फूटबॉल वर्ल्डकप २०१० - द. आफ्रिका

Submitted by हिम्सकूल on 13 May, 2010 - 06:45

ह्या वर्षीचा फूटबॉलचा धमाका ११ जून रोजी द आफ्रिकेत चालू होत आहे... जगभरातून सगळ्यात जास्त प्रेक्षकसंख्या असलेला हा धमाका जोरदार होणार आहे...
एकूण आठ गटात चार संघ असे ३२ संघ समील होणार आहेत.. गेली चार वर्ष प्रचंड मेहनत करुन हे सगळे संघ इथे पोहोचले आहे.
गट पुढील प्रमाणे


द आफ्रिका, (२)मेक्सिको, (१)उरुग्वे, फ्रान्स


(१)अर्जेंटीना, नायजेरिया, (२)कोरिया रिपल्बिक, ग्रीस


(२)इंग्लंड, (१)अमेरिका, अल्जेरिया, स्लोवानिया


(१)जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सर्बिया, (२)घाना


(१)नेदरलॅण्ड, डेनमार्क, (२)जपान, कॅमेरून


इटली, (१)पराग्वे, न्यूझीलंड, (२)स्लोव्हाकिया


(१)ब्राझील, कोरिया डिपीआर, आयव्हरी कोस्टा, (२)पोर्तुगाल (हा गट कदाचित 'ग्रूप ऑफ डेथ' मानला जाईल)


(१)स्पेन, स्वित्झर्लंड, होंडुरस, (२)चिली

उपउपांत्यपूर्व फेरीतील सामने

उरुग्वे - कोरिया (२ - १)
अमेरिका - घाना (१ - २)
अर्जेंटीना - मेक्सिको (३ - १)
जर्मनी - इंग्लंड (४ - १)
नेदरलँड - स्लोवाकिया (२ - १)
ब्राझील - चिली (३ - ०)
पराग्वे - जपान (५ - ३, पेनल्टी शूटआऊट)
स्पेन - पोर्तुगाल (१ - ०)

उपउपांत्य फेरीतील सामने..
उरुग्वे - घाना (१ - १, ४ - २ पेनल्टी शूटाआऊट)
अर्जेंटीना - जर्मनी (० - ४)
ब्राझील - नेदरलँड (१ - २)
पराग्वे - स्पेन (० - १)

उपांत्य फेरीतील सामने
उरुग्वे - नेदरलँड (२ - ३)
जर्मनी - स्पेन (० - १)

तिसर्‍या क्रमांकाचा सामना
ऊरुग्वे - जर्मनी (२ - ३)

अंतिम फेरीतील सामना
स्पेन - नेदरलँड (११ तारखेला रात्री ८:३० वाजता द.आफ्रिका प्रमाणवेळ)

ह्या संदर्भात अधिक माहिती फिफाच्या दुव्यावर मिळेल. http://www.fifa.com/worldcup/

तर यंदाच्या ह्या फुटबॉल धमाक्याविषयी चर्चा करण्यसाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>यंदा फायनल मधे साऊथ आफ्रिका मधला एखादा संघ निश्चितचं फायनल मधे असेल.<< म्हणजे आफ्रिका खंडातील एखादा देश अस म्हणायच आहे काय?

>> झिदान, काका, रोनाल्डिन्हो , मेसी या सारख्या खेळाडूंवर कमालीचा विश्वास<< झिदान व रोनाल्डिन्हीओ यंदाच्या विश्वचषकात नाहीयेत.

आजच कुठेतरी वाचल की फायनल ब्राझील व सर्बिया यांच्यात होईल व ब्राझील जिंकेल. हे भाकित कुठल्यातरी सर्वे का आकडेवारी वरून केलय. :-). मॅरॅडोनाने अशी वल्गना केलीय की जर अर्जेंटिना हा विश्वचषक जिंक्कली तर तो राजधानीमध्ये रस्त्यावरून 'नग्न' धावेल Uhoh

<<मॅरॅडोनाने अशी वल्गना केलीय की जर अर्जेंटिना हा विश्वचषक जिंक्कली तर तो राजधानीमध्ये रस्त्यावरून 'नग्न' धावेल>> जगाला फक्त "हँड ऑफ गॉड" दाखवूनच मॅरॅडोनाचं समाधान झालेलं दिसत नाही Proud Proud Proud

