स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ही चांगली आयडीया दिलि @ अमा. मिक्सर कोणता ह्यावरून इतकं डोकं भंजाळ्लय कि तुझी मेथड जास्ती इफेक्टिव वाट्तिये.
माझं पण साधारणं २५ ते तीस असचं बजेट आहे कारण तसा फार लागतं नाही.
sakaali mala breakfast la smoothie pyayla bari padte mhanun to blender. karan food pro. madhe karun pahili pan ti either leak tari vhyachi nahi tar utu gelya sarkhi varun baher jaaychi . kiti hi kami liquid ghaala.@ PURVA

तु आणी नीधप दोघिन्नी बॉस स्जेस्ट केलाय. ती पण वेब्साईट पाहते. तो भारतातून आणावा लागेल.@प्राजक्ता
नीधप ,cocktails madhla mala kalat nahi pan ek japanese khalbatta "suribachi" mhanun milto to thodassa kahi thechayla bara padto. Japanese store madhe to 16 dollar la hota pan mala eka american discount store madhe 4 la milala. ani to tasa bagetun carry karayla pan soppa asto. Ekdaa vaatla hota ki chota kahi vaatayla hey ghyava ki kaai http://www.amazon.com/Jamie-Oliver-Flavour-Shaker-Mixer/dp/B001F50TBY/re... pan tey baryapaiki mahag vaatla usage chya maanani ani reviews pan changle nhavte pan to jevha tyahcya shows var tey vaparto tey baghayla chhan waatata.

@anjali me attach sumeet chi site pahile . agadi bhariye ga. ata to kahitari 195 la aahe pan asa watatay ki bhartiya companych aaplya needs olkhun products banavnaar. ani tyatun tin bhandi mhanje ekda ghetla ki baghayla nako. tyatun tyat barach kai kai hota asa distay.

अरे भांडीकुंडी व उपकरणांनी हाताला चव येत नाही. आमचा एक मित्र बीअरच्या बाट्लीने पोळ्या लाट्त असे व
स्टो वर बटाटा भाजी रॉकेल फ्लेवर्ड बनवत असे. तशी चव मी कुठेच पाहिली नाही. मी कुठेतरी वाचलेले कि
स्पेशलाइज्ड उपकरणे फारशी घेऊ नयेत जसे एकाच अ‍ॅप्लिकेशनला उपयोगी पडणारी. काही नाहीतर लसूण वगैरे लाटण्याने ठेचता येते. अर्थात आपले स्वयंपाकघर सुंदर व उत्तम भांडी उपकरणांनी चमकावे असे मला पण वाट्ते. एक हाउस प्राउड बाई म्हणून. जितना जमेगा उतना करनेका नै तो कॉफी ब्रेड खानेका. Happy

फारशी घेऊ नयेत जसे एकाच अ‍ॅप्लिकेशनला उपयोगी पडणारी >> अमा, मलाही तसेच वाटते. पण कधी कधी वाटते की एकाच स्पेशलाइझ्ड अ‍ॅप्लिकेशन साठी जे टूल असेल ते आपलं काम अतिचशय व्यवस्थित करेल - मल्टिपर्पझ टूल हे जॅक ऑफ ऑल ट्रेड सारखे होईल. आईच्या स्वैपाकघरात रगडा , जाते, पाटा वरवंटा, मिक्सर, दोन खलबत्ते शिवाय एक गोल वाटोळा दगड एवढ्या गोष्टी असायच्या. जेनू काम तेनू ठाय Happy

हा खानदेशी स्टाईलचा लाकडी खलबत्ता http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/03/click-03-2009-wood.html
माझ्याकडे याहुनही अजुन एक लहान पण आहे Happy

एखादी लसूण पाकळी, भरताचे वांगे ठेचायला याचा मस्त उपयोग होतो. हजार प्रकारचे मिस्कर, ब्लेंडर्स, फूड प्रोसेसर्स असले तरी हे लागतेच Proud

