ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे
अ
द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स
ब
(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस
क
(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया
ड
(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना
इ
(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून
फ
इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया
ग
(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)
ह
(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली
उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने
उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)
उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)
उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)
तिसर्या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)
अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)
ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/
तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...
यूहूऊऊऊउ, जर्मनी जिंकलं .
यूहूऊऊऊउ, जर्मनी जिंकलं . What a match ! Amazing game .
One of the memorable
One of the memorable matches....
Germany played very well...
What a match!!!
जर्मनीच 'ब्लिट्झक्रीग' सुरूच
जर्मनीच 'ब्लिट्झक्रीग' सुरूच आहे. प्रतिस्पर्ध्याच्या चिंधड्या उडवत चाललेत. फिला हाफ तरी व्यवस्थित संतुलित वाटला पण दुसृया हाफ मध्ये जर्मनीने पार सुपडा साफ केला. जर्मनीचे मुख्यतः आक्रमण उजव्या विंगेतून , लामने केले पण गोल्स मात्र डाव्या विंगेतून आले. बॉल वर नियंत्रण ठेवणे जर्मनी कडून शिकावे.
अर्जेंटिना व जर्मन टीम मधील मुख्य फरक जाणवला तो म्हणजे बचाव फळीत. जिथे जर्मन बचाव फळीची भिंतच उभी राहायची तिथे अर्जेंटिनाचा बचाव फळी कमकुवतपणे चाचपडत होती.
क्लोसे ने त्याच्या १००व्या सामन्यात २ गोल करून विजयात मह्त्वाचा वाटा उचलला. श्वाइन्स्टाइगर, पोडोलस्की, मुलर यांन्नी पण समर्थ साथ दिली.
मुलरने आधीच म्हटले होते की या शनिवार नंतर मॅराडोना त्याला कधीच विसरणार नाही आणि योगायोगाने पहिला गोल मुलरनेच केला.
आत्ता दक्षिण अमेरिकेतील दोन बलाढ्य संघ स्पर्धेबाहेर गेल्याने युरोपिअन संघाचा दबदबा वाढलाय. आता स्पेन काय करतय ते पाहू.
भाऊ...उत्तम
भाऊ...उत्तम विश्लेषण...
जर्मनीने खरेच तुफानी खेळ केला. विशेष म्हणजे कुठेही दांडगाईचा खेळ नाही..जोकीम लोवने आखून दिलेल्या रेषेनुसार व्यवस्थित खेळ..मध्यंतरानंतर अर्जेंटिनाने ज्यावेळी एकदम आक्रमणाचा वेग वाढविला त्यावेळी थोडेसे भांबावले होते..पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी अर्जेंटिनाच्या स्पीडगेमला प्रत्युत्तर म्हणून खेळाचा वेग वाढविला नाही आणि आपल्या गेमप्लॅनला चिकटून राहीले. तिथे जर काही चूक करत होते तर मग अर्जेंटिनाने हातची संधी दवडली नसती. नंतर मग क्लोसचा डबल धमाका झाल्यानंतर अर्जेंटिनाने पराभव मान्यच केला. नंतरची काही मिनिटे तर ते केवळ औपचारिकता म्हणून खेळत असल्यासारखे वाटले.
जर्मनीचा आजचा खेळ फारच सुरेख. दोष न काढता येण्यासारखा..
त्यातल्या त्यात म्हणायचे झाले तर कर्णधार फिलीप लामला पुढे जाऊन आक्रमण करण्यासापासून थोडे परावृत्त होणे आवश्यक आहे. अजूनपर्यंत त्याने दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. पण प्रतिस्पर्धी संघाला संधी देणे घातक ठरू शकते.
बाकी सध्या मी तरी हवेतच. धमाल नुसती...
घरी आईसक्रीम घेऊन चाललोयय.. माबोकरांना पुणेरी आमंत्रण...
