काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - वाहतुकीचे साधन
शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.
हि नॅशनल पार्क मधील वनराणी
हि नॅशनल पार्क मधील वनराणी
US Navy Blue Angels... यांचा
US Navy Blue Angels... यांचा खरं तर उडताना फोटो हवा, नंतर सापडला तर टाकते.
लोकहो, शक्यतो एकाच साधनाचे
लोकहो,
शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.
माझा झब्बु क्रं २
माझा झब्बु क्रं २
मस्त्च! कोणाकडे ट्रॅमचा फोटु
मस्त्च! कोणाकडे ट्रॅमचा फोटु नाही का? माझ्याकडे आहे पण ईथे रात्रीचे अकरा वाजलेत आणि तो फोटु आहे डेस्कटॉपात.......
उद्या हा विषय सुरु असला तर टाकते.
और ये मेरा
और ये मेरा झब्बु.................
I own a chevrolet माझी Chevy
I own a chevrolet
माझी Chevy
काऊबॉईजची सवारी..
काऊबॉईजची सवारी..
संयोजक, एकच साधन आहे की --
संयोजक, एकच साधन आहे की -- फायटर जेट्स! आधीच्या फोटोंमध्येही दोन उंट, दोन हत्ती, अनेक बोटी, वरती दोन घोडे आहेतच की!
ही फेरारी. एका परेड मध्ये पाहिली त्यामुळे खूप हळू 5mph ने चालली होती. बोअरींग!
स्टिंग रे मंदे बसून्शान
स्टिंग रे मंदे बसून्शान ष्टाइलीत जाऊ.
अरे कोणाकडे जुन्या लाल
अरे कोणाकडे जुन्या लाल पिवळ्या एस्टीचा फोटो नाही का ?
फार चांगला नाहीये फोटो, पण
फार चांगला नाहीये फोटो, पण गोड मानून घ्या
डेक्कन जिमखान्यापाशी काढलाय.
मला महामंडळाच्या आठवणीने गहिवरून येतंय :p
Fat Albert - C130T Hercules -
Fat Albert - C130T Hercules - support aircraft for Blue Angels
भारी! आताच ब्ल्यू एंजल्सच्या
भारी! आताच ब्ल्यू एंजल्सच्या वेबसाईटवर फॅट अॅलबर्टविषयी वाचत होते!
एस्टीचा फोटु तर मस्तच!
एस्टीचा फोटु तर मस्तच! बर्याच दिवसांनी दर्शन घडलं. पण तितकीच भारी बशीमागची श्री. आदिनाथ साळवी सरांची पाटी!
Les Shockley - Shock Wave (3
Les Shockley - Shock Wave (3 Pratt & Whitney J34-48)

प्रमोद, जबरदस्त! मृ अशा
प्रमोद, जबरदस्त!
मृ :p अशा महत्त्वाच्या गोष्टी आजिबात नजरेतून सुटत नाहीत तुझ्या :p
हा अजून एक नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू वाला फोटो. फारच खराब आहे, पण चालवून घ्या.
'वाट पाहीन पण पीएमटीनेच जाईन' :p

जंगली महाराज रस्ता, पुणे.
कुणाकडे पीएमटीचा बरा फोटो असेल तर टाका ना, प्लीज. मी वाहतुकीचं दुसरं कुठलंही साधन पीएमटी इतकं वापरलं नसेल!
सखे - तुला त्यांचे उडतानाचे
सखे - तुला त्यांचे उडतानाचे फोटू हवे होते ना? हे घे...
संयोजक - तीनही फोटो एकत्र टाकले आहेत कारण सगळे Blue Angels चेच आहेत.
Travel thru Air in Style
Travel thru Air in Style

सखीप्रिया, वरच्या पोष्टीमध्ये
सखीप्रिया, वरच्या पोष्टीमध्ये तू लिहिलंयस की महामंडळाच्या आठवणीने गहिवरून येतंय्....ते डचमळून येतंय असं म्हणायचंय कां?
Montreal -
Montreal -
आऊटडोअर्सः यू गॉट इट!
आऊटडोअर्सः यू गॉट इट! :p
ब्ल्यू एंजल्स आणि हॉट एअर बलून्स, दोन्ही जबरी!
Water Taxi
Water Taxi

हा माझा आणखी एक. दुमजली
सखीप्रिया धन्यवाद, एस्टीचा
सखीप्रिया धन्यवाद, एस्टीचा फोटो सही आलाय , आडो डचमळुन आलं तरी एस्टीच्या प्रवासात जी मजा आहे ती आलिशान कारमध्ये नाही , तो गियर बदलताना होणारा आवाज , तो खडखडाट , ती गर्दी, जाम मजा यायची.
गजानन, बस तुमच्या मालकीची
गजानन, बस तुमच्या मालकीची वाट्टं? नाही समोरच लिहिलंय गजानन देसाई म्हणून विचारलं हो, नाहीतर मला काय करायच्यात नसत्या चौकश्या?
हो हो श्री, कोकणात जाणार्या एष्टीत टिप्पीकल आंबा-फणसाचे वास असतात.
श्री, आणि वास विसरलास?
श्री, आणि वास विसरलास?
एका आगळ्या वेगळ्या
एका आगळ्या वेगळ्या 'वाहतुकीचे' साधन
Marshall Space and Flight Center, Hunstville, AL
ही बोट थेम्स नदीतली..
ही बोट थेम्स नदीतली..
छे छे आडो, पन्ना वास कसा
छे छे आडो, पन्ना वास कसा विसरेन
आडो निरिक्षण भारी आहे तुझं , मी आता पाहिलं गजाननचं नाव.
Pages