संभाजी ब्रिगेड-एक आदर्श व सम्यक संघटना

Submitted by मधुकर on 20 September, 2010 - 08:50

संभाजी ब्रिगेड म्हटलं की लोकांना एकच घट्ना आठवते ती म्हणजे “भांडारकार ईन्स्टिट्युट” आणि या घटनेचा मिडियानी एवढा बाऊ केला आहे की, संभाजी ब्रिगेड म्हणजे सकाळ संध्याकाळ जणु एकच काम करत फिरते, भांडारकर शोधने व तोडने.

अरे ती एक प्रतिक्रिया होती, हो प्रतिक्रिया.
आता कशाची प्रतीक्रिया हे सांगायची गरज पडु नये. एक संघटनेला नुसतं एका प्रतिक्रियेमुळे भारतातील मिडीयाने असे रंगवुन दाखविले जणु काही ती संघटना म्हणजे आतंक पेरत फिरणारी दहशतवादी बापटयांची टोळी आहे.

पण या पेक्षा मोठ मोठाले कांड करणा-या संघटना मात्र पांढरपेशी लोकाना अगदी चालतात. अयोध्येची मशीद फोडणारी संघटना असो, गोध्र्यात कत्तल घडविणारी संघटना असो वा क्रिकेटचं पिच खोदुन दहशत माजविणारी, महाराष्ट्रात राडा संस्कृती आणणारी किंवा त्याच संघट्नेतुन बाहेर पडुन उत्तर भारतियाना झोडपणारी नवनिर्मीती असो. हया सगळ्य़ा संघटनांच्या दहशती पुढे संभाजी बिगेडचं ते भांडारकर प्रकरण म्हणजे किस खेत कि मुली. पण नाही मिडीयाना ह्या सगळ्य़ा संघटनांची दहशती कृत्ये अगदी मान्य आहेत. पण संभाजी ब्रिगेडची मात्र याना भलतीच एलर्जी.

खरंतर संभाजी ब्रिगेड एक सम्यक संघट्ना आहे. समावेशक तत्वांचा पुरस्कार करणारी एक आपली सामान्य मराठी माणसांची ती संघटाना आहे. शिवराय व जीजाऊचा आदर करणारी ती संघटना आहे. बहुजन व दलितांसाठी लढणारी ती संघटना आहे. अंद्धश्रद्धेला नाकारणारी बुद्धिजीवी लोकांची ती संघटाना आहे. देवाचं अस्तित्व नाकारणारी व समाजातील तळागळातल्या लोकांच्या पाठिशी उभी राहणारी एक स्वच्छ विचारसरणी असलेली ती संघटना आहे.

विद्यार्थी, युवक युवतिंचे संघटन करुन समाजासाठी पुर्णवेळ कार्यकर्ते तयार करणे, अन्याया विरुद्ध एकत्र येऊन संघर्ष करणे. आपल्या प्रश्नांसाठी लढने व स्वयंरोजगार निर्माण करुन मराठा बांधवाना स्वत:च्या पायावर उभे करणे हे मुख्य उद्देश डोळ्य़ापुढे ठेवुन या संघटनेची स्थापना झाली.

राज्यभर ब्रिगेडच्या शाखा आहेत, १४ मे या दिवशी संभाजी राजेंच्या जन्मदिवशी राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जाते. त्यातुन युवक मराठा कार्यकर्ते तयार केले जातात. Standing Commando Force ह्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यात १०० जणांची फौज उभी करण्याचे काम चालु आहे.

अधिक माहिती ईथे वाचा.

http://sambhajibrigade.blogspot.com/

http://www.shivdharma.com/

तसेच मराठा सेवा संघाचा शिवधर्म व त्यांची भुमिका पण किती व्यापक आहे ते ईथे वाचा.

http://www.msschanda.com/pdf/Bhumika.pdf

थोड्सं भांडरकर प्रकरणा बद्दल

ज्या भांडारकर प्रकरणावरुन संभाजी ब्रिगेडला बदनाम केल्या जातं मुळात ते प्रकरण किती लज्जास्पद आहे ते बघु या.