जर्मनीच्या संघातील खेळाडूंचे
जर्मनीच्या संघातील खेळाडूंचे पासिंग अतिशय अचूक व जबरदस्त आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याची चुणुक दिसलीच होती. आजचा शेवटचा गोल तर अफलातून होता. तो गोल होण्यापूर्वी केवळ अर्धा मिनिट आधी चेंडू जर्मनीच्या गोलक्षेत्रात होता. त्यावेळी जर्मनीवर पहिला गोल होणार असेच वाटत होते. काही क्षणातच चेंडू जर्मनीच्या गोलक्षेत्रातून बाहेर काढून केवळ २-३ पासमध्ये तो अर्जेंटिनाच्या गोलक्षेत्रात पोहोचला व अर्जेंटिनावर ४ था गोल झाला.
जर्मनीचा आजच्या व इंग्लंड विरूद्धच्या सामन्यातला झंझावात बघितला तर जर्मनीच संभाव्य विजेते वाटतात.
जर्मनी अप्रतीम
जर्मनी अप्रतीम खेळले....अर्जेंटिनाला हारवणे सोपे नाही..जर्मनीचा बचाव खुप खुप छान आहे..
स्पेन ने आताचा सामना आरमात जिन्कायला पाहीजे..बघुयात काय होते ते..
माझी आधीची पोस्ट पुन्हा
माझी आधीची पोस्ट पुन्हा चिकटवतोय .....
थांबा इतक्यात फायनलाचा स्कोर वर्तवू नका... अर्जेंटीनाला जर्मनीची मॅच जड जाणार हे नक्की आहे....
>>> १०० % सहमत
जर्मनी हारणारच अस वाटाव अस त्यान्च्या खेळात फारस काही नव्हत काल .
मोस्ट इम्पॉर्टन्ट : त्यातला कुणीही स्वतःसाठी खेळत नाहिये (किमान तस दिसु तरी देत नाहिये)
हाच त्यान्च्यात व इतर युरोपियन साइड्स मधे फरक आहे .
अर्जेन्टीनाला च काय ब्राझिललासुद्धा ते जड जाणारच
... पण ब्राझील आधिच बाहेर गेले
गो जर्मनी गो ..............
जर्मनी आणि स्पेन अशीच मॅच
जर्मनी आणि स्पेन अशीच मॅच होणार. जर्मनी जिंकेल.
>>जर्मनी आणि स्पेन अशीच मॅच
>>जर्मनी आणि स्पेन अशीच मॅच होणार. जर्मनी जिंकेल.
नाही केदार, बघा तुम्ही...स्पेन जिंकेल.
माझं मत जर्मनीला.
माझं मत जर्मनीला.
काल स्पेन जसे खेळले ते पाहता
काल स्पेन जसे खेळले ते पाहता जर्मनी फेवरीट वाटतायत . पण खेळात कधिच काही सान्गता येत नाही .
तरीही ..... गो जर्मनी गो
पण माझा मुद्दा वेगळा आहे . क्लब पर्फॉर्मन्स च्या आधारावर खेळाडूना legends बनवणे योग्य आहे का ?
एक मेस्सि सोडला (त्यानेही जरी एक ही गोल केला नाही तरीही) तर रूनी , रोनाल्डो , ड्रोग्बा सारखे स्टार खेळाडू International sides च्या defence समोर ढेपाळले . याला incompetency म्हणावी की Lack of effort ?
