रानभाजी १५) शेवग्याचा पाला

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 July, 2010 - 06:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शेवग्याचा पाला
२ मोठे कांदे
२-३ मिरच्या
३-४ पाकळ्या लसुण
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
३-४ खवलेल चमचे ओल खोबर
चविपुरते मिठ
चिमुटभर साखर
तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम शेवग्याचा पाला काढुन धुवुन चिरुन घ्यावा. मग तव्यावर थोडा भाजावा. आता तेलावर लसुण टाकुन मिरची, कांदा, हिंग, हळद घालावे वरुन शेवग्याचा भाजलेला पाला घालावा परतुन थोडा वेळ शिजवावा. भाजलेला असल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नसते. मग मिठ, साखर, खोबर घालून थोड परतवुन गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

*आमच्याइथे हा पाला भाजून घेण्याची पद्धत आहे. पण न भाजताही मी भाजी केली आहे. ती भाजलेल्या पानाएवढी टेस्टी नाही लागली. कदाचित ह्या भाजीतील जडपणा जाण्यासाठी पाला भाजुन घेत असतील.

*इतर पालेभाज्यांप्रमाणे ह्या भाजीतही डाळी घालता येतात.

*शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात.

*ही भाजी उष्ण असल्याने पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच खातात.

*बाळाच्या पाचविला ही भाजी सटवाईला नेवेद्य म्हणून पानावर दाखवुन ते नेवेद्य बाळाच्या आईने खाण्याची पद्धत आहे.

*बाळंतीणीसाठीही ही भाजी पोषक असते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पाने निवडतात कशी, ते नाही लिहिले. या पानांची फडक्यात
घट्ट गठळी बांधायची, दुसऱ्या दिवशी, ती पाने झटकली, कि
सगळी पाने गळून पडतात.
मालवणला गोकुळाष्टमीच्या उपवासाला हि भाजी, चपाती आणि
मुगाचे कढण करतात. हि पाने फक्त गोकुळाष्टमीपर्यंतच खातात,
मग पुढच्या पालवीपर्यंत खात नाहीत.

आईकडे खुप जुने शेवग्याचे झाड आहे. ८-९ महीने शेण्गानी लगडलेले असते मस्त. सगळ्या कोलनीत, नातेवाईकात शेवगा कोणी बाजारातुन आणत नाही. घरात शेन्गाच भर्पुर असल्याने पाल्यची भाजी अगदीच क्वचीत व्हायची, पण भाजी आई- काकु वर्गात एकदम फेव्हरीट! घरची आठवण आली..:(

मी एका "मुलांचे संगोपण" ( बहुदा वंशवेल Uhoh ) पुस्तकात वाचले होते. ज्यांना महाग खाने देता येत नाहित मुलांना ते शेवग्याच्या पाल्याचे पदार्थ देउ शकतात. व्हीटॅमीन्स भरपुर असतात वगैरे.

बाकी पदार्थ छान आहे हो जागु Happy

वा शेवग्याच्या पाल्याची भाजी!! मस्तच.. ह्या भाजीबरोबर तांदळाची भाकरी खुपच छान लागते. फुलांची भाजी अगदि मटणासारखी होते. वाटप घालुन. Happy

मस्तच ग जागू. कित्ती वर्ष उलटली ही भाजी खाल्ल्याला.

>>फुलांची भाजी अगदि मटणासारखी होते. वाटप घालुन.
अगदी अगदी!

या झाडाबाबत एक खास बाब, (मी आधी लिहिले होते, तरी परत.)
शेवग्याच्या शेंगांची शेती करायची नाही, त्यांची झाडे बांधावरच
लावायची, असा दंडक होता.
हिंदीत याचे नाव सहजन, (की फ़ली) सहजन म्हणजे सामान्य माणूस.
या झाडाची पाने, फ़ूले व शेंगा, तिन्ही खाण्याजोग्या आणि जीवनसत्वयुक्त.
त्या सर्वांना मोफ़त उपलब्ध व्हाव्यात म्हणून हा दंडक. शेवग्याच्या झाडाचे
मूळ थोडे अपायकारक असते, पण दक्षिणेत तेही खायचा प्रघात आहे.
हे झाड मूळचे इथलेच. याचे लॅटिन नाव पण भारतीय नावावरुनच बेतलेय.

