फूटबॉल वर्ल्डकप २०१० - द. आफ्रिका

Submitted by हिम्सकूल on 13 May, 2010 - 06:45

ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे


द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स


(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस


(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया


(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना


(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून


इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया


(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)


(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली

उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने

उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)

उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)

उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)

तिसर्‍या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)

अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)

ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/

तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ धन्यवाद....
क गटापाठोपाठ ड गटाचेपण भकित खरे ठरले...
जर्मनी आरामात जिंकेल असे वाटत होते पण घानाने सुरेख खेळ केला.
मला तर जाणवत होते की दोन्ही संघ एकाच पद्धतीने खेळत होते. छोटे छोटे ग्राऊंड पासेस, अचानक आत घुसुन केलेले भेदक आक्रमण आणि आक्रमक खेळ ही जर्मनीची खासियत आहे आणि घानाही त्याच प्रकाराने खेळत होते.
जर्मनीचे ऑझील, म्युलर, ककाऊ ही नवी पिढी अतिशय तडफदार खेळ करते, पण त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता जाणवली.
आता इंग्लडविरुद्धच्या मॅचमध्ये काय करातात याची उत्सुकता आहे...
घानाकडूनही अपेक्षा आहेत युएसएविरुद्ध.....

<<इटली आऊट !! >>दहावा फलंदाज "आऊट" व्हावा इतक्या सहजपणे "इटली आऊट" म्हणायची पाळी यावी ! तरी पण, कालच्या सामन्याने इटलीसाठी सहानुभूति तरी नक्कीच मिळवून दिली. स्लोव्हाकिया व इटली यांच्या सततच्या हल्ल्या- प्रतिहल्ल्यानी हा सामना खरंच रंगला. स्लोव्हाकियाचं कौतुक म्हणजे सुरवातीलाच आघाडी मिळवूनही त्यानी जोरदार आक्रमण चालूच ठेवलं व म्हणूनच इटलीला शेवटी लय सापडल्यावरही ते एका गोलच्या फरकानी [३-२]तरी जिंकू शकले.
आज ब्राझील वि.पोर्तुगाल सामना रंगतदार होणार असं भाकीत असलं तरी दुखापत व पिवळ्या/लाल कार्डांच्या भितीने केवळ ग्रूपमध्ये पहिलं स्थान मिळवण्यासाठी फार अटीतटीने दोन्ही संघ खेळतील असं वाटत नाही [ कका दोन पिवळी कार्ड मिळवून आज खेळातून बाहेर झाला, यावरून धडा घेतीलच ना !] अर्थात, ब्राझील व पोर्तुगाल हे दोनही संघ नुसता सराव करताना पण पहायला मिळणं भाग्याचं मग त्याना आमने -सामने बघणं तर "कंपलसरी" झालंच ना !!

मला मागच्या वेळीच इटली कुठून आलं फायनलला असं वाटलं होतं.. अर्थात त्यांनी भक्कम बचावाच्या जोरावर ती मजल मारली होती.. तरीही इटलीचा खेळ बघायला मला फारसा इंटरेस्ट वाटला नाही.. तीच कथा फ्रांसची पण.. त्यामुळे इटली आणि फ्रांस दोन्ही बाहेर गेले ते बरच झालं.. Happy ब्राझिल आणि जर्मनीने संधी साधली पाहिजे मात्र.. !

अवघड होत चाललय भाकित वर्तवण.
आज स्पेन वि. चिलि , स्पेन साठी जीवन मरण. मला तरी स्पेनच काही खर दिसत नाही, खूप चांगली टीम असूनही.
ब्राझिल वि. पोर्तूगाल - दोन वेगळ्या शैलींचा सामना. मजा येणार.
मला आज निल्मार कसा खेळतो याबद्दल उत्सुकता आहे.

लाल्वाक्का- कारण नसताना म्हणजे, अहो ते अमेरिकन लोक "अमेरिकन फूट बॉल" म्हणून जे काही त्यांच्या "वर्ल्ड सिरिज" मधे खेळतात ती लोकं इकडे काय करतायत असा मला प्रश्न पडला होता.:)

<<ब्राझिल वि. पोर्तूगाल - दोन वेगळ्या शैलींचा सामना. मजा येणार.>> विक्रमजी , हल्ली विविध देशांच्या शैली- शैलीमधला फरक कांहीसा धूसर होत चाललाय असं नाही वाटत ? शॉर्ट पसिंगचा तर आता सगळेच संघ [कदाचित जर्मनी सोडून] सर्रास व प्रेक्षणीय उपयोग करतात. बचावात्मक व वेळकाढू खेळ, "ऑफसाईड ट्रॅप" इ. प्रकारही खूप कमी झाल्यासारखे नाही वाटत ? कीं मलाच असा भास होतोय ? यावर तुमच्यासारख्या जाणकारांचं म्हणणं ऐकायला आवडेल.