<< क्लब पर्फॉर्मन्स च्या
<< क्लब पर्फॉर्मन्स च्या आधारावर खेळाडूना legends बनवणे योग्य आहे का ? >> केदारजी, आपण उपस्थित केलेला मुद्दा बहुधा सार्याच फूटबॉल चाहत्याना सतावत असावा. माझे याच चर्चेत व्यक्त केलेले अंदाज असे आहेत -
<<भारतात जसं मोहन बगान व ईस्ट बेंगॉल म्हणजेच फुटबॉल असं कांहीसं झाल, तसंच आतां इतर देशात राष्ट्रीय संघापेक्षांही खेळाडूंची त्यांच्या क्लबशी असलेली समीकरणं त्यांची प्रतिमा ठरवू लागली असावी; .....क्लब व त्यांचे पाठीराखे याना फक्त लीग सामन्यांतील क्लबच्या व खेळाडूंच्या कामगिरीचाच ध्यास असावा व खेळाडूनाही ही जाणीव असावी. >>
<<चांगल्या संघातल्या दिग्गज खेळाडूचा अपेक्षित खेळ न होण्याचं कारण राष्ट्रीय संघातून सामने खेळण्याचा अभाव हेच असावं. त्यांच्या क्लबमधील सहकार्यांयाबरोबर खूप सामने खेळल्याने एकमेकांत जी अबोल पण सखोल अशी समज निर्माण होते त्यामुळेच त्यांचा खेळ बहरत असावा.>>
आपण सुचवल्याप्रमाणे जागतिक दर्जाच्या बचावापुढे हे दिग्गज निष्प्रभ वाटतात, हाही अंदाज बरोबर वाटतो. पण <<याला incompetency म्हणावी की Lack of effort >> पेक्षा Lack of involvement किंवा Lack of commitment म्हटलं तर ? काल कॉमेंटरीमध्येही या स्पर्धेतल्या "लीजंडस्"च्या सुमार कामगिरीबद्दल बराच उल्लेख झाला.
पहिल्यांदाच बघतीय फुटबॉल
पहिल्यांदाच बघतीय फुटबॉल मॅचेस. त्याही आधीच्या सगळ्या नव्हत्याच पाहिल्या. क्वार्टर फायनल्स पाहिल्या मात्र. तरीही मत द्यायला काय हरकत?

फायनल : जर्मनी वि. नेदरलँडस (जर्मनी विजेता) असं वाटतंय. डच फार बहादरीचे आहेत म्हणा. आपल्यावर राज्य करून गेलेत. तेंव्हा तेही जिंकले तर सांगता येत नाही.
ह्या विश्वचषकातले जर्मनीचे
ह्या विश्वचषकातले जर्मनीचे सगळेच गेम हुच्च झालेत.. स्पेन ने पण उप्-उपांत्य सामन्यात फार झोकात विजय मिळवलेला नाही.. स्पर्धा जसजशी पुढे जातोय तसतसा जर्मनीला रिदमही उत्तम सापडतोय.. आपलं मत त्यांच्याच पारड्यात.. आखिव रेखीव गेम आणि तितकच सुंदर इंम्प्लिमेंटेशन.. गो जर्मनी !!
*नेदरलँडने ब्राझीलला लोळवल्यामुळे माझा त्यांच्यावर खुन्नस आहे, त्यामुळे त्यांना मी अनुल्लेखाने मारलय
स्पेन फार धडपडत आलाय सेमी
स्पेन फार धडपडत आलाय सेमी फायनलला. डेविड विला (की विया?) चा गोल पण दोन वेळा बारला लागूनच जाळ्यात गेला. पॅराग्वेची पेनल्टी किक अडवून कॅसिलास ने मोलाची कामगिरी बजावली.
>>नेदरलँडने ब्राझीलला लोळवल्यामुळे माझा त्यांच्यावर खुन्नस आहे<< यामुळेच उरुग्वेने नेदरलँडला हरवावे अशी वेडी अपेक्षा बाळगून आहे
जर्मन रणगाड्याला स्पेन कसे रोखणार की डेविड विला पुन्हा एकदा तारणहार म्हणून स्पेनला फायनलला नेणार हे पहायला हवे.
या स्पर्धेत इतके धक्कादायक
या स्पर्धेत इतके धक्कादायक निकाल लागले आहेत ना की आता कोण जिंकेल हे सांगणे म्हणजे अशक्य झाले आहे.
