पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मला पण पुण्यात घर घ्यायचय, वाकड मधे.
मी online research केले.
dynasty म्हनुन एक प्रोजेक्ट आहे ज्याचा प्लान मला आवडला.
कुणाला या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहीती असेल तर please सांगा.

मला पण पुण्यात घर घ्यायचय, वाकड मधे.
मी online research केले.
dynasty म्हनुन एक प्रोजेक्ट आहे ज्याचा प्लान मला आवडला.
कुणाला या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहीती असेल तर please सांगा

गोयल गंगा ग्रूप बद्दल काही माहिती आहे का? मला वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी माहिती मिळालीये.
काहींच्या मते विश्वासार्ह नाहीये तर काही जण चांगला बिल्डर असल्याचे सांगतात. इकडे कोणाचा काय अनुभव आहे?

@ प्राची - २ महिन्यापुर्वी २७०० चालू होता.
खुपच ambitious प्रोजेक्ट वाटला आम्हाला. त्यामुळे बुक करण्यापुर्वी एकदा काय काय फॅसिलिटीज आहेत, काय काय खरच implement आणि maintain होउ शकतात याचा पण अंदाज घ्यावा लागेल.
नाहितर नंतर ऊगीचच monthly maintenance काहिच्या काही चार्ज करायचे ते..

पुणे वेस्ट मधल्या रिअल इस्टेट बद्दलः

जागांचे भाव (साधारण महिन्यापूर्वी):
- वारजे भागात १ महिन्यापूर्वी ३५०० चा रेट चालू होता. सध्या ते ३७०० सांगतात
- बावधन ३४०० ते ३६००
- वाकड २९०० (निगोशिएबल)
- पिंपळे सौदागर/गुरव वगैरे मधे पण वाकड सारखाच रेट आहे
- हिंजवडी - ब्लू रिड्ज - २७०० का २९००
- बालेवाडी ३२००

एरियाबद्दल झालेलं मत:
वाकड/हिंजवडी:
फायदा: हिंजवडीत ऑफिस असेल तर कम्युटेशनचा वेळ वाचेल
तोटा: इन्फ्रास्ट्रक्चर बघता शहर आणि गाव दोन्हीतले तोटे अनुभवायला मिळतील असं वाटतं..
उदा रस्ते खेडेगावातले आणि ट्रॅफिक शहरातलं..
हिंजवडी ब्लू रिड्ज मधे त्यांची स्वतःची शाळा आहे, पण ती वगळता मुलं असलेल्या फॅमिलीज करता शाळेचा प्रश्न येऊ शकतो.

पिंपळे सौदागर बगैरे: अलीकडे गेले नाहिये त्यामुळे नक्की माहित नाही

बावधनः
फायदा: हिंजवडीला तसा जवळ ( बाईक वरून २० ते ३० मिनिट्स)
हॅपनिंग प्लेस
रस्ता छान मोठा झाला आहे
झाडं भरपूर (आणि रहातील अशी शक्यता - कारण डीआरडीओ च्या मालकीचा परिसर)
जर तरूण/interested असाल तर चांदणी चौक आणि तिथलं नाईट लाईफ
कोथरूड डेपो गाडीवरून ७ मिनिट्स मधे येऊ शकतं (ट्रॅफिक असल्यास जास्त वेळ)
तोटा:
पाण्याचा वगैरे प्रश्न येतो उन्हाळ्यात.
लाईट खूपवेळा जातात.

बालेवाडी:
फायदा:
तिथला रोहन बिल्डरचा प्रोजेक्ट चांगला आहे
हिंजवडीला जोडणारा ८० फूट रस्ता प्रपोज्ड आहे - तो झाल्यास हिंजवडी जवळ असेल - एरिया डेवलप होऊ शकतो असं वाटतं..
तोटा: सध्या तिथे काहीच नाहिये - डॉक्टर, शाळा, भाजी खरेदी,रस्ता, पाणी सगळ्याचा सध्या प्रॉब्लेम..
- डेवलप्ड नसलेल्या एरिया करता ३२०० चा रेट जास्त वाटतो.