आजच्या ग्रुप जी मधल्या मॅचेस तश्या निवांत होतील असं दिसतय.. पण जर का आयव्हरी कोस्टनी अंगात भूत शिरल्या सारखे खेळून १० एक गोल मारले तर मात्र चित्र पलटेल आणि त्यात जर चुकून पोर्तुगालनी ब्राझीलला हरवले तर मग बघायलाच नको.. ब्राझीलच बाहेर जायचे... किंवा जर ब्राझीलनी पोर्तुगालला हरवले तर पोर्तुगाल बाहेर पडायचे... तसे झालेच तर खरच हा ग्रुप ग्रुप ऑफ डेथ म्हणावा लागेल.. पण ह्याची शक्यता अर्धा टक्का वगैरे दिसते आहे..

एच गटात जरा चुरस आहे.. स्पेन आणि स्वित्झर्लंड जिंकण्याचा जिवतोड प्रयत्न तर करणार पण सगळा खेळ किती गोल केले आणि किती स्विकारले त्यावरच ठरणार जर हे दोन्ही संघ जिंकले तर.. नाही तर मग चिली सहज पुढे जाईल पण दुसरा संघ ठरणे अवघड आहे.. होंडुरासनी काही गंमत केली तर इथे पण अनिश्चितता वाढेल पण त्यांच्या विरोधात जास्त गोल असल्यामुळे आणि त्यांनी आत्तापर्यंत एकही गोल केलेला नसल्यामुळे त्यांची पुढच्या फेरीत जाण्याची शक्यता कमीच आहे.

विक्रमजी , हल्ली विविध देशांच्या शैली- शैलीमधला फरक कांहीसा धूसर होत चाललाय असं नाही वाटत ? शॉर्ट पसिंगचा तर आता सगळेच संघ [कदाचित जर्मनी सोडून] सर्रास व प्रेक्षणीय उपयोग करतात. बचावात्मक व वेळकाढू खेळ, "ऑफसाईड ट्रॅप" इ. प्रकारही खूप कमी झाल्यासारखे नाही वाटत ?>>
भाउ साहेब, मी जी आणि जाणकार दोन्ही नसून सुद्धा लिहितोय बर का.

मला तर अस वाटत की पहिल्या राउंड मधे लिग च्या तिसर्‍या मॅचेस सोडल्या तर जास्त भर सेफ्टी फर्स्ट असाच दिसत होता. त्यामुळेच असेल कदाचित तुम्ही म्हणता तस शैली- शैलीमधला फरक कांहीसा धूसर होत चाललाय असं अ‍ॅपरंटली वाटतेय. सॉक्रेटिस पण तुमच्या सारखच म्हणलाय. ब्राझिल जिंकतय पण प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत नाही. (म्हणजे ते युरोपीयन्स सारखे खेळत आहेत :))

मी गेल्या वर्षी ब्राझिल मधे असताना रविवारी सकाळी इंग्लिश आणि जर्मन लिग बघायचो व संन्ध्याकाळी ब्राझिल मधल्या मॅचेस. दोन्ही मधे खूपच फरक. जमिन - आसमान. जिंकण्यासाठी काय चांगल, ही गोष्ट वेगळी.
ब्राझिलियन टीम्स फारच सुंन्दर, अगदी अवर्णनीय फूट बॉल खेळतात. यु ट्यूब वर कोरिनथियन्स (रोनाल्डो २००८) किंवा साओ पावलो चे गोल बघा.(http://www.maayboli.com/node/7979#comment-479636) तुम्हाला उदाहरण द्यायचे झाले तर आयव्हरी कोस्ट विरुद्धचा गोल. काही तरी गडबड गुंडा करून गोल होतोय. मेसीही तसाच.

बाय द वे. काल कंपनीत एक ब्राझिलियन आला होता. काय होणार असे विचारल्यावर म्हणाला, "नक्की ब्राझिल, अर्जेंटिनाच्या मनात दुसर काही नसेल तर". अस एखाद्या ब्राझिलियन च्या म्हणण्याला प्रचंड म्हणजे प्रचंड अर्थ आहे. आणि मला खात्री आहे मेसीचा खेळ अख्या ब्राझिलला आवडतोय पण बोलून दाखवणार नाहीत इतकच.

