पाककला उपक्रम - नैवेद्यम् समर्पयामि

Submitted by संयोजक on 30 August, 2022 - 23:46

naivaidyam samarpayami.jpeg

बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक असला तरी आपण मनापासून अर्पण केलेला नैवेद्य बाप्पाला आवडतोच

अशा आपल्या आवडत्या बाप्पाचे १० दिवस कोडकौतुक पुरवण्यात आपण कोणतीच कसर बाकी ठेवत नाही.
घरोघरी आपापल्या पद्धतीने नैवेद्याचे प्रकार बनतात आणि मग चांगला व नेहमीपेक्षा वेगळा नैवेदय सर्वांना फोटो काढून दाखवावासा वाटणारच ना!

तर मग याही वर्षी तुम्ही बनवलेल्या वा चाखलेल्या नैवेद्याबद्दल लिहा. पाककृती, फोटो किंवा नैवेद्याबरोबर जोडला गेलेला एखादा किस्सा वा आठवणीही आम्हा सर्वाना आवर्जून सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

हा पहिल्या दिवशीचा, उशीर झाला टाकायला.
पडवळ भाजी, नीरफणस आणि काळा चणा नारळाच्या दूधात घालून भाजी, कच्च्या केळ्याची भजी, पापड, काकडी चोचवलेली, लालमिरची ओले खोबरे चटणी, वरण भात, आणि घरीच पीठी काढून केलेले मोदक हळदीच्या पानतले .
हि माझी मोदकाची रेसीपी वापरून,

https://youtu.be/sp_EHVdjDPI

560C74EC-E21D-4FFC-8C2A-18635883EEC4.jpeg