फूटबॉल वर्ल्डकप २०१० - द. आफ्रिका

Submitted by हिम्सकूल on 13 May, 2010 - 06:45

ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे


द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स


(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस


(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया


(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना


(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून


इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया


(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)


(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली

उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने

उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)

उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)

उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)

तिसर्‍या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)

अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)

ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/

तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्यूलरला २ पितपत्रे मिळाल्यामुळे त्याच्यावर आजच्या सामन्यात खेळण्याची बंदी आहे. श्वाईनस्टायगर खेळणार की नाही याची कल्पना नाही.

यलो कार्ड्स...
सलग दोन सामन्यात यलो कार्ड्स मिळाले तर तिसर्‍या सामन्यात खेळता येत नाही.

पैजाना [बेटींग] आता ऊत आलाय. पहिला गोल कोण व किती मिनीटांच्या आंत करेल ? जर्मनी किती गोलच्या फरकाने जिंकेल ? सामना पेनल्टी शूटाऊट वर जाईल का ? वगैरे, वगैरे . पेनल्टी शूटाऊटच्या सरावाच्या संदर्भात जर्मनीच्या प्रशिक्षकाने मार्मिक टिपणी केली आहे. त्याच्या मते पेनल्टी शूटींगसाठी वेगळ्या सरावाची गरज नसून प्रचंड दबावाखालीसुद्धा नेहमीचा खेळ खेळण्याची मानसिक तयारी असणं आवश्यक असतं !
एका वेब साईटवर [ गोल.कॉम] टोरेसला जर्मनी विरूद्धच्या सामन्यात न खेळवण्याचं धाडस स्पेनने दाखवावं असं सूचित केलं आहे ! टोरेस हा महान खेळाडू असला तरी तो सध्या फॉर्मात नाही व त्याला "सबस्टीट्युट" केल्यावरच या विश्वचषकात स्पेनच्या आक्रमणाला धार आली, असं समर्थन देण्यात आलं आहे. फॅबरगासलाच प्रथमपासून खेळवण्यात स्पेनचा फायदा आहे असं ठाम मतही व्यक्त करण्यात आलं आहे. वाचलं तें आपलं इथं माहितीकरतां नमूद केलं ! पण, टोरेसशिवाय स्पेन अन तेही आजच्या सामन्यात ?

आतापर्यन्तच्या सामन्यात फॅब्रिगस ला "सबस्टीट्युट" केल्यावरच स्पेन चा विजय झाला आहे, >>टोरेसशिवाय स्पेन अन तेही आजच्या सामन्यात, का नाही ? Happy

जिंकली. पुयॉल चा गोल टेरिफीक.
पेद्रो ने हावरट पणा केल्यावर त्याला बाहेर काढले ते बरे झाले.

मुयी बीयेन, वामोस इस्पॅनिऑल.

>>पेद्रो ने हावरट पणा केल्यावर त्याला बाहेर काढले ते बरे झाले.
खरय!
मॅच मस्त झाली ... जर्मनीच्या बचावाचा चान्गलाच धुव्वा उडवला स्पेनने .
आता फायनल एक फोर्मलीटी असेल स्पेन साठी.

जर्मन्स जिंकावे असं वाटत होतं पण स्पेन पहिल्या पासूनच जास्त आक्रमक होते आणि डिझर्व्ड व्हिक्टरी !
फिनाले मस्तं होणार !

मला तर मॅच एकतर्फीच वाटली. स्पेन पहिल्यापासूनच आक्रमक तर जर्मनी त्या ऑक्टोपसचं भविष्य खरं ठरावं यासाठीच झटतायत असं वाटून गेलं.

Sad जर्मनी आउट!
पण स्पेनची वेल डिझर्वींग व्हिक्टरी....जर्मन्सच्या चांगल्या बचावामुळे फक्त १ गोल झाला. नाहीतर ज्या आक्रमकतेने स्पेनने खेळी केली ते पाहता अजून दोनेक गोल तर नक्की बसले असते. स्पेन टीम पहिल्या मिनीटापासून डॉमीनेटींग वाटत होती.

आता फायनल एक फोर्मलीटी असेल स्पेन साठी.>>> अनुमोदन!

हुर्रे... आता ओरेंजच जिंकणार वर्ल्ड कप.. पण जर्मनी फायनलला असते तर अजून मजा आली असती.. सगळ्या हॉलंडमध्ये जर्मनीला मनापासून शिव्या घालत असतात.. ७४च्या फायनलला त्यांची टीम जबरी तगडी असून व पहिल्याच २ मिनिटात लीड घेउनसुद्धा डच हारले होते.. ७८ची फायनल पण एकदम वादग्रस्त झाली ज्यात अर्जेंटिना जिंकल्यावर डच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी बाहेर आले नव्हते..

गो ऑरेंज..