जर्मनी आणि स्पेनमध्ये आत्तातरी जर्मनीचेच पारडे जड आहे. चोकर्स म्हणून ओळखला जाणारा स्पेनचा संघ यावेळी तरी आपली प्रतिमा पुसणार का असा प्रश्न आहे. अनेक स्टार खेळाडू असूनही (कॅसिलस, तोरेस, व्हिला, रामोस, अलोन्सो) स्पेनचा खेळ एकसंघ वाटत नाही. बचावफळी आणि मधली फळी यांच्यात कमालीचे समन्वय आहे आणि १-२-१ पासेस करत त्यांनी दडपण आणण्याची कामगिरी चोख पार पडली आहे. त्यांना डोकेदुखी आहे ती चान्सेसचे रुपांतर गोलात करायची. अद्याप त्यांना एकाही सामन्यात निर्विवाद असे वर्चस्व गाजविता आलेले नाही ते याच कारणामुळे. अन्यथा स्पेनचा गेम सुरेख आहे.
जर्मनीतर काय प्रत्येक गेममागे आपला खेळ सुधारत चालले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी अर्जेंटिनाचा धुव्वा उडविला ते पाहत त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आणि इथेच गोम आहे. अपेक्षांच्या दडपणाखाली खेळणे सोपे नाही. आत्तापर्यंत नविन टीम, बलॅकची अनुपस्थिती यामुळे जर्मनीच्या संघाकडून फारशा अपेक्षा बाळगल्या जात नव्हत्या. पण आता तसे नाही. त्यांना या कामगिरीपेक्षा सरस खेळ करून दाखविण्याचे आव्हान आहे. आणि इतिहास साक्ष आहे की भले भले संघ यात गारद झाले आहेत.
स्पेनविरुद्ध म्युलर आणि फ्रेडरिकची अनुपस्थिती, वाढत्या अपेक्षांचे ओझे या गोष्टी जर्मनीविरुद्ध जात आहेत.
नेदरलँड - युरुग्वेमध्ये माझाही पाठिंबा युरुग्वेला. काय जिगरबाज खेळ करतात. घानाचे वाईट वाटले पण युरुग्वेचा खेळही तितक्याच तोडीचा होता.
नेदरलँडबद्दल काहीच भाकित करणे अवघड आहे.
<<अद्याप त्यांना एकाही
<<अद्याप त्यांना एकाही सामन्यात निर्विवाद असे वर्चस्व गाजविता आलेले नाही ते याच कारणामुळे. अन्यथा स्पेनचा गेम सुरेख आहे.>>पॅराग्वेच्या अभेद्य बचावफळीवर सतत वेगवेगळ्या चाली रचून केलेल्या आक्रमणांमुळे स्पेनच्या खेळाडूंमधला समन्वय आता घोटून घोटून प्रभावी व धारधार झाला असण्याची व त्या ताज्या "मॅच प्रॅक्टीस"चा स्पेनला जर्मनीविरुद्ध मोठा लाभ होण्याचीही दाट शक्यता आहे !
आ रा रा रा रा. ब्राझिल मधला
आ रा रा रा रा.
ब्राझिल मधला प्रत्येक माणूस मला सांगायचा. यावेळी काही खर नाही. मला मात्र मात्र आशा होती. जाउदे.
जर्मनी सर्बिया च्या मॅच नंतर चांगलीच जागी झालीय. वेगवान प्रति आक्रमण, यंग टीम, क्लोज सॉलिड फॉर्मात. डेडली कॉम्बीनेशन.
आता मात्र रिझल्ट बद्दल मॅच झाल्यावरच बोलणे बरे.
पण राहवत नाही.
नेदरलँड.
आजचं म्हटलं तर 'नेदरलँड' चे
आजचं म्हटलं तर 'नेदरलँड' चे चान्सेस जास्त आहेतच.
आजच्या लढतीत जरी हॉलंड चे
आजच्या लढतीत जरी हॉलंड चे पारडे जड असले तरीही उरुग्वे कडुन चुरसीच्या खेळाची अपेक्षा राहील.
