संभाजी ब्रिगेड म्हटलं की लोकांना एकच घट्ना आठवते ती म्हणजे “भांडारकार ईन्स्टिट्युट” आणि या घटनेचा मिडियानी एवढा बाऊ केला आहे की, संभाजी ब्रिगेड म्हणजे सकाळ संध्याकाळ जणु एकच काम करत फिरते, भांडारकर शोधने व तोडने.
अरे ती एक प्रतिक्रिया होती, हो प्रतिक्रिया.
आता कशाची प्रतीक्रिया हे सांगायची गरज पडु नये. एक संघटनेला नुसतं एका प्रतिक्रियेमुळे भारतातील मिडीयाने असे रंगवुन दाखविले जणु काही ती संघटना म्हणजे आतंक पेरत फिरणारी दहशतवादी बापटयांची टोळी आहे.
पण या पेक्षा मोठ मोठाले कांड करणा-या संघटना मात्र पांढरपेशी लोकाना अगदी चालतात. अयोध्येची मशीद फोडणारी संघटना असो, गोध्र्यात कत्तल घडविणारी संघटना असो वा क्रिकेटचं पिच खोदुन दहशत माजविणारी, महाराष्ट्रात राडा संस्कृती आणणारी किंवा त्याच संघट्नेतुन बाहेर पडुन उत्तर भारतियाना झोडपणारी नवनिर्मीती असो. हया सगळ्य़ा संघटनांच्या दहशती पुढे संभाजी बिगेडचं ते भांडारकर प्रकरण म्हणजे किस खेत कि मुली. पण नाही मिडीयाना ह्या सगळ्य़ा संघटनांची दहशती कृत्ये अगदी मान्य आहेत. पण संभाजी ब्रिगेडची मात्र याना भलतीच एलर्जी.
खरंतर संभाजी ब्रिगेड एक सम्यक संघट्ना आहे. समावेशक तत्वांचा पुरस्कार करणारी एक आपली सामान्य मराठी माणसांची ती संघटाना आहे. शिवराय व जीजाऊचा आदर करणारी ती संघटना आहे. बहुजन व दलितांसाठी लढणारी ती संघटना आहे. अंद्धश्रद्धेला नाकारणारी बुद्धिजीवी लोकांची ती संघटाना आहे. देवाचं अस्तित्व नाकारणारी व समाजातील तळागळातल्या लोकांच्या पाठिशी उभी राहणारी एक स्वच्छ विचारसरणी असलेली ती संघटना आहे.
विद्यार्थी, युवक युवतिंचे संघटन करुन समाजासाठी पुर्णवेळ कार्यकर्ते तयार करणे, अन्याया विरुद्ध एकत्र येऊन संघर्ष करणे. आपल्या प्रश्नांसाठी लढने व स्वयंरोजगार निर्माण करुन मराठा बांधवाना स्वत:च्या पायावर उभे करणे हे मुख्य उद्देश डोळ्य़ापुढे ठेवुन या संघटनेची स्थापना झाली.
राज्यभर ब्रिगेडच्या शाखा आहेत, १४ मे या दिवशी संभाजी राजेंच्या जन्मदिवशी राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जाते. त्यातुन युवक मराठा कार्यकर्ते तयार केले जातात. Standing Commando Force ह्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यात १०० जणांची फौज उभी करण्याचे काम चालु आहे.
अधिक माहिती ईथे वाचा.
http://sambhajibrigade.blogspot.com/
तसेच मराठा सेवा संघाचा शिवधर्म व त्यांची भुमिका पण किती व्यापक आहे ते ईथे वाचा.
http://www.msschanda.com/pdf/Bhumika.pdf
थोड्सं भांडरकर प्रकरणा बद्दल
ज्या भांडारकर प्रकरणावरुन संभाजी ब्रिगेडला बदनाम केल्या जातं मुळात ते प्रकरण किती लज्जास्पद आहे ते बघु या.
