मला वाटतं घटनेनुसार जवळजवळ २२ संमत भाषांमधून आमदार शपथ घेऊ शकतात. अबू आझमींनी ’त्या’ प्रसंगानंतर पत्रकारांसमोर असे सांगितले आहे की, काही आमदारांनी इंग्रजीतून शपथा घेतल्या. जर ’ते’ चालते तर ’हे’ का नको? हे जर खरं असेल तर आझमींचं काहीच चुकलं नाही. कारण आग्रह मराठीचा आहे, त्यामुळे विरोध इंग्रजी भाषेलाही व्हायला हवा होता. वक्तव्य केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार हे मनसेचं तत्व आहे त्यामुळे ’मनसे’ने थोडं धिराने घ्यायला हवं.
मात्र, आझमींच्या शपथविधीच्या वेळची चित्रफित पाहिली तर लक्षात येतं की खुद्द आझमींची देहबोली देखील हेच दर्शवत होती की, "घेणार मी शपथ हिंदीतून. बघू राज ठाकरे काय करतो ते?" त्यामुळे असं वाटतं की केवळ ’मनसे’ला विरोध करण्यासाठी म्हणूनच अबू आझमींनी हिंदीतून शपथ घेण्याचा आग्रह धरला असावा. कारण राज मसल पॉवर दाखवणार, हे त्यांना माहित असावं.
तिकडे लालूप्रसाद यादव यांना आपण कोणत्या पक्षाविषयी बोलतोय याचं भान आहे की नाही कुणास ठाऊक? आधी त्यांनी आबू आझमींच्या घटनेमुळे ’मनसे’चा धिक्कार केला. मग महाराष्ट्राबद्दल बोलताना त्यांनी शिवसेनेलाही मधे घेतलं. त्यांचं म्हणणं असं आहे की देश तुटला तर तो महाराष्ट्रामुळेच तुटणार!
नि हिंदीला सारखं सारखं राष्ट्रभाषा का म्हणतात? खरंच ती राष्ट्रभाषा आहे का??
१३ - ४ = ?
१३ - ४ = ?
२३०
२३०
विधानसभेतच अबुला थोबाडला हे
विधानसभेतच अबुला थोबाडला हे बरेच झाले!
निदान तमाम महाराष्ट्रातील "अतिसहिष्णू सामान्य नागरिकान्ना" याची जाण तरी येईल यामुळे, की आपल्या "मायच्या भाषेबद्दल" आग्रही रहायचे अस्ते!
अन असे आग्रही की वेळेस ठकासी महाठक बनुन वागावे!
बरं झालं ह्याला थोबडला ते. हे
बरं झालं ह्याला थोबडला ते. हे कुठेतरी व्हायलाच हवं होतं. अरे महाराष्ट्रात रहातोस आणि मराठी येत नाही सांगतोस?? लाज नाही वाटत?
नसेल येत मराठी बोलता तर घ्या शिकुन आणि तसही हिंदी आणि मराठी देवनागरीतुनच लिहील्या जातात ना मग वाचायला तर यायलाच हव्यात.
दु:ख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की चांगले काम करणारे आमदार बाहेर पडले. मलातरी वाटतय ह्यातही राज ठाकरेंची काहीतरी खेळी असावी.
आबु आझमी हे जवळ जवळ २५ पेक्षा
आबु आझमी हे जवळ जवळ २५ पेक्षा जास्ती वर्षं महाराष्ट्रात आहेत तरिही त्यांनी फक्त "मी मराठी शिकेन" असं एक वाक्य लोकांच्या तोंडावर फेकून मल्लिनाथी केली. मराठी शिकायला २५ वर्षं पुरत नाहीत?
ऐतेन च झालं म्हणायचं की... मारहाण वगैरे करणं थोडं अतीच झालं, पण चेव देणारा हा आझमी च होते.