निराली, मी देशातच असते. आणि मला गावातल्या मार्केटात किंवा हायवेच्या बाजूला दुकानं लावून बसलेल्यांकडे असा छोटा खलबत्ता मिळतो. १०० रू डोक्यावरून पाणी. नाहीतर आईकडे छोटा पाटा आहे तो उचलून मुंबईला आणणंही अवघड नाही. Happy

अमा, एकदम पटेश.
बाकी माझ्या हाताला लसूण सोलल्यानंतर अरेबियन नाइटस मधल्यासारखं १०८ वेळा साबणाने, १०८ वेळा अमुकतमुकने असं धुवूनही लसणाचा वास येत रहातो. जो इरिटेट करतो. त्यामुळे मी ते लसूण सोलायची रबरी गुलाबी नळी असते ती वापरते. सिंगल अ‍ॅप्लिकेशन साठी घेतलेली वस्तू असली तरी जागा व्यापत नाही जास्त आणि स्वस्तही आहे म्हणून नो प्रॉब्स!! Happy

ते लसूण सोलायची रबरी गुलाबी नळी असते ती वापरते. >> अशी असते का? वा वा. लसूण ही एकच गोष्ट पण ती कापल्यास चिरल्यास, ठेचल्यास वाट्ल्यास त्याचा स्वाद वेगळा लागतो. खरे कि नाही. मी खलबत्यात दाणे वगैरे कुट्ले आहेत. तसेच ते जुने पुरणाचे यंत्र, दाण्याच्या कुटाचे यंत्र, विळी, संगमरवरी छोटा खलबत्ता, पितळी खलबत्ता, जाते, तांदुळाच्या पापड्या करायचे ते पत्रे व स्टँड, पितळी कुकर अन काय काय.
एखादी गोष्ट नाही म्हणून काम अडू नये एवढेच. सांगलीला सासरी अजूनही मट्णाचे वाट्ण पाट्यावरच वाट्तात. ग्रेट ना.

अमा, कधी दर्शन दिलेत आम्हाला तर तुमच्या गिफ्टबॅगमधे ही रबरी नळी असेल. Happy (तेवढीच नसेल याची नोंद घ्यावी!)

>>खलबत्यात दाणे वगैरे कुट्ले आहेत. तसेच ते जुने पुरणाचे यंत्र, दाण्याच्या कुटाचे यंत्र, विळी, संगमरवरी छोटा खलबत्ता, पितळी खलबत्ता, जाते, तांदुळाच्या पापड्या करायचे ते पत्रे व स्टँड, पितळी कुकर अन काय काय.<<
खलबत्त्यात दाणे कुटणे हे प्राचीन काळी कधीतरी आईला मदत करताना करून दिलेलं आहे.
जुन्या पुरणाच्या यंत्राचा 'अफसाना' पण प्राचीन काळी आईला मदत या क्याटेगरीत येतो.
विळी मी नेहमीच वापरते मला अजूनही सुरीपेक्षा ती बरी पडते. उसगावात शिकायला गेले असतानाही छोटी विळी नेली होती.
जात्यावर एकदा दळलं होतं. श्वासच्या शूटच्या साठी. शॉटमधे अश्विनी गिरी दळतेय पण सेट लावताना निर्जाबाई पण दळायला बसल्या. दोघींना मिळून ते भलंमोठठं जात हलवतानाही घाम फुटला होता.
बाकीच्या वस्तू घरात बघितल्यात. प्रेशर कुकर घरी यायच्या आधी पितळी कुकरमधे सगळं शिजवलं जायचं घरी हे अंधुक आठवतंय. पितळी कुकर आणि स्टो. आणि छोट्या शेगडीवर पितळ्याच्या भांड्यात मंद आचेवर माझ्यासाठी स्पेशल भात व्हायचा. मी आईला मदत करायचे त्यापेक्षाही प्राचीन काळात.

