चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या शनिवारी इंसेप्शन पाहिला.... नोलनला साष्टांग दंडवत रे बाबा!!! मेंदू थकला!!! Happy

"वन्स अपॉन अ...." छान आहे... गँगवॉर असुनही निवडक गोळीबार.... सगळ्यांची कामे छान झालीयेत..

एक्लिप्स पाहिला. त्या वयोगटासाठी छान आहे. सर्व उपस्थित तरूण प्रेक्षकगण अतिशय एंजॉय करत होते.
घरून पुस्तक वाचूनच आले होते. टेकिन्ग , सीजी, मस्त. त्यात ती व्हॅंपायरचया गाडीतून उतरून वेअरवुल्फच्या बाइक वरून निघून जाते व जनरली दोघांच्या प्रेमात असते वगैरेला पब्लिक टाळ्यावाजवत होते. मला हे वँपायर प्रकरण मुळातच पसंत नाही. पण आद्य कर्तव्य करून टाकले. पिक्चर दाखिवला.
वोल्टुरीतली लालडोळ्याची सुंदरी मस्त आहे. ब्रेकिंग डॉन येइल तो मैत्रीणीबरोबर पाहण्यात येणार आहे. सो देअर. Happy

वन्स अपॉन अ...." बघितला ,छान वाटला .७०-८० चे दशक कलाकारान्च्या कपड्यातून,हेअरस्टाईल मधून लाऊड न होता छान दाखवले आहे तसेच तेन्व्हाची मुम्बई पण जिन्वतपणे दाखविली आहे.अजय देवगण ,ईमरान, कन्गना मस्त...सन्वाद छान्,चुरचुरित आहेत...गाणी कमी पण श्रवणीय/ प्रेक्षणीय आहेत, गुन्हेगारीवर आधारित असूनही हिन्साचार टाळल्यामुळे बरा वाटतो, फक्त एक-दोन गोष्टी खटकल्या त्या म्हणजे शेवट थोडा आटोपता घेतला...थोडासा मसाला,मेलोड्रामा चालला असता...,कन्गणा व अजय देवगन यान्चे वय वाढत नाही फक्त हाश्मीच मोठा झालेला दाखवला आहे...आणि चित्रपटाची सुरुवात ९० च्या बॉम्ब स्फोटाने होते पण शेवट ७०च्याच दशकाचा दखवला आहे...बाकी चित्रपट चान्गला आहे...

मागच्या आठवड्यात इन्सेप्शन पाहीला. ८/१०. GEB तील खालील संवादातील

http://www.scribd.com/doc/7349078/Douglas-Hofstadter-Godel-Escher-Bach-C...

त्याच्याशी असलेल्या साधर्म्यामुळे IMDB वर एक परीक्षण टाकले:

http://www.imdb.com/title/tt1375666/usercomments-1086

इन्सेप्शन नक्की पहाच . Almost perfect movie . फक्त एकच , चित्रपट पहायला जाताना मनाची तयारी करून जा की फार अवघड कोडे सोडवायला चाललोय , सुटले तर सहीच . पण नाही सुटले तरी प्रयत्न केल्याचा आनन्द तरी मिळेल Happy

Dinner For Schmucks बघीतला, एकदा बघण्यासारखा आहे. मला Paul Rudd आवडतो.
याच कथानकावर हिन्दीत भेजा फ्राय आधी येवून गेलाय. बहुदा दोन्ही सिनेमा द डिनर गेम या एकाच फ्रेंच सिनेमावरून प्रेरणा घेऊन बनवलेले दिसतात.

'शॅल वुई डान्स' कितव्यांदातरी पाहिला, प्रत्येकवेळा पाहताना त्यातल्या डान्स सिक्वेन्सच्यावेळी माझा श्वास आपोआप रोखला जातो, सिंपली ब्रेथटेकींग!! आयुष्यात कधीतरी बॉलरुम डान्स शिकायचाच!

Unfaithful आणि मर्डर दोन्ही पाहिले. m ही u ची शॉट टू शॉट कॉपी आहे. फक्त शेवटची १० वगैरे मिनिटं बॉलीवूडच्या ख्यातीला जागून वेगळा मसाला भरलाय. पण माझं प्रामाणिक मत असं आहे की अगदी मसाला भरुन सुद्धा एक चांगली कथा वाया घालवलीये m वाल्यानी. ह्या चित्रपटाला उत्तम दर्जाचे अभिनेते आणि अभिनेत्री लाभले असते तर तो cheap न होता 'चांगला चित्रपट' झाला असता. ( काही शॉट्स नसते तरी चालले असते. )

काल 'वेल डन अब्बा' पाहिला.