जेम्स लेन नावाचा एक गोरा भारतात येतो, भांडारक संस्थेतील काहि लोकांच्या मदतीने शिवरायांवर पुस्तक लिहतो. या संस्थेतील आपल्याच मातितील लोकानी जेम्स लेनला खोटी माहिती पुरविली जी पुढे जाऊन वादग्रस्त ठरली. आता सगळे जेम्स लेनला दोषी धरतात. पण मुळात हि १४ लोकं ज्यानी जेम्स लेनला हि माहिती पुरविली ते मात्र खरे गुन्हेगार असुनही मोकाट सुटलेत. संभाजी ब्रिगेडला भांडारकर संस्थेवर नक्कीच सुड उगवायचा नव्हता. ते या १४ लोकाना जाब विचारायला गेले होते. आणि पुढे हे सगळ घडलं.
त्या १४ लोकांची नावं.
१) व्हि. एल. मंजुल.
२) एस. एस. बहुलकर.
३) सुचेता परांजपे.
४) वाय. बि. दामले.
५) रेखा दामले.
६) भास्कर चंदावरकर.
७) मीना चंदावरकर.
८) माधव भंडारे.
९) मीरा कोसंबी.
१०) ए. आर. कुलकर्णी.
११) राजेंद्र वोरा.
१२) नरेंद्र वागळे.
१३) जयंत लेले.
१४) दिलिप चित्रे.
हि आहेत ती दिव्य रत्ने ज्यानी लेनच्या पुस्तकातुन चिकलफेक केलीय़. आता काय या लोकांची पुजा करायची का ?
आपल्या महापुरुषांची बदनामी करणा-या लोकाना जाब विचारल्यामुळे मिडियानी संभाजी ब्रिगेडला बदनाम करुन ठेवलं.
पण ज्या रक्तात शिवरायांचा संस्कार धावतो. त्या रक्ताला परिणामाची तमा नाही.
जय जीजाऊ, जय शिवराय.
जय संभाजी ब्रिगेड.
तुमच्या कारवाईची वाट
तुमच्या कारवाईची वाट बघतोय.
नाहितर मी त्याचा बंदोबस्त करेन माझ्या परिने.
मग तेंव्हा मला माबो प्रशासनाने जबाबदार धरु नये."
--------------------------------------------------------------------
आता या माणसाची धमकीपर्यंत मजल पोहोचली आहे.. दुर्दैवाने ती घमकी खरी ठरली तर मी मायबोलीला याला वेळीच आळा न घातल्याबद्दल जबाबदार धरेन. वाद होता तोपर्यंत ठीक आहे पण जर यातुन कोणाला इजा होण्यापर्यंत मजल गेली तर त्याला कोण जबाबदार?
भांडारकरमधे यांनी जो गोंधळ
भांडारकरमधे यांनी जो गोंधळ घातला तो निस्तरण्यासाठी मदत करायला आम्ही भांडारकरला गेलो होतो. यांनी कितीही समर्थन केलं तरी तो जो काही विध्वंस या 'संभाजी ब्रिगेड' वाल्यांनी केला होता तो अजिबात समर्थनीय नव्हता आणि नाही. विनाकारण नसते वाद उकरून काढू नका मधूकरराव.
१- अरे. इकडे ये रे जरा.. ते
१- अरे. इकडे ये रे जरा.. ते वरती आकाशात काय दिसतय तुला UFO वाटतीये नाही का?
२ - थांब जरा त्याला विचारुन बघतो..
३ - वाटतीये तर खर UFO.. पण नीट खात्री करुन घ्यायाला पाहिजे..
४ - काही तरीच काय.. ही काय UFO आहे का... हे तर विमान आहे साधं एवढं कसं कळत नाही तुम्हाला..
३- अरे हो की विमानच दिसतय बरका..
५ - विमान.. विमान.. विमान.. विमान...
२- मला पण विमानच वाटायला लागलय.
६७...
८९...
१००...
१९०३९....