वारजे:
फायदा:
- बँगलोर-मुंबई हायवेजवळ त्यामुळे हिंजवडीला कनेक्टीविटी- तसंच सातारा-सांगली कोल्हापूरलाही कनेक्टिविटी
- लाईट/पाण्याचा प्रश्न (अतुल नगरच्या आसपास) बावधनच्या तुलनेत कमी
- इन्फ्रास्ट्र्क्चर चांगलं आहे.. हॉस्पिटलपासून सगळ्या प्रकारच्या सेवा वारजे भागात उपलब्ध आहेत
- कोथरूड/कर्वेनगर पासून जवळ.
तोटा:
- आदित्य गार्डन च्या आसपास असाल तर तिथे दररोज पाण्याचा टँकर मागवावा लागतो (असं ऐकलं आहे)
- झाडांची कमतरता Sad
- पुढेमागे सिप्लाच्या समोर फ्लायओव्हरचं काम सुरु होण्याची शक्यता आहे - जर हे काम सुरु होऊन रेंगाळलं तर - ट्रॅफिकचा प्रॉब्लेम (काही काळ करता तरी) अनुभवावा लागेल
- वारज्यात डुक्कर खिंडीच्या आसपासचा भाग अपरात्री जायला फारसा सेफ नाही (वंडर फ्युचुराच्या आजूबाजूचा)

बावधन/वारज्याचा मेन प्लस पाँईट : वर उल्लेखलेल्या इतर भागांची डेवलपमेंट 'ऑरगॅनिक' नाही.. म्हणजे ते आयटीच्या/बीपीओच्या जोरावर वाढलेले आहेत
हेच बावधन/वारजे भाग (सध्यातरी) कोथरूड मधली जागा संपल्यानं वाढलेले आहेत - म्हणजेच त्यांची ग्रोथ ऑरगॅनिक आहे.. त्यामुळे ते कुठल्या एका प्रकारच्या इन्डस्ट्रिवर डिरेक्टली अवलंबून नाहीत.

ह्या व्यतिरिक्त महात्मा सोसायटीतही काही नवीन प्रोजेक्ट्स चालले होते.. पण रेट ५०००, रहायला अत्यंत शांत- छान परिसर, पण पालकांना/पाहुण्यांना यायचं असेल तर रिक्षावर प्रचंड डिपेंडन्सी असेल + खूप आत आत जायला लागतं
हिंजवडीत काम करणार्‍यांसाठी तरी खूSSSप लांब पडेल.

>>आदित्य गार्डन च्या आसपास असाल तर तिथे दररोज पाण्याचा टँकर मागवावा लागतो (असं ऐकलं आहे)
In case of Aditya Garden thats not a problem... in fact theres never a shortage of water. Its creditable. The problem is not the shortage of water, it is connection to the municipality main line, which is not complete as there is still some construction going on.
In other nearby areas the buyer should verify the water availability and supply facility.

>>पुढेमागे सिप्लाच्या समोर फ्लायओव्हरचं काम सुरु होण्याची शक्यता आहे - जर हे काम सुरु होऊन रेंगाळलं तर - ट्रॅफिकचा प्रॉब्लेम (काही काळ करता तरी) अनुभवावा लागेल
Again not true. There is already some work going on but there is enough room available on either side of the highway to allow two way traffic flow. Regardless of the construction work, traffic in pune is a problem Happy

>>म्हणजेच त्यांची ग्रोथ ऑरगॅनिक आहे.. त्यामुळे ते कुठल्या एका प्रकारच्या इन्डस्ट्रिवर डिरेक्टली अवलंबून नाहीत.
Not true. The IT folks are the main customers/consumers of this developing area.