<<ब्राझीलने जिंकण्यासाठीच खेळावे पण शैलीत बदल शक्यतो नको. (पण आम्ही केवळ पंखे आहोत, खेळणार तर तेच आहेत)>>रंगासेठजी, असं पंख्याना कमी नका लेखूं, राव. आजच ब्राझीलच्या रॉबिन्होची मुलाखत वाचली. तो मॅन सिटी सोडून तात्पुरता सँटोसतर्फे द. अमेरिकेत खेळतोय. "इंग्लंडमध्ये फुटबॉल हा केवळ ताकदीचा खेळ आहे; ब्राझीलच्या खेळाडूना त्याच्याशी जुळवून घेणं महाकठीण आहे", हे शब्द आहेत ब्राझीलच्या विश्वचषक संघातील ह्या अग्रेसर खेळाडूचे ! आपण "पंखे" काय वेगळं बोलतोय !!

भाऊ :-), ब्राझीलने त्यांच्या शैलीत बदल करू नये या आपल्या मताला माझा पण जोरदार पाठिंबा.

इंग्लंडने आपला विश्वचषकाचा संघ जाहीर केला, त्यातून 'वॉलकॉट' ला वगळलय, कारण तरी अजून जाहीर झाल नाही. वॉलकॉटने पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली होती. इटलीच्या संघातून रॉस्सी व कॅसिनी यांना वगळलय.

फ्रेंडली मॅचेस मध्ये पोर्तुगलने कॅमेरूनला नमवत स्वतःसाठीच आशा निर्माण केल्यात. रोनाल्डोने मान्य केले होते की त्याच्यावर जबरदस्त दडपण आहे.

वॉलकॉटच्या बाबतीत जाणकारानी "त्याला वगळणं एक आश्चर्य आहे" पासून " त्याला फुटबॉलसाठी लागणारा भेजाच नाही " अशी दोन टोकाची मतं व्यक्त केली आहेत. वयाच्या १५व्या वर्षापासून वेगवेगळ्या वयोगटात इंग्लंडचं प्रतिनिधीत्व करणार्‍या व गेल्या विश्वचषकात तर इंग्लंडच्या संघात समावेश असलेल्या या केवळ २१ वर्षांच्या तरुणावर सकॄतदर्शनी तरी अन्याय झाल्यासारखा वाटतोय. पण कांही ठामपणे सांगणं कठीणच.

माझाही असा अंदाज आहे की नेहमीच्या प्रस्थापित संघांना हादरा देत एखादा वेगळाच संघ अंतिम फेरीत दाखल होईल. विश्वचषक जिंकणे न जिंकणे हा वेगळा प्रश्न असेल पण या वेळी प्रसिद्ध खेळांडूपेक्षा नवोदित खेळाडूच भाव खाऊन जातील.

--- वॉलकॉटला वगळणे हा खरंच धक्का होता. जरी त्याला अंतिम ११ मध्ये स्थान नाही दिले तरी राखीवमध्येतरी तो असणे आवश्यक होते.
--- जर्मनीचे भवितव्य यंदा अंधुकच वाटत आहे. बलॅकच्या अनुपस्थितही आम्ही चांगला खेळ करायाच प्रयत्न करू असा विश्वास जरी जोकिम लो दाखवत असले तरी सध्यातरी त्यांच्याकडे असा कोणताही समर्थ पर्याय दिसत नाही. जास्तीत जास्त उपांन्यपूर्व फेरी
--- ब्राझीलचा संघ एकदम नविन आहे. तो, त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. पण अनुभवी खेळाडू नसल्यामुळे जर भाऊंनी म्हणाल्याप्रमाणे शैलीत बदल करून इंग्लिश पॉवर गेमवर त्यांनी जोर दिला तर ते संपले...
---- अर्जेंटिना, स्पेन, इटली आणि फ्रान्स बद्दल बोलायचे झाले तर सगळ्याच संघांनी आपापल्या हिरोज बद्दल फारसा हाईप केलेला नाही. गॅलरी गेमपेक्षा सामना जिंकणे महत्वाचे त्यामुळे इंग्लिश प्रिमिअर लीग किंवा चॅम्पियन्स लीग मध्ये जो मेस्सी, तोरेस बघायला मिळतो तसा इथे मिळणार नाही.
---- फुटबॉलच्या देवाने अफ्रिका खंडातील एक देश अंतिम फेरीत जाणार असे भाकित केले आहे. अवघड आहे. अल्जिरीया, नायजेरीया आणि यजमान दक्षिण अफ्रिकेकडून फारशा आशा नाहीत. प्रश्न उरला, कॅमेरून, आयव्हरी कोस्ट आणि घानाचा. या तिनही संघाकडे धक्कादायक निकाल नोंदविण्याची क्षमता आहे. युरोपातील लिगमध्ये खेळण्याचा अनुभव, जबरदस्त शारिरीक क्षमता आणि चिकाटी याच्या जोरावर हे साखळी स्पर्धेत नक्कीच भारी ठरतील. पण नंतरच्या फेरींमध्ये या गोष्टींबरोबर लागणारी मानसिक तयारी (प्रेशर हँडलीग टॅक्टिज)त्यांच्याकडे कितपत आहे याबाबत शंका आहे.
अनेक दर्जेदार खेळाडू असूनही स्पेन चोकर्स ठरतात ते यामुळेच.
---- पोर्तुगाल, सर्बिया, हॉलंड, कोरिया आणि मेक्सिको यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत. गेल्या विश्वचषकात धडाकेबाज कामगिरी करणाऱया पोर्तुगालला एवढ्यात तरी फारशी चमक दाखवता आलेली नाही.