सगळ्या चॅनल्स वर काल हाच धुमाकुळ होता. शिवसेनेचा एक नेता तर काय लहान मुलांसारखं लॉजिक देऊन बोलला, त्यांच्या बुद्धिची किव करावी तितकी थोडी. म्हणे की काही लोकांनी ईंग्रजी भाषेतून शपथ घेतली, ज्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम केलं त्या भाषेत शपथ घेतली तर त्याला विरोध केला गेला नाहिये, जनतेने नोंद घ्यावी - हे सरळ सरळ भडकवणं आहे. आझमीना मराठीतून शपथ घेण्यासाठी का सांगितलं गेलं या मुळ मुद्द्यालाच सगळ्यांनी बगल दिली आहे.
लोकमत वर मी हा सावळा गोंधळ पाहिला निखिल वागळे ने राम कदमांचा निषेध केला कारण ते मराठी चॅनल सोडून आजतक वर मुलाखत द्यायला गेले, शिवाय एक प्रश्न विचारला की तुमची मुलं कोणत्या माध्यमात शिकतात? तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं राम कदम यांनी टाळलं आणि मुलाखतीतून उठून गेले...
मग आणखिच निषेध....
अबु आजमीला कानफटवलं खुपच बर
अबु आजमीला कानफटवलं खुपच बर केलं.. भैया लोकांच्या इश्युच्या वेळीस हाच अबु आझमी काय काय वक्तव्य करीत होता.. २६/११ च्या वेळीहि ह्याची मुक्ताफळ ऐकावी.. खुप बर झालं.
हिंदी चॅनलवर भडकरित्या ही
हिंदी चॅनलवर भडकरित्या ही न्यूज्स दाखवत आहे... त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा उगाच मलिन होत आहे... ह्या हिंदी चॅनल्सवर बहिष्कार घातला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने कडक कारवाई केली पाहिजे...
हे कधीही होणार नाही.
हे कधीही होणार नाही. महाराष्ट्रातले नेते उत्तरेतल्या नेत्यांच्या हाताखालचे आहेत त्यामुळे ते असं काहीही करणार नाहीत.
हिंदी चॅनल्सवर बहिष्कार घातला
हिंदी चॅनल्सवर बहिष्कार घातला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने कडक कारवाई केली पाहिजे...
>>
हे ह्या आधीच झालं असतं तर ही न्युज चॅनेल्स इतकी सवकली नसती. ह्यांना बाहेर काढुन पोकळ बांबुचे फटके दिले पाहीजेत.
मी तर म्हणतो कशाला शपथ
मी तर म्हणतो कशाला शपथ घ्यायची नाटके करता? त्या पेक्षा प्रत्येक नवनिर्वाचित आमदाराने शिवचरित्र वाचलेच पाहिजे असा नियम करा. मग तरी डोक्यात थोडा प्रकाश पडला तर पडला.
आता कालची घटना आणि महाराजांची आगर्याची घटना समान आहे, त्यावेळी जर महाराजांनी अपमान झाला म्हणून त्या औरंगजेबाच्या थोबाडित मारली असती तर? जिवंत आले असते का?
पण महाराजांना परिस्थितीचे भान होते त्यांना ठावूक होते वाचलो तर पुन्हा लढू.
ऊगाच स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्याच्या गोष्टी करायच्या आणि प्रत्यक्षात कृती मात्र यू.पी, बिहारला शोभेल अशी करायची याला काही अर्थ आहे का?
>>>>> त्यावेळी जर महाराजांनी
>>>>> त्यावेळी जर महाराजांनी अपमान झाला म्हणून त्या अकबराच्या थोबाडित मारली असती तर?
अकबराच्या नाही हो! औरन्गजेबाच्या!
अन तुम्हाला काय वाटल महाराज फक्त मुस्काटीत मारुन गप्प बसले अस्ते??? किम्बहुना इतके शेकडो कोस दूरचा प्रवास करुन गेले ते असे तसेच???
अफजलखानास ज्यान्नी लोळवला, शाईस्तेखानाच्या अन्तर्गृहापर्यन्त जे घुसले, त्यापुढे औरन्गजेब कीस खेतकी मुली!!!
त्यान्ना औरन्गजेबास "मुस्काटीत भडकविण्यापेक्षा" अधिक वेगळे काही करण्याची सन्धीच मिळाली नाही, हेच खरे!