परांजपे स्कीमचे नवीन प्रोजेक्टस सिंहगड रोड आणि कोथरूड ला येत आहेत. किंबहुना ही माहिती तुमच्या साठी जुनी असु शकेल पण वुड लॅड् कोथ्रुड पाहिल्यावर मला परांजपे जास्त खात्रीलायक वाटतात. सध्या चिंचवड सोडायचा माझा विचार नाही. वुडलॅड मधे माझे नातेवाईक रहातात या अनुभावरुन लिहिले आहे.

परांजप्यांचे रेट्स थोडे अप्पर एन्ड आहेत, पण कामाची, वेळेत फ्लॅट ताब्यात मिळण्याची आणि एकंदरितच गुणवत्तेची खात्री बर्‍यापैकी आहे. माझ्या परिचयातील अनेकजण परांजपे स्कीम्सच्या फ्लॅट्समध्ये राहतात आणि त्यांचा एकंदरित अनुभव चांगला आहे.

योग, तुमचा लेख वाचून आणि वरील पोस्ट वाचून एक शंका आली आहे- तुम्ही आदित्य गार्डनमध्ये घर घेतले आहे का?
मागील डिसेंमध्ये आम्ही आदित्य गार्डन(फेज २) चौकशी केली होती. आम्हांला प्लॅन आवडला, सगळं मनासारखं होतं, पण आमच्या बजेटच्या बाहेर होतं थोडंसं Sad त्यामुळे, बात कुछ बनी नहीं.
पण तो प्रोजेक्ट मस्त आहे अगदी. आमच्या बजेटमध्ये रिसेल मिळाले तरी आम्ही विचार करू. पण इकडे आल्यावर काहीच हलचाल करू शकत नाही. आता पुढच्या सुट्टीत गेलं की परत मोहीम सुरु करायची Happy तिथे गरजेची दुकानं वगैरे पण आहेत का? तो भाग आम्ही नीट पाहिला नाही, त्यामुळे ती एक शंका होती. तुम्ही तिथली अजून माहिती देऊ शकाल काय?

अतुलनगर भागही आम्हांला चांगला वाटला होता. तिथेही डेव्हलप्मेंट चालू आहे.

पिंपळे सौदागर भागही फिरलो आम्ही. काळेवाडी चौकापासून जवळच अनेक नवीन बांधकामे चालू आहेत. तिकडे जीके बिल्डर्सची अनेक स्कीम्स चालू आहेत. रेट ३०००-३५०० होता तेव्हा. जीके बिल्डरही विश्वासार्ह आहे असे कळले. पण परत तेच झालं की एरियाविषयी विशेष माहिती नसल्याने आम्ही विचारात पडलो आहोत. Sad

सिंहगडरोडवर गोयल गंगाच्या दोन स्कीम्स चालू आहेत. 'गंगा भाग्योदय' आणि 'अमृतगंगा'... 'गंगा भाग्योदय' चे प्लॅटस् बरे आहेत, पण बजेटमध्ये नाहीत. अमृतगंगाचे जरा लहान आहेत. पण बिल्डरबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाहीये. Sad

aamhi recently P.N.Gadgil developers kade flat book kela aahe.Project che nav Anant shilp,located in Bavdhan.Ha tyancha 1st project aahe.3500 rate chalu aahe.

>>योग, तुमचा लेख वाचून आणि वरील पोस्ट वाचून एक शंका आली आहे- तुम्ही आदित्य गार्डनमध्ये घर घेतले आहे का
हो.. २+ वर्ष झाले. आम्ही तिथे कायम स्वरुपी रहात नाही, अधून मधून देशात गेलो की चक्कर मारतो. but no complaints to date. Their location, amenities, children play area, security, maintenance has been upto the expectations or exceeds at a time. There is solar power and big commercial complex, plus mall coming up in the vicinity. The best thing is they provide their own buses/transport to kothrud, pune stn, and other areas. Its great place if you plan to do your own business there as its huge community with higher middle class consumer.
Overall the feedback we have from others is also good.

