ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे
अ
द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स
ब
(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस
क
(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया
ड
(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना
इ
(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून
फ
इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया
ग
(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)
ह
(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली
उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने
उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)
उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)
उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)
तिसर्या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)
अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)
ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/
तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...
एकाच दिवशी दोन ब्लंडर्स, फिफा
एकाच दिवशी दोन ब्लंडर्स, फिफा कडून.
इंग्लंड चा १ फूट आत पडलेला गोल दिला नाही. आणि अर्जेंटिनाचा १ मिटर ऑफ साइड असताना केलेला गोल दिला.
यांना कॅमेराची मदत घ्यायला काय होतय कोण जाणे. निदान गोल साठी तरी. पुढच्या वर्ल्ड कप पर्यंत नक्की रिव्हू सिस्टीम येणार.
इंग्लंडच्या मॅच मधे निकालात फरक पडू शकला असता. जर्मनीने मारलेला दुसरा गोल मात्र सुपर्ब होता. पहिला, तिसरा व चौथा केवळ इंग्लंड च्या गलथान पणामुळे. इतर टीम विरूद्ध असे गोल होणार नाहीत. फर्डिनांड ची अनुपस्थिती इंग्लंड ला खूप भोवली.
अर्जेंटिनाचा दुसरा गोल, जबरी.
आशूचॅम्प, बाकी सगळ ठिक, पण एक किरकोळ फरक - अंतिम लढत : अर्जेंटिना प. वि. ब्राझील १-२
२०१४च्या विश्वचषकात आणखीन २
२०१४च्या विश्वचषकात आणखीन २ असिस्टंट रेफरी आणनार आहेत पण व्हिडिओ रिप्लेची सोय त्यावेळी पण नसेल बहुतेक.
काल जर्मनीचे 'ब्लिल्ट्जक्रीग' पाहता आले नाही
. लँपार्डचा गोल जर वैध ठरवला असता तर अंतिम निकालात फरक पडू शकला असता. आत्ता लोक कपेलोला शिव्या घालतात की 'ग्रीन' ला ते बघायला पाहिजे.
अर्जेंटिनाची आगेकूच जबरदस्त चाललीय. आत्त्ता जर्मनी वि. अर्जेंटिना म्हणजे एकदम ट्रीट आहे.
मेस्सीला अजून एकही गोल करता आला नाही पण त्याने केलेले असिस्ट्स व पासेस मस्तच. जबरदस्त खेळाडू.
या सगळ्या सामन्यांची क्षणचित्रे (हाइलाईट्स) युट्यूब वर आहेत काय? अथवा अन्य ठिकाणी कुठे पहायला मिळू शकतील काय?
>>अंतिम लढत : अर्जेंटिना वि. वि. ब्राझील १-२ << अगदी सहमत
थांबा इतक्यात फायनलाचा स्कोर
थांबा इतक्यात फायनलाचा स्कोर वर्तवू नका... अर्जेंटीनाला जर्मनीची मॅच जड जाणार हे नक्की आहे.... तेव्हा इतक्यात ते फायनलला जातील असे म्हणू नका... आजच्या मॅचेस कालच्या मानानी सरळ आहेत... ब्राझील आणि नेदरलँड बहुतेक जिंकतील.. पण फूटबॉल मध्ये काहीही घडू शकते तेव्हा... हातची घडी आणि तोंडावर बोट...
झक्की.. भारतात आता तुमच्या त्या विशिष्ठ शहराची टीम सुद्धा आहे आणि ती भारतीय क्लब लेव्हलला पहिल्याच वर्षी तिसर्या नंबरला आहे... दुर्दैवानी भारत क्वालिफायच होऊ शकत नाही कारण बाकीच्या संघांची पातळी गाठायला बराच वेळ लागेल... रच्याकने १९५० च्या दशकात एकदाच भारत वर्ल्डकप मध्ये पोहोचला होता पण तेव्हा अनवाणी खेळायला परवानगी नाकारली गेल्यामुळे प्रत्यक्षात एकही मॅच खेळता आली नाही...