ह्या सगळ्यात १ नंबरचा कधीच कुठेतरी गायब उगाच मधूनच बघून जातोय गर्दीत... बाकीचे बसलेत विमान शोधत....
> देवाचं अस्तित्व नाकारणारी व
> देवाचं अस्तित्व नाकारणारी व समाजातील तळागळातल्या लोकांच्या पाठिशी उभी राहणारी एक स्वच्छ विचारसरणी असलेली ती संघटना आहे.
दुर्दैवाने, जुने देव नाकारुन नवीन लोकांना देव बनविले जाते. जर खरेच समाजाचे हित साधायचे असेल (संपुर्ण समाजाचे - एखाद्याच गटाचे नव्हे) तर सर्वांचा एकच देव हवा, किंवा एकही नको.
छान आहे - लेख पण आणी
छान आहे - लेख पण आणी प्रतिक्रिया पण सर्वांच्याच. मजा आली आणी मस्त टीपी झाला. लोक संभाजी ब्रिगेडला नावे ठेवता-ठेवता स्वताही तोच प्रकार करायला लागले.
एका ५० वर्षे वयाच्या तुर्कि माणसाबद्दल वाचले. तो म्हणाला " पुर्वी आमच्याकडे जर कोणी दुसर्या माणसाशी सहमत झाला नाहि तर एकच मार्ग होता - त्याचा जीव घेणे. आम्ही इंग्रजांकडुन जर काहि शिकलो असेल तर ते हे कि " we agree to disagree" "
भारतीय अजुन फारच मागासलेले आहेत हे तर होतेच पण टर्की पेक्षा आहोत हे कळून मस्तच वाटले.
असो.
Voltaire supposedly said- I disapprove of what you say; but I will defend your right to say it.
मधुकरराव, तुम्ही धमक्या
मधुकरराव, तुम्ही धमक्या देण्यात पटाईत दिसत आहात. पण जरा टण्या यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तसदी का घेत नाही?
तुम्हाला वाटत असेल फक्त मास्तुरे, मी, एव्हढेच लोक तुम्हाला नावे ठेवतात. तसे नाही. इतर अनेक लोक माबो वर आहेत, त्यांचेहि मत काही चांगले नाहीये तुमच्याबद्दल. पण मी एक रिकामटेकडा आहे, तसे ते नाहीत, म्हणून ते लिहीत नाहीत एव्हढेच.
आता किती लोकांना तुम्ही धमक्या देत फिरणार? ते ऑस्ट्रेलिया, भारत, यूरोप नि अमेरिकेत सर्वत्र पसरलेले आहेत. आयुष्यभर तेव्हढे एकच काम केले तरी सगळ्यांना धमक्या देऊन होणार नाहीत!
त्यापेक्षा, मी म्हंटल्याप्रमाणे, चांगले काय घडवले संभाजी ब्रिगेडने, ते लिहायला सुरुवात केली का ? का नाही?
सम्भाजी ब्रिगेड ही सन्घटना मराठ्याना (सर्व जाती-जमातीच्या) व्यवस्थीत दिशा देण्याचे काम करत आहे, यात वाद नाही.
हे वाचून बरे वाटले. वा, वा! व्यवस्थित दिशा म्हणजे प्रश्नच नाही!!
पण सध्या कुण्णाला म्हणजे कुण्णाला माहित नाही हे. शिवाय व्यवस्थित दिशा म्हणजे कुठली हे सुद्धा कुण्णाला माहित नाही. तर ते जरा विस्तृत करून सांगाल का? म्हणजे सगळ्या टीकाकारांची तोंडे बंद होतील.
सध्या एव्हढेच कळले की
१. संभाजी ब्रिगेड देव मानत नाही, पण देवावर नितांत श्रद्धा असणारे, मातोश्री जिजाऊ, गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री. शिवाजी महाराज, व छत्रपति श्री. संभाजी महाराज यांची नावे घेतात.