जेम्स लेन नावाचा एक गोरा भारतात येतो, भांडारक संस्थेतील काहि लोकांच्या मदतीने शिवरायांवर पुस्तक लिहतो. या संस्थेतील आपल्याच मातितील लोकानी जेम्स लेनला खोटी माहिती पुरविली जी पुढे जाऊन वादग्रस्त ठरली. आता सगळे जेम्स लेनला दोषी धरतात. पण मुळात हि १४ लोकं ज्यानी जेम्स लेनला हि माहिती पुरविली ते मात्र खरे गुन्हेगार असुनही मोकाट सुटलेत. संभाजी ब्रिगेडला भांडारकर संस्थेवर नक्कीच सुड उगवायचा नव्हता. ते या १४ लोकाना जाब विचारायला गेले होते. आणि पुढे हे सगळ घडलं.

त्या १४ लोकांची नावं.

१) व्हि. एल. मंजुल.

२) एस. एस. बहुलकर.

३) सुचेता परांजपे.

४) वाय. बि. दामले.

५) रेखा दामले.

६) भास्कर चंदावरकर.

७) मीना चंदावरकर.

८) माधव भंडारे.

९) मीरा कोसंबी.

१०) ए. आर. कुलकर्णी.

११) राजेंद्र वोरा.

१२) नरेंद्र वागळे.

१३) जयंत लेले.

१४) दिलिप चित्रे.

हि आहेत ती दिव्य रत्ने ज्यानी लेनच्या पुस्तकातुन चिकलफेक केलीय़. आता काय या लोकांची पुजा करायची का ?

आपल्या महापुरुषांची बदनामी करणा-या लोकाना जाब विचारल्यामुळे मिडियानी संभाजी ब्रिगेडला बदनाम करुन ठेवलं.

पण ज्या रक्तात शिवरायांचा संस्कार धावतो. त्या रक्ताला परिणामाची तमा नाही.

जय जीजाऊ, जय शिवराय.

जय संभाजी ब्रिगेड.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

एआरसी.

एकदम बरोबर बोललात. हा माणुस असं द्वेष , तेढ वाढणारं का लिहीतो प्रश्न प्डतो.
मझे कित्येक दलित मित्र हलाखिच्या परिस्थितीतुन स्वतःच्या हिमतीवर वर आलेत.
मला आणि ग्रुपमधल्या सर्वांना त्याचा आदर , अभिमान आहे. आणि हे दलित वगैरे त्यांच्या तोंडीही नसतं..

उच्च विचार ठेवा मधुकर. हे लोक मुर्ख म्हणुन सांगत नाहीयेत.
शिकुन माणुस शहाणा होतो. तुमच्या बाबतीत काय घडलं तुम्ही दाखवताय..

नाहीतर सोडुन दे जाऊ दे आढिच भिकारी जीवन जगतोय बिचारा....
>>>
@ बाबानु, जितकी आक्षेपार्ह मला त्या संभाजी ब्रिगेड ब्लॉगवरची विधाने वाटली, तितकेच आक्षेपार्ह व अश्लाघ्य मला हे वरील विधान वाटले.

मधुकरला विरोध करायचा असेल तर त्याच्यासारखीच शेंडाबुडखा नसलेली विधाने करून आपण त्याच पातळीला जाण्याशिवाय काही घडत नाहीये. उलट त्या द्वेषाला खतपाणीच मिळतेय.

>>अविवेकाला अविवेकी प्रत्युत्तर देण्यात काहीच अर्थ नसतो, किंबहुना त्यात नुकसानच जास्त असते, त्यामुळे विनोदी लिखाण ,फालतु लिखाण,अक्कल काढणार्‍या अशी हेटाळणी करणार्‍या पोष्टकर्त्यांनी पोष्ट टाकल्या नसत्या तरी चालले असते.<<
१००% अनुमोदन.