<<ब्राझिलियन टीम्स फारच सुंन्दर, अगदी अवर्णनीय फूट बॉल खेळतात >> त्यांचाच खेळ बघून तर मी जगभरच्या त्यांच्या चाहत्यात सामील झालो !
<<ब्राझिल जिंकतय पण प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत नाही. (म्हणजे ते युरोपीयन्स सारखे खेळत आहेत )>> मला जरा वेगळंच वाटलं- इतर संघ द. अमेरिकन शैलीकडे झुकण्याच्या तयारीत असावेत, असं. मेसीसारख्यांची तर बातच वेगळी !
गारेगारजी, तुम्ही दाखवलेल्या शक्यतांबद्दल धन्यवाद. ब्राझील,पोर्तुगाल बाहेर जाण्याची दूरची का होईना पण शक्यता लक्षातच आली नव्हती !
<<भाउ साहेब, मी जी आणि जाणकार दोन्ही नसून सुद्धा लिहितोय बर का.>>विक्रम३११, मी "साहेब" नक्कीच नाही, तुम्हाला "जी" म्हटलेलं बहुधा आवडत नसावं.... पण आपण तुमचं लिखाण "जाणकार" म्हणूनच आता आतुरतेने वाचणार हे नक्की.

भाउ, मला नुसत विक्रम (किंवा त्रिविक्रम:)) म्हणल तरी चालेल).

<<ब्राझिलियन टीम्स फारच सुंन्दर, अगदी अवर्णनीय फूट बॉल खेळतात >> तुम्हाला खरच सांगतो, ब्राझिलियन नॅशनल टीम ब्राझिलियन डोमेस्टिक टीम सारखी अजीबात खेळत नाही. (जस सचिन कधी कधी ठरवतो, हुक मारायचा नाही, स्वीप नाही, फक्त व्ही मधे खेळायच)

ब्राझिल मध्ये ब्राझिलियन टीम्स (संतोस, फ्लेमिंगो, साओ पावलो, कोरिंथियान्स) वेगळच खेळतात. मग तिथले प्लेयर युरोपला जातात आणि बदलायला लागतात, (तिथले जवळ्पास ७०० प्लेयर युरोप मधे खेळतात). आणि मग आपल्याला दिसते ती मिक्स्ड शैलीची टीम. आणि म्हणून तुम्हाला फार फरक नाही असे वाटत असेल.

म्हणून मला निल्मार कसा खेळतो बघायचय. तो नुकताच युरोपला गेलाय, शिवाय त्याच्यावर कका सारख प्रेशर ही नाही.

विक्रम, "ब्राझील फूट्बॉल" वर तुम्ही दिलेल्या लींक पाहिल्या व इंग्लिश प्रिमीयम लीग अळणी असते हे लक्षात आलं. धन्यवाद.
<<आज ब्राझील वि.पोर्तुगाल सामना रंगतदार होणार असं भाकीत असलं तरी दुखापत व पिवळ्या/लाल कार्डांच्या भितीने केवळ ग्रूपमध्ये पहिलं स्थान मिळवण्यासाठी फार अटीतटीने दोन्ही संघ खेळतील असं वाटत नाही >> ब्राझील वि. पोर्तुगाल सामना माझ्या या अंदाजानुसार रंगला नाहीच. पुर्वार्धात ज्याना पिवळं कार्ड दाखवलं गेलं त्याना दूसरं कार्ड दिसू नये म्हणून बदली खेळाडू पाठवण्यात उत्तरार्ध गेला ! ३८व्या मिनीटाला ब्राझीलचा [फॅबिअ‍ॅनो] व ५९व्या मिनीटाला पोर्तुगालचा गोल थोडक्यात हुकला, लुसिओ मैदानाच्या प्रत्येक इंचावर आपल्या बूटाचा ठसा उमटवत होता, रोनाल्डोचं अस्तित्व जोरकसपणे जाणवत होतं, ह्यापलिकडे विशेष काही लक्षात रहाण्यायोग्य नव्हतं, असं वाटलं. आणि हो, गारेगारनी घाबरवलं होतं तशी कांही भयंकर उलथापालथ या ग्रूपमध्ये झाली नाही !

ब्राझिल -पोर्तूगाल, पहिला हाफ बरा होता. निल्मार चांगल खेळला.