छान जागु. मी मागे ऐकले होते कुठल्या तरी आजारात ही भाजी खूप उपयोगी असे. कुठल्या ते आता आठवत नाही पण.

दिनेश, जागु, आमच्याकडेही गोकुळाष्टमीला ही भाजी करतात. पाने भाजुन घेत नाहीत. चिरुन फोडणीला घालुन भाजी करायची आणि वर भरपुर खोबरे. अतिशय चविष्ट लागते ही भाजी. बाजारात फक्त गोकुळाष्टमीलाच विकायला येते. एरवी कधी खायची असल्यास झाडावरची आणा तोडुन. पण मला तरी वर्षभरात एरवी कधीही खाल्ल्याचे आठवत नाही, आणि या भाजीशिवाय साजरी झालेली गोकुळाष्टमीही आठवत नाही Happy

जागु,

खुप खुप धन्यवाद. आमच्या घराजवळच्या भारतिय वाणसामानाच्या दुकानात हा पाला हमखास मिळतो. हा आरोग्याला चांगला म्हणुन वापरायचि खुप इछ्छा होति पण कृति माहिति नसल्याने इतके दिवस आणला नाहि कधि. आता नक्कि करुन बघणार.

तुझ्या कृतित एक बदल सुचवु का? पाने चिरल्यावर भाजलित तर त्यातिल जीवनसत्वांचा मोठ्या प्रमाणावर नाश होणार त्याऐवजि आधि भाजुन मग चिरलित किंवा अख्खिच (पान काही फार मोठि नसतात ना हि?) वापरलीत तर जास्त बर.

वा मस्त माहिती.
ओरिसात हि भाजि आवडिने खातात. तिथे त्याला छुईं म्हणतात.
<<हि पाने फक्त गोकुळाष्टमीपर्यंतच खातात, मग पुढच्या पालवीपर्यंत खात नाहीत.>> याच कारण बहुधा गोकुळाष्टमी नंतरच्या दिवसात या झाडावर खुप सुरवंट होतात हे असु शकेल. सुरवंटाच हे आवडत झाड आहे अस ऐकल आहे (वाचल नाहिये, त्यामुळे नक्की माहित नाहि)

स्वाती२, वत्सला, रैना, स्वाती, साधना, धन्यवाद.

दिनेशदा, पण हल्ली ह्या झाडांची लागवड चालू आहे. आम्हीही बांधावर लावतो. व शेंगा झाल्या की जो घरी येईल त्याला भेट देतो.
ह्या शेंगांमध्ये पण दोन-तिन जाती आहेत. एक अगदी २ ते ३ फुट लांब शेंग असते, दुसरी साधी आणि एक मोहाची असते. आमच्याकडे मोहाचे झाड आहे. त्यामुळे जे आमच्याकडून नेतात ते परत फांदी आणि शेंगा मागितल्याशिवाय राहत नाहीत.
ह्या झाडांच्या फांद्या खुप ठिसुळ असतात. त्यामुळे ह्याच्यावर चढण्यापेक्षा उंच बांबुनेच शेंगा काढाव्या लागतात. ह्याची लाकडे ज्यांच्या घरात गुरे ढोरे असतील त्यांनी जाळु नये अशी काहीतरी प्रथा आहे. का ते माहीत नाही. ह्या झाडाला थोडी इजा झाली तरी त्यातुन लगेच दुसर्‍या दिवशी डिंक तयार झालेल दिसत.

रमा, जिवनसत्वांच्या बाबतीत तुझ म्हणण पटतय मला. पण अग जी शेवटची टोके असतात त्याला थोड्या काड्या राहतात मग भाजल्यावर चिरणे कढीण जाते.

सावली, आमच्याकडे मी ह्या झाडाला अजुन सुरवंट लागलेली पाहीली नाहीत. कारण शेंगा संपल्या की लगेच ह्याला दुसरी फुले येतात. कदाचित आमच्याकडे झाडि जास्त असेल मग त्या सुरवंटांना शेवग्यापेक्षा आवडणारी दुसरी झाड मिळत असतील.

तमिळ लोकांमधे ही भाजी खूप लोकप्रिय आहे. इथे सिंगापुरात कुठेही मिळेल. ही भाजी वरण उकळी आले की त्यात घालायची. छान आमटी होते.

