संभाजी ब्रिगेड म्हटलं की लोकांना एकच घट्ना आठवते ती म्हणजे “भांडारकार ईन्स्टिट्युट” आणि या घटनेचा मिडियानी एवढा बाऊ केला आहे की, संभाजी ब्रिगेड म्हणजे सकाळ संध्याकाळ जणु एकच काम करत फिरते, भांडारकर शोधने व तोडने.
अरे ती एक प्रतिक्रिया होती, हो प्रतिक्रिया.
आता कशाची प्रतीक्रिया हे सांगायची गरज पडु नये. एक संघटनेला नुसतं एका प्रतिक्रियेमुळे भारतातील मिडीयाने असे रंगवुन दाखविले जणु काही ती संघटना म्हणजे आतंक पेरत फिरणारी दहशतवादी बापटयांची टोळी आहे.
पण या पेक्षा मोठ मोठाले कांड करणा-या संघटना मात्र पांढरपेशी लोकाना अगदी चालतात. अयोध्येची मशीद फोडणारी संघटना असो, गोध्र्यात कत्तल घडविणारी संघटना असो वा क्रिकेटचं पिच खोदुन दहशत माजविणारी, महाराष्ट्रात राडा संस्कृती आणणारी किंवा त्याच संघट्नेतुन बाहेर पडुन उत्तर भारतियाना झोडपणारी नवनिर्मीती असो. हया सगळ्य़ा संघटनांच्या दहशती पुढे संभाजी बिगेडचं ते भांडारकर प्रकरण म्हणजे किस खेत कि मुली. पण नाही मिडीयाना ह्या सगळ्य़ा संघटनांची दहशती कृत्ये अगदी मान्य आहेत. पण संभाजी ब्रिगेडची मात्र याना भलतीच एलर्जी.
खरंतर संभाजी ब्रिगेड एक सम्यक संघट्ना आहे. समावेशक तत्वांचा पुरस्कार करणारी एक आपली सामान्य मराठी माणसांची ती संघटाना आहे. शिवराय व जीजाऊचा आदर करणारी ती संघटना आहे. बहुजन व दलितांसाठी लढणारी ती संघटना आहे. अंद्धश्रद्धेला नाकारणारी बुद्धिजीवी लोकांची ती संघटाना आहे. देवाचं अस्तित्व नाकारणारी व समाजातील तळागळातल्या लोकांच्या पाठिशी उभी राहणारी एक स्वच्छ विचारसरणी असलेली ती संघटना आहे.
विद्यार्थी, युवक युवतिंचे संघटन करुन समाजासाठी पुर्णवेळ कार्यकर्ते तयार करणे, अन्याया विरुद्ध एकत्र येऊन संघर्ष करणे. आपल्या प्रश्नांसाठी लढने व स्वयंरोजगार निर्माण करुन मराठा बांधवाना स्वत:च्या पायावर उभे करणे हे मुख्य उद्देश डोळ्य़ापुढे ठेवुन या संघटनेची स्थापना झाली.
राज्यभर ब्रिगेडच्या शाखा आहेत, १४ मे या दिवशी संभाजी राजेंच्या जन्मदिवशी राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जाते. त्यातुन युवक मराठा कार्यकर्ते तयार केले जातात. Standing Commando Force ह्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यात १०० जणांची फौज उभी करण्याचे काम चालु आहे.
अधिक माहिती ईथे वाचा.
http://sambhajibrigade.blogspot.com/
तसेच मराठा सेवा संघाचा शिवधर्म व त्यांची भुमिका पण किती व्यापक आहे ते ईथे वाचा.
http://www.msschanda.com/pdf/Bhumika.pdf
थोड्सं भांडरकर प्रकरणा बद्दल
ज्या भांडारकर प्रकरणावरुन संभाजी ब्रिगेडला बदनाम केल्या जातं मुळात ते प्रकरण किती लज्जास्पद आहे ते बघु या.
जेम्स लेन नावाचा एक गोरा भारतात येतो, भांडारक संस्थेतील काहि लोकांच्या मदतीने शिवरायांवर पुस्तक लिहतो. या संस्थेतील आपल्याच मातितील लोकानी जेम्स लेनला खोटी माहिती पुरविली जी पुढे जाऊन वादग्रस्त ठरली. आता सगळे जेम्स लेनला दोषी धरतात. पण मुळात हि १४ लोकं ज्यानी जेम्स लेनला हि माहिती पुरविली ते मात्र खरे गुन्हेगार असुनही मोकाट सुटलेत. संभाजी ब्रिगेडला भांडारकर संस्थेवर नक्कीच सुड उगवायचा नव्हता. ते या १४ लोकाना जाब विचारायला गेले होते. आणि पुढे हे सगळ घडलं.
