी करावे, म्हणजे हे प्रश्न उद्भवणार नाहीत.

Pages