म्युएलर नसल्यामुळे जर्मनीची लय बिघडली व टोरेस नसल्यामुळे [शेवटची दहा मिनीटे सोडून] स्पेनला लय गवसली, असंच म्हणायचं का? अर्जेंटीनाविरूद्ध खेळलेला जर्मन संघ हाच होता ? कीं, सरड्यासारखा प्रत्येक संघाला हर सामन्यागणिक रंग बदलायला लावायचाच, हा या विश्वचषकाचा दंडकच आहे ?
<<जिंकली. पुयॉल चा गोल टेरिफीक.>> १००% खरंय ! पण, एकंदरीतच स्पॅनिश अप्रतिम खेळले. नियोजनबद्ध असूनही त्यांच्या खेळात लय व लवचिकता होती आणि मुख्य म्हणजे दडपण असूनही त्यानी सहजसुंदर खेळ केला. बॉलचा ताबा स्वतःकडे ठेवतानाही त्यानी आक्रमणाची कास सोडली नाही व "शॉर्ट पासिंग"चाही प्रेक्षणीय उपयोग केला. स्पॅनिश एका बगलेवरून दूसर्‍या बगलेकडे आक्रमण सहजपणे वळवत होते. जर्मनीच्या कट्टर पाठीराख्यानाही दाद द्यायला लावणारा कालचा स्पेनचा खेळ होता. त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन.
कालच्या सामन्यात जाणवलेले आणखी कांही विशेष -१] रेफरीने काल उत्तम कामगिरी केली; कुठेही आपला अधिकार गाजवण्याचा आव न आणता खेळाचं छान नियंत्रण केलं; २] इतक्या दडपणाचा व अटीतटीचा सामना असूनही दोनही संघानी आक्रस्ताळेपणा व आडदांडपणा कटाक्षाने टाळला [एखाद-दूसरा अपवाद वगळता]; ३]जर्मनीचं आक्रमण जितकं निष्प्रभ होतं तितकच जर्मनीचं गोलरक्षण अप्रतिम होतं व ४] संख्याशास्त्र व रेकॉर्डस कांहीही म्हणोत, या विश्वचषकाचा प्रत्येक सामना स्वतःची पत्रिका स्वतःच मांडून येतोय व जातोय !

मला नाही आवडली मॅच. रात्री पुन्हा बघितली. इतका वेळ पझेशन असून एकच गोल. किती चान्सेस घालवले (सगळे गोलकीपरमुळे नव्हे).
जर्मन्स तर अर्जेंटिनाविरुद्ध पहिला गोल ते हाफ टाईमपर्यंत जसे ताळमेळ नसल्यासारखे खेळत होते तसे काल पूर्ण मॅचभर खेळले. एक दोनदा पेनल्टी मिळायला हवी होती, ती दिली नाही. दोन्ही युरोपियन टीम्स असल्या की असं. एक साऊथ अमेरिकन पाहिजे. त्यांची स्टाईल वेगळी आहे.
आडो Lol

मला पण नाही आवडली, संध्याकाळी घरी गेल्यावर पाहिली. एक्दम बोर मॅच झाली. जर्मनीला फ्रस्ट्रेट करणे हीच फक्त स्पेनच्या संघाची स्ट्रॅटजी होती असं वाटत होतं. काहीकाही वेळा चांगला अ‍ॅटॅक केला स्पेननी, पण काहीकाही वेळाच. जर्मनीच्या संघाचा अ‍ॅटॅक बघायला जी मजा येते ती अजिबात स्पेनला बघताना आली नाही.
बाकी जर्मनीनी स्पेनचा खेळ, स्ट्रॅटजी बघता हाफ टाईम नंतर तरी त्यांच्या खेळात बदल करायला हवे होते. अजून एक खरी डिझर्विंग टीम बाहेर Sad

>>अजून एक खरी डिझर्विंग टीम बाहेर ..
नाही पटले..
मग स्पेन आणि हॉलन्ड डिझर्विंग नाहीत का?
ब्राझील नम्बर १ टीम आहे, म्हणुन काय झाले, त्याना सेमी फायनल पण पर्यन्त पण येता नाही आले.
हा विश्वचषक आहे. जे त्या दिवशी चाल्गले खेळतील तेच विजयी....

भाउ नमस्कार, तुमचे विष्लेशण एकदम पटेश.

लालूजी, फुटबॉलचं हे एक वैशिष्ठ्यपूर्ण "अंग" निदर्शनास आणल्याबद्दल धन्यवाद !
पण बव्हंशी स्त्रियांच्याच दॄष्टीकोनातून फुटबॉलपटूंच्या शरीरसौष्टवाबद्दल यात रसग्रहण व विश्लेषण केलेलं दिसतं. त्यावरून आपलं सहज मनात आलं, रशियन बॅले तन्मयतेने पहाणार्‍या उच्चभ्रू मंडळीतल्या किंवा जिमनॅस्टिकसमधील मुलींच्या कसरती पहाणार्‍या क्रिडारसिकांमधल्या पुरुषांच्या दॄष्टीकोनातून जर असं कांही स्त्रियांच्या कमनीय देहाचं रसग्रहण व विश्लेषण "वॉशिंग्टन पोस्ट"ने दिलं, तर त्यावर विकॄतिचा आरोप होऊन किती गदारोळ उठेल ! आपण आपलं फुटबॉलपटूंच्या खेळातलं कसब एव्हढ्यावरच बोललेलं बरं !!

Pages