५ - ६ येलो कार्ड मिळाल्यावर दोघांच्याही फ्युटिलिटी लक्षात आली असावी. एकूणातच मॅच बोअर झाली. पण हे आपल्या आधिच लक्षात यायला पाहिजे होत. Sad
आजचे घोडे उरुग्वे, घाना

उरुग्वे वि.कोरीया २-१
सामना अटीतटीचा झाला. कोरीयन स्टॅमिना व वेग यात उरूग्वे संघापेक्षाही बर्‍याचदा सरस वाटले. उत्तरार्धात तर त्यानी उरूग्वेला जेरीस आणलं. एक गोलची पिछाडी भरून काढल्यावर कोरीयन तर झपाटल्यासारखे खेळले व केवळ सुवारेसच्या गोलच्या कोपर्‍यात मारलेल्या दूसर्‍या अप्रतिम वळणदार
शॉटमुळेच उरुग्वे बचावली !
आशियाचाही विश्वचषक स्पर्धेवर ठसा उमटू लागला आहे असं वाटतं.

थोड्याच वेळाच घाना आणि अमेरिका सुरू होईल.
घानाचा खेळ सुरेख आहे आणि माझी पसंती त्यांनाच...
मी तर त्यांना सेमी फायनल्समध्ये पहातो आहे...
पाहुया हा अंदाज कुठपर्यंत खरा ठरतो ते..
बाकी आता निर्णायक सामने सुरू झालेले आहेत.
जर्मनीने जर इंग्लंडला नमवले तर त्यांची गाठ अर्जेंटिनाशी आहे...त्यांमुळे त्यांची आगेकूच खूपच खडतर आहे...
दुसरीकडे स्पेन आणि पोर्तुगाल ... सगळ्यात रंगतदार लढत होण्याची शक्यता..माझी पसंती स्पेनला..
त्यामुळे तिकडून जपानला पराभूत करून आलेली पॅराग्वे आणि स्पेन यांच्यात स्पेन बाजी मारेल..
अर्थातच त्यामुळे स्पेन आणि अर्जेंटीना सेमी फायनल
ब्राझीलला त्यामानाने सोपा ड्रॉ आहे. पहिले चिलीचा अडथळा सुखरूप पार केला तर एकदम अंतिम फेरीत धडक मारण्यात अडचण येणार नाही असा अंदाज.
अंतिम लढत अर्जेंटिना वि. वि. ब्राझील २-१.

पहील्या हाल्फ मध्ये घानाचा खेळ खुप चांगला आहे अमेरिकेपेक्षा .. त्यांचा बॉलवरचा कंट्रोल बघता घानाच जिंकेल अस वाटतेय .. आणि तसेही ते एका गोल ने पुढे आहेत .. अमेरिकेच्या टीम मध्ये समन्वयाचा अभाव दिसतोय

घाना वि.अमेरिका २-१
मिडफील्डमधले डोनोव्हान, ब्रॅडले, व डेम्पसे खूप मेहनत घेत होते पण अमेरिकेच्या आक्रमणाला धार मात्र नव्हती , हे जाणवत होतं. गोली हॉवर्डमुळेच त्याना घानाला जादा वेळेपर्यंत थोपवता आलं. त्याना मिळालेल्या पेनल्टी कीकवरचा गोल झाल्यानंतर गोल करण्याच्या संधी मिळूनही त्यांच गोलमध्ये रुपांतर नाही करतां आलं त्याना. अर्थात, घानाच्या गोलीने केलेलं उत्कॄष्ट क्षेत्ररक्षणही त्याला जबाबदार होतं. घानाने सहाव्या मिनीटाला गोल करूनही आक्रमण चालूच ठेवलं. पासिंगची त्यांची पद्धत, आपल्या खेळाडूंच्या"पोझिशन"चं पक्कं भान व वेग हे सारं सहजसुंदर होतं. अक्रमणात मध्येच दिलेले कांही "शॉर्ट बॅक-पासेस" छानच होते. जादा वेळेत स्वतःचा जात असलेला तोल संभाळत ग्यानने डाव्या पायाने मारलेला गोल अफलातून होता.
डोनोव्हानचा म्हणे या सामन्यातला गोल हा त्याचा आंतरराष्ट्रीय सामन्यांतला ४५ सा वा व विश्वचषकातला ५वा. या स्पर्धेतील मला खास आवडलेल्या खेळाडूंत तो वरच्या क्रमांकावर. घानाच्या संघाने आफ्रिकेबाहेरचेही बरेच चाहते काल मिळवले. अधूनमधून कॅमेराचं लक्ष वेधून घेणार्‍या बिल क्लींटनचाही त्यात समावेश असावा !