>>सांगलीला सासरी अजूनही मट्णाचे वाट्ण पाट्यावरच वाट्तात. <<
सांगलीत खाडीलकरांकडे मटणाच्या वाटणाला उघडपणे मटणाचे वाटणच म्हणलं जातं यातंच केवढा काळ पुढे आलाय... Wink

दगडी खलबत्त्यात चटणी अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत कुटलीये आईकडे. अश्यात आईने दगडी खलबत्ता कुणाला तरी देवून टाकला. पण लोखंडी खलबत्त्यात चटणी, शिकेकाई वैगरे अजूनही कुटली जाते तिच्याकडे. आम्ही घरी गेलो की हे कुटायचे काम आमच्याकडेच. Happy
लहानपणी आईला जात्यावर काहीबाही दळताना पाहिलंय, अन रिकामं जातं फिरवून बघितलंय. छोटं जातं अजूनही आहे आईकडे. उपयोगात नाहीये सध्या, पण एखादं जीम सुरु करुन त्यात ते जातं ठेवावं असा विचार घरी बर्‍याचदा मांडला जातो. Happy
पाटा वरवंटा पण आईने अश्यातच काढला घरातून वापर होत नाही म्हणून. बाकी सगळ्या काक्या मटणाचं किंवा इतर मसाल्याचं वाटण पाट्यावरच करतात. गावाकडे तर शेंगदाण्याची चटणी उखळात करतात.
जुनं पुरणयंत्र कसं होतं? आईकडे अन माझ्याकडे एकसारखंच पुरणयंत्र आहे.

अमा, कधी दर्शन दिलेत आम्हाला तर तुमच्या गिफ्टबॅगमधे ही रबरी नळी असेल. स्मित (तेवढीच नसेल याची नोंद घ्यावी!)>> किती गोड ग धन्यवाद. मी पण लसूणचा काय मास्किंग एजंट आहे ते विचारून घेते.
अल्पना फार खोलात गेल्यास माझ्या गॄहकृत्यदक्षतेची पिसे निघतील. पुरण यंत्र एकाच टाइपचे असते. ते एखाद्या एलिअन शिप सारखे दिसते असे मला नेहमी वाट्त आले आहे.

लोखंडी खल व बत्ता काय सॉलिड जोडी होती कि नाही. आता सर्व पुश बटण काम. इजी-पीजी.

अल्पना फार खोलात गेल्यास माझ्या गॄहकृत्यदक्षतेची पिसे निघतील. पुरण यंत्र एकाच टाइपचे असते. ते एखाद्या एलिअन शिप सारखे दिसते असे मला नेहमी वाट्त आले आहे. <<<
इसी बात पे हाथ मिलाओ!!

इकडे एका पॅम्पर्ड शेफ टाइप दुकानात साबणाच्या वडिच्या आकाराची स्टीलची वडी - जराशा खळ्या असलेली पाहिली होती. ते काय असावं ते बराच काथ्याकूट करून कळेना तेंव्हा तिथल्या बाईला विचारलं
ती म्हणाली लसूण सोलला / चिरला की हाताचा वास जात नाही. त्या स्टीलच्या वडीला साबण लावून त्यावर हात घासून धुतल्यास वास जातो असे तिने सांगितले. मग डोळा मारून म्हणते ' एक स्टीलच्या चमच्याला साबण लावून हात धुतलास तरी तेच होइल '

करून पहा अन मला सांगा खरंच तसं होतं का ?

छोटा लोखंडी अन दगडी खलबत्ता आणावा या भारतवारीत !

माझ्याकडे आहे छोटा दगडी खलबत्ता. नितेशचा एक मित्र आला की हमखास 'भाभी, आज मै चाय बनाउंगा' असं म्हणत त्यात आलं नाही तर ताजा मसाला कुटून चहा बनवतो. स्वर्ग Happy

खरयं @ मामी. पणं जर हाताला ही चव नसेल तर निदान उपकरणं वापरून तरी येइलं का असं ट्राय करायचं (lol)
ते लाकडी खलबत्ता प्रकार आवड्ला. आफ्रिकन टाईप दिसतोय. आधी पाहिलाच न्व्हता. @ मिनोति
@नीधप आणी मेधा माझ्या कडे काउन्टर स्पेस फार कमी आहे म्हणुन थोडिच उपकरणे घ्याविशी वाटतात. कारण ती जर cabinets मधे ठेवली तर out of sight/ out of mind अस करून वापरली पण जाणार नाहीत. म्हणुन एखादी गोष्ट घेताना जरा विचार पूर्वक घ्यावी लागते.
@अनु ३ कान्दा फूड प्रोसेसर मधे बारीक नाही का होणार?