म्हणजे काय ह्या लोकांची बदनामी करावी, अपमान करावा असा काही अंतस्थ हेतू आहे का? लै हुष्षार हं. एकदम सट्टल ह्यूमरच!! चक्क सार्कॅझम!
२. जाब विचारायला जायचे नि पुस्तके जाळायची, संस्थेची मोडतोड करायची!
अलिकडच्या काळात, हिटलरच्या जर्मनीत अशी पुस्तके जाळली होती.
तुम्ही तुमच्या संस्थेला 'हिटलर ब्रिगेड' का म्हणत नाही?? एकदम समर्पक नाव! तुमच्या रक्तातून बहुधा त्याचीच संस्कृति वहात असावी. तो असाच होता. ज्यू लोकांना, ते केवळ ज्यू आहेत म्हणून त्याने मारले.
पण आता त्याच्या नाकावर टिच्चून ज्यू लोकांनी स्वतःचे राष्ट्र बनवले, नि बलाढ्य अमेरिकेवर तर त्यांचा एव्हढा प्रभाव आहे! सांभाळून. ब्राह्मणहि तसलेच आहेत बरं का! पचणार नाहीत तुम्हाला.
त्यापेक्षा भारत जसे मुसलमानांना घाबरून त्यांचे पाय चाटत बसला आहे तसेच तुम्ही पण ब्राह्मणांच्या बाबतीत करा! भारताचे काही खरे नाही, पण तुमचे कल्याणच होईल, याची खात्री आहे.
कळकळीने सांगतो आहे, चांगले लिहा.
तुमचा देवावर विश्वास नसेल पण माझा आहे. तो तुमचे भलेच करेल. पण माणसांचे सांगता येत नाही.
मला फक्त एकच प्रश्ण आहे, कि
मला फक्त एकच प्रश्ण आहे, कि लोकं का लिहितात इथे ह्या अश्या बीबीवर? मीही हे इतके सुद्धा इथे लिहिणार न्हवते. पण इथल्या "फक्त" विषयाची चार पाच पोस्ट वाचूनच वाटले की एखाद्याचे inclination कळले की कशाला जा समजावायला की सांगायला? आयडी पाहिली की कुठला विषय असेल हे कळतच असेल आता तर जावूच नये.
ह्या आयडीच्या आधीच्या पुर्वीच्या गावाकडच्या गोष्टी चांगल्या वाटल्या तेव्हाच अभिप्राय दिला. मला वाटते तिथेच त्यांनी कोणा ब्राह्मण शिक्षकेमुळे कसे त्याना शिक्षण मिळाले,मदत मिळाली लिहिले होते मग अजुनही हा जाती द्वेष? मग काय त्या शिक्षकेने ह्याच्यासाठीच तुम्हाला मदत केली का? जर नसती केली तर इथे लिहु तरी शकले असता का? म्हणजे शाळेत शिकायला मिळालेच नसते तर....? हे फक्त प्रश्ण आहेत. राग नाहीये. प्रगतीचा योग्य वापर करा ना...हे शेवटची पोस्ट.
पुर्वी इंग्रजांनी जसे फोडा
पुर्वी इंग्रजांनी जसे फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबले होते, दुर्दैवाने अजुनही तसेच चालू आहे. मतपेटीचे राजकारण करून सत्ता मिळविण्यासाठी सर्वांनी आपल्यापरीने प्रयत्न केले आहेत. यामधे चांगले, वाईट, डावे, उजवे सर्व आले. कोणत्यातरी दोन गटांमधे वाद निर्माण करायचा आणि त्यातल्या एका गटाची मते मिळवायची.
आता काय झाले की गेल्या अनेक वर्षांपासुन लोक शिकले प्रगती केली आणि मग अनेकांना वाटू लागले की राजकारणात गेले पाहिजे, कारण तिकडे पैसा व प्रसिद्धी आहे, झटपट आहे. पण आजपर्यंत ज्यांचे वर्चस्व आहे ते इतरांना असे सहजासहजी थोडेच येऊ देतील ? मग असे काहीतरी केले पाहिजे की जेणे करून सर्व समाजाचे लक्ष वेधले जाईल, लक्ष वेधून घेणारे प्रसिद्धीच्या झोतात येतील आणि राजकारणात शिरणे सोपे जाईल.