मधुकर,
चांगला प्रयत्न ...माहीती !
Happy
मला वाटतं, कोणत्याही संघटनेच्या/चळवळीच्या बाबतीत ,त्यांच्या तत्वांवरुन मतभेद जरुर अस शकतात पण त्यासाठी वयक्तिक चारोळ्या/टिका करणं योग्य नक्कीच नाही
सध्या अनेक चांगल्या आणि दुर्मिळ संघटनाच्या बद्दल अनेक अपप्रचार मुद्दाम्हुन ,मोठी ताकत लाऊन्,पैसा खर्च करुन,(मीडीया तर पाने विकतोच आहे) केला जातो कारण काही लोकांचा यात स्वार्थ/राजकिय कारकिर्द्/त्यांची पाप यात दडलेली असतात....
वरील काही लोकांचे वाद/प्रतिसाद मी तर एन्जॉय करतोय .....

आमच्या गावी एकदा नाक्या वर मोठठा बोर्ड लावला होता

" संभाजी बिग्रेड सहर्ष स्वागत करीत आहे "

बिग्रेड>>> Rofl

मला वैचारीक भिकारी म्हणायचं होतं.तरी मी माफी मागतो आणि माझे शब्द मागे घेतो.
तुमच्याइअतकं छान मला शब्दात नाही मांडता येत.... असो.

...

...

पोस्ट फलक हलता ठेवल्याबद्दल सर्व खेळाडुंना धन्यवाद (जिगा परिणाम).

बाफचा विषय आणि आतिल पोकळ विचार वाचुन माझा कुठलाही भ्रमनिरास झाला नाही. नव्या वेष्टनात तेच ते परिचयाचे द्वेषाचे विचार.

नेहेमी प्रमाणे खोटे नाटे लिहीले म्हणुन मधुकर रावांचा रागही आलेला नाही. होय किव आणि सहानभुती जरुर वाटली. गुस्सा अकल को खा जाता है याची प्रचिती प्रत्येक बाफ मधे डोकावते.

पण ज्या रक्तात शिवरायांचा संस्कार धावतो. त्या रक्ताला परिणामाची तमा नाही.
--- औरंजेबाने सहानभुती दाखवली होती म्हणुन महाराज आग्र्याहुन सुटले असे म्हणणारे हेच संस्कार आहेत कां ?

आता काय या लोकांची पुजा करायची का?
---अंधश्रद्धेला, देवाला नाकारणारी लोकांनी पुजेची भाषा करावी? हे काही बरोबर नाही.

संभाजी ब्रिगेडला भांडारकर संस्थेवर नक्कीच सुड उगवायचा नव्हता. ते या १४ लोकाना जाब विचारायला गेले होते.
--- ब्रिगेडचा आपल्या कायद्यावर, न्याय प्रक्रियेवर विश्वास नाही का? त्या वेळी तर तुमचेच मायबाप सरकार होते ज्यांचा ब्रिगेडला पाठिंबा असतो.

काय चुकल काय ब्राम्हण इतिहास संशोधकांच ? त्यांनी ब्राम्हण घराण्यात जन्म घेऊन शिवाजी महाराजांवर संशोधन केल हे चुकल की काय म्हणुन संभाजी ब्रिगेड आणि कंपनी त्यांच्या विरोधात आहे ?

मा. बाबासाहेब पुरंदरेंवर केवळ ब्राम्हण म्हणुन या मंडळींनी टिका केली. मुद्दा काय तर दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते याला पुरावा नाही.

हे सत्य ही असेलही परंतु ज्यांनी आपल आयुष्य फक्त शिवचरित्रासाठी खर्ची घातल त्या ॠषीतुल्य व्यक्तीची या संभाजी ब्रिगेडवाल्यानी हेटाळणी करावी ?

समजा शिवचरित्र लिहताना एक कल्पना विलास झाला असेल तर त्याला माफी नाही ?