दगडी खल्बत्ता म्हण्जे संगमरवरीच ना का इथे ते मेक्सिकन रेस्टॉरन्ट्स मधे ग्वाकामोले सर्व करायला वापरतात तो? @ सगळे

माझं सर्वात आवडीचं किचन टूल म्हण्जे मोठा " chef's knife" तो एक अस्ला कि अस वाटत कि बर्याच गोष्टी सोप्प्या होतात.

जात्यावर एकदा दळलं होतं. श्वासच्या शूटच्या साठी. शॉटमधे अश्विनी गिरी दळतेय पण सेट लावताना निर्जाबाई पण दळायला बसल्या. दोघींना मिळून ते भलंमोठठं जात हलवतानाही घाम फुटला होता.

Happy
मी गावी मावशीला माझ्यासाठी मला छोटं जातं घेऊन ठेवायची ऑर्डर कधीची दिलीय. कधी मिळतेय त्याची वाट पाहातेय. तसे मी खुप वेळा दळलेय जात्यावर. पोटाचा व्यायाम एकदम मस्त. जीममध्ये अ‍ॅब्स मारायला नकोत मग. Happy

मला नॉनस्टिकचा कुकवेअर सेट घ्यायचाय. (सध्या हार्ड अ‍ॅनोडाझ्ड ऑप्शन चांगला असला तरी एवढा महाग आत्ता नकोय.) मी सध्या जेसीपेनीची ऑनलाइन डील्स बघतेय. इकडे झालेली चर्चा वाचली, पण जुन्या मायबोलीवरची पानं उघडत नाहियेत.
मला qtr म्हणजे काय ते समजलं नाही. १ qt, 2 qt वगैरे म्हणजे काय?
पार्टी वगैरे असताना, साधारण १५-१६ लोकांसाठी पुरेल एवढी भाजी झाली पहिजे अशी बेसिक गरज आहे.
आणि मग सेट्मधे इतर भांडी पण हवी आहेत. काही चांगला ऑप्शन सुचवाल का? थोडी कमी भांडी असलेला, आणि एकूण वजनाकडून थोडा हलका पण चालेल, भारतात परत जाताना न्यायला सोपा पडला तर उत्तम. वर सांगितलेलं मोठं भांडं मस्ट आहे, आणि ३-४ जणांची रोजची भाजी होईल असं दुसरं भांडं.

भारतात जसे स्टीलची भांडी घेतांना ते इतके इतके लिटरचे भांडे आहे असे म्हणतात तसे इथे इतके इतके क्वार्ट्सचे भांडे म्हणतात. थोडक्यात तेवढे लिटर/क्वार्ट द्रव त्यात बसते.
१ Quart हे साधारण १ लिटरच्या आसपास असते.

मिनोतीने फोटो दिलाय तशी लाकडी ठेचणी आहे माझ्याकडे पण. मी ठेच्यासाठी किन्वा भरितासाठी वापरते. जळगावला मामीकडे स्पेशल भरताची वांगी ठेचण्यासाठीच वापरतात ती.

Slicer Dicer बद्दल काही feedback मिळेल का? कोणी वापरला आहे का ? रिझल्ट कसे आहेत ?