आजकाल तसे लक्ष वेधून घ्यायला विषय फारसे उरले नाहीत, म्हणुन मग हे असे विषय शोधले जातात आणि बरेचसे लोक त्यामधे ओढले जातात.
"जोडा आणि राज्य करा" हे मला ज्ञात असलेल्या इतिहासात फक्त शिवाजीनेच यशस्वीरित्या केले आहे. त्या थोर माणसाची सर कोणालाच नाही. इतिहासाचा अभ्यास करण्याचा उद्देश असतो की पुर्वी ज्या चुका झाल्या त्या दुरूस्त करून समाजाने प्रगती करावी. दुर्दैवाने भारतिय समाज पुर्वी ज्या चुका घडल्या नाहीत त्या जास्तीत जास्त करत आहे. तसे तर इतिहासाबद्दल लिहिण्यासारखे खुप आहे, पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही. त्यामूळे लिहून काही उपयोग नाही.
इति लेखनसिमा !
ब्राह्मणांनी नक्की काय
ब्राह्मणांनी नक्की काय प्रायश्चित्त घ्यावे ,जेणे करुन तुमच राग शांत होइल? सांगाल तर बरे होइल्.ब्राह्मण नक्कीच प्रयत्न करुन बघतील.तुमच्या पुर्वजांना त्रास दिल्याबद्दल समस्त ब्राह्मण समाजातर्फे तुमची जाहीर माफी.पण आता झालेले बदलता येत नाही. भविष्यकाळ चांगला घडवायचा मिळुन प्रयत्न करुयात.
बाकी SC/ST च्या अनेक जागा (professional colleges,state,central government,PSU मधे) रिकाम्या राहतात .त्या भरण्यासाठी सतत जाहीराती येतात. तिथे तुमच्या लोकांनी पोहचावे म्हणुन तुम्ही काय करत आहात?ते करण्यासाठी मदत हवी असेल तर सर्व ब्राह्मण समाज आनंदाने तयार आहे, मदत मागुन तर बघा. मला अनेक जातीपातींचे शिक्षक होते, वर्गात अठरापगड जातीच्या मुली होत्या.ज्यांनी अभ्यासात शर्थीचे प्रयत्न केले ते आज वेगवेगळ्या जातींचे असले तरी चांगले आयुष्य जगत आहेत. त्यात ब्राह्मण-अब्राह्मण असा फरक नाही. द्वेष करून नक्की काय साध्य होतय?
एक निर्जातीय समाज निर्माण करणे अगदीच अशक्य नाही.फक्त त्या द्रुष्टीने सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत.माणुस म्हणुन जगताना तुमची नी माझी निव्वळ जात वेगळी म्हणुन समस्या वेगळ्या होत नाहीत ना. अस्वश्चता,रोगराई,वाढती लोकसंख्या,बेरोजगारी,रस्त्यावरचे खड्डे,अपुरा पाणीपुरवठा,कमी पडणारी वीज ह्याला आपण सगळेचजण सामोरे जातोय.तुम्ही दलित म्हणुन तुम्हाला भारनियमन, आणि तुमच्या बिल्डिंगमधल्या ब्राह्मण कुटुंबाला २४ तास वीज पुरवठा अस काही आहे का?
त्यापेक्षा भारत जसे
त्यापेक्षा भारत जसे मुसलमानांना घाबरून त्यांचे पाय चाटत बसला आहे तसेच तुम्ही पण ब्राह्मणांच्या बाबतीत करा! भारताचे काही खरे नाही, पण तुमचे कल्याणच होईल, याची खात्री आहे.
झक्की,
आपल्या मागील पोस्ट व त्यातील आशयसंपन्नता,कळकळ चांगली वाटली......