कथा चांगली आहे, पण चित्रपटाचा वेग कमी आहे. त्यात परत इतर काही गोष्टी घुसडून आणखी स्लो केलय. उदा. बोमनचा भाऊ, सोनाली कुलकर्णीचे सर्व प्रसंग, मिनिशाच्या मैत्रिणिचे अरबाशी लग्न.

बोमन नेहमीप्रमाणे अप्रतिम. मिनिशानेही खुप चांगला प्रयत्न केलाय... पण तिला हैद्राबादी हिंदी जमत नाही.

सोनाली कुलकर्णिने असा रोल का केलाय, याचे सखेद आश्चर्य वाटले. मी कालपर्यंत तिला विचारपुर्वक भुमिका निवडणारी अभिनेत्री मानत होते. (रच्याकने, ही सोनाली म्हणजे नटरंग मधली नव्हे, 'दोघी' मधली सोनाली आहे. )

'द पुअल', एक दर्जेदार चित्रपट. * वेन्कटेश, नाना पाटेकर.
हा चित्रपट नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे.

मी पण मु-पु-मु पाहीला आहे. मुक्ता पुण्याची आहे. ती आधी चिच्ववडला रहायची. तिच्या भावाने देवदत्तने पुर्वी आशिश मालिकेत leading role केला होता

काल एक मैत्रीण पीपली लाईव्ह च्या प्रीमियर ला गेली होती. आमीर खान खास त्यासाठी मेल्बर्न मध्ये आला आहे. तीने सांगितले की सिनेमा एकदम मस्ट सी असा आहे! आमीरच्या दर्शनाने आणि भाषणाने पण ती भारावुन गेली होती.

आयेशा पाहिला मजेशीर सिनेमा आहे. कपडे वगैरे सुन्दर आहेत सोनमचे व इतरांचे पण. अभय देओल चे काम छान आहे. चिक फ्लिक. संगीत चटकदार आहे.

आयेशा= ईग्लिश क्लुलेस रीमेक.

फक्त कपडे व फॅशनसाठी मस्ट पहावा. सोनम कपूरने मस्त कपडे घातलेत. बाकी नवीन काही(च) नाही.

गेल्या विकांताला "Predators" (२०१०) मूव्ही (हिंदीत डब्ड) पाहिला. One time watchable आहे.
हिंदीत डब करताना काही मूळ प्रसंगांना कात्री लावतात का? Uhoh कारण अधल्या मधल्या प्रसंगांची कारण मीमांसा कळलीच नाही. Sad

असो. कथानक असे आहे, की एका परग्रहावरील नरभक्षी प्राण्यांना पृथ्वीवरील मानवांची शिकार करण्यात interest असतो. त्यासाठी सीलेक्टेड लोकांना त्यांच्या ग्रहावर आणायची व्यवस्था ते करतात. (ती व्यवस्था कशी करतात ते इथे सांगून स्टोरीची मजा घालवणार नाही.) त्या त्या लोकांचे सीलेक्शन करण्यामागे काय कारण असते ते स्टोरीलाईन जसजशी पुढे सरकते तसतसे रीव्हील होते. हा खेळ वर्षानुवर्षे चालू असतो. अगदी गेल्या शतकापासून. तर दर वर्षी ३ च्या गटाने हे परभक्षी (नरभक्षी) प्राणी त्या ग्रहावर आलेल्या माणसांना खेळवून/पळवून्/घाबरवून त्यांची शिकार करतात. कधी ते जिंकतात तर कशी मानव जिंकतात. पण खेळ अव्याहत चालू असतो.

तर या वेळी खालील लोक या खेळाचे शिकार असतात. १ स्त्री आणि बाकी पुरुष.
Adrien Brody,
Topher Grace,
Alice Braga,
Walton Goggins,
Danny Trejo,
Mahershalalhashbaz Ali,
Oleg Taktarov
Louis Ozawa Changchien.