जर्मनी - इंग्लंड २-१
काय जबरदस्त सामना. अपेक्षेप्रमाणेच...
जर्मनीचे तडाखेबंद आक्रमण आणि सुरुवातीला इंग्लंडची चांगलीच तंतरली होती.क्लोसचा आणि पाठोपाठ पोडलस्कीचा गोल फारच सुरेख..
इंग्लंडलचा बचाव फारच कमी पडत होता.
नंतर त्यांनी बराच इंप्रुव्ह केला.
पाठोपाठ २ गोल बसले. (त्यांच्या दुर्दैवाने दुसरा गोल देण्यात आला नाही....इतिहासाची पुनरावृत्ती..१९६६ च्या विश्वचषकादरम्यान थेट असेच घडले होते. त्यावेळी जर्मनीविरुद्ध गोल देण्यात आला. ती मॅच इंग्लंडने ४-२ अशी जिंकली)
जर्मनीला त्यांच्या बचावात बदल करण्याची गरज आहे. केवळ आक्रमणावर जोर दिला तर अवघड आहे...

चौथा गोल लई भारी होता..
जर्मनीचा बचाव किती भक्कम आहे सेकंड हाफ मधे !

जर्मनीने कचरा केलाय इंग्लंडचा.. Happy

दर वर्ल्ड्कपमध्ये त्या वेन रुनीचा हाईप केलेला असतो. तो करत काहीच नाही. त्याच्यापेक्षा लॅम्पार्ड, जेरार्ड लोक चांगले आहेत.

मी आजच हा धागा वाचायला घेतला. मला सॉकरमधे फारसे समजत नाही.

पण या सर्व देशांत भारत कसा नाही? मोहन बगान का कायसेसे संघ आहेत ना भारतात? मग ते कसे नाहीत 'विश्वचषक' स्पर्धेत? आणि पाकीस्तान? बांगलादेश?

>>मग ते कसे नाहीत 'विश्वचषक' स्पर्धेत?
विश्वचषक स्पर्धेत गतस्पर्धेचा विजेता आणि यजमान संघ यांनाच निश्चीत प्रवेश असतो. बाकी सर्व संघांना पात्रता फेरी पार करावी लागते. आपण बहुतेक तिथेच गार होतो.

जर्मनीने कचरा केलाय इंग्लंडचा..
दर वर्ल्ड्कपमध्ये त्या वेन रुनीचा हाईप केलेला असतो. तो करत काहीच नाही. त्याच्यापेक्षा लॅम्पार्ड, जेरार्ड लोक चांगले आहेत.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अनुमोदन....
लॅपार्डचे वाईट वाटले...बिचाराने मारलेला एक गोल दिलाच नाही, दुसरा गोलपोस्टला लागला...
बाकी जर्मनीने तुफान खेळ केला. काऊंटर ऍटाक काय असतो दाखवून दिले...
वाहवा....फारच भारी...१९६६चा बदला...

सुपर्ब मॅच ! जर्मनीचा खेळ खतरनाक मस्त झाला . इंग्लंडला अक्षरशः धुतलं . Happy लोकं विश्वचषक जिंकल्यासारखे सेलिब्रेट करताहेत . Happy

अर्जेंटीना-३, मेक्सिको -१
कालच्या दोनही सामन्यात निकाल जरी अनपेक्षित नव्हता तरी पण अर्जेंटीनाला "ऑफ्-साईड"असूनही दिलेला पहिला गोल व इंग्लंडला नाकारलेला दूसरा गोल हे दोन्ही चुकीचे निर्णय ऐन मोक्याच्या वेळी आले हे दुर्दैवच होते. मेक्सिकोच्या मुख्यतः तरूण व कांहीशा अननुभवी संघाच्या खेळावर त्यामुळे सुरवातीलाच पिछाडीवर पडल्याने झालेला परिणाम स्पष्ट दिसत होता; इंग्लंडनेही २-२ बरोबरी साधली असती तर जर्मनीच्या आवेशालाही कांहीसा लगाम बसलाच असता व इंग्लंडला हुरूप आलाच असता. मग, जर्मनीला व अर्जेंटीनाला जिंकल्याचं , इंग्लंडला व मेक्सिकोला चांगली झुंज दिल्याचं
व प्रेक्षकाना रंगतदार सामने पाहिल्याचं अधिक समाधान मिळालं असतं !
आता, ह्या चुकीच्या निर्णयांचं खापरही बिचार्‍या जाबुलानी बॉलच्या डोक्यावर फोडलं नाही म्हणजे मिळवलं !!

Pages