मा. बाबासाहेब पुरंदरेंना जर फक्त ब्राम्हणांचा पुळका असता तर त्यांनी हयातभर फक्त पेशव्यांचा इतिहास जपला असता येवढी साधी गोष्ट समजु नये ?

श्री मधुकरांनी नावे लिहलेले संशोधक जर केवळ ब्राम्हण आहेत व म्हणुन त्यांनी खोटा नाटा इतिहास जेम्स लेन च्या मदतीने गरळ ओकायला मदत केली असेल असा आरोप जर संभाजी ब्रिगेड करत असेल तर तो धादांत खोटा आहे.

जेम्स लेन हा सापच आहे. त्याला दुध पाजल्यावर तो गरळच ओकणार हे समजण्याची पात्रता नसणार्‍यांना माफ करावे कारण हा एक राजकारणी खेळ आहे. संभाजी ब्रिगेड्चे बोलविता धनी कोण ते लक्षात ठेवा.

गोब्राम्हण प्रतिपालक छ. शिवाजी महाराज सर्वांनाच पुजनीय आहेत.

धागा सुरु करणार्‍याने तो करून दिला आणि नंतर त्याकडे ढुंकूनही बघत नाहीतये... सगळे एकाच बाजूचे असताना कशाला घसे फोड करताय.. सोडून द्या की विषय... हे म्हणजे प्रत्येक जण एकच बाजू त्याच्या त्याच्या मताने मांडतोय.. समोरच्याने काही नविन मुद्दा मांडला तरच लिहा.. उगाच कशाला वेळ आणि शक्ती वाया घालवताय..

कोणितरी लागतोच द्वेश करायला म्हणजे मग संगठना उभारणे सोपे जाते. डोके भडकावने सोपे जाते....>>>> एकदम बरोबर,
या लेखाचा उद्देश संभाजी ब्रिगेड बद्द्ल माहिती देणे नसून 'चला जरा बामणांना मिरची लाउन मजा बघूया' हा आहे.

हिम्सकूल | 21 September, 2010 - 04:45 नवीन
धागा सुरु करणार्‍याने तो करून दिला आणि नंतर त्याकडे ढुंकूनही बघत नाहीतये... सगळे एकाच बाजूचे असताना कशाला घसे फोड करताय.. सोडून द्या की विषय... हे म्हणजे प्रत्येक जण एकच बाजू त्याच्या त्याच्या मताने मांडतोय.. समोरच्याने काही नविन मुद्दा मांडला तरच लिहा.. उगाच कशाला वेळ आणि शक्ती वाया घालवताय..

एकदा एका पत्रकाराने मा. वसंतदादा पाटील यांना विचारले की लोकशाहीत जर शंबर लोक गाढवाला घोडा ठरवत असतील तर ते बरोबर आहे का ?
त्यावर मा. वसंतदादा पाटील म्हणाले की दुर्दैवाने हे बरोबर म्हणावे लागेल.

या शंभर लोकांनी खोटेच ठासुन सांगावे असे वाटत नसेल तर खरे काय आहे हे सांगनारे हजार लोकांनी रस्त्यावर येऊन याचा प्रतिवाद करायला हवा.

कुणिच प्रतिवाद केला नाही तर लिहणार्‍याचा आत्मविश्वास वाढतो. चुकीचच लिहण्याची प्रथा पडते. ते ढुंकुनही पहात नसतील असे नाही.

एकदा मा. नेहरुनी छ. शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान केले होते. जनमानसातल्या प्रतिक्रिया ऐकुन त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती.

दादोजी कोंडदेवांचा पुतळा २४ तासात हलवु म्हणणार्‍या पुण्याच्या महापौरांनी विरोध झालेला पाहुन घुमजाव केले तिथे यांचे काय ?

विरोध दर्शविणे आता जरुरीचे झाले आहे. हे लोकशाही संमत आहे.

विरोध दर्शविणे आता जरुरीचे झाले आहे.>>> विरोध कुठे दर्शवावा हे पण तितकेच महत्त्वाचे आहे.. आणि त्या विरोधाचा काही परिणाम होणार असेल तरच काहीतरी अर्थ आहे..