हे सर्व त्या नरभक्षी प्राण्यांच्या तावडीत सापडतात का? की त्यांना गुंगारा देऊन त्या ग्रहावरून बाहेर पडण्यासाठी असलेल्या अंतरीक्षयाना पर्यंत पोचू शकतात? अध्ये मध्ये त्या नरभक्षी प्राण्यांनी या मानवांना चकविण्यासाठी वापरलेल्या युक्त्या ते ओळखू शकतात का? त्या नरभक्षी प्राण्यांना चकविण्यासाठी हे काही उपाययोजना करतात का? नक्की काय चाललंय, कशा करता चाललंय याचा छडा ते लावू शकतात का? वै. प्रश्नांची उत्तरे मूव्हीत मिळतील. Happy

Laurence Fishburne (matrix फेम) कलाकाराची यात पाहुणी भुमिका आहे. या व्यक्तिरेखेचा आगापीछा नीट समजत नाही. Sad वर मी म्हटल्याप्रमाणे हिंदीत डब करताना काही मूळ प्रसंगांना कात्री लावली असेल तर त्यामुळे असे झाल्याची शक्यता आहे. पण "Laurence Fishburne चा नक्की उद्देश मानवांना मदत करणे होता की त्या नरभक्षी प्राण्यांना आयती शिकार मिळवून देण्यासाठी मानवांना फसविणे हा होता?" , "Laurence Fishburne जर मानव आहे तर त्याला गायब होण्याची विद्या कुठून मिळाली? त्याने ती स्वतः invent केली की कुणी मदत केली?" असे काही प्रश्न पडतात. पण ते प्राणी, परग्रहावरील चित्र-विचित्र घटना, शिकारी व शिकार यांचा पाठशिवणीचा खेळ यात आपण इतके गुंतून जातो की या प्रश्नांना थोडा वेळ बाजुला ठेवले तरी चित्रपट पाहतानाच्या गंमतीत अडथळा येत नाही. Happy

पीपली लाईव्ह

आत्ताच पाहून आलो. अर्धे सिनेमागृह रिकामे होते. चित्रपट मला आवडला. आमिरखानने 'मेला' या अतिभयाणचित्रपटाचे पापक्षालन केले असे वाटले.
काय आवडले
- प्रेक्षकाला थोडासा बुध्यांक असावा असे गृहित धरलेला चित्रपट. सिनेम्याच्या शेवटी नाणी आणि शिट्ट्या छाप स्वगत आणि शब्दांची आतिषबाजी (विजन दिनानाथ चौहान छाप) टाळल्याबद्दल कौतुक वाटले. आणि तरीही आपली 'अँग्री यंग मॅन' ची पिढी नाही, हे पुन्हा एकदा प्रकर्षाने आणि सखेद जाणवले.
- प्रत्येक ठिकाणी हसताना आत काहीतरी दुखत होते.

बाकीची कौतुकं प्रत्येक वर्तमानपत्री रिव्ह्युत आहेतच.

पब्लिकने मनापासून टाकलेल्या पिंका
' साला, एकही बंदा कुछ समझने जा रहा था, उस्को काय्को टपकाया यार' !!!!
' एलो, ऐसे कैसे खत्तम??? आगे क्या हुआ? क्यों नही हुआ कुछ?
' You know, this is what happens in this country...' (चित्रपट संपल्यावर निदान in this country या शब्दांवर वाद झडताना पाहिले.)
(रच्याकने: महंगाई गाण्याला शिट्ट्यांचा पाऊस पडला. )

धन्यवाद रैना. आजकाल रीडिफ आणि इतर साईट्सवर रिव्यू करतात की प्रमोट्/ट्रॅश करायच्या उद्देशाने लिहीतात कळत नाही. तुझ्या रिव्यू वरून बघावासा वाटतो. आधी मला आमिर दिग्दर्शक आहे असे वाटले होते. तो फक्त निर्माता आहे असे दिसते.

रीडिफ वर प्रमोट करत असतील तर एक आठवडा आधीपासून त्याबद्दल फीचर्स येउ लागतात. मग एक दणदणीत चांगला रिव्यू येतो आणि लगेच सोमवारी हा चित्रपट हिट होत असल्याची बातमी ही येते Happy नाहीतर पूर्ण उलट्या बातम्या.

'ईट प्रे लव्ह' पाहिला आहे का कोणी? सौ. ला हा ज्युलिया वाला चित्रपट पहायचा आहे . याहु वरील सिनेरसिकांच्या मते हा चित्रपट बकवास आहे.

मी पाहिला आज 'इट प्रे लव्ह'. बकवास आहे. खूप बोअर होत होते आणि शेवटी तर जांभया यायला लागल्या.
रिव्ह्यू वाचूनच साशंक होते पण आई आणि मी दोघीच जाणार होतो. तिला आवडेल असं वाटलं म्हणून गेले.
आता इथे येऊन तिने हे वाचू नये म्हणजे मिळवली Proud

ईट प्रे लव पुस्तकच लै वाइट आहे. सिनेमा बकवासच असणार. त्यातील भारताचे वर्णन वाचून कोणालाही हसू फुटेल इतके सुपरफिशिअल आहे.

