स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी माझ्या सगळ्या वाटणाघाटणाची जबाबदारी ३-४ यंत्रांना विभागून दिली आहे. हो उगिच एखाद्या यंत्राला वाईट वाटले तर Happy

मिनी ग्राईंडर - लसणीची चटणी, जवसाची चटणी असल्या कोरड्या चटण्या , दाण्याचे कूट, मिरच्या वाटणे, लहान प्रमाणात चटण्या करणे, आले-लसूण-खोबरे असली बारिक वाटणे करणे
हॅमिल्टन बीच ब्लेंडर - खानदेशी स्टाईलने भाज्या करतात त्याची वाटणे, मोठ्या प्रमाणात चटण्या, ग्रेव्ही वगैरे करणे.

हँड ब्लेंडर - ताक, सूप करणे, काही वाटणे आणि ग्रेव्ही वगैरे पण बरे होतात याने.

फूड प्रोसेसर - इडल्या-डोसे-उत्तप्पा-पसरट्टू आणि इत्यादी पिठे बारिक करणे. अनेक प्रकारच्या पराठ्यांची, चपात्यांची कणीक मळणे, मोठ्या प्रमाणात चटण्या वगैरे करणे, गाजरे वगैरे किसणे, आलू टिक्की, कटलेट्सचे सगळे मळणे हे सगळे यात होते.

क्युझिन आर्टच्या ब्लेंडरमध्ये कोरड्या चटण्या, वाटणं नीट होत नाहीत. त्यासाठी मी तरी एस शेपचे ब्लेड लावून फूप्रो वापरते.

क्युझिन आर्टच्या ब्लेंडरमध्ये कोरड्या चटण्या, वाटणं नीट होत नाहीत. त्यासाठी मी तरी एस शेपचे ब्लेड लावून फूप्रो वापरते. >> अगदी अगदी Happy

पण त्या मिनी चॉपर मध्ये चटण्या कुठे बारीक होतात. मी परवाच लसणीची आणि जवसाची चट्णी करायचा असफल प्रयत्न केला.

माझ्याकडे स्वैपाकघरात खालील उपकरणे आहेत
एक ऑस्टरचा २० वर्षे जुना मिक्सर - माहेरहून आणलेल्या वस्तुपेक्षा जास्त प्रिय मिक्सर - अमेरिकेत आल्यावर महिना दोन महिने हॅन्ड मी डाउन वस्तु मिळाल्या होत्या . तेंव्हा मैत्रिणीने घेउन दिलेली पहिली नवी गोष्ट Happy यात दोन भांडी आली होती - मोठं भांड पालकाची प्युरे, मिल्क शेक वगैरेंना बेस्ट. बारकं भांडं नुस्तं शोभेलाच होतं. १९९५-९६ सालापासून भारतातली मेड फॉर ऑस्टर भांडी वापरते - यात ओल्या / सुक्या चटण्या, कोरडे मसाले , खोबर्‍याचं वाटण इत्यादी अगदी मस्त होतं.

एक ब्राउन चा स्पाइस ग्राइंडर - ताजे, एकावेळपुरते मसाले करायला हा वापरते. याचा जार पाण्या बुडवून धुता येत नाही. त्यामुळे वास पूर्ण जात नाही अशी मला सतत शंका असते.

एक इडली -डोशाचा पीठाचा वेट ग्राइंडर - हा भारतातून आणला होता. उत्तप्पा, अडै, अप्पे, वडे यांची पीठं पण मस्त निघतात. जरा जड आहे

एक ब्राउनच हँड ब्लेंडर / चॉपर कॉबि. ( हे मॉडेल आता मिळत नाही ). - यातून वाटली डा़ळ, बारीक चिरलेले कांदे , टोमेटो, चक्का फेटणे, सूप्स प्युरे करणे, दाण्याचं कूट हे सगळं करते. शिवाय यालाच दोन अ‍ॅटचमेंट आहेत त्याने केक / कपकेक वगैरेंच बॅटर पण करता येतं.

