Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34
स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.
जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.
स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी तर ताटल्या / वाट्या टाकते
मी तर ताटल्या / वाट्या टाकते बर्नरवर साफ करताना
रच्याकने इजी ऑफ बँग नाहीतर मिस्टर मसलने एग्झॉस्ट फॅन साफ होइल का? ( खुप तेलकट झालाय)
रच्याकने इजी ऑफ बँग नाहीतर
रच्याकने इजी ऑफ बँग नाहीतर मिस्टर मसलने एग्झॉस्ट फॅन साफ होइल का? ( खुप तेलकट झालाय)>>>
नको ते वायाच जास्त जाईल आणि साफ नाही होणार फॅन.. त्यापेक्षा रॉकेलमध्ये स्पंज बुडवून त्याने साफ कर. एक्दम नव्यासारखा साफ होईल अजिबात तेलकटपणा रहाणार नाही.
रॉकेलमध्ये स्पंज बुडवून
रॉकेलमध्ये स्पंज बुडवून त्याने साफ कर. एक्दम नव्यासारखा साफ होईल अजिबात तेलकटपणा रहाणार नाही. >> धन्स ग. उद्याच बाइला रॉकेल आणायला सांगते ( असे बाहेर कुठे मीळते ते पण माहित नाही ना)
http://www.google.co.in/image
http://www.google.co.in/images?hl=en&q=collapsible%20steamer%20basket&um...
या लिंकवर दिसत असलेली स्टीमर बास्केट मी घेतलीय. त्यात मोदक उकडता येतील ना?
मॅग्नेटिक इंडक्शन कुक
मॅग्नेटिक इंडक्शन कुक घ्या.... कसली कटकट नाही..
मी अमि, त्यात मोदक उकडता
मी अमि, त्यात मोदक उकडता येतील, पण ती बंद नाही करुन चालणार. (मोदक कमी राहतील) तसेच मोदकाखाली केळीचे पान वगैरे ठेवावे लागेल.
धन्यवाद दिनेशदा. जामोप्या
धन्यवाद दिनेशदा.
जामोप्या इंडक्शन कुकर पाहिल्याचे आठवत नाही. पण आता लक्षात ठेवते.
इंडक्शन प्लेट मिळते त्यावर
इंडक्शन प्लेट मिळते त्यावर ठराविक भांड्यातूनच स्वैपाक करता येतो असं कळल्यावर मी नादच सोडला. बाईला एवढं कोण शिकवणार...
मला अमेरीकेत नविन प्रेशर कुकर
मला अमेरीकेत नविन प्रेशर कुकर घ्यायचा आहे.अॅमेझॉनवर प्रेस्टी़ज,हॉकिन्स तसेच इकडचे असे बरेच दिसले.नक्की कुठला घ्यावा?माझ्या मनात हॉकिन्स वेंचुरा घेण्याचे होते.पण त्यात इडली होईल का? कारण त्याला नेहमीच्या कुकर्रपेक्षा वेगळी शिट्टी दिसली नाही.इडली करताना शिट्टी काढून ठेवावी लागते ना? तसेच स्टेनलेस स्टीलचा घ्यावा कि हार्ड अॅनोडाइस्ड?अजूनही काही सजेशन्स आहेत का?
माझ्याकडे प्रेस्टी़जचा
माझ्याकडे प्रेस्टी़जचा अॅल्यूमिनिअमचा आहे. अॅमेझॉनवरुनच गिफ्ट मिळालेला. त्यात भांडी, एक्ट्रा व्हाल्व, शिट्टी, रिंग असं काही नाही मिळत.

हार्ड अॅनोडाइस्ड पण आहे, मला तरी दोन्ही मध्ये काही फरक वाटला नाही. धुतानां डिश वॉशरमध्ये न टाकलेला बरा. मी कधीच टाकत नाही. स्टेनलेस स्टीलचा सगळ्यात बेस्ट (माय ओपिनिअन.) धुवायला फार कटकट नाही. रच्याकने, इडल्या खायला कधी येवू?