असो....... ! बीबीचा हा विषय नाही
परिस्थीतीचे भान असायला हवे
परिस्थीतीचे भान असायला हवे ..पटतय पण आबू आझमी ने जेव्हा चप्पल दाखवली तेव्हा वाटले कि घडले ते असेच घडणार होते.. चप्पल दाखवण्याला कोणी आक्षेप नाही घेतला
अबु आझम्याला कानफटवल हे
अबु आझम्याला कानफटवल हे चांगलच झाल! त्याला धडा शिकवायलाच हवा होता, महाराष्ट्रात २५ वर्षं राहुन म्हणे ह्याला मराठि येत नाहि , मनसे ला चिथवण्या साठिच त्याने तसे केले.
अबु आझमींच खरोखरच खूपच
अबु आझमींच खरोखरच खूपच चुकल
त्याने आधीपासुनच कशाला हिंदीत शपथ घेणार म्हणुन डिवचायचं, चुकलच त्याच
हा माणुस गेली ४० वर्षे महाराष्ट्रात राहुन अजुनही मराठी येत नाही अस कस काय म्हणु शकतो, चुकलच त्याच
त्याने चप्पल दाखवली तरी त्यावर कारवाइ नाही, ही चुक कोणाची?
बाकीच्यांवर कारवाई झाली, ही चुक कोणाची?
आता कालची घटना आणि महाराजांची आगर्याची घटना समान आहे>>>>>>
हे विधान अजीबात पटल नाही
माझ्यामते आजघडीला महाराष्ट्रात काय भारतातही महाराजांची तुलना करता येइल या लायकीचा माणुस नाही
ऊगाच स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्याच्या गोष्टी करायच्या आणि प्रत्यक्षात कृती मात्र यू.पी, बिहारला शोभेल अशी करायची याला काही अर्थ आहे का?>>>>>
हे मात्र १००% पटले
सर्वांना मराठीतुन शपथ घेन्याचे आव्हान करने कौतुकास्पद आहे
पण त्याचे पालन करायला लावन्यासाठी हाथ उगारणे हे फतवा काढन्यासरखेच झाले
त्यामुळे विचार बरोबर असुनही चुकिच्या कृतीमुळे तो विचारच बदनाम होनार नाही याची काळजी घ्यायला हवी होती
पण कितिही म्हटलं तरी शेवटी वाटत झाल हे योग्यच झाल
कोनितरी हे करायलाच हवं होतं
पण त्याचवेळेस संस्कृत मधे शपथ घ्यायला सुरुवातीला विरोध करनार्या अध्यक्षांची काहीच चुक नाहीका?
आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यांना (मनसे सोडुन) निवडुन देवुन आपणच घोड्चुक केली की काय असं आता वाटु लागल आहे

संस्कृत मधुन शपथ घेणार्यांना
संस्कृत मधुन शपथ घेणार्यांना मला सांगावेसे वाटतेय की सगळे व्यवहार आता संस्कृत मधुनच करा केवळ शपथ का संस्कृत मधुन? ..भाषणे करा , मते मागा पण संस्कृत मधुन. रोजचे सगळे व्यवहार संस्कृत भाषेतुन करा.
इंग्रजीतुन अन संस्कृत मधुन शपथ घेउन दाखवायचे काय होते? हेच मला अजुनही उलगडत नाहीये
इंग्रजीतुन अन संस्कृत मधुन
इंग्रजीतुन अन संस्कृत मधुन शपथ घेउन दाखवायचे काय होते? हेच मला अजुनही उलगडत नाहीये
>>
बासुरी इथे फक्त विरोधाला विरोध करणं इतकंच साधायचं होतं.
संस्कृत कितीही झाल तरी भारतीय
संस्कृत कितीही झाल तरी भारतीय भाषांची जननी आहे
त्यामुळे संस्कृतमधे शपथ घेणे हे मला तरी तिला आदर दाखवण्याची कृती वाटते
तसही आता संस्कृत आता फक्त शाळेत टक्केवारी वाढवन्याचाच विषय राहीला आहे
तेव्हा जर कोणी कुठेतरी तिचा वापर करन्याची इच्छा करत असेल तर ते कौतुकास्पद आहे
हो गं योगिता, पण जर शपथ विधी
हो गं योगिता, पण जर शपथ विधी मध्येच जर तुम्ही विरोध दखवताय तर बाकी अजुन तर घडवाचय भविष्य निदान पाच वर्षांसाठी तरी तर हे कितपत सयुक्तिक? विरोध काही मुद्द्यांवर ठिके तत्वांवर ठिके पण ज्या महाराष्ट्रात तुम्ही निवडुन येता त्या राज्याच्या भाषेलाच तुमचा विरोध तर पुढील बाबी विशयी बोलणे नको.