थांबा इतक्यात फायनलाचा स्कोर
थांबा इतक्यात फायनलाचा स्कोर वर्तवू नका... अर्जेंटीनाला जर्मनीची मॅच जड जाणार हे नक्की आहे....
>>> १०० % सहमत
जर्मनी हारणारच अस वाटाव अस त्यान्च्या खेळात फारस काही नव्हत काल .
मोस्ट इम्पॉर्टन्ट : त्यातला कुणीही स्वतःसाठी खेळत नाहिये (किमान तस दिसु तरी देत नाहिये)
हाच त्यान्च्यात व इतर युरोपियन साइड्स मधे फरक आहे .
अर्जेन्टीनाला च काय ब्राझिललासुद्धा ते जड जाणारच
माझा अन्दाज : अंतिम लढत : जर्मनी वि. वि. ब्राझील २-१/३-२
जर्मनी जिंकला तर समस्त
जर्मनी जिंकला तर समस्त माबोकरांना माझ्यातर्फे मोदकांची पार्टी....
मी जर्मनीचा हार्डकोअर फॅन आहे..जर्मनी जिंकला तर त्यांच्याइतकाच मला आनंद होईल...
पण वस्तुस्थिती वेगळी आहे... अर्जेंटिना आत्ता सुपर फॉर्ममध्ये आहे..मेस्सीला जरी गोल करता आलेला नसला तरी त्यांनी अप्रतिम खेळ करून दाखविलेला आहे...मॅराडोनाची जादू आहेच...त्यालाही आता जर्मनीच्या बॅकेनबॉरसारखा विक्रम करून दाखवायचे वेध लागले आहेत...(त्याने १९७४ मध्ये कर्णधार म्हणून तर १९९० मध्ये कोच म्हणून जर्मनीला विश्वचषक जिंकून दिला होता)..तर जर्मनीच्या तुलनेत मानसिकदृष्टया अर्जेंटिनाचे पारडे जड आहे...
जर्मनी - दबावाखालीही चांगला खेळ करण्याची क्षमता, अप्रतिम टिमवर्क, म्युलर, उझील या नवोदित जोडीची तडाखेबाज आक्रमण करण्याची क्षमता, मिरास्लाव क्लोस आणि पोडलस्कीसारखे दर्जेदार स्ट्रायकर आणि त्यांना श्वाईनस्टायगर आणि लामची साथ, भेदक आक्रमण आणि तितकेच सुरेख बचाव
------ याचबरोबर धसमुसळा खेळ करून कार्ड खाण्याची शक्यता..क्लोसचे उदाहरण ताजेच आहे..एखादा चांगला खेळाडू कार्ड खाऊन बाहेर गेला तर जर्मनीचा खेळ एकदम खालावण्याची दाट शक्यता...नव्या दमाच्या खेळाडूंमध्ये अनुभवाची कमतरता..त्यामुळे उत्साहाच्या भरात गेमप्लॅनपासून भटकणे..इंग्लंडविरुद्ध २-० अशी आघाडी घेतल्यानंतर त्यांना २-२ अशी बरोबरी साधण्याची संधी यामुळेच मिळाली...
अर्जेंटिना - अप्रतिम टिमवर्क यांचेही, संधीचे रुपांतर गोलात करण्याची क्षमता सर्वात जास्त आणि हाच मुद्दा कळीचा ठरू शकतो..आत्तातरी अर्जेंटिना सर्वात जास्त (१०) गोलांसह आघाडीवर...बचावही तितकाच भक्कम..चार सामन्यांमध्ये फक्त २ गोल...
....... अजूनपर्यंत एकदाही अर्जेंटिनाला दडपणाखाली खेळ करावा लागलेला नाही...त्यामुळे लवकर एखादा गोल करून जर्मनीने दबाव वाढवत नेला तर त्यांचा खेळ कसा असू शकेल याचा अंदाज करणे अवघड आहे...दुसरे म्हणजे पेनल्टी शुटआऊटमध्येही जर्मनीचे पारडे भारी असू शकेल...
रंगासेठ...फिफाच्या साईटवर
रंगासेठ...फिफाच्या साईटवर मिळतील ही सर्व क्षणचित्रे पहायला...
http://www.fifa.com/worldcup/highlights/video/video=1261773/index.html
जर्मनी जिंकणार.. !!!! क्लोज
जर्मनी जिंकणार.. !!!!
