हस्तलेखन स्पर्धा - विषय - स्वतंत्र भारत

Submitted by संयोजक on 26 August, 2022 - 22:57

hastalekhan-3.gif

हस्तलेखन स्पर्धा - विषय - स्वतंत्र भारत

बालके बाळबोध अक्षर।
घडसुनी करावे सुंदर।
जे देखतांची चतुर।
समाधान पावती ।।

असं रामदास स्वामींनी दासबोध मध्ये खूप पूर्वी लिहून ठेवलेय.
आठवतंय का? लहानपणी टाक, बोरू, शाईची दौत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हाताळली आहे. ज्याचं अक्षर चांगलं त्याला शाळेत काळ्या फळ्यावर एका कोपऱ्यात 'सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना' हा सुविचारही लिहायला मिळायचा. इतकच काय तर वर्गातल्या 'ती'च्यावर वेगळीच छाप पडायची. गृहपाठ वही, प्रयोग वही यासाठी रांगा लागायच्या त्या वेगळ्याच. पूर्वी पत्र घरी यायची त्या वरचं पत्ता लिहिलेलं अक्षर बघूनच कळायचं कुणाचं पत्र आलंय ते. आता मात्र या डिजिटल युगात हस्ताक्षर दर्शन दुर्मिळ होत चालले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण या कलेचे संवर्धन करूया.

नियम :

१) स्पर्धेत भाग घेणारा मायबोलीचा सदस्य असावा अथवा सदस्याचा पाल्य असावा.
स्पर्धा दोन गटात खुली आहे.
अ गट- लहान मुले (वय वर्ष १५ व त्याखालील)
ब गट- मोठ्यांसाठी.
२) अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून त्यासंबंधी कोणतेही लेखन असेल तरी चालेल जसे प्रतिज्ञा (भारत माझा देश आहे), राष्ट्रगीत, भारतासबंधी घोषवाक्य, चारोळी, कविता ... (लेखनाचा स्रोत तुम्ही ठरवा) फक्त ते भाग घेणार्‍या व्यक्तीने स्वतःच्या
हाताने लिहिलेले असावे.
३) लेखन मराठी, संस्कृत भाषेतले व देवनागरी लिपी मधे लिहिलेले असावे.
४) अक्षरलेखना व्यतिरिक्त ईतर सजावट नको.
५) कॅलिग्राफिची साधने वापरु नयेत जसे निब कापलेले पेन, बोरु किंवा क्रोक्युल ई.
६) लेखन साधा बॉलपेन, पेन्सिल, शाईपेनाने लिहिलेले असावे. पेन्सिल, बॉलपेन किंवा शाईपेन कोणत्याही एकाच रंगाचे वापरावेत.
७) कागदावर नाव, गट आणि मायबोली आयडी प्रथम लिहावे त्यानंतर स्वहस्ते मजकूर लिहुन त्याचे फक्त एक छायाचित्र प्रसिद्ध करावे.
8) स्पर्धेच्या प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०२२ (भारतीय प्रमाण वेळ) ते ९ सप्टेंबर २०२२ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
९) एक आयडी ब गटातून एकच प्रवेशिका सादर करू शकतो. अ गटासाठी प्रत्येक पाल्य नावाने एकच प्रवेशिका सादर करू शकतो.
१०) प्रकाशचित्रे कशी द्यायची याच्या माहितीसाठी येथे भेट द्या www.maayboli.com/node/1556
११) मायबोली गणेशोत्सव २०२२ ( https://www.maayboli.com/node/82168 ) या ग्रुपमध्ये धागा काढा , धाग्याला " हस्तलेखन स्पर्धा - (मोठा गट / छोटा गट) - (तुमचा मायबोली आयडी) -(तुमचे नाव-ऐच्छिक -जर प्रशस्तिपत्रकावर पाहिजे असेल तर) " असे शीर्षक द्या.
१२) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील.
तुमच्या शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
|| गणपती बाप्पा मोरया ||
------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी प्रवेशिका तयार आहे. कोणत्या गृपात कसा धागा काढू? का इथेच प्रतिसादात द्यायचे आहे?

@ अश्विनीमावशी >> मायबोली गणेशोत्सव २०२२ या ग्रुपमध्ये धागा काढा , धाग्याला " हस्तलेखन स्पर्धा - (मोठा गट / छोटा गट) - (तुमचा मायबोली आयडी) -(तुमचे नाव-ऐच्छिक -जर प्रशस्तिपत्रकावर पाहिजे असेल तर) " असे शीर्षक द्या.

@हर्पेन >> स्पर्धेच्या प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०२२ (भारतीय प्रमाण वेळ) ते ९ सप्टेंबर २०२२ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील. धागा अपडेट केला आहे.

प्रकाटाआ

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे >> मायबोली गणेशोत्सव २०२२ ( https://www.maayboli.com/node/82168 ) या ग्रुपमध्ये धागा काढा , धाग्याला " हस्तलेखन स्पर्धा - (मोठा गट / छोटा गट) - (तुमचा मायबोली आयडी) -(तुमचे नाव-ऐच्छिक -जर प्रशस्तिपत्रकावर पाहिजे असेल तर) " असे शीर्षक द्या.

विषयवार यादीत उपक्रमापुढे प्रकाशचित्र येण्यासाठी आणखी कुठे अपलोड करायचे आहे का? माझे हस्तलेखन चित्र समोर दिसत नाही इतरांप्रमाणे.

@ sariva - आपला ग्रुप ऑडियन्स (Group content visibility: ) आपण, फक्त ग्रुप निवडला आहे. तो - Public - accessible to all site users केल्यास धागा सर्वांना दिसेल.

त्यांना मला वाटतं मुख्य पानावरच्या अनुक्रमणिकेत चित्र दिसत नाही म्हणायचं आहे. त्यासाठी संपदनात जा आणि लेखात चित्र टाकण्या ऐवजी शीर्षकाखाली "मुख्य चित्र/फोटो" लिहिलं असेल तिकडे फोटो टाका म्हणजे तुम्हाला हवा तिथे दिसेल.

Submitted by sariva on 4 September, 2022 - 19:07 >> अमितव यांनी सांगितल्याप्रमाणे "मुख्य चित्र/फोटो" लिहिलं असेल तिथे फोटो अपलोड करा. खाली स्क्रीनशॉट सुद्धा देत आहे.

photo upload1.jpg