त्या १४ लोकांची नावं.
१) व्हि. एल. मंजुल.
२) एस. एस. बहुलकर.
३) सुचेता परांजपे.
४) वाय. बि. दामले.
५) रेखा दामले.
६) भास्कर चंदावरकर.
७) मीना चंदावरकर.
८) माधव भंडारे.
९) मीरा कोसंबी.
१०) ए. आर. कुलकर्णी.
११) राजेंद्र वोरा.
१२) नरेंद्र वागळे.
१३) जयंत लेले.
१४) दिलिप चित्रे.
हि आहेत ती दिव्य रत्ने ज्यानी लेनच्या पुस्तकातुन चिकलफेक केलीय़. आता काय या लोकांची पुजा करायची का ?
आपल्या महापुरुषांची बदनामी करणा-या लोकाना जाब विचारल्यामुळे मिडियानी संभाजी ब्रिगेडला बदनाम करुन ठेवलं.
पण ज्या रक्तात शिवरायांचा संस्कार धावतो. त्या रक्ताला परिणामाची तमा नाही.
जय जीजाऊ, जय शिवराय.
जय संभाजी ब्रिगेड.
मधुकर, सुरुवातीला तुम्ही जे
मधुकर, सुरुवातीला तुम्ही जे लेख लिहिले होतेत, तुमच्या गावच्या मुलांनी शिक्षण कसे खडतर परिस्थितीत घेतले, तेथील होस्टेल चे जीवन वगैरे.. ते लेख खुप चांगले , माहितीपुर्ण, अभिमानास्पद व शिकण्यासारखे होते. मायबोलीवर खुप कौतुक पण झाले होतेच त्याचे.
पण काही महिन्यापासुन जे लेख तुम्ही लिहिताय ते फक्त तुमच्या मनात ब्राह्मणांबद्दल असलेल्या प्रचंड संताप प्रकट करणारे आहेत ह्याचा मला खुप खेद होतोय. पुर्वी अत्याचार झाले पण आता जग खुप बदलले आहे असे अजुन पण तुम्हाला वाटत नाही का? ब्रिटिशांनी आपल्याला किती त्रास दिला पण भारतीय ते विसरले नसले तरी तेच धरुन बसले नाहीयेत.
पराकोटीचा संताप मनात असेल तर creativity संपते, तुमचे तसे होऊ देऊ नका.
शिवाजी राजे किंवा शिवराय
शिवाजी राजे किंवा शिवराय म्हणा. राज्यांना असं एकेरी संबोधलेलं मला नाही चालणार >> तू कोण लागून गेला बे? म्हणे मला चालणार नाही. मला चालेल. मी बुद्धाला पण बुद्ध म्हणतो.
ह्याच मधुकरने काही दिवसांपूर्वीच शिवाजीवर पण गरळ ओकली हे येथील लोक विसरले वाटतं. मी नाही विसरलो.
तिक्रिया देणारा फक्त काडी टाकतोय >> काडी काय त्यात? शिवाजीने जे राज्य स्थापन केले त्याला एम्पायर पेशव्यांनी बनवले. आता हे पण मान्य नाही म्हणजे झालच. मराठा साम्राज्य पेशव्याने वाढवले, टिकवले, द ग्रेट मराठा ही उपाधी पेशव्यामुळे लाभली आहे. शिवाजीने पाहिलेल्या व्हिजनला डिलव्हरीचे स्वरुप द्यावे लागते की नाही? की शाहू सारखे बोळ्याने दुध पित बसायचे?