नितीनचिंचवड अनुमोदन,
खूप झाले बरेच ऐकून घेतले.
आमच्या पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल जर येता-जाता कोणत्याही कारणाबद्दल दोषी ठरविले जाणार असेल तर याचा नुसता नव्हे तर कडाडून विरोध केला पाहीजे. दर वेळी आपण हाच विचार करतो की, कशाला वाद घालायचा, वाद घालून काही उपयोग नाही. आणि मग असे विषारी लेखन करणाऱ्यांचे फावते. कारण त्यांनाही आपली मानसिकता माहीती झाली आहे.
भांडारकर हल्यानंतर आणि तसेच त्यानंतर झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या पत्रकार परिषदेला मी उपस्थित होतो. त्यावेळी बाहेर एकाने हे उद्गार काढले होते
"काय करतील ही बामनं, बोलतील बोलतील आनी चिप पडतील. आपन लई झ्याक दनका दिला त्यांस्नी."
(अर्थात हे खूपच सभ्य करून लिहीले आहे)
इथे मला कोणताही नविन वाद निर्माण करायचा नाही पण किती वेळा ऐकणार तेच तेच. दर वेळी तेच येऊन दणका देणार का?
आपण काही बोललो तर ब्राम्हण कसे जातीयवादी, आपमतलबी, देशद्रोही आणि स्वार्थी आणि त्यांनी कधीही महापुरूषांच्या नावाखाली आपल्याला येऊन ठोकावे याला काय अंत आहे की नाही?
दर वेळीच आपण गप्प बसतो पण आता असे वाटते की पलटवार झाल्याशिवाय यांना अद्दल घडणार नाही.

मला वाटतं हिम्याचं बरोबर आहे. मधुकर लेख टाकून मजा बघत बसलाय. त्याने एक ब्राह्मण द्वेषाचा चष्मा घालून ठेवलाय आणि तो त्याला काढायचा नाहीये. त्याला चर्चा करण्यात काडीमात्र रस दिसला नाही कधी.

हिम्सकूल, धन्यवाद. मी मांडलेला मुद्दा तुम्ही जरा जास्त नीट लिहीला, त्यामुळे जे लोक डोळ्याला झापडे लावून बसलेले, किंवा, ज्यांच्या अक्कलेच्या जागी अहंकार नि राग यांनी गर्दी केली आहे, अश्या लोकांच्या ते लक्षात आले.

आता मी मला जे म्हणायचे ते तुम्हाला सांगत जाईन. म्हणजे लोकांना लवकर कळेल.

(आणि पुनः एकदा मी प्रचंड शिव्या खाईन. वाचणार्‍यांना आणखी मजा. सापाचे फूत्कार आपल्या ऐवजी दुसर्‍याच्या अंगावर पडताना पाहून जरा जास्तच मजा वाटते!!)

असे म्हणतात की लिहून लिहून लेखन सुधार॑ते. त्यासाठी प्रयत्न करून दरवेळी जास्त चांगले लिहावे लागते. माझे तिथेच चुकते. असो.

तर मधुकरराव,
तुम्ही इथे बरेच लोकप्रिय की हो!
घटं भिंद्यात् पटं छिंद्यात् कुर्यात् रासभरोहणम् | येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ||
हे तुम्हाला चांगले समजलेले दिसते आहे.

माझी खात्री आहे, तुम्ही लिहीत नसलात तरी हे वाचून खो खो हसत असाल. तर आता एक सांगतो, प्रसिद्ध होण्याचे दोन तीन उपाय सांगितले आहेत, तुम्ही एकच धरून बसलात. काही वेगळा विषय काढा की!

उदा. कुठलीतरी बॉलीवूडची प्रसिद्ध नटी खरा पुरुष आहे, किंवा सदराफाड खान ही खरी बाई आहे.