Good Luck with your search!

नानबा
dynasty वाकड या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहीती असेल तर please सांगा...

बालेवाडी:
तोटा: सध्या तिथे काहीच नाहिये - डॉक्टर, शाळा, भाजी खरेदी,रस्ता, पाणी सगळ्याचा सध्या प्रॉब्लेम..
- डेवलप्ड नसलेल्या एरिया करता ३२०० चा रेट जास्त वाटतो.
------------------------------------------------------------------------------
सॉरी..तितकीशी बरोबर वाटत नाही आहे माहिती.
मी बालेवाडीत राहतो.
शाळा- बाणेर, वाकड आणि हिंजवडीच्या ब्ल्रु रिज इ. शाळांच्या बसेसची सर्विस उपलब्ध आहे. भारती विद्यापीठाची इंग्लिश माध्यमाची शाळा, पेटल्स, क्रेडल्टु़रेयॉन आणि इतर काही नर्सरी, प्लेग्रुप उपलब्ध आहेत.

बाळेवाडी गाव आणि बाणेर बाळेवाडी रोडजवळ भाजी , जनरल स्टोर्स, मेडीकल स्टोअर्स, ब्युटी पार्लर, डॉक्टर इ. उपलब्ध आहेत. बरेच दुकानदार ऑर्डर दिल्यास घरपोच माल पोहोचवतात.

रस्ता - बाणेर बाळेवाडी रस्ता आणि बाळेवाडीतुन हायवेला जाणारा रस्ता बर्‍यापैकी चांगला आहे.
पावसाळ्यात काही रस्ते कच्चे असल्याने (अपार्टमेंट कडे जाणारे) चिखल वगैरे होतो. पण पाउस नसताना काही प्रॉब्लेम वाटला नाही.

लाईट्स आठवड्यातुन एकदा (गुरुवारी) ४/५ तास जातात आणि अधुनमधुन काही वेळासाठी जातात. पण घरी इन्वर्टर बसवला असेल तर विशेष जाणवत नाही.

पाणी कॉर्पोरेशनचे आणि बोअरवेलचे मिक्स करुन असते. आणि टँकरनेही मागवतात. घरी आरओ फिल्टर बसवुन घेतला तर पाण्याचा प्रॉब्लेम तितका जाणवत नाही.

आणि हो मुख्य म्हणजे बस सर्विस उपलब्ध आहे. २५६,११४ इ. मनपा ला जाणार्‍या गाड्या किमान २० मि नी असतात. तुमचे स्वतःचे वाहन असेल तर उत्तम. रिक्शा उपलब्ध नाहीत फारशा पण काही रिक्शावाल्यांचे मोबाईल न. घेउन ठेवल्यास हवे तेव्हा बोलवता येते त्याना.

आम्ही जेव्हा न्यु जर्सी तुन इकडे शिफ्ट झालो तेव्हा मी अगदी वर्स अपेक्षित केले होते. फार तगमग होइल, फ्रस्ट्रेशन होइल या तयारीने आलो होतो. पण तितके काही (अजुनतरी.. नॉक ऑन वुड) वाटले नाही.

ज्याना इकडे घ्यायचे असेल त्यानी एकदा एरीयात फिरा आणि खात्री करा.