अन विरोध करायचाच तर शिवाजीला ज्यांनी ज्यांनी लुटारू म्हणले त्यांचा करा की. बसले आपले ब्राह्मण द्वेष पाजाळीत. (केदारराव हे तुम्हाला नाही हो. )
केदार जाधव यांचे विचार योग्य
केदार जाधव यांचे विचार योग्य वाटले. ब्राह्मणांचा आत्यंतिक द्वेष करणार्या एका जातीयवादी व्यक्तिने मुद्दामच हा बाफ सुरू केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही व्यक्ती ब्राह्मणांबद्दल अतिशय गलिच्छ लिखाण करीत आहे. त्यावर प्रतिक्रिया म्हणून इतरही काही जणांनी वाईट लिखाण केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी अशांसारख्या थोर व्यक्तींबद्दल वाईट लिहिले जात आहे. ऐन गणेशोत्सवात असे वाद विनाकारण निर्माण करून वातावरण गढूळ करण्याचा या व्यक्तीचा डाव पुन्हा एकदा यशस्वी झाला आहे.
मी अॅडमिनना यापूर्वी १-२ वेळा या व्यक्तीचे द्वेषमूलक लिखाण काढून टाकण्याची विनंती केली होती. परंतु माझ्या विनंतीचा उपयोग झाला नाही. कदाचित सर्वांनी (किमान २५-३० जणांनी) अॅडमिनना विनंती केली तर काहीतरी होऊ शकेल. अन्यथा ही व्यक्ती गरळ ओकतच राहील.
अहो सुनिधी, त्यांना समजत
अहो सुनिधी, त्यांना समजत असेलच की ते. पण असे बदला म्हंटले की लगेच बदलता येत नाही, तोपर्यंत जरा त्यांना आपण सांभाळून घ्यायला हवे. त्यांच्यावर जबरदस्त टीका करून हैराण करून सोडू नये. त्याने त्यांचा राग कमी होणार नाही.
शिवाय मायबोली जरा शांत झाली की ते मुद्दाम अशी एक काडी टाकतात, नि मग गंमत बघत बसतात. पहा ना, इतक्या लोकांनी विचारले, की या ब्रिगेडने काय केले, सांगितले का त्यांनी? नाही. कारण उद्देश मुळी विचारपूर्वक वादविवादाचा नाहीच, केवळ गंमत बघणे हा आहे.
तशी आपल्या भारतात, सकाळी उठून, लोटा घेऊन, भर रस्त्यात उकीडवे बसायची पद्धत आहेच. हे त्यातलेच. इतक्या वर्षात लोकांनी काय केले त्याबद्दल? काही नाही. मग थोडा वेळ त्यांना बसू द्या, जातील उठून, पाऊस पडेल, रस्ते स्वच्छ. उद्या पुनः येतीलच. एखाद्या दलितानेच हाकलले त्यांना तर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल.
देशाच्या उन्नतीत नि अधोगतीत नेहेमीच सगळ्या जातीपातींचा, धर्मियांचा नि निधर्मियांचा सुद्धा वाटा असतो. त्यामुळे कुणि दुसर्या कुणाला, तो अमुक जातीचा आहे, असे म्हणून नावे ठेवू नयेत.
नि पूर्वीच्या काळी काय झाले, त्यावरून तर मुळीच नाही! जरी खरे असले नसले तरी.
आजचा भारत गेल्या वीस वर्षात प्रचंड बदलला आहे. ब्राह्मण अब्राह्मणच काय, हिंदू, मुसलमान इ. सर्व लोक एकत्र येऊन भारताचे नाव उज्ज्वल करताहेत. त्यांच्या विद्वत्तेला, कर्तबगारीला जगात सर्वत्र मान मिळतो. तेंव्हा हे असले वाद निरर्थक आहेत. नाहीतरी दहा वर्षांपूर्वी, हजार वर्षांपूर्वी काय झाले या पेक्षा आत्ता काय होते आहे तेच महत्वाचे.
येथील परिस्थितीतील तणाव दूर करण्यासाठी आपण जरा विनोद वगैरे करू. मग हळू हळू एकमेकातली तेढ कमी होईल.
अन जाधवराव एक राहिलेच,
अन जाधवराव एक राहिलेच, मराठ्यांनी एकमेकांना विकले हे खरेच आहे हो. खोटे नाही. सत्तेसाठी काय वाट्टेल ते करत होते ते. ( ह्यात बामन रघोबा पण आलाच, पण हे एकच उदाहरण) बाकी संभाजीला नाईकाने विकलं हे तुम्हाला मान्य नसलं तरी काय फरक पडणार? खरं आहे ते बदलणार का? नाही ना? म्हणून दुसरे कोणी आपल्याला लुटारू म्हणू धजावतात.