बार मधे एक हॅमिल्टन बीच चा ग्राइंडर आहे = तो फक्त बर्फासाठी.

एक क्युझिनार्टचा फु प्रो आणि किचन एडचा मिक्सर घ्यायचं मनात आहे पण आधीच इतकी एक्विपमेंट्स झालीत म्हणून मी मागेपुढे करतेय .

तेंव्हा मैत्रिणीने घेउन दिलेली पहिली नवी गोष्ट >>> माझ्या नवर्‍याने अशी $८ ची इस्त्री घेतली होती. २-३ महिन्यांपुर्वी ती वारली बिचारी. तिच्या शोकात आम्ही ८ दिवस चुरगळलेले कपडे घातले. (:फिदी:) इस्त्री नंतर त्याने घेतलेली दुसरी वस्तू मावे, तो आहे अजून.

हाय ! कोणाला काही कल्पना आहे का , मातीच्य्य भांड्यात स्वंयपाक करावा कि नाही ? केरळी लोक करतात अस ऐकल होत अशी भांडी आरोग्यासाठी योग्य असतात का? या बाबतीत माहीती असल्यास कळवावे.

सध्या कॉस्टको मधे ५७५ वॉट , ५.५ क्वार्ट कॅपसिटी वाले किचन एड मिक्सर वर डील आहे . २९९ मूळ किंमत ( हीच मेसीज वगैरे पेक्षा कमी आहे ) शिवाय २८ नोव्हेंबर पर्यंत त्यावर अजून $५०.०० सुट आहे.

लाल , काळा, व ब्रश्ड निकेल हे रंग आहेत.
क्युझिनार्टच्या १४ कपच्या फु प्रो वर पण चांगले डील आहे म्हणे.

हो क्युझिनार्टच्या १४ कपच्या फु प्रो वर पण $३० सुट आहे तो घेण्याच्या विचारात आहे पण तो किती उपयोगी पडतो आणि कसा आहे?

खुप छान पोस्ट्स @मेधा आणी मिनोती

मला मेधा ची पोस्ट पाहून ओस्टर चा ब्लेन्डर फेकू नये अस वाटायला लागलय. पण तो का बन्द पड्तोय हेच कळत नाहिये. आणी दोनशे वगेरे चा घ्यावासा पण वाटत नाहिये. मी मधे येल्प वर एक पोस्ट वाचली.
तो मुलगा स्मूदी विकाय्च्या ठिकाणी काम करायचा. त्यानी लिहील होत कि ते लोक साधारण १४/१५ डॉलर चे रीफरबिश केलेले ब्लेन्डरस घेतात. आणी युसेज खुप असल्यामुळे सहा महिन्यात फेकुन द्यायला पण काही वाटत नाही.

मी सुमीतचा इथेच घेतलेला मिक्सर वापरते आहे गेली १४ वर्षे. तीन भांडी आहेत एकूण. सगळ्यात लहान भांडयात कोरडे मसाले एकदम छान बारिक होतात. चटण्या, wet grinding करायला मध्यम भांडं वापरते. मोठ्या भांड्यात डाळीचं भरड वगैरेपण छान होतं.

हो उगिच एखाद्या यंत्राला वाईट वाटले तर स्मित>> अगदी अगदी मी लहानपणी एका बाहुलीला एकटे वाटेल म्हणून त्या आवरून कपाटात ठेवताना दोन भावल्या एकत्र ठेवत असे त्याची आठवण झाली.
ताक करायला हँड ब्लेंडर मला पण घ्यायचा आहे.

