माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

यावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.
गणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.
असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.

१. DiwaliPantyaMB10.JPG

२. DiwaliPantyaMB09.JPG

३. DiwaliPantyaMB08.JPG

४. DiwaliPantyaMB07.JPG

५. DiwaliPantyaMB06.JPG

६. DiwaliPantyaMB05.JPG

७. DiwaliPantyaMB04.JPG

८. DiwaliPantyaMB03.JPG

९. DiwaliPantyaMB02.JPG

१०. DiwaliPantyaMB01.JPG

११. DiwaliPantyaMB11.JPG

वरच्या सगळ्या गोल पणत्या साधारण 3"x3"x1.5" (LxBxH) आहेत. तर बदामाच्या आकाराच्या पणत्या 3"x3"x1.25" आहेत.

विषय: 

सुंदर. Happy
एका वर्षी मी आणि माझ्या मुलाने अश्याच बाजारातून पांढर्‍या पणत्या आणून घरी रंगवल्या होत्या. पण नंतर त्यात तेल-वात घालायचंही जीवावर आलं होतं.

Pages