क्लोज आणि कंपनी असे खेळणार :
तर मेस्सी आणि कंपनी असे :
<रच्याकने १९५० च्या दशकात
<रच्याकने १९५० च्या दशकात एकदाच भारत वर्ल्डकप मध्ये पोहोचला होता पण तेव्हा अनवाणी खेळायला परवानगी नाकारली गेल्यामुळे प्रत्यक्षात एकही मॅच खेळता आली नाही...>
अहो, १९५० मधे भारत खरच एक गरीब देश होता. आम्ही त्या काळातलेच. फुटबॉलचे जोडे कुठले, साध्या चपलांचा एक झिजलेला जोड वर्षानुवर्षे वापरलेला (कारण पुष्कळदा अनवाणीच जात असू).
पण आता तर भारताजवळ कमालीच्या बाहेर श्रीमंती झाली आहे असे ऐकले. अमेरिकेला सहज हसत हसत २५ लाख रु. एक राज्य देऊ शकते, हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प जाहीर करतात (प्रकल्प होत नसतील, पण पैसे मात्र खर्च होतात आरामात!) मग आता सगळ्यांना फूटबॉलचे जोडे आणता येतील की.
अरे, उरुग्वे, पॅराग्वे नि स्लोवाकिया खेळतात, भारताला काय कठीण आहे?
रच्याकने - तो बेंड इट लाईक बेकॅम वाला बेकॅम आहे का यंदा? तो अमेरिकेकडून खेळतो का इंग्लंडकडून? कुणि नेता (कुणितरी खेळ मंत्री असेलच केंद्रात) घोषणा का करत नाही की पुढच्या विश्वचषकात भारत भाग घेऊन नॉक आउट पर्यंत तरी नक्की पोचेल? त्या नेतृत्वाखाली मग भारतीय लोक उत्साहाने खेळू लागतील.
>>जर्मनी जिंकणार.. !!!! असेच
>>जर्मनी जिंकणार.. !!!!
असेच
झक्की... नजिकच्या काळात तरी
झक्की...
नजिकच्या काळात तरी ते अवघड आहे. आपल्याकडे पैसे भले ढीगभर असोत, जोपर्यंत फुटबॉल संस्कृती येत नाही तोपर्यंत आपण वर्ल्डकपला खेळू असे वाटत नाही.
पॅराग्वे, युरुग्वे आणि अन्यही अनेक गरीब देश केवळ फुटबॉलच्या जोरावर पुढे आले आहेत. खरे तर गरीब देशांमध्ये फुटबॉल इतका सोपा आणि कमी खर्चिक खेळ नाही. पण आपल्याकडे सगळे श्रीमंती थाटाचे ना. आपल्याकडे जसा क्रिकेट रुजला आणि फोफावला तसा फुटबॉल नाही. आपल्याकडे जसा गल्ली-गल्लीत आणि मुंबईत तर गॅलरीत क्रिकेट खेळला जातो तसा या देशांमध्ये रस्त्यावर फुटबॉल. अनेक दर्जेदार फुटबॉलपटू अत्यंतिक गरीबीतून आणि रस्त्यावर खेळत वरती आले आहेत.
तसे आपल्याकडे व्हायला बराच कालावधी लागेल आणि व्हायची शक्यताच कमी आहे. जो खेळ जगातले जेमतेम १०-१२ देश खेळतात त्यातच आपली मर्दुमकी...ऑलिम्पिक आणि फुटबॉल जिथे लहानतले लहान देश आपले कर्तुत्व गाजवतात तिथे आपला भोपळा....
असो....
१९५० च्या दशकात एकदाच भारत वर्ल्डकप मध्ये पोहोचला होता पण तेव्हा अनवाणी खेळायला परवानगी नाकारली गेल्यामुळे प्रत्यक्षात एकही मॅच खेळता आली नाही..>>>>>>>>>>
ही एक मोठी अफवा आहे. असे प्रत्यक्षात काही झालेले नव्हते. माझ्याकडे यासंदर्भात एक मेल होती. ती सापडली की तपशीलवार खुलासा करू शकेन.