मास्तुरे, तुम्ही एकदा निट
मास्तुरे,
तुम्ही एकदा निट वाचा मी काय लिहले ते. त्याच्यात कुठेही बामणाना टाकुन किंवा जातीयवादी वा कुणाला दुखविणारं एक शब्दही लिहलेलं नाही.
तुम्ही उगीच काव काव करत कशाला फिरताय.
अॅडमिनच्या विपुत सुद्धा गरड ओकुन आलात.
असो तुम्ही तुमच्या वृत्ती प्रमाणे चालु दया.
तुमचं मंगल होवो.
चला आता 'झाले' का? संपला हा
चला आता 'झाले' का? संपला हा 'कार्यक्रम'?
आता दुसरे काहीतरी काढा उकरून. पुरुष किती वाईट, का भारत वि. अमेरिका? दोन्ही तितकेच स्फोटक आहेत, नि मधुकरराव नाही आले तरी बाकीचे काही कमी नाहीत इथे!
जाउद्या झक्की. >येथील
जाउद्या झक्की.
>येथील परिस्थितीतील तणाव दूर करण्यासाठी आपण जरा विनोद वगैरे करू. मग हळू हळू एकमेकातली तेढ
> कमी होईल.
मी एक 'सम्यक' जोक सांगतो... मग तुम्ही सांगा... बाकी कोणी सांगितला तरी चालेल....
माझ्या मित्राने जीमेल वर स्टेटस मेसेज लिहीलं होतं : -
'Don't always expect change. You bring the change...' - Conductor.
चला. पुढचा विनोद कोण सांगेल ? ? ?
त्याच्यात कुठेही बामणाना
त्याच्यात कुठेही बामणाना टाकुन किंवा जातीयवादी वा कुणाला दुखविणारं एक शब्दही लिहलेलं नाही.
---------------------------------------------------------------------------------
ब्राह्मणाना " बामण" कुठल्या उदात्त हेतुने संबोधले आहे का?
अहो मास्तुरे, गणपती महोत्सव
अहो मास्तुरे, गणपती महोत्सव चालू आहे म्हणूनच त्याने हा बाफ सुरु केला. त्या आधी वर्गणीच्या बाफवर त्याने उघळलेले गुण पाहिले आहेतच. मायबोलीचा दगडी गणपती महोत्सव ह्या माणसाला सहन नसावा झाला.
शिवाजी वगैरे निमित्त हो. ही संघटना ब्राह्मण विरोधी म्हणून हा मधुकर त्याला सपोर्ट करतो बाकी काही नाही. नाही तर हा औरंग्याला ग्रेट म्हणाला नसता.
विनोदनिर्मितीने असे लोकं सुधारले असते तर सगळ्या टिव्हीवर चालणार्या विनोदी कार्यक्रमातून बदल दिसला असता. पर्याय एकच विरोध.
बामन रामदास सांगून गेला आहे, " धटासी धट, उद्धटासी उद्धट आणावा तैसा" म्हणजे काय की आमची आधीची पिढी संडास साफ करायची अन तुम्हाला तर माहीत आहे की संडास साफ करायचा असेल तर हात खराब होतील म्हणून काय फायदा? तस्मात गाडगेबाबा व्हा, समाजतली ही घाण साफ करा. आणि आता समाज म्हणजे खरे लोकंच नाही तर इंटरनेट पण !!
केदारच्या सर्वच मुद्द्यांना
केदारच्या सर्वच मुद्द्यांना अनुमोदन.
शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या मजकूराबद्दल कुणाही माणसाचा संतापच होईल. पण त्याची प्रतिक्रिया म्हणूनही भांडारकर वरील हल्ल्याचे समर्थन करता येणार नाही. त्या जेम्स लेन ने जर भांडारकर समोरच्या झेरॉक्स वाल्याचे किंवा चहाच्या टपरीवाल्याचे आभार मानले असते तर त्यावरही हल्ला केला असता का? त्या बिचार्या पुस्तकांनी काय घोडे मारले आहे? मुळात असे हल्ले करणार्या तरुणांना (झेंड्याचा रंग कोणताही असो ) आपण वापरले जातोय हेच समजत नाही. अशी पेटवा पेटवी करणारे आमदार खसदार होतात. आणी तरुण पोलिस केसच्या झंझटात अडकतात. शिवाजी महाराज एका जातीचे किंवा धर्माचे नव्हेत. किंबहुना सर्व महाराष्ट्राचेही नव्हेत. त्यांना एका जातीच्या किंवा धर्माच्या चौकटीत बसवणे चुकिचेच आहे.
