स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला उसगावात चांगला तवा कुठे मीळेल... कितीही चांगला तवा घेतला तरी २ वर्षात वाट लागते.रोजच्या पोळ्या आणी डोसे, उत्तप्पे करायला वेगवेगळे तवे घ्यावे का?

रोजच्या पोळ्या आणी डोसे, उत्तप्पे करायला वेगवेगळे तवे घ्यावे का >>> हो. डोसे/उतप्पे करुन झाले की लगेच कापडाने नाही तर टिश्युपेपरने पुसून घेता का तवा ? अगदी गरम असताना धुवायची गरज नाही आणि तेलही तसेच रहात नाही तव्यावर.

हे असे तवे (:)) पोळ्यांना वगैरे चांगले आहेत.

हो, तवा जरा थंड झाला की कापडने पुसुन घेते..वेगवेगळे तवे (पोळ्या आणी डोसे) ठेवले तरी माझे तवे २ वर्षात खराब होतात त्याचे कोटिंग निघायला सुरवात होते . पोळ्यान्चा तवा मात्र मी ली॑॑वीड सोपने विसळुन घेते. ईथे कुठे मीळतील चांगले तवे?

मी पोळ्यांकरता भारतातून निर्लेपचा काठ नसलेला तवा आणलाय. तो फक्त भाकरी /पोळ्यांना वापरते. आता १०-१२ वर्षे झाली, तोच तवा आहे. त्यावर सराटा, चमचा असं काही लावत नाही. हाताने पोळी पलटते किंवा फुलका हातानेच उचलून गॅसवर टाकते.
ज्वारी / तांदळाची भाकरी पण त्याच तव्यावर करते. भाकरी करताना प्रत्येक भाकरी नंतर तवा पुसून घेते.

पराठे, डोसे, फिश फ्राय वगैरे करता कॅल्फलॉनचे किंवा तत्सम वापरते. जरा कोमट असतानाच किचन पेपर टावेलने स्वच्छ पुसुन घेते. कडेचे तेल नीट पुसले गेले पाहिजे दर वेळेस. शिवाय रिकामा तवा फार तापत ठेवू नये.

माझ्याकडे गेली तीन वर्षे हा तवा आहे. पोळ्या, डोसे, उत्तपे, वगैरे सगळे त्यावरच करते. माझ्याकडे गॅस नाही सिरॅमिक ग्लास बर्नर आहे. त्यामुळे काम झाले की तो तवा लगेचच बाजुला काढून ठेवावा लागतो. नाहीतर तव्याची कढई होते Happy - हे माझ्या मैत्रिणीने केलेले पाहिले आहे Happy

या तव्याच्या आधी माझ्याकडे सर्क्युलॉनचा हा तवा होता. तो मी ७ एक वर्षे वापरला.

भाकरीसाठी मी कास्ट आयर्नचा तवा गेले ३-४ वर्षे वापरतेय मस्त होतात भाकरी.
तवा घेताना शक्यतो हार्ड अ‍ॅनोडाईझ्ड घ्यावा असे मला वाटते त्याचे कोटींग इतक्या सहजी निघत नाही.

तवा किती मोठ्या गॅसवर तापवता, तोन पोळ्यांच्या मधे किती वेळ तवा तापत रहातो, पोळीला वगैरे तेल तव्यावर लावता की पोळीवर - हे सगळे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.

खरे तर पोळ्यांना म्हणुन मी बिनाकाठाचाच तवा शोधतेय.. सर्क्युलॉनचा तवा माझ्या एका मैत्रीणीकडे आहे आणी तिचाही अनुभव चांगला आहे. आधी मी पोळ्या, डोसे करयला वेगवेगळे तवे वापरत होते पण एक तवा खराब झाल्याने ( मी एकदा डीश वाशरमधे धुतलेला, अगदी लगेचच त्याचे कोटींग निघायला लागले Sad ) सध्या एकच तव्यावर काम चालु आहे. दोन्ही तवे मी भारतातुनच आणलेय. कास्ट आयर्न नी सर्क्युलॉनचा तवा चांगले वाटताय.

शक्यतोवर पोळ्यांचा तवा आणि दोसे, पराठे, धिरडे, आमलेट ह्यांचा तवा वेगळा असावा. नॉन्स्टिक तवा पोळी सोडून बाकी सगळ्यासाठी एकदम सही !!

माझ्याकडेही फ्युचुरा कुकर गेल्या ८ वर्षापासून आहे. मस्त इडली, बिर्यानी वगैरे होतं. फक्त डीशवॉशर मधे मात्र चुकूनही टाकू नये.

डिश वॉशरमध्ये कूकरचे झाकण टाकू नये (शिट्टी, रिंग, व्हॉल्व्ह काढून ते पण चालतं खरं तर). कूकर टाकला तर चालतोच. माझा गेली सहा वर्षं आरामात आहे. तवे सुद्धा खालच्या रॅकमध्ये लावते तरी चांगले आहेत.

डिशवॉशरमध्ये टाकल्याने माझ्या प्रेस्टीजच्या हार्ड अ‍ॅनोडाइज्ड कुकरची पार वाट लागली.झाकण कधी टाकले नाही म्हणून ते काळे दिसते आणि कुकर पांढरा Proud
असो.माझा फ्युचुरा आला आज Happy

डिश वॉशरमध्ये कुकर बिघडत नाही. पण त्यांच्या रंग्-रुपाची पार वाट लागते.
रच्याकने, पूर्वा आता इडल्या कधी? Proud

त्यांच्या रंग्-रुपाची पार वाट लागते.>> नाही गं मिनी. मी आठ वर्षे झाली वापरतेय. आठवड्यातून २ दा लावते मी डिशवॉशर ला. झाकण कधीच टाकत नाही.