माझा अंदाज
अ गट - फ्रान्स आणि मेक्सिको
ब गट - अर्जेंटीना आणि कोरिया रिपब्लिक
क गट - इंग्लंड आणि अमेरिका
ड गट - जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया किंवा घाना
इ गट - नेदरलॅण्ड आणि कॅमेरून
फ गट - इटली आणि पराग्वे
ग गट - ब्राझील आणि पोर्तुगाल
ह गट - स्पेन आणि चिली

उपान्त्यपूर्वफेरी - फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, अर्जेंटिना,पोर्तुगाल किंवा कॅमेरून
उपान्त्यफेरी - इटली, ब्राझील, अर्जेंटिना, इंग्लंड
अंतिम फेरी - ब्राझील वि. अर्जेंटिना
विजेते - अर्जेंटिना

ह्या विश्वचषकापुरतं तरी गट फेरीतील सामने पाहूनच मग पुढच्या फेरीतील सामन्यांचा अंदाज बांधणं
योग्य होईल. पण पाहूं आशुचँपचा अंदाज किती बरोबर येतो ते ! त्यातही गंमत असतेच.
<<सगळ्याच संघांनी आपापल्या हिरोज बद्दल फारसा हाईप केलेला नाही>> जाणकार मला टपली मारु शकतात, तरी पण माझा एक कयास मांडतोच -
भारतात जसं मोहन बगान व ईस्ट बेंगॉल म्हणजेच फुटबॉल असं कांहीसं झाल, तसंच आतां इतर देशात राष्ट्रीय संघापेक्षांही खेळाडूंची त्यांच्या क्लबशी असलेली समीकरणं त्यांची प्रतिमा ठरवू लागली असावी; उदा. विश्वचषकाच्या संघातून इंग्लंडच्या डॅरेन बेंडला वगळण्यात आल्यावर त्याच्या क्लबचा मॅनेजर मोठ्या उत्साहाने म्हणतो "ड्रोग्बा [२७ गोल्स्]व रूनी [२४ गोल्स] यांच्या खालोखाल प्रिमीयर लीगमध्ये २३ गोल्स करणार्‍या बेंडला [वय ३० वर्षं] आता वगळण्यात आल्याने पूर्ण विश्रांति मिळून तो खुन्नसने पुढच्या लीगमध्ये क्लबसाठी धमाल खेळेल !" त्या मॅनेजरला बेंडची ही बहुधा विश्वचषक खेळण्याची शेवटची संधी हुकली किंवा त्याला वगळल्याने इंग्लंडच्या कामगिरीवर काय परिणाम होईल याच्याशी काहीही देणं-घेणं नाही ![मालवणीत एक म्हण आहे - "कोणाक कीत्याचां, रामाक सीतेचां". अर्थ- कुणा कुणाला कसल्या कसल्या चिंता असतात, रामाला फक्त आपला सीतेचाच ध्यास ! ] क्लब व त्यांचे पाठीराखे याना फक्त लीग सामन्यांतील क्लबच्या व खेळाडूंच्या कामगिरीचाच ध्यास असावा व खेळाडूनाही ही जाणीव असावी. पूर्वी ब्राझील, अर्जेंटीनासारख्या देशात राष्ट्रीय संघाच्या विश्वचषकातील कामगिरीवरून राजकीय उलथापालथ होत असे ! म्हणून, हिरोजबद्दलचा हाईप हल्ली क्लब करतात , राष्ट्रीय संघ त्या भानगडीत पडत नसावा !!