इन्सेप्शन पाहिला अतिशय सुन्दर आहे. सिनेमा अनेक लेवल वर कनेक्ट होतो कन्सेप्ट्च जबरदस्त आहे. स्क्रिप्ट् फ्लॉलेस आहे. मेलेला पार्टनर सबकॉन्शस मध्ये जिवंत आहे, त्याच्या बरोबरचा काळ आपण प्रोलॉन्ग करायचा अयशस्वी प्रयत्न करतो व एक प्रकारचे गिल्ट मनात धरून असतो. हे जामच खरे आहे. जास्त लिहायचे तर फार वैयक्तिक अनुभव परत लिहावे लागतील त्याची आता माझी तयारी नाही. पण जे लिओच्या कॅरेक्टरचे होते ते मी अनुभवले आहे त्यामुळे दरवेळी डायरेक्टरला सलाम करत करत पाहिला सिनेमा.

माझे स्वप्न जीवन लहान पणा पासून अतिशय सम्रुद्ध राहिले आहे. एक मजेची गोष्ट म्हण्जे कुठे ही गेले व राहिले तरीही स्वप्नात माझे घर म्हणून ते लकडीपुलापासले, पांचाळेश्वराच्या मागे असलेल्या इमारतीतलेच घर येते. जेव्हा ही काही संक्रमण अवस्था असते किंवा माइंड बॉगलिंग प्रोब्लेम समोर येतात तेव्हा स्वप्ने पड्ली कि स्वप्नात सुपर सॉनिक विमाने मोठ्या संख्येने येऊन ते घर नष्ट करायचा प्रयत्न करतात. पाकिस्तान युद्धात १९७१ मध्ये त्या घरात ब्लॅक आउट करून राहिल्याचा परिणाम. असे मला वाट्ते.

त्यातील सर्वांचीच कामे अतिशय सुंदर वठली आहेत. सिनेमास ऑस्कर घट्ट आहे. मी तर आत्ताच दिले समजा. डिजिट्ल वर्क अप्रतिम आहे यात शंकाच नाही. पण असे सिनेमे कधी कधी अगदी ड्राय ब्रिट्ल टेक्निकल होतात तसे इथे झालेले नाही. पहिल्या अ‍ॅक्शन सीन नंतर लिओ हॉटेलातील रूम मध्ये बसतो
मुलांशी फोनवर बोलतो नंतर हतबल होतो हे अगदी खरे आहे काम पण आहे, भेटू शकत नाही, आई नाही आहे, मुलाला ते समजत नाहीये. मुलांना अगदी बघावेसे वाट्ते आहे ही मनःस्थिती त्याने उत्तम साकार केली आहे. हे अगदी युनिवर्सल फीलिन्ग आहे. तिथेच सिनेमाची पकड बसली व ती सुट्लीच नाही. मला वाट्ते एक कल्ट क्लासिक फिल्म आपण पहिल्यांदा पाहिली आहे.

एशरची चित्रे ज्यांना आवड्तात त्यांना हा सिनेमा नक्की आवडेल. इन्फिनिट लूप, पेनरोज स्टेअर्स चा यशस्वी वापर केला आहे. माझ्याकडे एशरच्या चित्रांचा मोठा संग्रहच आहे. आज तो बाहेर निघणार नक्कीच. ६००० रु पगार असतानाही ते १६०० रु चे पुस्तक घेऊन घरी बोलणी खाल्ली होती. पण काल सिनेमा पाहताना ते जुने सुह्रुद भेट्ल्या सारखे वाट्ले. गोडेल एशर बाख नावाचे एक अजून दिव्य पुस्तक आहे त्याचा वापरही सिनेमाचे संगीत बनविताना केला आहे. हे विकिपीडियावर वाचले तेव्हा अतिशय मौज वाट्ली. त्या पुस्तका वर व एशरवर एक वेगळा बीबी आरामात चालू शकेल एवढे मटेरिअल आहे. सिनेमाच्या स्क्रिप्ट वर ९ वर्शे काम झाले. ते पर्फेक्ट बनविल्यावरच शूटिन्गला सुरुवात या शिस्तिचे नक्कीच कौतुक आहे. व ते सिनेमात दिसून येते.