निलंबन जो त्या राज्याची भाषा व्यवहारासाठी वापरणार नाही त्यांचे करायला हवे तर.
>>चप्पल दाखवण्याला कोणी
>>चप्पल दाखवण्याला कोणी आक्षेप नाही घेतला >> काहीतरीच बोलू नका हो (मिडियासारखं) आझमीच्या पक्षातल्या एका पिल्लानं सांगितलं की त्यांचा चप्पलचा बिझनेस आहे आणि ते कधी जोडा वापरत नाहीत, पण सँडल वापरतात त्याचं क्लिप निघालेलं ते काढाण्यासाठी की घालण्यासाठी म्हणून त्यांनी पाय उचललेला म्हणे...

का उगिच भल्या माणसावर आरोप करताय चप्पल दाखवली म्हणून?
निलंबन जो त्या राज्याची भाषा
निलंबन जो त्या राज्याची भाषा व्यवहारासाठी वापरणार नाही त्यांचे करायला हवे तर.
साऊथला एका आमदाराला तिथली स्थानिक भाषा येत नव्हती. त्याचं पद लगेच काढुन घेण्यात आलं. आपल्या राज्यकर्त्यांनाच मराठीची लाज वाटतं असेल तर बोलणंच खुटतं इथे.
>>
इतकी अक्कल आपल्या मुख्यमंत्र्यांना असती तर हा दिवस पहावा लागलाच नसता ना.
>>हिंदी चॅनल्सवर बहिष्कार
>>हिंदी चॅनल्सवर बहिष्कार घातला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने कडक कारवाई केली पाहिजे...<<
मराठीभाषिक समाज एवढी संघशक्ती दाखवू शकेल?! मला खात्री वाटत नाही.. कारण आधीच आपल्यात हिंदू-अहिंदू(पक्षी बौद्ध न् मुस्लिम), ब्राह्मण-ब्राह्मणेतर, दलित-दलितेतर असे अस्मितेचे, अस्तित्वाच्या ओळखी ठरवण्याचे असंख्य जीर्ण-शीर्ण मुद्दे शिल्लक आहेत. त्यात परत शिवधर्म, संतसूर्य प्रकरण, अरबी समुद्रातल्या शिवाजी पुतळ्याचं प्रकरण वगैरे प्रकरणे आपापसांतच लाथा घालायला-खायला आहेतच. त्यामुळे तुम्ही म्हणता तशी सडेतोड, संघटित प्रतिक्रिया आपण देऊ शकू का? प्रश्न पडतो.
पण खरं तर अशी सडेतोड प्रतिक्रिया द्यायला हवी. आज मुंबईत आणि इतर मोठ्या, वाढत्या शहरांमध्ये मराठीतर भाषिक समाज नुसते कामधंद्यांपुरते नांदायला न येता, सत्तेसाठी एकवटू लागलेत, समाजावर प्रभाव पाडू लागले आहेत, असं चित्र दिसत आहे. एकट्या मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टी आणि हिंदी माध्यमांची जबरदस्त मोठी इंडस्ट्री उभी आहे (हिंदी चित्रपटसृष्टीचं केंद्र दिल्ली किंवा इतर कुठल्या हिंदीभाषिक प्रदेशातील राज्यात नसून, मराठ्यांच्या राजधानीत मुंबईत आहे, यातच सर्व काही उघड होतं. खरं तर हॉलिवूडपटांची निर्मिती शांघायात व्हावी, इतकं हे चमत्कारिक, अनैसर्गिक वाटायला हवं.). मराठीभाषिकांनी जर एक महिना अख्ख्या महाराष्ट्रात हिंदी चित्रपट व माध्यमे न बघण्याचा उपक्रम राबवला, तर या इंडस्ट्रीच्या महसुलावर काही अंशी का होईना परिणाम होईल आणि त्यातून या धेंडांना अप्रत्यक्ष संदेशही मिळेल. ब्रिटिशांच्या अन्याय्य वसाहतवादाला प्रत्युत्तर म्हणून स्वदेशीची चळवळ जशी चालवली गेली, तशी आपल्या भाषिक अस्तित्वाची किंमत आपल्या राज्यात आणि विशेषत्वाने त्याच्या राजधानीत राखली जाण्यासाठी मराठ्यांनी स्वभाषिकत्वाचं तत्त्व आचरायला हवं. हिंमत करणार्यांनी आधुनिक मुघलांना चपराक लगावली; आपण संघटित समाज म्हणून इतपततरी धैर्य दाखवायला हवं.