जागु, माझ्यासाठी एक फांदी ठेव मग. मला लावायचेय हे झाड माझ्या गावी.

माझ्या लहानपणी वाडीत नविन झाड लावायचे असेल तर फक्त म्हाता-या स्त्रिया याच्या बिया पेरत. जो बिया पेरील त्याचे पुढचे आयुष्य झाडाला मिळते असा समज होता Happy

या भाजीत लोहाचे प्रमाण खुप असते.
>> हो आईच्या हाताचं हाड मोडलेलं तेव्हा तिला ही भाजी खायला सांगितलेली..
मिरच्यांची फोडणी आणि दाण्याचं कूट घालूनही मस्त लागते ही भाजी!

आमच्या भागात अशी समजूत होती की हे झाड घरात असणं चांगलं नाही..
तरी आमच्या घरी होतं Happy

<<<मी मागे ऐकले होते कुठल्या तरी आजारात ही भाजी खूप उपयोगी असे. कुठल्या ते आता आठवत नाही पण.<<<

स्वाती, पाईल्सच्या त्रासावर शेवग्याच्या पानांची भाजी खातात. Happy

पपई, शेवग्याचे लाकुड ठिसुळ असते. त्यामुळे ही झाडे दाराशी लावत नाही... ! घराच्या मागे लावले तर चालते!

शेवग्याच्या (बीया लावुन) झाडे (खाऊच्या) पानमळ्यात मोठ्या प्रमाणात लावली जातात, ही झाडे सरळ वाढवली जातात,यावर पानांच्या वेली चढवल्या जातात,त्यामुळे वर्षभर यापसुन चारा ही मिळतो,भाजी मिळते
या भाजीत लोह खुप असतं !
इतर फायदे तर सगळ्यांना माहीत आहेतच
Happy

तुम्ही शेवग्याच्या शेंगांच पिठलं नाही करत का?
अतिशय चविष्ट पण खतरनाक तेल लागतं त्या प्रकाराला.

तसेच मल्लु लोकं या शेंगांचा गर काढुन एकास एक या प्रमाणात नारळ टाकुन एक पदार्थ बनवतात. तोही छान लागतो.

ही पाने निवडतात कशी, ते नाही लिहिले. या पानांची फडक्यात
घट्ट गठळी बांधायची, दुसऱ्या दिवशी, ती पाने झटकली, कि
सगळी पाने गळून पडतात.
हो मी हेच लिहिणार होते. आई ही भाजी अशीच निवडायची.
बाकी भाजी मस्त होते.

गोकुळअष्टमीला केलेली भाजी: भुकेलेल्या कॄष्णाने द्रौपदीकडे काही खायला मागितलं (दुर्वास येण्या अगोदर) तेव्हा तिने म्हणे तिच्याकडे असलेलं अक्षयपात्र पाहिलं. त्याला शेवग्याच्या भाजीचं एक पान चिकटलेलं होतं (कोकणातली कथा).
ते कॄष्णाला देऊन तिने त्याला त्रॄप्त केलं..म्हणुन त्यादिवशी ती भाजी.
कोकणात शेवगा लावत नाहीत. जो शेवग्याचे बी पेरेल तो मॄत्यू पावतो म्हणे. पण बहुतेक परड्यांमधे एकतरी झाड असतेच..

साधना, येशील तेंव्हा घेउन जा.
नानबा, हो हाडांसाठी शेवगा चांगलाच असतो. मी हा पाला गरम करुन जखमेवर किंवा सुजेवर लावल्याचेही ऐकले आहे.
आर्या, अनिल तुमच्या मुळे अजुन माहीती मिळाली.
रैना पिठल की भगरा ? म्हणजे सुकी भाजी की ओली भाजी ?
मानुषी Happy
निर्मयी आमच्याकडे माझ्या वडीलांनी एकदा एक शेत हरभर्‍याच लावल होत. पण आम्हाला भाजी वगैरे करण्याच माहीत नाही. हरभर्‍याची भाजी माहीत आहे. हरभर्‍याच्या पानाची काहितरी भाटी की काहीतरी काढतात ना ?

जागू- दोन्ही.
केश्विनी- ते बहूधा पाल्यावर असतं, पाला जून नको. माझीही अतिभयाण झाली होती, तेव्हा मिळालेला सल्ला. Proud

Pages