मामी लगेच घ्या. मी घेतलाय नुकताच आणि अतिशय उपयोगाचा होतो.
मी तर पाभा स्मॅश करणे, आज करून ठेवलेला पास्ता सॉस स्मॅश करणे, मिल्कशेक बनवणे, ऑम्लेटसाठी अंडं फेटणे (भरपूर आणि फेस येईतो फेटले गेल्यास ऑम्लेट मस्त होते असं 'हायवे ऑन माय प्लेट' मधे बघितलं होतं. आता अनुभवलं.) अश्या अनेक गोष्टींसाठी वापरतेय.
चटणीच्या भांड्यासकट येणारा असतो तो नाही घेतलात तरी चालेल. शेवटी प्लॅस्टिकच्या भांड्यांचे वास जात नाहीतच. नुसताच घ्या. माझा बॉस या कंपनीचा आहे. १००० ला होता. आजीचा प्राचीन मोडका मिक्सर दिल्याने मला ७०० ला पडला. चटणी भांड्यासकटचा याच कंपनीचा १४०० ला असतो.

हो लगेचच घेणार नी धन्यवाद. ते सोड माझ्याकडे स्टीलची भांडी, पॉट्स, पॅन्स पण कमी झालेत. लग्नात आहेर मिळालेली, सासरच्या घरची जुनी अशी काय काय होती आता सर्व सेट परत घ्यायचा आहे मला खूप स्टायलिश काचेची क्रॉकरी व ग्लासेस, कटलरी, उत्तम स्वयंपाकाची भांडी घ्यायची आहेत. लिविन्ग द गुड लाइफ. बेड शीट्स नवे व क्विल्ट्स पण घ्यायची आहेत . माझ्या रूम साठी काहीतरी सुपर आराम दायक घेणार आहे. वेस्टिन बेड चे चित्र मनात आहे:) फुल डोमेस्टिक अपग्रेड इन प्रोग्रेस.

सुमीत चा मिक्सर किति ला पड्ला @ अन्जली. ईन्डियन ग्रोसेरी मधुन घेतला का?

हन्ड ब्लेन्डर ला पॉट पण मिळत का? @ नीधप

निन्जा ची दोन व्हर्जन्स बघितलियेत. वालमार्ट मधे ३४ ला आहे पण तो बॉक्स छोटा दिसला आणी "Bed Bath and Beyond" मधे निन्जा ६४ ला आहे आणी बॉक्स पण मोठा आहे.

शेवटी अस वाट्तय कि पाटा वरवंटाच बरा पण तो तरी कुठुन मिळणार हा प्रश्णच आहे.

शेवटी अस वाट्तय कि पाटा वरवंटाच बरा पण तो तरी कुठुन मिळणार हा प्रश्णच आहे.>> रेड इंडियन लोकांच्या वसाहतीत मिळेल सुवनीर शॉप मध्ये. किंवा त्यांच्या घरात. Happy

माझ्याकडे क्रोगरमधून घेतलेला ब्लॅक एंड डेकरचा मिक्सर आहे.तो मला ३०$ ला पडला.
आपल्या ओल्या,कोरड्या चटण्या आणि वाटणे,इडलीचं,वड्याचं पीठ वगैरे व्यवस्थित बारीक होतं.कोरडे मसाले जरा जाडसर रहातात.जार काचेचा असल्याने वास वगैरे रहात नाहीत.हा मिक्सर नेहमीच्या वापराला मला चांगला वाटतो.

मागे कुठेतरी लिहल होत परत लिहते, मागच्या भारतवारित(२ वर्षापुर्वी) मी 'बॉस ' (boss)कंपनिचा मिक्सर आणलाय, ३००० रु. ला होता. उत्तम चालतोय(अजुनतरी!)

हन्ड ब्लेन्डर ला पॉट पण मिळत का? @ नीधप<<
हो पण मी घेतला ज्याच्याकडून त्या दुकानदाराने नका घेऊ म्हणून सांगितलं. हे भारतातलं हा. उसगाव आणि इतर परदेशातलं मला माहित नाही.