>>संस्कृत कितीही झाल तरी भारतीय भाषांची जननी आहे<<
चिमुरी, हे विधान पूर्णतः सत्य नाही. राज्यघटनेत नोंदवलेल्या २२ भाषा 'प्रजासत्ताकाच्या भाषा' आहेत. त्यांपैकी कन्नड, तमिळ, तेलुगू, बोडो, मणिपुरी, मल्याळम, संथाळी या भाषा संस्कृतोद्भव नाहीत.
फायदा-तोटा ______ मनसे : खुप
फायदा-तोटा
______
मनसे : खुप फायदा
अबु आझ्मि : थोडा फायदा
कोन्ग्रेस - राश्ट्रवादि : फायदाहि नाहि आनि तोटाहि नाहि
रिडालोस - रिपब्लिकन : फायदाहि नाहि आनि तोटाहि नाहि
भाजप : थोडा तोटा
शिवसेना : खुप तोटा
मिडिया : प्रचन्ड फायदा
महाराश्ट्रातिल जनता - प्रचन्ड तोटा
मराठी माणसांच्या
मराठी माणसांच्या प्रतिनिधीच्या सहज साध्या आग्रहाला महाराष्ट्रात निवडून आल्यावरही न जुमानणे
ही मराठी माणसाला व महाराष्ट्राला अपमानास्पद घटना आहे .हा मुद्दा घेवून सर्व पक्षातील मराठी
प्रतिनिधिनी यापुढे ही शपथ महाराष्ट्रात मराठीतच व्हावी असा बदल घटनेतच व्हावा म्हणून प्रयत्न करावेत.
मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न प्रत्येक मराठी माणसाकडून व्हायला हवा .मराठी माणसाने एकत्र यायची
ही योग्य वेळ आहे .क्रांतिच स्वरूप जहाल असाव की मवाळ आसाव हे प्रश्न स्वातंत्र्यापुर्वी सुद्धा होते व
त्याचे परिणाम त्या त्या नेत्यानी अनुभवले पण मुळात भारतमाता स्वतंत्र असावी यावर सर्वांच एक मत
होत .
सभापति गनपतराव यान्नि मराठि
सभापति गनपतराव यान्नि मराठि सोडून इतर भाशान्मध्ये शपथ द्यायला नकार द्यायला पाहिजे होता. म्हनजे प्रश्नच मिटला असता. सभापतिनच्या निर्नयाला न्यायालयात आव्हान देता येत नाहि.
या निलम्बित सदस्यान्नि जर राजिनामा देउन परत निवडनुक लढविलि व ते परत निवडुन आले तर निलम्बन रद्द होते का?
निलंबन जो त्या राज्याची भाषा
निलंबन जो त्या राज्याची भाषा व्यवहारासाठी वापरणार नाही त्यांचे करायला हवे तर.>>>>>
अगदी योग्य
आयबीएन लोकमतवर काल 'आजचा
आयबीएन लोकमतवर काल 'आजचा सवाल' मध्ये निखील वागळे ज्या मूर्खपणाने वागत होता ते बघितल्यावर याला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालकाचा पुरस्कार देणार्यांच्या बुद्धिमत्तेचीच कीव आली. राम कदम मधल्या वेळात 'आजतक'शी बोलायला गेल्याचे समजताच निखील शेपटाला आग लागल्यासारखा बोंबलत होता. मुख्य म्हणजे विषय 'आबू आझमीने हिंदीत शपथ घेऊन योग्य केले का आणि मनसेचा राडा योग्य वाटतो का' हा असताना या माणसाने मनसेच्या नेत्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कशी जातात? अशा वेगळ्याच विषयावरून राम कदमला पिळायला सुरवात केली. बरे झाले राम कदम तिथून उठून गेला ते. निखीलचा आजकाल अनेकदा कार्यक्रमात तोल जायला लागलाय.