मी नुकताच प्रेस्टीजचा घेतला तो काळा कुकर (हार्ड अनोडाइज्ड). मी विचारत होते घासण्याबद्दल कुठली घासणी की नॉन स्टीकचा स्पंज वगैरे तेव्हा दुकानदाराने सांगितलं डिशवॉशरमधे टाकू नका. (त्याला मी परदेशात रहाणारी का वाटले असेन?)

नारळाचे दोन भाग करण्यासाठी काही उपकरण मिळते का? माझ्या शेजार्‍यांकडे रॉड्सारखे काहीतरी आहे, ते मी प्रत्येकवेळी मागुन आणते. (जे तिने तिच्या सासूकडून काही दिवसांसाठी म्हणून मागून आणलयः) आणि परतच केलं नाहीय)

मला भारतात फुड प्रोसेसर वापरण्याची खुप सवय होती. ईथे (अमेरीकेत) कोणता फुड प्रोसेसर चांगला आहे? मला भाज्या चिरणे व्यतिरीक्त कणिक मळण्यासाठी हवा आहे. (इथे चॉपिंग साठीचेच बघितले जवळच्या दुकानात.)
कुणाला चांगला माहित असल्यास सांगा प्लिज.

anujay : इथे पान १०-११ वर बरीच माहिती आहे. जुन्या मायबोलीमधे देखील बरीच माहिती आहे. वाचून बघा.

Target, Sears, Macy's, JCPenny, Kohls, Bed, Bath and Beyond - इथे तुम्हाला फूड प्रोसेसर्स मिळातील.

अमि, नारळाचे दोन भाग करणे म्हणजे नारळ फोडणे ना ? त्यासाठी कोयता उत्तम. पण त्याला पर्याय म्हणून मी दगड, फरशी इत्यादी वापरलेत. वरच्या मजल्यावरुन खाली फेकण्याचा प्रयोगही केलाय. माझ्याकडे एक जाडजूड लाटणे होते, त्याचा पण उपयोग होत असे.

नारळाच्या मध्यभागी एक पाण्याने रेघ मारायची विषुवव्रुत्तासारखी मग दाण कन आपटायचा. एका भांड्यात पाणी गोळा करायचे व घरातील लहान मुलाला द्यायचे. मग परत एकदा आपटायचा. दोन छकले. बिन्धास्त.
मग सुरीने तुकडे काढायचे व मिक्सीतून काढायचे.

मग सुरीने तुकडे काढायचे व मिक्सीतून काढायचे.

जिच्या टोकाला छोटासा पंजा असतो खोबरे खवण्यासाठी अशी विळी नाय काय तुमच्याकडे ?? आणि पोह्यांवर घालायचे झाल्यास हेच मिक्सीमधले घालता की काय?????

माझ्याकडे माझ्या आजोबांनी बनवलेला कोयता आहे. लग्नाच्या वेळी मला दिलेला, मुलीच्या लग्नानंतर तिलाही वापरता येईल. Happy

मला माक्रोवेव ओवन घ्यायचा आहे.. मी वर्पुल ग्रिल २५ लीटर चा विचार करते आहे.. कुणाला ह्याच्या बद्दल महिती आहे का ?

मा.ओ..कोणता चांगला.. आणी त्याचा उपयोग रेग्युलर जेवणासाठी करता येईल का ? बिल वर कितपत परिणाम होईल ?
मी आधी कधीच मा.ओ वापरला नाही..
कुणाला चांगला माहित असल्यास सांगा प्लिज.

जिच्या टोकाला छोटासा पंजा असतो खोबरे खवण्यासाठी अशी विळी नाय काय तुमच्याकडे ?? आणि पोह्यांवर घालायचे झाल्यास हेच मिक्सीमधले घालता की काय?????>> नाही ग तसली विळी घ्यायची आहे कितीतरी दिवस पण एका सुरीने बाकीची कामे होतात. मी लहानपणी आईस मदत करत असे नारळ खोवायला. दाण्याच्या कुटाचे यंत्र पण होते. खोबरे वरून शिवरायचे असेल तर मी किसून घेते तुकडा. आता विळी घेतेच.

कोकणात एकाच विळीवर चिरायचे आणि खवायचे काम होते, पण फक्त खवायचीही आणि फक्त चिरायचीही वेगळी विळी असते हे मी सासरी आल्यावर पाहिले Happy विळी घेच तु, विळीवर खवलेले खोबरे दिसायलाही अगदी लेससारखे छान दिसते.

अमा, पुण्याला तुळशी बागेत, फक्त खवायची विळी मिळते. ती ओट्यावर ठेऊन ही नारळ खवता येतो. कधी पुण्याला गेलात तर बघा!!

अमा, येत्या ठाणे भेटीत एक सोलाण्याच्या आकारात असणारी नारळ खवणी आपल्याला देण्यात येईल. आता सोलाणं कशाला लागतंय? सुरीनेही सालं काढता येतात असं म्हटलंत तरी तुम्हाला सोलाणं मी देणार नाही ह्याची नोंद घ्या.

Pages