ह्या बा.फ.वर मी मुद्दाम एकदाही लिहिले नाही..... लिहायची आवश्यकता वाटली नाही... किंबहुना कुणी प्रतिसाद देवू नये... ''अकारण'', 'तेढ'' वाढेल हे मला ज्ञात आहे.
पण आपला वरील प्रतिसाद निश्चित चांगल्या अभिरुचीचा नाही.
बाकी चर्चा... चालू द्या.
त्यापेक्षा भारत जसे
त्यापेक्षा भारत जसे मुसलमानांना घाबरून त्यांचे पाय चाटत बसला आहे तसेच तुम्ही पण ब्राह्मणांच्या बाबतीत करा!>>. अत्यंत घाणेरडी भाषा आहे ही. निषेध,निषेध,,निषेध!!!
त्यापेक्षा भारत जसे
त्यापेक्षा भारत जसे मुसलमानांना घाबरून त्यांचे पाय चाटत बसला आहे तसेच तुम्ही पण ब्राह्मणांच्या बाबतीत करा! भारताचे काही खरे नाही, पण तुमचे कल्याणच होईल, याची खात्री आहे.
>>>
झक्की, तुमची आख्खी पोस्ट जरी उपहास, सार्कॅझमने भरली असली तरी वरील वाक्य अत्यंत घाणेरडे, गलिच्छ आहे. निषेध!
ब्राह्मणांनी नक्की काय
ब्राह्मणांनी नक्की काय प्रायश्चित्त घ्यावे ,जेणे करुन तुमच राग शांत होइल? सांगाल तर बरे होइल्.ब्राह्मण नक्कीच प्रयत्न करुन बघतील.तुमच्या पुर्वजांना त्रास दिल्याबद्दल समस्त ब्राह्मण समाजातर्फे तुमची जाहीर माफी >>> FOR WHAT? आर्क तुम्ही जसे लिहले तसे अनेकदा इथे लोकांनी लिहले गेले आहे, पण त्याचा फायदा झालेला नाही, एकदा तर मी ही लिहले आहे. ह्या झोपी गेलेल्या माणसाला जागे करण्यात काय फायदा? तुमची भावना समजते पण ह्या माणसाचा बेसच द्वेषावर आहे.
आणि हा कोण तिसमारखाँ लागलाय ह्याचासमोर प्रायश्चित घ्यायला? आर्क तुम्ही नेहमी डोक्याने लिहिता आज एकदम भावनेत?
पण तुम्ही मुद्दा आणला आहे तर इथे माझे मत लिहितोच.
पूर्वापार ब्राह्मण जातीची उतरंडही क्षत्रियांनतरची होती. इंग्रजांच्या नंतर मात्र चित्र पालटले कारण इंग्रजांना बुद्धिजीवी माणसं हवी होती. ते यायच्या आधी राजा म्हणेल ते चालायचे. ब्राह्मण हे अशा राजांचे भाट म्हणजे स्तुतीपाठक होते. राजांनी म्हणावे तसे सर्व चालायचे. आठवून पाहा हिंदू धर्मीयांचे सर्व देव कोण आहेत? आणि त्यात किती ब्राह्मण अन किती क्षत्रिय? तुलना करा. सर्वांमध्ये फक्त परशुराम अन वामन हे दोन ब्राह्मण आठवतात पण इतर झाडून सारे क्षत्रिय. मागेही त्या हिंदुत्वाचा चर्चेत लिहले होते की ब्राह्मणांना मोक्षाचा अधिकार क्षत्रियांमुळे मिळे. सर्व विद्या क्षत्रियांकडे असत. (अपवादाला परशुराम वगैरे)
अहो हे तर सोडा जातक कथे नुसार बुद्धाला ब्राह्मणांन जन्म मिळण्याची संधी होती पण त्याने ती नाकारली कारण ब्राह्मण हे क्षत्रियांपेक्षा हिन होते. बुद्ध घ्या, भगवान महाविर घ्या वा पूर्ण २४ तिर्थंकर घ्या सर्व क्षत्रिय आहेत, ब्राह्मण कोणी नाही. शंकराचार्य ब्राह्मण पण त्यांनी वैदिक धर्माचे पुनर्जिवन केले, ब्राह्मणांचे नाही!!