भरलेल्या कपात चहा ओतता येत
भरलेल्या कपात चहा ओतता येत नाही.. झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही... अशा अनेक म्हणी /संकल्पना आठवताहेत..
असो!
मधुकरांचे मला मनापासून आभार मानावेसे वाटताहेत.. 'जेव्हा एखादा माणूस हेतूपुरस्सर तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतो - तेव्हा आपण न चिडणं हेच त्याचं अपयश', 'एका टप्प्याच्या पुढे पोचल्यावर चर्चेतही काहीच अर्थ नसतो' ह्या कल्पना पटलेल्या होत्या.. पण मधुकरच्या सततच्या अशा प्रकारच्या लिखाणामुळे त्या खर्या अर्थानं 'उमगताहेत' (हे आयुष्याच्या इतर अँगल्सना पण ह्यापुढे लागू पडेल ही आशा)
धन्यवाद मधुकर!
>>> त्याच्यात कुठेही बामणाना
>>> त्याच्यात कुठेही बामणाना टाकुन किंवा जातीयवादी वा कुणाला दुखविणारं एक शब्दही लिहलेलं नाही.
मागे एकदा तुम्ही स्वत:च सुरू केलेल्या असंख्य विकृत बाफपैकी एका बाफवर "ब्राह्मण या देशात उपरे आहेत. त्यांनी इथे राहू नये." अशा अर्थाचे लिखाण केलेले होते.
एनीवे, ब्राह्मणांविरूध्द द्वेषमूलक लिखाण करून त्याचा आनंद लुटणे ही तुमची मानसिक विकृती आहे. तुम्हाला तातडीने एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडून मानसोपचार घेण्याची गरज आहे.
फालतू आणि विकृत लिखाण.....
फालतू आणि विकृत लिखाण.....
तुम्हाला तातडीने एखाद्या
तुम्हाला तातडीने एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडून मानसोपचार घेण्याची गरज आहे.>>
धन्यवाद.
माझं माहित नाही, पण माझे लेख असच वाचत राहिलास अन टेन्शन घेत राहिला ना, तर तुला मात्र उपचाराची गरज नक्कीच पडेल.
<<तुम्हाला तातडीने एखाद्या
<<तुम्हाला तातडीने एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडून मानसोपचार घेण्याची गरज आहे.>>
मानसोपचार तज्ज्ञान्ना जम्ले नाय म्हनुन तर हा सायको इथे आला ना तुमाला वेड कराय्ला हाहा
केदार जाधव यांना प्रचंड
केदार जाधव यांना प्रचंड अनुमोदन
तर तुला मात्र उपचाराची गरज
तर तुला मात्र उपचाराची गरज नक्कीच पडेल.
तुम्हाला काय मानसतज्ज्ञांकडून 'कट' मिळतो काय? कुणि आहेत का ओळखीचे? मला सांगा.
म्हणून लोकांचे मानसिक संतुलन बिघडावे असे लिहिता?
अहो मधुकरराव, तुमच्या लक्षात येत नाही का? जेव्हढे तुम्ही स्वतःला बुद्धीवादी, बेडर समजता, नि फक्त तुम्हालाच इतिहास माहित आहे असे सांगता, तसेच उलट बाजूने वाटणारे लोक इथे आहेत. कोण किती खरे नि किती खोटे हे सांगता येत नाही. तुम्ही तुमची मते बदलणार नाही, तसेच तेहि त्यांची मते बदलणार नाहीत.
तुम्ही पूर्वी काय झाले त्यावरून चिडता? ब्राह्मण, आज काय होत आहे - दलितांना असंख्य सवलति, सर्व मंत्रि प्रामुख्याने अब्राह्मण, ब्राह्मणांचा व हिंदूंचा समाजात होत असलेला अनादर, मुसलमानांकडे सदैव झुकते माप, यावरून चिडतात.
उगीच काय द्वेष पसरवायचा? त्याने कुणाचेच भले होणार नाही.
