चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - जंगलातील प्राण्यांचा गणेशोत्सव.

Submitted by संयोजक on 26 August, 2022 - 15:25

jungla ganeshotsav-1.gif

छोट्या दोस्तांनो, यावेळी मायबोलीबरोबरच जंगलातील प्राणीही साजरा करत आहेत गणेशोत्सव , तिथेही चालू आहे लगबग बाप्पाच्या आगमनाची, सजावटीची, नैवैद्य बनवण्याची. कसा असेल तेथील गणेशोत्सव, कसा असेल तेथील मंडप,कशी असेल तिथली बाप्पाची मिरवणूक? चला, आपल्या कल्पनाशक्तीची दारे सताड उघडा आणि बाप्पाच्या आगमनाच्या तयारीचा, बाप्पाच्या आरतीचा किंवा असाच कोणताही प्रसंग घेऊन चितारीत करा कागदावर जंगलातील प्राणी साजरा करत असलेल्या गणेशोत्सवाचे.

नियम-
१) हा छोट्या दोस्तांसाठीचा उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
२) प्रवेशिकेला "जंगलातील प्राण्यांचा गणेशोत्सव." - मायबोली आयडी - छोट्या दोस्तांचे नाव. अशा प्रकारे शीर्षक द्यावे.
३) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४) वयोगट - 15 वर्षे पर्यंत.
५) चित्र स्वतः काढून रंगवलेले असावे. रंग कोणतेही वापरा.
६) चित्रं गणेश चतुर्थीपासून, ३१ ऑगस्ट २०२२ (भारतीय प्रमाण वेळ) ते ९ सप्टेंबर २०२२ (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) पाठवता येतील.
७) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२२" अशी शब्दखूण द्यावी

छोट्या दोस्त मंडळींनो, लवकरात लवकर पाठवा तुम्ही काढलेली छान छान चित्र.

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users