मराठा समाजाचे इंग्रजानंतर खच्चिकरण झाले कारण इंग्रजांना योद्धे नको होते तर मेकॉले चालवणारी पद्धती हवी होती. फोडा, झोडा राजकाराणाचे ते ही बळी ठरले. त्यांचा हातातील सत्ता नंतर बाबू लोक असलेल्या ब्राह्मणांचा हातात आली. त्यांचे चिडणे साहजिक आहे. आणि ह्या सर्वाचा बदला स्वातंत्र्यानंतर ब्राह्मणांना चांगलाच मिळाला आहे.
आगावूच्या मराठ्यांनी (क्षत्रियांनी) जितके नुकसान केले तेवढे ब्राह्मणांनी केले नाही ह्या मताशी सहमत. त्याने कदाचित आजचे राजकारण म्हणून लिहले असेल पण मी त्याच्याही थोडा मागचा आढावा घेतला इतकेच.
उगा आपलं ब्राह्मण ब्राह्मण करुन काय फायदा? आधी आपला इतिहास पाहा. शिव्या देताना मात्र ब्राह्मणाला मिळतात, कदाचित फक्त २०० वर्षांचा इतिहास पाहिला तर ते बरोबर ठरते, पण सर्व राजे-रजवाडे केवळ ब्राह्मण असले असते तर मी ब्राह्मणांच दोष आहे हे बुद्धीने माणले असते, पण सर्व राजे ब्राह्मण नाही क्षत्रिय होते, तरीही त्यांनी हे का चालू दिले? ह्याचे उत्तर सापडते का? नाही ना? आणि ह्यातच उत्तर दडलेले आहे.
मधुकर जरा जातक कथा नं सागंतोस का? तुला मी वर बुद्धजन्माबद्दल लिहलेले माहितच नाही हे मला माहित आहे. खरे तर तुला काहिच माहित नाही, हे माझे मत मी वारंवार नोंदवले आहे. तू फक्त पळपुटा आहेस. माझ्या विपूत येउन गरज नसताना बरळणार. अन उत्तर दिल्यावर ते डिलिट करणारा.
बरं ते बुद्धावर / त्रिपिटकावर लिहिणार होतास म्हणे ना? मग काय झालं? आता तर महाराजांवर पण लेखमालिका लिहिणार म्हणे. वा वा अभिनंदन.
हे पोस्ट मधुकरच्या बाफसाठी नाही तर येथील वाचकांसाठी आहे, कोणत्याही जातीला उगाच नावे ठेवण्यापेक्षा जरा विचार करा. "होलियर देन दाऊ" अॅप्रोच काही कामाचा नाही. सगळेच चिखलात बुडालेले आहेत. बुद्ध पण! हवे असले तर कुंडली मांडतो.
त्यापेक्षा भारत जसे
त्यापेक्षा भारत जसे मुसलमानांना घाबरून त्यांचे पाय चाटत बसला आहे तसेच तुम्ही पण ब्राह्मणांच्या बाबतीत करा! भारताचे काही खरे नाही, पण तुमचे कल्याणच होईल, याची खात्री आहे.
>>>
निषेध. हे वाक्य पाहून मला शंका आली की मधुकरचा सगळ्या बाफांचा मूळ हेतू (तेढ पसरवणे, स्वतःसारखेच इतरांचेही मानसिक संतुलन बिघडवणे) सफल होतोय किकॉय.
या विषयावर भरपूर चर्चा झाली
या विषयावर भरपूर चर्चा झाली आहे. आता इथली चर्चा बंद करण्यात आली आहे.
Pages