हॉलंड हा असा संघ आहे की जो या विश्व्चषकामद्धे एकही सामना हरलेला नाही, पण उरुग्वे ला याआधी हॉलंड ने एकदाच हरवले असल्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उरुग्वेचा संघ खेळेल एवढे नक्की.
आजच्या लढतीत जरी हॉलंड चे
आजच्या लढतीत जरी हॉलंड चे पारडे जड असले तरीही उरुग्वे कडुन चुरसीच्या खेळाची अपेक्षा राहील.
हॉलंड हा असा संघ आहे की जो या विश्व्चषकामद्धे एकही सामना हरलेला नाही, पण उरुग्वे ला याआधी हॉलंड ने एकदाच हरवले असल्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उरुग्वेचा संघ खेळेल एवढे नक्की.
आजच्या लढतीत जरी हॉलंड चे
आजच्या लढतीत जरी हॉलंड चे पारडे जड असले तरीही उरुग्वे कडुन चुरसीच्या खेळाची अपेक्षा राहील.
हॉलंड हा असा संघ आहे की जो या विश्व्चषकामद्धे एकही सामना हरलेला नाही, पण उरुग्वे ला याआधी हॉलंड ने एकदाच हरवले असल्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उरुग्वेचा संघ खेळेल एवढे नक्की.
आत्ताच ढकपत्रातून मिळालेली एक
आत्ताच ढकपत्रातून मिळालेली एक मस्त माहिती
This world cup is already determined by the numbers....
1. Brazil won the World Cup in 1994; before that they also won in 1970.Adding1970 + 1994= 3964
2. Argentina won its last World Cup in 1986; before that they also won in 1978. Adding 1978 + 1986= 3964
3. Germany won its last World Cup in 1990; before that they also won in 1974. Adding 1974 + 1990= 3964
4. Brazil also won the World Cup in 2002; before that they also won in 1962. Adding 1962+ 2002= 3964
5. Therefore if you want to know what nation is going to win the World Cup in 2010, you only have to subtract 2010 from the magic number that we have determined: 3964.3964 minus 2010 = 1954... In 1954 the World Cup was won by Germany !!!
Probably not scientific... but pretty interesting..
रंगासेठजी, खरंय, पण हा
रंगासेठजी, खरंय, पण हा विश्वचषक तर सगळीच आकडेवारी व अंदाज उधळून टाकायचा विडा उचलूनच आला आहे !
हॉलंडचे बहुतेक पाठीराखे ५जुलैचं तिकीट बुक करून मायदेशी परतले आहेत व हॉलंडच्या फुटबॉल असोसिएशनने पण जोहान्सबर्ग येथील सँडटोन हॉटेलमध्ये फक्त क्वार्टर फायनलपर्यंतच त्यांच्या संघाचं बुकींग केलं होतं ! फिफा आता त्यांच्या हॉटेलची सोय करण्याची धडपड करतेय कारण बहुतेक हॉटेल्सचं आताचं बुकींग केव्हांच झालंय ! [ याहू वर्ल्डकप कव्हरेज ]
अर्जेंटीना, ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स इ.च्या १२जुलै पर्यंतच्या हॉटेल बुकींगचं "कॅन्सलेशन" असेलच ना!!:हहगलो:
>>ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स
>>ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स इ.च्या १२जुलै पर्यंतच्या हॉटेल बुकींगचं "कॅन्सलेशन" असेलच ना!!<<
खरयं अगदी.
आजच फॅब्रेगसने जर्मन्सना फेवरिट म्हटलयं, एकतर त्याला जर्मन्सवर पूर्ण भरवसा आहे नाहीतर स्वतःच्या टीमवर थोडा अविश्वास नाहीतर त्यांना हरभर्याच्या झाडावर चढवायचा प्रयत्न केलाय.
अवांतर : पण ज्याने ही आकडेवारी शोधलीय त्याला मानायला पाहिजे नायतर त्याला काहीच काम नाही असं समजायला हरकत नाही.