मनस्मी, माहितीबद्दल धन्यवाद.
अहो, ह्या बाफचा उद्देशच हा आहे की नीट माहिती मिळावी. तुमच्यामुळे बालेवाडीची माहिती कळली. Happy

मनस्मीची पोस्ट वाचली..
सॉरी मी आधी मेंशन नाही केलं की मी रोहन लेहेर आणि त्याच्याच बाजूची आदित्य बिल्डरची स्कीम - एवढच टार्गेट ठेवून बोलत होते (त्यावर सेपरेट पोस्ट टाकणार होते, म्हणून राहिलं)
रोहनचा प्रोजेक्ट अत्यंत छान आहे, पण सध्या त्याच्या आजूबाजूला खरच काही नाहिये..
(ह्यांच्यात दोन प्रकारची घरं आहेत स्पेशियस आणि ईकॉनॉमी.. मला तरी त्यांची स्पेशियस वाली घरं सही वाटली.. परत रोहन बिल्डर्स विश्वासार्ह आहेत - त्यांचा प्राईस प्रोटेक्शन प्लॅन पण आहे (म्हणजे तुमच्या नंतर कुणी कमी दरानं फ्लॅट बूक केला तर तुम्हालाही ते त्याच (कमी) दरानं घर देतील.)
त्याच्याच शेजारी आदित्य बिल्डर्सची स्कीम चालली आहे.. त्यांची मास्टर बेडरूम हॉल आणि किचन मधून कनेक्टेड आहे (डायरेक्ट किचन मधून बेडरूमचं दार!) रचनाही नाही आवडली आणि घरही छोटं वाटलं.

dynasty >> खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण सापडलं नाही. बर्‍याच उलट्या पुलट्या फेर्‍या मारल्यावर तो नाद सोडून दिला Sad
वाकडमधेच एक फ्लॅट पाहिलेला.. तेव्हातरी तिथे फक्त साईट ऑफिस, एक सॅंपल फ्लॅट, खूपसारे खोदलेले खड्डे आणि घरांची रंगीबेरंगी चित्र होती..
हा प्रोजेक्ट कुणाचा विचारल्यावर त्यांनी तिथल्या दोन लोकल लोकांची नावं सांगितली.. त्यांचे इतर प्रोजेक्ट्स कुठले असं विचारल्यावर पहिलाच आहे असं सांगितलं..
तसाही वाकडचा एरिया आम्ही गल्लीबोळातून फिरून पाहिल्यावर आम्हाला आवडलेलाच नव्हता.. त्यामुळे आम्ही मग इतर घरं प्रत्यक्ष पहाण्याच्या भानगडीत पडलो नाही.

ब्लू रिड्जः परांजप्यांच नाव क्वालिटी करता घेतलं जातं.. त्यांचा प्रोजेक्ट असल्यानं बघायला गेलो.
प्रोजेक्ट चांगला वाटला पण जरा जास्तच महत्त्वाकांक्षी वाटला.. म्हणजे ते जे सगळ्या अ‍ॅमिनिटीज प्रोवाईड करणार म्हणतात त्या सगळ्या प्रोवाईड करणं त्यांना खरच जमेल का? एवढा मोठा प्रोजेक्ट त्यांनी आधी एक्झिक्यूट केलेला नसल्यानं - तो नीट एक्झिक्यूट होईल का?
एकदा सोसायटीच्या ताब्यात सगळं आलं की नीट मेंटेन करणं जमेल का - हे सगळे प्रश्न पडले आणि त्यातही ऑल्रेडी ज्या फिल्ड मधे आपली नोकरी आहे, त्यावर बेस्ड ठिकाणीच गुंतवणूक करणं योग्य ठरेल का असले प्रश्न पडल्यानं आम्ही ब्लू रिड्ज चा विचार सोडून दिला..

बावधन मधे नॅन्सी ब्रह्मा, रानवाराच्या अलिकडे- आदित्य मॉलच्या जवळ एक प्रोजेक्ट चाललाय (नाव विसरले) - ह्या दोन्ही ठिकाणी चौकशी केली तर ते म्हणाले की त्यांच्याकडचे फ्लॅट्स संपलेत..
बावधन मधेच ड्रीम्स रिदम मधे पाहिले ते फ्लॅट्सही आवडले नाहीत, बिल्डिंगही आवडली नाही - आणि एरियाही आवडला नाही..
ह्यावतिरिक्त चांदणी चौकाच्या जवळ हायवेच्यावर २-३ प्रोजेक्ट्स चालले आहेत, पण लोकेशन न आवडल्यानं विचार ड्रॉप केला.
(त्यातला एक मराठा मंदिरच्या मागे होता.. लग्न असलं की लोकं तिथे १२-१२ वाजता फटाके उडवतात Sad )