लिओ अरियाड्नी ला एक डेमो देतो तेव्हा ड्रीम वर्ल्ड फोल्ड होते तो सिक्वेन्स अतिशय सुंदर आहे. मी आयमॅक्स वर परत सिनेमा बघणार तेव्हा अधिक इंट्रेस्ट ने बघणार तो सीन. स्क्रीन प्ले मध्ये एकही शब्द वावगा नाही. मध्येच हसवूनही जातात. साइतो एका ठिकाणी I bought the airline, that seemed neater. म्हणतो तेव्हा तर मला खूप मजा वाट्ली. टिपीकल उद्योजक विचारसरणी. त्यात केमिकल्स चे कंपाउंडींग करून सिडेटिवज बनविणे वगैरे अग्दी फॅमिलिअर गोष्ट त्यामुळे सिनेमाशी जवळीक जास्त वाढ्ली.
ओवरॉल ग्रेट एक्स्पिरिअन्स. असे चित्रपट भारतात बनणे शक्य नाही. हॉलिवूड चे आभार मानलेच पाहिजेत.

मामी Happy कालच आम्हीपण हा सिनेमा पाहिला. एकदम ग्रेट. स्वप्नातले स्वप्न त्यातले स्वप्न आणि सर्वात शेवटी लिओ इमिग्रेशन, कस्टम मधुन बाहेर येतो तेव्हाच मी सुटकेचा श्वास सोडले. इतकी इन्वॉल्व झाले काल त्या मुव्हित. अम्हाला तर आवडला. मला जुलियाला जायचे होते पण नवर्‍यांनी हा दाखविला.

धन्यवाद . इथले प्रतिसाद वाचल्यामुळे ज्युलियाला सोडुन नत्था बघायला गेलो. पीपली लाइव्ह मला आवडला पण चित्रपट संपल्यावर वाजलेल्या टाळ्यावरुन लोकांना फारसा आवडलेला दिसला नाही, कदाचित ३ इडीयट सारखा ह्या अपेक्षेने आले असावेत. ईंडीयन ओशन ची गाणी चांगली वाटली. सगळ्या नवख्या कलाकारांचे काम पण आवडले.

निबंध अगदी अगदी. तुम है किधर आजकल दिखताइच नहिं?
फक्त मला एक शंका आलेली. ( बघा म्हण्जे त्यांनी मेहनतीने सिनेमा काढायचा आणि आम्ही फाटे फोडायचे ) तो मुलगा जर एवढा बिझ मॅन असेल तर त्याचे प्रायवेट प्लेन पाहिजे नाही का? तो कमर्शिअल फ्लाइट कसा घेइल?

आणि खाली पूर्ण डायलॉग येत होते त्यामुळे ते वाचण्यात लक्ष डायवर्ट होत होते. व वरील ऑसम पड्झड मिस
होत होती.

इट प्रे मध्ये ती बाई इट्ली मध्ये जाऊन वजन वाढीवते, व इटालिअन बोलायला शिकते. मग भारतात येणार म्हणून भारताला साजेसा गरीब वार्डरोब अमेरिकेतून घेऊन भारतात जाते व योगा ध्याना वगैरे १० - २० दिवसात मास्टर करते. ते जयपूरला वगैरे फिरंग टूरिस्ट येतात, ह्रिषिकेशला केशरी कपडे शबनम घालून हिंड्तात तसेच. मग तिला काही इन्साइट्स मिळतात. शेवटी बालीत जाऊन इतक्या कमी पैशात कसे बाई सुखी राहतात हे लोक वगैरे विचार करते. एका गरीब बाईला डॉलर डोनेशन्स मधून घर घेऊन देते( हाउ पॅट्रनाइझिन्ग कॅन यू गेट!) व शेवटी एका मध्यमवयीन ब्राझिलियन बॉयफ्रेंडला पकड्ते. अगदी ट्रू रिलेशनशिप वगैरे. किती ते सुपरफिशिअल. पूरे पुस्तक अश्याच भारी इनसाइट्स ने भरले आहे.
ज्युलीयाला अगदी वयानुरूप रोल आहे हे मात्र खरे. मुळात याचा सिनेमा का बरे बनवावा? पण नाही.

आज सकाळी अचानक मोठ्ठी ट्रीट. झी स्टुडिओ वर गॉडफादर लागला होता. एकेक फ्रेम, एकेक वाक्य, एकेक सीन, एकेक नट... सगळंच मस्त.
सॅन्टीनो च्या फ्युनरलच्या आधी ब्रँडोचे फ्युनरल मेकपमॅनला सांगणे की त्याच्या आईने सॅन्टिनोला अश्या अवस्थेत बघता कामा नये. ब्रँडोचा कसनुसा चेहरा. फ्युनरल मेकपमॅनचे ओलावलेले डोळे....
डॉन आणि मायकेलचा बाप-मुलगा हार्ट टू हार्ट टॉक... there is just not enough time! म्हणणे. आणि मग नातवाशी खेळताना मरून जाणे....

सगळंच कमाल कमाल कमाल!!

Pages