पूर्वा, तुला हॉकिन्स
पूर्वा, तुला हॉकिन्स फ्युच्युरा म्हणायचं आहे का? माझ्या माहिती प्रमाणे हॉकिन्स फ्युच्युरा आणि काँटुरा हार्ड अॅनोडाईस्ड मधे येतात. वेंचुरा नाही. फ्युच्युरा एकदम मस्त आहे. त्याची शिट्टी काढता येते. माझ्याकडे गेली ११ वर्षे वापरत आहे. काहीही तक्रार नाही.
इथे बघः http://www.hawkinscookers.com/1.1.7.hawkinsventura.asp
अरे हो सॉरी मला फ्युचुराच
अरे हो सॉरी मला फ्युचुराच हवाय
अंजली तू इडल्यापण करतेस का त्यात?
नाही, पण इडल्या होउ शकतील.
नाही, पण इडल्या होउ शकतील. झाकण आतून लावायचं असल्याने इडली स्टँड थोडा लहान घ्यावा लागेल.
बरं धन्स दोघींना. मिने,
बरं धन्स दोघींना.
मिने, इडल्या केल्या कि तुला हाक मारतेच
अंजली तू सुद्धा फार लांब नाहीस.एखादी विकेंड ट्रीप मार....
झाकण आतून लावायचं असल्याने
झाकण आतून लावायचं असल्याने इडली स्टँड थोडा लहान घ्यावा लागेल. >> माझ्याकडे आहे मिनी इडली स्टँड. बाईट साईज इडल्या होतात. फार कंटाळवाणं काम आहे ते.
लहान इडल्यांचा नाही ग कमी
लहान इडल्यांचा नाही ग कमी इडल्या होणारा ८/१२ वगैरे
माझ्याकडे फ्युचुराच आहे ७
माझ्याकडे फ्युचुराच आहे ७ लिटरचा. १२ ईडल्यांचा स्टँड बसतो त्यात. पुण्य नगरीतल्या असाल तर तुळशी बागेतल्या "तुलसी" नामक दुकानात कुकरचं नाव आणी कपॅसिटी सांगितल्यावर नेमका स्टँड काढून देतिल ईडल्यांचा. बाकीचे स्टँड कसे दिसतात? फ्युचुरा मधे बसतात का ते बघायला पण मागू नका. अपमान करणेत येईल.
माझ्या कडचा अॅनोडाईज्ड आहे. डिश वॉशर मधे टाकत नाही.
मुलींनो इडलीचा स्टॅण्ड मावेल
मुलींनो इडलीचा स्टॅण्ड मावेल अन नीट झाकण असेल अशा कुठल्याही भांड्यात इडल्या करता येतात. तळाशी १ ते १.५ इंच पाणी घालायचे, स्टॅंड ठेवायचा अन वरून झाकण लावायचे. वाफ यायल्या लागल्यापासून ८-१० मिनिटात इडल्या तयार ! मी गेली १०-१२ वर्षे अशाच करतेय. रोज वापरात फक्त प्रेशर पॅन पुरतो मग .
मला अमेरीकेत नविन प्रेशर कुकर
मला अमेरीकेत नविन प्रेशर कुकर घ्यायचा आहे इति पुर्वा.
मी मेसिजमधुन (बहुतेक cuisinart) ५ की ७ क्वार्टसचा घेतला आहे. त्याला आपल्या देसी कूकरसारखी रिंग, शिट्टी, व्हॉल्व आहे. बाहेरचे झाकण आहे त्यामुळे त्यात देसी दुकानात मिळते ते ढोकळा स्टँड बसते. पण त्याच्या शिट्टीची काय तरी गडबड आहे. शिट्टी होतच नाही. नुसताच आवाज येत रहातो. मी वरण भात लावला तर अंदाजाने १५ ते २० मिन. बंद करते. एरवी फक्त शिट्टी न लावता करायच्या गोष्टी त्यात बनवते इडली, ढोकळा, मोदक इ. झाकण डिशवॉशर सेफ नाहीये. बाकी कूकर टॉप रॅक सेफ.
