शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:23

पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्‍या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय दुरंगी

दुरंगी (bi-colour): छायाचित्रासाठी विषयाचे बंधन नाही मात्र त्यात कोणतेही दोन रंग ठळकपणे टिपलेले हवेत. छायाचित्रात इतरही रंगांचा अंतर्भाव असू शकतो.

2010_MB_Zabbu-Rang-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा!! सगळे उच्च!!!

कासचं पठार!!!!

>लालू | 13 September, 2010 - 11:31 नवीन
ओ लालु, हे वरचं कुठलं फुल????

आपला झब्बु.... एनोशिमा बीचमधली गुहा.

ग्रे-ग्रीन........
green.jpg

अरे देवा!!!! काय सुंदSSSSSSSSsर फोटो टाकताय लोकहो!!!! लालु चे , मिनी चा गोळ्याचा फोटो, आल्हाद चा भूत, कासरपठार, आणि बाकी पण .. मी तर गाणच म्हणायला लागले, 'मार डाला देवा मार डाला' Happy Happy ... हा विषय न संपणारा आहे.

.

Pages