Happy Light 1

मधुकर तुमचे प्रथम अभिनन्दन.
वरिल लेख वाचल्यानन्तर त्यान्चा जळफळाट होने सहाजिक आहे. आजवर ते जे म्हनतिल त्याला आपन मान डोलावत आलो, ते म्हनतील ते प्रमान मानत आलो, आता स्वतन्त्र बुद्धिने कहि लिहायचे म्हटले कि ते थयथयाट करणारच. असो.
वरील प्रतिक्रिया देणार्याना माझा एक प्रश्न आहे, शिवाजि महाराजान्ची बदनामि नेहमी ब्राम्हणच क करतात? जेम्स लेन ल मदत करणारे सर्व ब्राम्हनच कसे काय? पुरन्दरे त्यान्च्या राजा शिवछत्रपती या ग्रन्थात लिहितात, "लाचार, स्वार्थी मराठा पुरुष स्वार्थासाठी स्वताची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहित?" मराठ्यान्च्या आईची इतक्या खालच्या पातळीवर जावुन बदनामि करणार्या पुरन्दरेला आम्ही का आदर्श मानावे. पुरन्दरे लिहितो, शिवाजि महाराज, जिजाऊ आनि दादू कोन्डदेव यान्चे गोत्र एकच होते. अशी हरामखोरी करणारा मानूस इतिहास अभ्यासक, छी....ददू कोन्डदेव आणी रामदास यान्चा शिवचरीत्राशी काहीही सम्बन्ध नसताना त्याना गुरु केले, का? तर कोनत्याही कर्तुत्ववान माणसाचे गुरु ब्राम्हणच पाहीजे, म्हणजे तत्यान्च्या कर्तुत्वाचे श्रेय घ्यायला रिकामे.
सम्भाजी ब्रिगेड चा लढा सर्व बहुजन, मराठा समाजासाठी आहे आनि महाराष्ट्रातून भरपूर पाठिम्बा मिळत आहे.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.

अहो तुम्ही ते शेवटचे जे लिहीले आहे ना, जय जिजाऊ वगैरे, त्या सर्वांचा देवावर विश्वास होता हो! नि जय महाराष्ट्र काय लिहीता? अहो ब्राह्मण पेशव्यांनी तिथे अनेक वर्षे राज्य केले, परकीयांना दूर ठेवले, त्यांच्या महाराष्ट्राला जय म्हणता?

असे नका करू! त्यापेक्षा अल्लाह हो अकबर, शहेनशाह औरंगजेब झिंदाबाद असे लिहा. ते लोक ब्राह्मणांचे शत्रू होते, म्हणजे तुमचे दैवतच ते! म्हणजे तुम्ही देव मानत नाही तर दैवत ऐवजी परवरदिगार म्हणा! ते चालेल, कारण ते ब्राह्मण नाही!

मी पण माझ्या स्वतंत्र बुद्धीने काही लिहू का? माझे पण अभिनंदन, कौतुक कराल का? स्वतंत्र बुद्धी हो. खरेच असेल असे नाही, जातिभेद पसरवणारे एकमेकांचा द्वेष करायला शिकवणारे असे काही काही लिहीन, पण स्वतंत्र बुद्धीने हं!

आपण एक राजाराम ब्रिगेड स्थापन करू, आदर्श, सम्यक्! सत्य, ईश्वर यांना अजिबात न मानणारी. नि आणखीन पाच सहा राडे करून टाकू. ब्राह्मणांनी टिकवलेल्या महाराष्ट्रात जाळपोळ, लुटालूट, करू. लै पैका मिळल. आपण दुसरे काहीच करत नाही! म्हणून हो.
Proud Proud Proud Proud

नवबौद्धांनी ब्राह्मणांना झोडपायला संभाजी ब्रिगेडचे गुण गावेत हा अज्ञानमूलक, हास्यास्पद, विरोधाभास आहे. दलितांचे जेवढे नुकसान ब्राह्मणांनी केले त्याच्या कितीतरी अधिक मराठ्यांनी केले आहे. दलित मतपेटीला गृहित धरुन आणि दलित नेत्यांना दावणीला बांधून हे नुकसान मराठा नेत्यांनी अजून चालूच ठेवले आहे.
मधुकरराव, डोळे उघडा आणि खरा शत्रू कोण आहे ते नीट पहा.