मुलींनो इडलीचा स्टॅण्ड मावेल
मुलींनो इडलीचा स्टॅण्ड मावेल अन नीट झाकण असेल अशा कुठल्याही भांड्यात इडल्या करता येतात. >>> हेच अंतिम सत्य
मुलींनो इडलीचा स्टॅण्ड मावेल
मुलींनो इडलीचा स्टॅण्ड मावेल अन नीट झाकण असेल अशा कुठल्याही भांड्यात इडल्या करता येतात.>> हो हे तर आहेच.सध्या माझ्याकडे झाकण असलेली स्टीलची कढई आणि आत इडली स्टँड आहे.फक्त त्यात एकावेळेस ८ च इडल्या होतात.त्यामुळे जास्त इडल्या करायच्या झाल्या तर खूप वेळा स्टँड लावावा लागतो.पण इडल्या मात्र बेस्ट होतात.
इकडे मेसीज पासून वॉलमार्ट
इकडे मेसीज पासून वॉलमार्ट पर्यंत जे भांड्याचे सेट्स मिळतात त्यातल्या मोठ्या डच अव्हनमधे भारतातले इडली स्टँड मस्त मावतात. शिवाय इडल्या स्टँडमधेच कराव्यात असं कुठल्याही वेदांमधे लिहिलेलं नाही
प्रेशरपॅनच्या आतल्या भांड्यात इंचभर पीठ घालून ते वाफवलं तरी मस्त 'डायमंड' इडल्या होतात.
फ्युच्युरा एकदम बेस्ट. माझा
फ्युच्युरा एकदम बेस्ट. माझा पण ८ वर्षे झाली वापरतेय. वरण भात , इडली पासून खिचडी, मसालेभात सुद्धा मी त्यात करते. आठवड्यातून २ दा डिशवॉशरला सुद्धा लावते पण अजूनतरी काही प्रॉब्लेम नाही.
मी पण इकडे अमेरिकेत एक कूकर घेतला होता. ब्रँड नाही आठवत. छान चालला होता पण एक दिवस त्याचा वॉल्व्ह उडाला आणि तो कूकर वायाच गेला. कारण दुसरा वॉल्व्ह कुठे मिळालाच नाही
मेधा बरोबर आहे. पूर्वी आया
मेधा बरोबर आहे. पूर्वी आया दिंडे वगैरे चक्क चाळणीवर उकडायच्या कि. ड्च अवन फार कामाची चीज आहे.
लंगडीत तेल लावून इड्लीचे पीठ एक इंच थिक असे घालून उकड्ले तर छान निघते. ड्ब्बा रोटी ती तीच ना?
खूप दिवस अल्युमिनियमचाच इडली
खूप दिवस अल्युमिनियमचाच इडली स्टँड वापरतेय.छान होतात इडल्या. पण आता नवीन घ्यायचाय.
स्टीलचा घ्यावा का?
अवनी, हल्ली नॉनस्टीक मिळतो.
अवनी, हल्ली नॉनस्टीक मिळतो. फार चांगला पडतो.
हँड मिक्सी कोणता
हँड मिक्सी कोणता चांगला?(भारतात मिळणारा?)
depending on what you need
depending on what you need hand blender for?
मी लोखंडाची कढई आणलीए, पण
मी लोखंडाची कढई आणलीए, पण आतुनही ती काळी आहे...कशी स्वच्छ करतात ?
लोखंडाची कढई आतून गंजू नये
लोखंडाची कढई आतून गंजू नये म्हणून दुकानदार तिला ग्रीस लावतात. त्यामूळे एक दोनदा ती धासून घ्यावी लागेल. तसेच पहिल्यांदा ती रिकामीच गॅसवर ठेवायची, तिच्यातून धूर येइल व घाण, जळकट वास सूटेल. मग ती थंड करुन घासायची. परत गरम करुन धूर व वास बंद झाला कि वापरायला घ्यायची.
Pages