१९५० च्या दशकात एकदाच भारत
१९५० च्या दशकात एकदाच भारत वर्ल्डकप मध्ये पोहोचला होता पण तेव्हा अनवाणी खेळायला परवानगी नाकारली गेल्यामुळे प्रत्यक्षात एकही मॅच खेळता आली नाही..>>
अफवा वाटत नाही..
http://en.wikipedia.org/wiki/1950_FIFA_World_Cup#Seeding
http://www.planetworldcup.com/CUPS/1950/wc50qualification.html
काल ब्राझील जिंकली . आज स्पेन
काल ब्राझील जिंकली :-). आज स्पेन व पोर्तुगाल भिडणार.
आशु, धन्यवाद.
केबल सर्विस प्रोवायडरच्या कृपेने जवळपास सगळे सामने बघता आले नाहीत
आणि एअरटेलची DTH सेवा घेतली तर उद्या येतायत Installationला. 
आशु.. ही फिफाची ऑफिशियल लिंक
आशु.. ही फिफाची ऑफिशियल लिंक आहे १९५० च्या वर्ल्डकपची.. ... http://www.fifa.com/worldcup/archive/edition=7/overview.html
ह्यात व्यवस्थित उल्लेख आहे भारत न खेळण्याबाबत... फिफानी अनवाणी पायानी खेळायची परवानगी नाकारल्यामुळे भारत ब्राझीलला गेलाच नाही...
कालच्या नेदरलंड वि.
कालच्या नेदरलंड वि. स्लोव्हकिया सामन्याबद्दल कुणीच बोलत नाही, कारण त्यात बोलण्यासारखं काही नव्हतच. तरी पण, युरोपियन व द. अमेरिकन शैलीतला विरोधाभास फार स्पष्टपणे मांडला, हे त्या सामन्याचं खास वैशिष्ठ्य म्हणायला हवं. नेदरलंडने पहिला गोल केल्यावर ते बराच वेळ ढेकरच देत होते व स्लोवाकियाला बरोबरी करण्याचीसुद्धा निकड भासत नव्हती. बॉल पुढे नेण्याऐवजी मागे मागे स्वतःच्याच गोली पर्यंत पोचवायचीच जणूं चढाओढ दिसत होती. फरक एव्हढाच कीं नेदरलंड संधि निर्माण करत नसले तरी मिळालेल्या संधींचा तरी तत्परतेने फायदा घेत होते पण स्लोव्हाकिया त्याबाबतीतही खास उत्साही नव्हते. स्लोव्हाकियन गोलीला मात्र मानलं. त्याच्या जागी कुणी लेच्यापेच्या गोली असता तर स्कोअर २-१ ऐवजी नक्कीच निदान ५-१ तरी झाला असता.
हे सारं मांडण्याचं कारण असं कीं कुणीतरी माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला त्या सकॄतदर्शनी निर्हेतूक वाटणार्या खेळाच्या डावपेचांच विश्लेषण करून सांगेल का ?
<खेळाच्या डावपेचांच विश्लेषण
<खेळाच्या डावपेचांच विश्लेषण करून सांगेल का ?>
मी आनंदाने सांगितले असते, पण मला सॉकरबद्दल एव्हढेच माहित आहे की बरेच लोक एक चेंडू पायाने इकडून तिकडे लाथाडतात, मधून मधून तो नेटमधे जातो, मग सगळे लोक गोsssssssssssssssssssल
म्हणून ओरडतात! आणि कंटाळा आला की सामना संपवतात, नि मग प्रेक्षक आपआपसात दे धमाल दनादन्न मारामारी करून एकमेकांचे हात पाय डोकी जे मिळेल ते तोडून ठेवतात.
पराग्वे वि जपान फिफा२०१०
पराग्वे वि जपान फिफा२०१० मधला पहिला पेनल्टी-शुट आऊट. छान झाली मॅच (शेवटची ३० मि).
