छ. शिवराय आणि आई जिजाऊ यांची बदनामी- एक षड्यंत्र
Submitted by प्रकाश पोळ on 24 September, 2010 - 13:19
सर्व बहुजन समाजाला आदरस्थानी असणारे छ. शिवराय व राजमाता जिजाऊ यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून जेम्स लेन याने सर्व बहुजनांच्या भावना दुखावल्या आहेत. आजपर्यंत बहुजन मुलनिवासिंच्या महापुरुषांची अनेक वेळा बदनामी करण्यात आली. बहुजनांच्या प्रेरणास्थानांची बदनामी केली की त्यांच्या विचाराने कार्यरत असणार्या चळवळीन्चे खच्चीकरण होते. त्यामुळे कथा, कादंबर्या, चित्रपट, नाटके, मालिका याद्वारे बहुजन महापुरुषाना खलनायक ठरवून मांडणी करण्यात येते. वरील सर्व माध्यमावर समाजातील एका वर्गाची सत्ता असल्यामुळे त्यानी बहुजनांच्या आराध्य देवतांची बदनामी करण्यासाठी त्याचा उपयोग केला.
गुलमोहर:
शेअर करा