पाटा वरवंटा मिळतो अजूनही गावांमधे.
बोटं चेचून घेण्याची भिती(हे मी केलेलं आहे एकदा ऑलरेडी) आणि होणारा मेस आणि अवजडपणा ऑलरेडी)आईचा आहे तो आणत नाहीये मी. पण आईचा एक छोटा आहे तो आणणारे. थोडीशी पानं ठेचून कशात घालायची असली तर म्हणून. उदा: कॉकटेल्स मधे पुदिन्याची पानं घालायची तर ती पाट्यावर वाटलेली असतील तर मस्त फ्लेवर उतरतो आणि क्वांटिटी अगदी कमी असल्याने मिक्सर मधे फिरवता येत नाहीत.

अमा, ही सगळी खरेदी(क्रोकरी किंवा तत्सम) माझ्यापण लिस्टीत आहे पण ती मी स्वतःचं घर झाल्याशिवाय करणार नाहीये.

मला एक चांगला दगडी खलबत्ता/ रगडा घ्यायचाय. मोठ्ठा नाही. मध्यम किंवा छोट्या आकाराचा. अजून पुण्याच्या आसपासच्या रस्त्यांवर पाथरवट बसलेले दिसतात. त्यांच्याकडून घ्यावा असा विचार करतेय. कॉकटेल्स साठी उत्तम पडतं हे प्रकरण.

सुमीतचा मिक्सर मी १४ वर्षांपूर्वी $१७५ ला घेतला होता. every penny is worth it. sumeet.net वर बघ मिळतोय का.

ब्लेंडर घ्याच, भारी उपयोगी आहे. ताक, ज्यूस, सूप, सोलकढी, पूरण घोटवणे, अळू-पालक इ. पातळ पालेभाज्या करण्यासाठी, (सा.बां. च्या नकळत) अंडी फेटणे इत्यादी इत्यादी...

पण केकसाठी त्याने अंडी फेटून घ्यायचा मोह आवरा, केकमध्ये भूकंप होतो आणि मोठ्या भेगा पडतात.

>> थोडीशी पानं ठेचून कशात घालायची असली तर म्हणून. उदा: कॉकटेल्स मधे पुदिन्याची पानं घालायची तर ती पाट्यावर वाटलेली असतील तर मस्त फ्लेवर उतरतो आणि क्वांटिटी अगदी कमी असल्याने मिक्सर मधे फिरवता येत नाहीत. <<

या साठी खलबत्ता वापरता येईल ना? रच्याकने, मुंबईत छोट्या आकाराचा दगडी खलबत्ता मिळतो का? काही ठिकाणी मी पांढर्‍या रंगाचे लहान खलबत्ते पाहिलेत, पण ते चिनी मातीचे असावेत असे मला वाटले.

हो खलबत्ता पण चालेल आणि पाटा पण. पानं वाटण्यासाठी पाटाच जास्त बरा असं आपलं मला वाटतंय.
पांढरे आणि हिरवे खलबत्ते संगमरवरी असतात. संगमरवरामधे कुटल्यावर संगमरवरपण बरोबर येईल की काय असं वाटतं.
मला रगड्याचा जसा असतो तसा किंवा काळा पॉलिश केलेला पण दगडी असा जो वैद्यांकडे (आयुर्वेदिक वैद्य) असतो तसा हवाय.

पण केकसाठी त्याने अंडी फेटून घ्यायचा मोह आवरा, केकमध्ये भूकंप होतो आणि मोठ्या भेगा पडतात.<<
एकदा कधीतरी केक ही गोष्ट करून बघायलाच हवी असं मला प्रकर्षाने आत्ता जाणवलं... Wink

मला रगड्याचा जसा असतो तसा किंवा काळा पॉलिश केलेला पण दगडी असा जो वैद्यांकडे (आयुर्वेदिक वैद्य) असतो तसा हवाय.>>>>>>

दादरला किर्तीकर मार्केटमध्ये मिळतो तसा खलबत्ता...

Pages