खेळ : धमाल गाणी

Submitted by संयोजक on 30 August, 2022 - 20:31

मायबोलीकरहो, जसा आपल्यासर्वांमध्ये एक गायक दडलेला असतो आणि जेव्हा कोणी पहात नसते तेव्हा तो बाहेर पडतो. तसेच एक कविमनही प्रत्येकात दडलेले असते. तर आज त्या कविमनाला प्रतिभेच्या गगनी, मुक्त भरारी घेउ द्या .चला तर माबोकर - कवि, नवकवि, उदयोन्मुख कवि, होतकरु कवि, हौशेगवशे कवि आणि अन्य सर्वही, होउन जाऊ द्यात धमाल. आपल्या प्रतिभेच्या धुंवाधार प्रपातामध्ये सर्वांना दंग होउ द्यात. .

आजचा धमाल विषय आहे - मराठी गाण्यांच्या २ ओळी व मग त्यांना जोडून स्वरचित २ ओळी

उदाहरणार्थ -

आनंदी आनंद गडे!
इकडे, तिकडे, चोहिंकडे.
तळणात टाकले मेदूवडे,
झारीतून निघाले बटाटेवडे
-----------------
त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का
सत्यभामा परोपरीने विचारतसे पारिजातका
माधवासंगे कटात तूही सामिल झालास का

तर मोकाट सुटू द्या तुमच्यातला कवी आणि चालू करा गाणी लिहायला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगुनी रंगात साऱ्या
रंग माझा वेगळा
न्हाऊनी पाण्यात खाऱ्या
देह माझा खाजला

रेशमाच्या रेघांनी
काळ्या काळ्या धाग्यांनी
करकचून गळा त्याचा दाबीला
हात नका लावू त्याच्या बॉडीला

- एक हिंस्र माणूस

सखे मंद झाल्या तारका,
आता तरी तू येशील ना
घरभाडे दिले आज मी,
वीजेचे बिल तरी देशील ना.

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
आलो कसाबसा
जात नाही तसा
दे माझा पैसा

चल ऊठ रे मुकुंदा झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली

दूधाची पिशवी घे आत बेल बघ वाजली
नको करू ढिलाई चहाची तलफ आली

तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ रंगमहाल
मी निघालेय बघाया नवीन मॉल

वर भांड्यांचा ढीग, पाणी हो तुंबलंय खालती
वर भांड्यांचा ढीग, पाणी हो तुंबलंय खालती
ही विमची वडी झिजून तुकडेही पडती
ही विमची वडी झिजून तुकडेही पडती

उभं रहावं हात चालवावं संपवा ही कामं खुशाल
संपवा ही कामं खुशाल
तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
मी निघालेय बघाया नवीन मॉल

सजण दारी उभा काय आता करु?
घर कधी आवरु? मज कधी सावरु?
फॅसपॅक अजुनि ओला कसा वाळवू?
अर्बन क्लॅपवाला मी कधी बोलवू?

हुरहुर असते तीच उरी
दिवस बरा की रात्र बरी?
पोस्टायला कविता नवी
सांगा कोणती वेळ बरी?

एक आडवा नि तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
मेला कंत्राटदार हसतीय कसा की रत्नागिरीकर पडला गं
या आकांताचा तुलि इशारा कळला गं
खड्डा आडवा येतोय मला कि पाय माझा मोडला गं
नको बाई नको रडू, खड्डयामध्ये नको पडू
इथनं नको तिथनं जाऊ रस्ता गावतो का ते पाहू
का?
पडत्यात

हा स्टेट्स लावला होता एका रत्नागिरीकर मित्राने

झाल्या तिन्ही सांजा, करून कॉर्ब्स-फ्री सांजा
वाट पहाते मी गं, येणार साजण माझा..

खाया मागतच,‌ येणार सरदार
कीटो डाएटचा त्याच्या गळ्यात घालीन आहार
एकच पोशन, देणार नाही दुजा
वाट पहाते मी गं...

सकाळी न्याहारीस, कारल्याचे सार
सोसवेना बाई त्याचा वजनाचा भार
फिरत्या ट्रेडमिलवरी काढवीन धापा
वाट पहाते मी गं...

उरात होत्येय धडधड लाली गालावर आली.
मेरु दंडाच्या शेवटी असीम शक्ती जागृत जहाली
नाग्या अधीर झालाया नाग्या बधीर झालाय
मुलाधारात बसुनी मीलन रुकारी प्रतिक्षा करतोया
अन उडतोय चक्रात पळतोय शुक्रात रंगात आलया
झालं कुण कुण कुण कुण कुण कुण कुंडल
कुण कुण कुण कुण कुण कुण कुंडल
कुण कुण कुण कुण डल.

खटपट खटपट खटपट खटपट
तुझं थेरानSस मोठ्या बकऱ्यांच
Theranos मोठ्या बकऱ्यांच
बोलणं ग मंजुळ मैनेचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग नारी ग नारी ग ह नारी ग ह नारी ग
खटपट खटपट खटपट खटपट
तुझं थेरं ग …
भ्रांति बिलबिलयंची
भ्रांति बिलबिलयंची दिसे आयपीओची प्रभा ढवळी
वाईची रे सनी जवळी
वाईची रे सनी जवळी
लिझ नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
लिझ नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
कशी सिलिकंची व्हॅली खवळी
कशी सिलिकंची व्हॅली खवळी
लिझ नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
दारूणपण सायन्स fake रगताचे जोरात
थेरानSस मोठ्या बकऱ्यांच
बोलणं ग मंजुळ मैनेचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं
नारी ग नारी ग नारी ग ह नारी ग ह नारी ग

ही त्या बलविंदर का कोण तिच्या बॉय फ्रेंड ची कोर्टतली साक्ष आहे का.. Biggrin

नाग्या अधीर झालाया नाग्या बधीर झालाय
मुलाधारात बसुनी मीलन रुकारी प्रतिक्षा करतोया >>> Rofl
थेरॅनोस चे गाणे पण भारी Happy

हा स्टेट्स लावला होता एका रत्नागिरीकर मित्राने >>>> हे विडंबन काव्य 'मिल्या' या मायबोलीकराने केले आहे. इथे बघा : https://www.maayboli.com/blog?page=69&%24Version=1&%24Path=/

हे विडंबन काव्य स्थळकाळातीत आहे. विशेषकरून यंदाच्या पावसाळ्यात या काव्याला नवे धुमारे फुटून शहरांची नावं बदलून बदलून हे फिरत आहे. मूळ काव्यात जरी पुण्याचे नाव असले तरी यावर खरा हक्क डोंबिवलीकरांचाच आहे. आद्यखड्डेभूमीतील भूमीपुत्रांचा हक्क असा हिरावून घेतलेला सहन केला जाणार नाही.

Pages