तुम्ही आता असे करा, स्वातंत्र्य मिळाल्यावर मिळालेल्या सवलतींचा फायदा घेऊन दलित समाजाने आपली कशी उन्नति करून घेतली आहे, याची उदाहरणे द्या. संभाजी ब्रिगेडने केलेल्या चांगल्या कामाची उदाहरणे द्या. (लिंका नकोत, कुणिहि त्या उघडून वाचण्याचे कष्ट घेणार नाहीत. एव्हढी असंख्य इतिहासाची पुस्तके वाचून तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, मग लोकांना तरी कसे खरे वाटल केवळ एक दोन बातम्या वाचून?)
एक नवा बीबी उघडून दररोज त्यात फक्त याच बातम्या देत चला. तुमचे स्पष्टीकरण नको, फक्त बातम्या!
सतत वाचून कुणि तरी त्याची शहानिशा करून तुमच्या बाजूने बोलतील. तोपर्यंत हे असेच चालायचे, याला अंत नाही.
झक्की, अहो मधुकराला बिनबुडाची
झक्की, अहो मधुकराला बिनबुडाची विधाने ठोकून देण्यात काही वावगे वाटत नाही. वाटले तरी इतरांकडे बोट दाखवण्याची त्याची सवय आहेच. तुम्ही तरी कशाला समजवायला जाता ?
नाहीतर काय, अनुभवाने
नाहीतर काय, अनुभवाने सगळ्यांना माहितेय की हे असे काडीलावू बीबी थोड्या थोड्या दिवसांनी येत असतात, आणि येत रहाणार. कशाला लक्ष देताय आणि समजावायच्या फंदात पडताय? पालथ्या घड्यावर पाणी म्हणा नी नाद सोडा.
"पण ज्या रक्तात शिवरायांचा
"पण ज्या रक्तात शिवरायांचा संस्कार धावतो. त्या रक्ताला परिणामाची तमा नाही."
अहो मधुकरराव, तुमच्या रक्तात शिवरायाचे संस्कार धावताहेत?
नानाची टांग!
जेम्स लेन नि इतर कुणि, गेल्या तीनशेहून अधिक वर्षात, छत्रपति श्री शिवाजी महाराजांचा जेव्हढा अपमान केला नसेल तेव्हढा तुम्ही एव्हढे एक वाक्य लिहून केलात!
बिचार्या छत्रपतींचा आत्मा देवाचे पाय घट्ट धरून देवाला म्हणेल, आता तरी माझी सुटका कर!
सगळे रक्त देश स्वतंत्र करण्यासाठी सांडून गेले असते तरी कधी पर्वा केली नव्हती, पण हा भेकड, संपूर्णपणे नालायक, रडतराव माणूस माझे नाव घेतो नि त्याची जीभ कसे कुणि हासडून टाकत नाहीत? त्याचे हात कसे कुणि कलम करत नाहीत?
वर माझे सुपुत्र छत्रपति श्री संभाजी महाराजांचा अपमान औरंगजेबाने केला नसेल एव्हढा त्या ब्रिगेडला त्यांचे नाव देऊन करण्यात आला! नि त्यांची या माणसाला कीव येते?
पण तुम्ही तरी त्यांना कशाला समजवायला जाता?
अहो जिथे ब्रह्मदेव सुद्धा हात टेकेल तिथे म्या पामराची काय कथा? मला मधुकररावांबद्दल यत्किंचितहि कर्तव्य नाही, पण त्यांचे लिखाण पाहून मनातील सगळे क्रोधादि विकार वर येतात, त्यांचा निचरा व्हायला पाहिजे, म्हणजे मग शुद्ध मनाने देवाची प्रार्थना करता येईल.
असलेच विनोद चालू ठेवा, विदूषक! घरात पोट साफ करायचे औषध हवेच, तसे तुम्ही इथे हवेच.
छत्रपति श्री संभाजी
छत्रपति श्री संभाजी महाराजांचा अपमान औरंगजेबाने केला नसेल एव्हढा त्या ब्रिगेडला त्यांचे नाव देऊन करण्यात आला! >>>>>>>> अगदी... यामुळेच संभाजी राजांची जास्त बदनामी होत आहे...
अहो, मधुकर.. बाकीच्यांचं
अहो, मधुकर.. बाकीच्यांचं जाउदे हो. मी तुम्ही दिलेले सर्व दुवे वाचून आलो, त्याबद्दल लिहिले, प्रश्न विचारले तर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहिये?