वारजे भागात ओवल नेस्ट, मेघवर्षा (का मेघमल्हार?), राहुल पार्क आणि राहुल पार्कच्या जवळचं एक सो कॉल्ड रो हाऊस असे ४ प्रोजेक्ट्स कन्सिडर केलेले
(आदित्य गार्डन बद्दल अनेक रियल ईस्टेट ब्लॉग्ज वरती रहाणार्‍या लोकांच्या शिव्या वाचल्या, त्यामुळे तो प्रोजेक्ट कन्सिडर नाही केला.
वंडर फ्युच्युरामधे आमच्या काही मित्रांनी २००५/६ मधे फ्लॅट बूक केलेला, त्यांना २०१० मधे पझेशन मिळालं.. प्रॉमिस केलेलं बरच काही त्यांनी दिलं नाही असं ऐकलं.. परत हे डुक्कर खिंडीच्या अगदी जवळ आहे, आणि डुक्कर खिंडीत लुटालुटीचे प्रकार होतात असही ऐकलंय. जागा सध्यातरी (गेले ५ वर्ष - एकट आहे.. त्यामुळे कन्सिडर केला नाही)

एके दिवशी सकाळी ओवल नेस्टच्या पाट्या फॉलो करत निघालो - पण बरच आत गेल्यावरही ते सापडलं नाही - फ्लोअर प्लॅन खूप आवडलेला असं नाही - त्यामुळे आणि आत जायची फारशी इच्छा नसल्यानं हे ही कॅन्सल केलं..

मेघवर्षाच्या फ्लॅटसचा एरिया कमी वाटल्यानं तो ही कॅन्सल केला..

--------
आता योगच्या पोस्ट विषयी:
The problem is not the shortage of water, it is connection to the municipality main line, which is not complete as there is still some construction going on.
>> काहीही झालं तरी रहाणार्‍या माणसाला त्रासच ना म्हणजे? आणि भारतात येणार येणार म्हटलं म्हणजे लाईन किती वर्षात येईल ह्याची काही गॅरंटी नसते असा माझा अनुभव आहे.. बावधन आदित्यशगुन फेज ३ च्या माणसांनी स्वतः कॉन्ट्र्युबिशन काढून मागच्या वर्षी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करववली- इतर फेजेस मधे अजूनही प्रॉब्लेम होतो : इती आदित्यशगुन मधली कामवाली बाई
(त्याआधी दिवसाआड टॅंकर मागवायला लागायचे)
सांगायचा मुद्दा एवढाच - की मी तरी ह्या घडीला काय अवस्था आहे (आणि ते ही, 'मी ऐकलं आहे' असं लिहून) ते लिहिलं.. जर भविष्यात होईल तोपर्यंत त्रास सहन करायची/पैसा खर्च करायची तयारी असेल तर माझी काय हरकत असणार Happy

----
योगः Again not true. There is already some work going on but there is enough room available on either side of the highway to allow two way traffic flow. Regardless of the construction work, traffic in pune is a problem
>> तुम्हाला बहुतेक मुद्दा कळलेला नाही, मी बँगलोरला असताना जेव्हा जेव्हा फ्लायओव्हरचं कन्स्ट्रशन होतं तेव्हा तेव्हा ट्रॅफिकची लागलेली वाट पाहिली आहे - प्रोजेक्ट्स वर्षानुवर्ष रेंगाळतात - त्या सगळ्या ड्युरेशन करता ट्रॅफिकची वाट तर लागतेच ( Over and above what is normal in that area) पुन्हा तिथे रहाणार्‍यांना धुळीचाही मुकाबला करावा लागतो.
(पटत नसेल तर कर्वेनगरमधे फ्लायओव्हरचं काम चाललं आहे, एखाद्या दिवशी जाऊन प्रत्यक्ष खात्री करून घेणे Happy )

