मायबोली गणेशोत्सव २०२२

आमचा बाप्पा

प्रसन्न वातावरणात गणेशाचे आगमन झालेले आहे. घरोघरी सगळ्यांचे बाप्पा स्थानापन्न झालेले असतीलच. मागील बरेच दिवस अपार मेहनत घेऊन तुम्ही गणेश मूर्ती निवड, एखादा देखावा, उत्तम सजावट केली असेल. आकर्षक मूर्ती, सजावट, देखावा यांचे दर्शन सर्व मायबोलीकर घरबसल्या घेऊ शकतील.

स्वरचित रचना

मायबोली गणेशोत्सव २०२२ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित रचना इथे लिहूया साहित्यदेवतेची पूजा करुन, फूल ना फूलाची पाकळी गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करु या. रचना, केवळ भक्तीपर असाव्यात असा आग्रह नाही.

मायबोली गणेशोत्सव २०२२

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे २३ वे वर्ष!

large_2022 hgu murti-2-final-V2.jpg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

हस्तलेखन स्पर्धा

या डिजिटल युगात हस्ताक्षर दर्शन दुर्मिळ होत चालले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण या कलेचे संवर्धन करूया. *हस्तलेखन स्पर्धा - विषय - स्वतंत्र भारत*

मोहिनी१२३
अश्विनीमावशी

नैवैद्यम समर्पयामि

तुम्ही बनवलेल्या वा चाखलेल्या नैवेद्याबद्दल लिहा. पाककृती, फोटो किंवा नैवेद्याबरोबर जोडला गेलेला एखादा किस्सा वा आठवणीही आम्हा सर्वाना आवर्जून सांगा.