खूप सारी डील्स बघूनही माझा नॉन्स्टिकचा सेट अजून दुकानातच आहे! Sad
काल कुझिनआर्टचा जवळजवळ नक्की झाला होता. बेड-बाथ चं कूपन असल्यमुळे डील अजून चांगलं मिळत होतं. (आणि तो बॉक्स आमच्या शॉपिंग कार्ट मधे मस्त मावत होता! Happy ) फक्त एकदाच कस्टमर रिव्ह्यूज बघावेत म्हणून ब्कॅकबेरीचा आसरा घेऊन तो उद्योग केला आणि घेतलेला सेट परत नेऊन ठेवला! Sad
त्याचं नॉन्स्टिक लवकर निघतंय असं खूप जणांनी लिहिलं होतं. आणि खरं तर कुझिनआर्ट म्हणजे चांगला ब्रॅण्ड, तरी असं झालं असंही अनेकांनी लिहिलं. म्हणजे चुकून एखादा पीस खराब निघाला असेल म्हणवं तर तेही नाही.
ऑनलाईन पण पाहिली मी, पण एकदा दुकानात जाऊन कशी आहेत ती भांडी हे बघावं असं वाटलं. इथे उसगावात आल्यावर अशी खरेदी कधी केली नाहिये त्यामुळे नुसतं ऑनलाईन बघून काही कळत नाही.
Calphalon चेही बघितले, पण त्यल कस कोण जाणे, ओरखडा पटकन जातोय. आम्ही नख हल्केच घसून पाहिलं Wink , तर तोही ओरखडा लगेच दिसतो. रिव्हु मधे पण ते वाचलं होतं घरून निघताना, पण विश्वास बसत नव्हता. Calphalon ची सगळी प्रॉडक्ट्स चांगली असतात असं ग्रुहीत धरलं होतं.
एकूण बराच रिसर्च करून झाला आणि रिकाम्या हातांनी आलो.

५ किंवा ६ qt Covered saucepan, तोही मध्यम आकाराचा, आणि 2/3 Qt covered pans, skillets असा, झाकणांसकट ८ ते १० पीस चा सेट घेणं इतकं त्रासाचं झालंय! आणि बाकीचे २/३ क्व्वाट. चे मिळतात हवे तसे, पण मोठ ५/६ चा नाही मिळत हवा तसा. सरळसोट उभा Dutch Pan सारखाच मिळतोय ज्यात काही ढवळायचं म्हणजे पाय उंच करावे लागतात, किंवा मुद्दाम वाकून बघावं लागतं. Sad
आणि IKEA माझ्या घराच्या जवळ नाहिये. सो मला टार्गेट, जेसीपेनी, बेड-बाथ किंवा मग ऑनलाईन मधे अ‍ॅमेझॉनवर जे आवडेल आणि रिव्ह्यूज चांगले असतील ते सेट्स हे ऑप्शन्स आहेत.
हुश्श! खूप्प्प मोठ्ठं पोश्ट झालं!

"इनालसा"चा घ्या .
मी गेली अकरा वर्ष रोज वापरते आहे. अजुन तरी काहेच प्रॉब्लेम नाहीये. छान चालु आहे.

hi loks..

majhi gelya kahi divsaatli kharedi ani aagami kaalatlya kharedi sathi mast guidnce milala...

nuktich keleli kharedi-
maharaja whiteline food processor
electrolux 20L convection microwave

aagaami-
gas stove (prestige cha 3 burner glass top ghyaycha manat ahe)
refrigerator (mostly haier cha ghein, bottm freezr mule narrow kitchen madhe convenient hoil asa andaz ahe)

अँकी, सल्ला मागितलेला नाहीस, तरी देतेय Happy शक्यतो ग्लास टॉपची गॅस शेगडी घेऊ नकोस. आपल्या भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकासाठी ती योग्य नाही- साफ वगैरे करायला. शिवाय, चुकून भांडं/ कूकर निसटून, त्यावर पडून तडा वगैरे गेला, तर रिप्लेसमेन्ट करता येत नाही, थेट नवीनच घ्यावी लागते परत. त्यापेक्षा स्टीलची उत्तम- ही माहिती दुकानदारानेच सांगितली होती.
ग्लास टॉप दिसते एकदम मस्त, चकाचक, भारी वगैरे, पण दुकानातच. तिच्यावर स्वयंपाक केला की तिचं रूप पालटतं Proud

तरी अर्थात, अंतिम निर्णय तुझाच (बायकोचा सल्ला घेऊन :))

Pages