अखेर पराग्वेने बाजी मारली, वाटलं होतं आशियातील एक तरी देश पुढे जावा
<<वाटलं होतं आशियातील एक तरी
<<वाटलं होतं आशियातील एक तरी देश पुढे जावा>> आणि जपानने तशी दाट शक्यताही निर्माण केली होती. शेवटी पेराग्वे धापा टाकत होते तेंव्हा जपानी स्टॅमिनाची शिदोरी टिकवून होते ही पण जमेची बाजू. करोडो लोक, विशेषतः स्वतःचे देशवासीय, श्वास रोखून आपल्याकडे पहाताहेत हे ओझं डोक्यावर ठेवून पेनल्टी-शूटाऊटमध्ये कीक मारायला जाणं म्हणजे अग्निदिव्यच ! अशिया आपला ठसा विश्वचषक
स्पर्धेवर उमटवूं लागला आहे, असं जपान , कोरीयाच्या खेळावरून वाटतंय.
स्पेन-१,पोर्तुगाल-०.
स्पेनने चँपियन्ससारखा खेळ केला ! त्यांचं आक्रमण नियोजित, शिस्तबद्ध असूनही त्यात लवचिकता व लय होती. पोर्तुगालचं "फिनिशींग" कमी पडल्यासारखं वाटलं; रोनाल्डोवर नको तेव्हढं अवलंबून रहाण्याचा तर तो परिणाम नव्हता ? स्पेननं आपलं स्पर्धेतलं स्थान आता खूपच बळकट केलंय, हे नक्की.
<<नि मग प्रेक्षक आपआपसात दे धमाल दनादन्न मारामारी करून एकमेकांचे हात पाय डोकी जे मिळेल ते तोडून ठेवतात.>> झक्की, मी सध्या एकटाच सामने बघत असतो व तेही टी.व्ही.वर. त्यामुळे, फक्त स्वतःच्याच कपाळावर हात मारून घ्यावा लागतो. म्हणूनच,समजून घेण्याची ही तळमळ !:हहगलो:
भाऊ तुम्ही कपाळावार हात मारत
भाऊ तुम्ही कपाळावार हात मारत सामने बघताय म्हणून तर आम्हाला विश्लेषण वाचायला मिळते
विक्रम, आशु, गारेगार यांचे देखील विश्लेषण मस्त असते.
झक्की, मी एके ठिकाणी अमेरिकन लोकांचे फुटबॉल बद्दलचं मत वाचलं होतं. त्यात एक ब्रिटिश वार्ताहर १९९४ या वर्षी अमेरिकेत आयोजित फुटबॉल विश्वचषकाचे वार्तांकन करायला गेलेला असताना तिथल्या कॅब ड्रायवर बरोबर फुटबॉलवर चर्चा झाली तेव्हा त्या कॅब ड्रायवरने फुटबॉलवर टिका करत सांगितले की ९० मिनिटे खेळून पण गोल न झाल्यास पेनल्टी शूटाउट ने सामन्याचा निर्णय घेतला जातो मग ९० मिनिटे वाया घालवण्यापेक्षा सरळ पेनल्टी शूटाउटने सामन्याचा निकाल का नाही ठरवत?
मला आता नेमकी ती मेल सापडत
मला आता नेमकी ती मेल सापडत नाहीये. हरवली बहुतेक. तर त्या मेलमध्ये असे दिले होते की, काहीतरी अंतर्गत विरोधामुळे भारताला संधी देण्यात आली नाही आणि काहीतरी थातूर मातूर कारण पुढे करण्यात आले..
आता फिफाच्या अधिकृत साईवर आहे म्हणजे ते खरे मानावे लागेल..पण मला शंका अशी आहे की
केवळ अनवाणी खेळायचे म्हणून भारताने ही संधी दवडली असेल का. एवढे आग्रही राहण्याएवढे भारतीय खेळाडू त्या परिस्थितीत होते का आणि इतक्या फालतू कारणावरून विश्वचषकातून माघार घेतली तर त्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाहीत का.
साधी गोष्ट..एखादा संघ ज्याने आयुष्यात कधीही बुट वापरणे सोडा पाहिलेही नाहीत..त्या संघाने चमत्कार करून विश्वचषकाला पात्र होण्याची कामगिरी केली. तर ते केवळ बुट घालायचे नाहीत म्हणून खेळणार नाहीत का. कोणताही संघ असो तो अशा वेळी मोठ्या फरकाने हरेल पण बुट घालून खेळेल.