आज पॉल या ऑक्टोपसने स्पेनला
आज पॉल या ऑक्टोपसने स्पेनला पसंती दिलीये. आत्तापर्यंततरी त्याने केलेली सर्व भाकिते खरी ठरली आहेत. अगदी सर्बियाविरुद्धच्या जर्मनीच्या पराभवाचेही त्याने भाकित केले होते.
दुसरी मनोरंजक बातमी म्हणजे पॅराग्वेच्या टॉपच्या मॉडेलने जर पॅराग्वे विश्वचषक जिंकला तर अंगावर झेंडा रंगवून विवस्त्रावस्थेत रस्त्यावरून धावणार असे जाहीर केले होते. त्यामुळे पॅराग्वेवासिय व्हीलावर जाम चिडून आहेत. (त्याच्या गोलमुळे स्पेन विजयी झाले. काय करावे या स्पेनला, छ्या) पण आजची बातमी अशी आहे की खेळाडूंच्या जिगरबाज कामगिरीला सलाम म्हणून आपला कार्यक्रम तडीस नेणार असल्याचे तिने जाहीर केले आहे.
दरम्यान, ब्युनोस आयर्सवाल्यांवरचे संकट टळले. (अर्जेंटिना जिंकल्यास मॅराडोना रस्त्यावरून तसाच धावणार होता..).
<<आजच फॅब्रेगसने जर्मन्सना
<<आजच फॅब्रेगसने जर्मन्सना फेवरिट म्हटलयं, एकतर त्याला जर्मन्सवर पूर्ण भरवसा आहे नाहीतर स्वतःच्या टीमवर थोडा अविश्वास नाहीतर त्यांना हरभर्याच्या झाडावर चढवायचा प्रयत्न केलाय.>> आजच, जर्मनीच्या बॅस्टीअन श्वाईनस्टीजरने स्पेनचा संघ सर्वोत्तम संघ असल्याचं म्हटलं आहे ! मला वाटतं, विरूद्ध संघाची उणीं-दूणीं काढल्यावर काय हालत होते हे ब्राझील व अर्जेंटीनापासून शिकल्यामुळे आता विरूद्ध संघाची स्तुति करण्याची ही नवी शक्कल निघाली असावी !:हहगलो:
<< (अर्जेंटिना जिंकल्यास मॅराडोना रस्त्यावरून तसाच धावणार होता..).>> हा विश्वचषक बर्याच जणांच्या वस्त्रहरणामुळेच बहुधा लक्षांत रहाणार आहे !
अखेर हॉलंड अंतिम फेरीत
अखेर हॉलंड अंतिम फेरीत पोहोचले. ऊरूग्वेने खूपच चुरशीची लढत दिली. शेवटच्या ३-४ मिनिटात हॉलंडच्या पोटात गोळा आला होता. ऊरूग्वेने केलेले २ गोल पाहिले तर हॉलंडचा बचाव फारसा प्रभावी वाटत नाही. त्यांचा जर्मनी किंवा स्पेनच्या आक्रमणासमोर निभाव लागणे कठीण दिसते. आजचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना हाच खर्या अर्थाने अंतिम सामना आहे. आजचा सामना जिंकणाराच अंतिम सामना जिंकेल. आज जर्मनीचे पारडे जड वाटते.
आज जर्मनीच्या म्यूलरला
आज जर्मनीच्या म्यूलरला निलंबीत केलं आहे का? लोकसत्तात तसं आलं आहे.आणि श्वाईनस्टायगर पण खेळणार नाहि दुखापतीमुळे.(देवा,प्लीज जर्मनी जिंकु दे :))
आज १०१ % स्पेन जिंकणार असंच
आज १०१ % स्पेन जिंकणार असंच वाटतयं ... स्पेन जिंकावी. अन वर्ल्डकप हॉलंडने घेवून जावा.
Pages