दलित मतपेटीला गृहित धरुन आणि दलित नेत्यांना दावणीला बांधून हे नुकसान मराठा नेत्यांनी अजून चालूच ठेवले आहे.>>>>> याला त्यांच मराठा असणं कारण नसुन त्यांच नेतेपद या गोष्टीला कारणीभूत आहे हे माझं मत

जेम्स लेन नावाचा एक गोरा भारतात येतो, भांडारक संस्थेतील काहि लोकांच्या मदतीने शिवरायांवर पुस्तक लिहतो. या संस्थेतील आपल्याच मातितील लोकानी जेम्स लेनला खोटी माहिती पुरविली जी पुढे जाऊन वादग्रस्त ठरली. आता सगळे जेम्स लेनला दोषी धरतात. पण मुळात हि १४ लोकं ज्यानी जेम्स लेनला हि माहिती पुरविली ते मात्र खरे गुन्हेगार असुनही मोकाट सुटलेत.>>>>>>

पुस्तक प्रकशित करतांना..त्यातील प्रत्येक लिहीलेल्या ओळिची जबाबदारी रेस्पेक्टिव्ह लेखकाचीच असते.. त्यासाठी दुसर्यांना दोश कसा देता येयिल??

चिमुरी असे रागात नका येऊ. चर्चेत कधीच रागात येऊ नये, ते काम मधुकरचे.

त्यांच मराठा असणं कारण नसुन त्यांच नेतेपद या गोष्टीला कारणीभूत आहे हे माझं मत >> चूक आहे. महाराष्ट्राचे नेते कोण? मराठा जातीचे नेते. भारतात अजूनही जातीवर आधारित राजकारण चालते हे तुम्हास माहीत असावेच.

उरलेले प्रांत कोणते ते सांगावं म्हणुन विचारल >> कोणते? सांगा की मला काहीच माहीत नाही बॉ. महाराष्ट्रातले राज्य किती भरले ते सांगा. तुम्हाला शिवाजीच्या समकालीन छत्रसाल माहिती असेलच. त्याचे राज्य का टिकले नाही? कारण त्याचाकडे बाजीराव, चिमाजी आपा, सदाशिव भाऊ, माधवराव पेशवे नव्हते. हो की नाही? मी आपला पेशव्यांच्या महालातील महार. मला आवडतं बॉ म्हणून घ्यायला. काही अपमान नाही. पेशव्याला मराठ्यांनी साथ नाही दिली, नाहीतर शाहूला फुकटात राज्य उपभोगता आले असते.

अन जय महाराष्ट्र रावजी संभाजीला कोणी पकडून दिलं हो? त्याचा सख्या बहिनोईने, विसरला काय? तो पण मराठाच. जाउ दे तुला नाही कळायचे ते. मराठा लोकांनी हांजी हांजी करण्यात सर्व विकायला कमी केले नाही . शिवाजी वेगळा म्हणून तो ग्रेट तुम्ही बसा बोंबलत एका जातीबद्दल.

पुस्तक प्रकशित करतांना..त्यातील प्रत्येक लिहीलेल्या ओळिची जबाबदारी रेस्पेक्टिव्ह लेखकाचीच असते.. त्यासाठी दुसर्यांना दोश कसा देता येयिल >> अगदी बरोबर बोललात रश्मी, पण ह्या भुक्कड संघटनेला अन द्वेष्ट्यांचा राजा मधुकरास ते कसे कळावे?