त्यामुळे मला तरी हे कारण खरे वाटत नाही.
आशू.. तुझ्या म्हणण्यात तथ्य
आशू.. तुझ्या म्हणण्यात तथ्य असूही शकेल.. पण त्याच बरोबर हे ही बघायला पाहिजे की तेव्हा भारतीय टीम वर्ल्डकप साठी पात्र ठरण्याची शक्यता बरीच आहे. कारण त्या नंतर टीमचा परफॉरमन्स १९६० पर्यंत तरी चांगला होता... नंतर सगळाच सावळा गोंधळ...
केवळ अनवाणी खेळायचे म्हणून
केवळ अनवाणी खेळायचे म्हणून भारताने ही संधी दवडली असेल का. >> बीबीसीवर एक लिंक सापडली (किंवा वर दिली असावी) त्यात पैश्याअभावी ही संधी दडवली असे लिहीलंय.
१९५६ च्या ऑलिंपिक्समध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत हरला होता (एकुण ११ संघ सहभागी झाले होते) ह्याबद्दल कोणी लिहिले नाहीये.. विकीपिडीयावर माहिती मिळेल. http://en.wikipedia.org/wiki/Football_at_the_1956_Summer_Olympics
गारेगार... मी असे म्हणत
गारेगार... मी असे म्हणत नाहीये की आपण पात्र झालो नाही. मला म्हणायचे होते की पात्र झाल्यानंतरही आपण केवळ बूट घालायचे नाही हा पवित्रा ठेऊन आपल्याला खेळायची परवानगी नाकारेपर्यंत आपण ताणून धरले असावे का.
जिथे जिथे खेळांमध्ये नविन नियम झाले, अगदी जिथे आपली मक्तेदारी होती त्या हॉकीतही आपण आंतरराष्ट्रीय महासंघाच्या नियमांपुढे मान तुकवली आहे. त्यामुळे त्यावेळी जर आपल्याला बूट घालून खेळा म्हणले असते तर आपण बूट घालून खेळलो असतोच नाही का.
<<कुणीतरी माझ्यासारख्या
<<कुणीतरी माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला त्या सकॄतदर्शनी निर्हेतूक वाटणार्या खेळाच्या डावपेचांच विश्लेषण करून सांगेल का ?>> या माझ्या विनंतीला जाणकार मायबोलीकरानी "ऑफ-साईड"चा झेंडा हलवलेला दिसतोय !
<<म्हणून तर आम्हाला विश्लेषण वाचायला मिळते >>रंगासेठजी, तुम्हाला दूसरं पिवळं कार्ड फक्त ११ जुलैची फायनल झाल्यानंतरच !!
नात्या लिंक बद्दल धन्यवाद.
नात्या लिंक बद्दल धन्यवाद. भारतीय संघ ऑलिंपिक मधील फूटबॉलच्या उपांत्यफेरी पर्यंत पोचला होता हे माहितीच नव्हते, आज पहिल्यांदाच कळाले. एकूण क्रिकेटच्या आगमनानंतर इतर खेळांकडे आपले दुर्लक्षच झालय.
ब्राझीलच्या 'एलानो'ला दुखापतीमुळे उरलेल्या सामन्यांस मुकावे लागेल असं वाचलं, निदान हॉलंड विरुध्दच्या सामन्यात तरी नक्की नाहिये तो.
भाउ साहेब हा घ्या प्रतिसाद.
भाउ साहेब हा घ्या प्रतिसाद. जाणकार मायबोलीकरा>> हे कोण बुवा??.
जोसे मोरिन्ह्यो तुम्ही म्हणता तस खेळून बार्का सारख्या टीम ला पद्धतशीर पणे हरवतात.