-----
योगः Not true. The IT folks are the main customers/consumers of this developing area.
>> आपल्या इथे गावांची वाढ - आज इथे हद्द संपली उद्या त्याच्या पुढे बांधकाम सुरू ह्या न्यायानं होतेय.
अशी वाढ होणं स्वाभाविकही आहे कारण
१. माणसांना रहायला जागा लागते(च)..त्याला पर्याय नसतो.
२. जिथे ऑल्रेडी गाव आहे - सगळ्या सोयी आहेत - इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा लाभ ह्या नव्यानं वाढलेल्या भागांना घेता येतो.
ह्याला मी ऑरगॅनिक ग्रोथ म्हणते.

ह्या उलट एखाद्या ठराविक व्यवसायाभोवती वसलेली वस्ती - जर वस्ती पूर्ण डेवलप झाली असेल (म्हणजे तिथे त्या व्यवसायावर अवलंबून नसलेले इतर व्यवसाय, वाहतुकीची व्यवस्था, इतर इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे डेवलप झाले तर प्रश्न नाही - पण जर तसे झाले नाहीत आणि जर ज्या व्यवसायावर अवलंबून वस्ती आहे, तो व्यवसाय कोसळला - तर त्या वस्तीचं भवितव्य काय असेल?

अशा रितीनं वस्ती वाढण्याला मी इनऑरगॅनिक ग्रोथ म्हणते.

आता हिंजवडी, वाकड वगैरे एरियात गुंतवणूक म्हणून घर घेतलं - तर मेनली आयटी आणि बीपीओ ह्या दोन व्यवसायांवर डिपेंडसी येते.. उद्या त्या व्यवसायात डाऊनटर्न आला तर तुमच्या घराची किंमत किती राहिल हे ते दोन व्यवसाय किती वाईट रित्या affect झालेत त्यावर रहातं..

जेव्हा हे व्यवसाय affect होतील तेव्हा सगळ्या economy वरही परिणाम होईल आणि त्यामुळे एकूणातच किमती कमी येतील हे जरी खरं असलं तरी गावात (non IT field मधे ) नोकरी करणारा माणूस कुठलं घर भाड्यानं घेईल असं तुम्हाला वाटतं? गावाच्या जवळच का हिंजवडी सारखं लांबचं?
------------------------

मनस्मी, बालेवाडीच्या इतर माहितीकरता धन्यवाद. मी आधीच कदाचित माझे टार्गेट प्रोजेक्ट्स सांगायला हवे होते.
---------
घर विकत घेताना कम्युटेशनची सोय, लहान मुलं असतील तर शाळा/दवाखाना/दुकानं, पाणी, वीज, रस्ते, ह्या गोष्टींबरोबरच
'recurring maintenance cost', ते मेंटेन होईल का, क्रयशक्ती थांबल्यावरही ते आपल्याला परवडेल का?, भाड्यानं द्यायचं असेल तर जाईल का? Target audience कोण?, त्या एरियातल्या किमती कशा रितीनं वाढतील, आपले पालक आपल्या बरोबर नसतील तर त्यांना यायला जायला बरं पडेल का?
ह्या सगळ्याचा विचार करून घ्यावं असं मला वाटतं..

घर विकत घेताना कम्युटेशनची सोय, लहान मुलं असतील तर शाळा/दवाखाना/दुकानं, पाणी, वीज, रस्ते, ह्या गोष्टींबरोबरच
'recurring maintenance cost', ते मेंटेन होईल का, क्रयशक्ती थांबल्यावरही ते आपल्याला परवडेल का?, भाड्यानं द्यायचं असेल तर जाईल का? Target audience कोण?, त्या एरियातल्या किमती कशा रितीनं वाढतील, आपले पालक आपल्या बरोबर नसतील तर त्यांना यायला जायला बरं पडेल का?
ह्या सगळ्याचा विचार करून घ्यावं असं मला वाटतं..>>>> पूर्ण अनुमोदन.