हे चाललय ते अत्यंत निंद्य आहे. स्वतःची तोकडी बुध्दी उघडी पाडुन उगाच मोठ्या नावांना बदनाम करायचे. मधुकर, जरा जातियवादापलिकडे जाऊन पहा......... आणि त्यांच्याशी वाद घालताना काही मंडळींनी केलेली शिवरायांबद्दलची विधाने ही पण तितकीच चुकीची आहेत.

राहिला प्रश्न ब्रिगेडींचा तर आपले प्रस्थ माजवायला घेतलेल्या ह्या कुबड्याच आहेत. काही विधायक करायचे नाही. मधुकरसारख्या लोकांना हाताशी धरुन उरे बडवत फिरायचे........ शिवाजीमहाराजांचे अस्तित्व या सो कॉल्ड "सम्यक विचार्‍यांनी" शाबुत ठेवलेय हे उभ्या महाराष्ट्रावर उपकारच आहेत.
उद्या "आग्र्याहुन सुटका" हा पळपुटेपणा होता किंवा अफजलखानाला मारलाच नाही तो शामियान्यात निसर्गतःच मरण पावला म्हणुन तिथे त्याची कबर बांधली असल्या वावड्या नाही उठवल्या या लोकांनी म्हणजे मिळवली. Angry

संभाजी ब्रिगेड म्हणे. शिवाजी राजे आणि शंभुराजेंच्या नखाची सर नाही आणि निघालेत इतिहास बदलायला. Angry

बाकी लेख अत्यंत फालतु. "आशयहीन" (किंवा "हीन आशय" असेही म्हणुया हवे तर). थोडक्यात "भ्रमनिरास"........ Sad

मधुभाउ धन्यवाद, अत्यंत चांगल्या चर्चेला सुरुवात केली आहे. अजुन काही माहीती देता आली तर बघा.
ज्या जगत्गुरु माऊलीला, देहुच्या वाण्याला ह्या लोकांनी जगणे असह्य केले त्याच मंबाजींकडुन तुम्ही शिफारस पत्राची मागणी करत आहात. कि जी गोष्ट सशाच्या शिंगांप्रमाणे दुर्मिळच नाही तर अस्तित्वात देखील नाही.
येथील त्याच भंपक, सो कॉल्ड प्रतिष्ठीत असामींच्या प्रतिक्रिया वाचल्या. आनंद झाला.

मी सध्या कामात असल्यामुळे सविस्तर प्र्तिक्रिया देवु शकत नाही.

अजुन ताटाखालच्या मांजरांच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत या बद्दल आच्श्र्य वाटले.

विचार करत होतो कि या पोस्टीला प्रतिसाद न द्यावा, परंतु न राहवून एकच सांगु इच्छितो कि, संगणकावर जेंव्हा एखादी Error येते तेंव्हा Cancel --> Retry --> Ignore अशा Keys येतात, तेंव्हा या आणि अशा पोस्टी एक Error आहे असे समजुन फक्त Ignore हिच Key दाबत रहा. कारण झोपलेल्याला जागे करता येते झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.

आचार्य अत्र्यांनी मधु लिमयेंना उद्देशुन एक कोटी केली होती. ती ईथेही चपखल लागु पडते "अधु मेंदुचा मधु

कारण त्याचाकडे बाजीराव, चिमाजी आपा, सदाशिव भाऊ, माधवराव पेशवे नव्हते. हो की नाही? मी आपला पेशव्यांच्या महालातील महार. मला आवडतं बॉ म्हणून घ्यायला. काही अपमान नाही. पेशव्याला मराठ्यांनी साथ नाही दिली, नाहीतर शाहूला फुकटात राज्य उपभोगता आले असते. >> देशी, हे ईथे बोल्ड केलेलं वाक्य काढुन टाका.

आणि

तुम्हाला शिवाजीच्या समकालीन छत्रसाल माहिती असेलच. >> शिवाजी राजे किंवा शिवराय म्हणा. राज्यांना असं एकेरी संबोधलेलं मला नाही चालणार.

haa jai maharashtrach Madhukar aahe...
samor yayachi himmat nahi mhanun hya DO I ni aalay....... Angry

Pages