अॅडमिनच्या विपूवर मधुकरने
अॅडमिनच्या विपूवर मधुकरने खालील तारे तोडलेले आहेत. मधुकर मनोरूग्ण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.
"नमस्कार अॅडमिन,
हा मास्तुरे माझ्या नावाने कय गरळ ओकत फिरतोय बघा.
तुम्ही त्याला समज दयाल ही अपेक्षा.
तुमच्या कारवाईची वाट बघतोय.
नाहितर मी त्याचा बंदोबस्त करेन माझ्या परिने.
मग तेंव्हा मला माबो प्रशासनाने जबाबदार धरु नये."
ब्राह्मणद्वेषाची कावीळ झाल्यामुळे त्याची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळेच त्याला मुस्लिम समाज सभ्य व संवेदनाशील आणि संभाजी ब्रिगेड आदर्श व सम्यक संघटना वाटत आहे.
मधुकरच्या धमकीमुळे मला भीती वाटू लागली आहे कारण डोक्याने वेडसर असलेले काहिही करू शकतात.
घालवा लेको फुकाच्या चर्चा
घालवा लेको फुकाच्या चर्चा करुन बाइट्सच्या बाइट्स वाया.
मधुकर, संभाजी ब्रिगेड ही राजकारण्यानी त्यांच्या फायद्यासाठी सुरु केलेली संघटना आहे.
त्याला किती मराठ्यांचा सपोर्ट असेल???
बाकी सध्या ओपन कॅटॅगरीत जे उरले आहेत त्यांच्यात फुट पाडण्याच कार्य सुरु आहे. कारण आधीच्या जातींच राजकारण करुन करुन मातेर झालच आहे आता उरलेल्या लोकात फुट पाडली तर बरच असा हिशेब आहे.
आणि दुर्दैवाने चांगले शिकलेले लोकही त्याला हळुहळु बळी पडत आहेत हे काही प्रतिसाद वाचुन कळतय.
केदार जाधव, मराठाच काय
केदार जाधव,
मराठाच काय कोणत्याच समाजाला टार्गेट केले जाऊ नये अशीच भुमीका आहे. दुर्दैवाने सर्वच समाजात /ज्ञातीत टोकाची भुमिका घेणारी माणसे होती किंवा आहेत.
प्रतिक्रिया लिहिताना मुळ लेखावरच आपले आक्षेप लिहावे हे ताळतंत्र काही लोक पाळत नाहीत. याचा अर्थ सर्वच प्रतिक्रिया सर्वांना मान्य असतात अस नाही.
कृपया मुळ लेख व त्यावर सुसंगत प्रतिक्रिया वाचुन आपले मत बनवावे.
झकासरावांचा प्रतिसाद उत्त्तम.
झकासरावांचा प्रतिसाद उत्त्तम. माझ्या अंदाजे झकासराव प्रतिक्रिया सुद्धा देण्यासाठी बाईट खर्च करु नये अशा मताचे असावेत. पण रहावल नाही म्हणुन दिला.
व्यक्तिगत आयुष्यातील कचाचित काही कटु अनुभवामुळे मधुकर यांची मते पुर्वग्रहावर आधारलेली आहेत असे मला वाटते.
त्यांच इतर लेखन खुपच चांगल असत.जगलेले लिहितात म्हणुन लिखाणात जिवंतपणा आहे.
ब्रिगेड व ईतर असे लिखाण
ब्रिगेड व ईतर असे लिखाण वाचण्यात आले.
त्या विरोधात ह मो व ईतर लेखन पण वाचले.
आणी लक्षात आले की ब्राह्म्णांना शिवचरित्रातुन हद्दपार करणे व ठोकुन काढ्णे हा उद्देश आहे.
ह्या विषयावरिल "शिवाजी कोण होता " ही कॉ. गोविंद पानसरेंची पुस्तिका वाचनीय आहे.
चर्चा व वाद करताना ईतरांचा योग्य तो मान मात्र सगळ्यानीच ठेवायला हवा.
सम्भाजी ब्रिगेड ही सन्घटना
सम्भाजी ब्रिगेड ही सन्घटना मराठ्याना (सर्व जाती-जमातीच्या) व्यवस्थीत दिशा देण्याचे काम करत आहे, यात वाद नाही.
मानसिक दिवाळं निघालेल्या
मानसिक दिवाळं निघालेल्या फडतूस माणसाचा भिकारचोट लेख!
Pages