अबू आझमी म्हणजे कुणी संत किंवा समाजसेवक नाही, की ज्याला कानफटवल्यावर इतका गंभीरपणे विचार व्हायला हवा आणि मनसेची कार्यपद्धती ठाऊक झाल्यावर ते प्रत्येकवेळी कसे वागणार, हेही उघडच आहे. त्यातून महाराष्ट्राच्या विधानसभेत हे काही आज घडतंय असे नाही. अंगावर धाऊन जाणे, सभापतींपुढे अर्वाच्च बोलणे, माईक हिसकावणे, राजदंड पळवणे, सदस्यांनी परस्परांना शिव्या देणे हे प्रकार घडले आहेत. जांबुवंतराव धोटेंनी तर पेपरवेट फेकून मारला होता. काल त्याचा पुढचा अध्याय बघायला मिळाला. आता असेच पिक्चर येणार यापुढे.
मला आठवतंय. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आम्ही दिल्ली दौर्यावर गेलो होतो. शिवराज पाटील हे लोकसभेचे सभापती होते. त्यांच्या भेटीत ते आम्हाला संसदेची उच्च परंपरा सांगू लागले. आम्ही सगळ्या बॅचनेच ठरवले होते, की कुठल्याही नेत्याला गुडी गुडी प्रश्न विचारायचे नाहीत. राग आला तरी चालेल, पण मर्मभेदीच विचारायचे. तर शिवराज बोलायचे थांबल्यावर मी त्यांना विचारले, 'तुम्ही या उच्च परंपरा सांगताय खर्या, पण आजच आम्ही पेपरमध्ये वाचले, की तमिळनाडूच्या विधानसभेत महिला सदस्यांच्या अंगावरच्या साड्या ओढण्यापर्यंत मजल गाठली गेली. लोकसभेत खासदार चक्क झोपतात. बरेच जण तिथल्या कँटिनमध्ये गप्पा मारत पडीक असतात. घाणेरडे बोलणे, शिव्यागाळी, वेलमध्ये जमून कामकाज बंद पाडणे हे तर सारखेच घडते. मग यात कसली आलीय उच्च परंपरा?' त्यावर ते म्हणाले, 'आडात आहे तेच पोहर्यात येणार. मतदार ज्या लायकीचे लोक निवडून देणार तेच संसदेत बघायला मिळणार'.
त्यांचे ते उद्गार मला आजही आठवतात. किंबहुना अधिक प्रकर्षाने.
pha माहीती बद्दल धन्यवाद आणि
pha माहीती बद्दल धन्यवाद आणि बाकिचा प्रतिसाद पण आवडला
dakshina चप्पल दाखवण्याच कारण सहीच

Buvaa फायदा तोट्याच गणित चांगलच जमलय
योगेश वाक्य पटल आडात असणार
योगेश वाक्य पटल आडात असणार तेच पोहोर्यात येणार.... पण मग कालचा झालेला गोंधळ योग्य होता? आबू आझमी चुकला की ..... त्याला योग्य ते उत्तर देणारे चुकले..प्रश्न शेवटी अनिर्णितच आहे ना या लेखाचा
prabhuneyogesh प्रतिसाद खूपच
prabhuneyogesh प्रतिसाद खूपच छान आहे आणि विचार करायला लावनारा
baasuree मला तरी अस वाटत की
baasuree मला तरी अस वाटत की अश्या प्रश्नांना खरच काही ठोस उत्तर नसतच
प्रत्येकाला स्वतःचंच बरोबर वाटत, आणि त्याकरता त्यांच्याकडे नेहमीच स्पष्टीकरण देखील असत
त्यामुळे कोण कोणाच्या दृष्टीने बरोबर आणि कोण चुक हे ठरणे तसे कठीणच
Pages