राहूल पार्क म्हणजे राहुल बिल्डर्सचं का अतुलनगरमधलं? आम्ही गेलो तेव्हा त्यांनी एकच फ्लॅट शिल्लक आहे आणि बेडरूमम्ध्ये एसी लावुन देणार असे सांगितले. पण जो फ्लॅट दाखवला तो वापरलेला असावा अशी आम्हांला शंका आली. Sad

मेघवर्षाचे फ्लॅटस् लहान वाटले आणि किंमत अव्वाच्यासव्वा वाटली.

वाकड, थेरगाव भाग पाहिले होते. थेरगाव मध्ये स्विस काउंटी आवडला, पण आजूबाजूला वस्ती योग्य वाटली नाही. अर्थात, तिथे राहणार्‍यांना जास्त माहिती असेल.

राहूल पार्क म्हणजे राहुल बिल्डर्सचं का अतुलनगरमधलं? आम्ही गेलो तेव्हा त्यांनी एकच फ्लॅट शिल्लक आहे आणि बेडरूमम्ध्ये एसी लावुन देणार असे सांगितले.
>> त्यांच्या बर्‍याच बिल्डिंग्ज आहेतः
A,B,C1,C2 ह्या अतुलनगरच्या साईडला आणि D1/D2/E1/E2 वगैरे अतुलनगरच्या समोर आहेत..
माझ्या माहिती प्रमाणे, समोरच्या बिल्डिंगमधे खूप फ्लॅट्स शिल्लक आहेत - त्यांनी तुला सँपल फ्लॅट दाखवला असेल कदाचित - म्हणून वापरलेला वाटला असेल..

मी ही सुरूवातीला बाणेर-बालेवाडी-सूस रोड या भागात घरं बघत होतो (२००५-२००८). पण तिथले रेट्स खूपच वाटले. आजूबाजूला चिटपाखरू ही दिसत नसताना २५००-३२०० सारखे रेट्स होते. याचं कारण विचारलं तर, "आयटी पार्क जवळ आहे" हे सांगितलं. मी विचारलं, "गॅस सिलिंडर संपलं तर आयटी पार्कात मिळेल का?", "सिरीयस पेशंट ला आयटी पार्कात अ‍ॅडमिट करून घेतात का?". तो निरुत्तर. परिहार चौक हे इथल्या भागाचं त्यावेळचं फायनल डेस्टिनेशन. Happy
शेवटी बराच विचार करून बिबवेवाडीत (चैत्रबन) नवीन ३BHK घेतला.
नानबा, तू रोहन लेहेर बद्द्ल बोलत आहेस का? तिथे खरंच काहीही नाहिये. Investment म्हणून घ्या अन् ५/६ वर्षांनी रहायला या अशी परिस्थिती आहे. बाणेर-बालेवाडी बद्द्ल तुला अनुमोदन.

आज ब्लु रिज पाहुन आलो. ज्याना पुढील ३/५ वर्षात रहायला घर हवे आहे त्यानी तिकडे न जाणे चांगले.
माझ्या अनुभवानुसार ब्लु रिज पुर्ण रहाणेबल होईपर्यंत किमान ७-८ वर्षे जातील. ज्याना रहायची घाई नाही त्याना लाँग टर्म गुंतवणूकीसाठी उत्तम आहे कारण जर त्यानी जे प्रॉमिस केले आहे ते सर्व झाले तर ती एक बेस्ट टाउनशिप होउ शकेल. पण वेळ खुप लागेल एवढे मात्र नक्की.
आज सांगितलेला रेट ३५००/स्क्वे फुट

Pages