<<जोसे मोरिन्ह्यो तुम्ही
<<जोसे मोरिन्ह्यो तुम्ही म्हणता तस खेळून बार्का सारख्या टीम ला पद्धतशीर पणे हरवतात.>> विक्रमजी, प्रथम प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
एखाद्या बलाढ्य संघाविरुद्ध एखाद्या सामन्यात नाईलाजाने अशी "टॅक्टीक" वापरणं समजण्यासारखं व कांहीसं कौतुकास्पद पण होऊ शकतं.[ फिरकी गोलंदाजांचे बॉल वेड्यासारखे वळत व उसळत असताना गावसकरने शांतपणे प्रत्येक बॉल बॅटखाली व्यवस्थित थांबवून गोलंदाजाना व जवळच्या क्षेत्ररक्षकाना हताश केलेली खेळी अविस्मरणीय होऊ शकते. पण ती कायमची खेळाची शैलीच तर नाही ना होऊ शकत !]. स्लोव्हाकियाने नेदरलँडविरुद्ध जिंकण्याचा एकमेव पर्याय म्हणून तसा खेळ केला असेल, तर "टॅक्टीक" म्हणून ते आवडलं नाही तरी समजण्यासाऱखं निश्चितच आहे. ही शक्यता लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद
त्याच सामन्याबद्दल मी वैतागाने <<युरोपियन व द. अमेरिकन शैलीतला विरोधाभास फार स्पष्टपणे मांडला, हे त्या सामन्याचं खास वैशिष्ठ्य म्हणायला हवं>>म्हटलं होतं. तेही कांहीसं अज्ञानमूलक होतं हें स्पेन वि. पोर्तुगाल सामन्याने दाखवून दिलं.
इथल्या चर्चेतून माझं फुट्बॉल खेळाचं रसग्रहण सुधारणार, हा माझा अंदाज खरा ठरतोय !!
आजपासून उप्-उपांत्य फेरीची
आजपासून उप्-उपांत्य फेरीची सुरुवात होणार. सामन्याआधीच बोलाबोली सुरू झालीय. जर्मनीच्या म्युलरने 'शनिवार नंतर मॅरॅडोना मला कधीही विसरणार नाही' अशी तर कर्णधार लामने 'अर्जेंटिनाला हरवूच' अशी वक्तव्ये केलीत. पेले तर मॅराडोनाच्या मागे हात धुऊनच लागलाय. आज पण 'मॅराडोना हा कोकेनच्या आहारी गेलेला होता व तो आपल्या खेळाडूंसमोर कसला आदर्श ठेवणार?' अशी टिका केलीय.
अर्जेंटिनाही मागे नाहीये, मॅराडोनाने श्वाइन्सटाइगरला डिवचलय आणि टेवेजने 'मेक्सिकोची टीम जर्मनी पेक्षा चांगली आहे' असं सांगून डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
आज ब्राझील्-हॉलंड यांच्यात कमालीची चुरस अपेक्षित आहे. हॉलंड संघाला 'युरोपातील दक्षिण अमेरिकन संघ' असे मानतात आणि टोटल फुटबॉल विरुध्द सांबा स्टाइल यांचा मुकाबला रंगू दे अशीच अपेक्षा.
उरूग्वे वि. घाना सामनाही
उरूग्वे वि. घाना सामनाही पहावा लागणारच. घानाचा खेळही प्रत्येक सामन्यागणिक बहरतो आहे. फक्त, त्या सामन्यात आडदांडपणा नाही झाला म्हणजे मिळवलं !
<< सामन्याआधीच बोलाबोली सुरू झालीय>> हे "सायकॉलॉजिकल वॉर" म्हणजे सर्वच खेळांच्या मोठ्या स्पर्धांमध्ये हल्ली खेळाच्या डावपेचांचाच एक अविभाज्य भाग झालाय !
आता न चुकवता येणारे सर्वच इतके चुरशीचे व प्रेक्षणीय सामने होणार; विश्वचषकात शेवटी नंबर एक कुणीही येवो, आपल्या चष्म्याचा नंबर वाढणार हे नक्की !:हहगलो:
ब्राझिल बाहेर !!!! वेल प्लेड
ब्राझिल बाहेर !!!!
वेल प्लेड डच
भाऊ. मला डचांचा दुसरा गोल फार
मला डचांचा दुसरा गोल फार आवडला. जबरी पास अन जबरी एक्झक्युशन. ब्राझिल हारले. मी ते ब्राझिल ला ल ला ला ब्राझिल हे गाणं लावून बसलो होतो पण फायदा नाही झाला.
Pages