आतां ड्रोग्बापण दुखापतग्रस्त होवून आयव्हरी कोस्टच्या संघातून बाहेर ![?]
इराक वि. द.आफ्रिका सामना ईएसपीएनवर आज दाखवला- अनिर्णित [०-०] द.आफ्रिकेचा " शॉर्ट पासिंग"वर भर होता पण त्याकरता आघाडीच्या फळीत आवश्यक असणार्‍या सखोल समन्वयाचा अभावच होता. आणि द. अफ्रिकेच्या बचाव फळीचा कल आडदांडपणाकडे झुकणारा वाटला.

आतां ड्रोग्बापण दुखापतग्रस्त होवून आयव्हरी कोस्टच्या संघातून बाहेर >>>>>
कहर म्हणजे रिओ फर्डिनांड पण... हा विश्वचषक म्हणजे सगळ्या कर्णधारांवर संक्रांत दिसतेय...

<<हा विश्वचषक म्हणजे सगळ्या कर्णधारांवर संक्रांत दिसतेय...> पंत पडले, राव चढले. इंग्लंडचा रिओ फर्डिनांड जखमी होवून बाहेर गेला व सुट्टीवर जायच्या तयारीत असलेल्या डॉसनला स्वप्नवत अचानक संघात येण्याचं आणि जेरार्डला कप्तानपद भुषवण्याचं आमंत्रण आलं ! ब्राझीलने सराव सामन्यांसाठी
लिंबुटींबू संघांची निवड केली आहे; नसती दुखापतीची भानगड नको !!
ड्रोग्बाच्या कोपराच्या हाडावर स्वित्झर्लंडमध्ये शस्त्रक्रिया होतेय व विश्वचषकात त्याच्या खेळण्याची अंधुक का होईना पण शक्यता निर्माण झाली आहे.

आशुचँप, सध्याच बलाबल पाहता उपान्त्यपूर्वफेरी पर्यंतचा अंदाजाला माझेही अनुमोदन. Happy
नंतरचे काही सांगता येणार नाही आत्ताच. पण माझा पाठिंबा ब्राझीलला.
ड्रोग्बा खेळायला पहिजे. त्या ग्रूपमध्ये धमाल आहे.

स्पेनच्या डेविड व्हीलाने इंग्लंडच्या संघाचं जाम कौतुक केलंय व इंग्लंडला विजेतेपदाचे मुख्य दावेदार म्हटलंय ! जाता जाता त्याने इंग्लंडला अमेरिकेपासून सावध रहायलाही बजावलंय. [ कॉन्फेडरेशन चषकाच्या स्पर्धेत २-०ने हरवून अमेरिकेने स्पेनला स्पर्धेबाहेर केलं होतं !]."क" गटात आशुचॅंपचा अंदाज [इंग्लंड व अमेरिका]खरा ठरेलसं वाटतय.

आजच लोकसत्ता मध्ये वाचलं :

कौशल्य व शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती दमसास (स्टॅमिना) व्यक्तिगत प्रतिभेसह सांघिक कामगिरीचा मिलाप असा कित्येक वैशिष्टय़ांमुळे फुटबॉलची जगभर जादू आहे. या संदर्भात कोलकोता दौऱ्यादरम्यान मॅराडोनाने सांगितलेला किस्सा बोलका आहे. १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या सात खेळाडूंना चकवून गोल करण्याची किमया त्याने साधली. स्पर्धेच्या ८० वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम गोल म्हणून त्याला गौरविण्यात आले. मात्र, मॅराडोना या गोलचे श्रेय सहकारी फॉरवर्ड व्हॅलडॅनो याला देतो! मॅराडोना सांगतो, मी प्रत्येक वेळी इंग्लंडच्या बचावपटूला सतावत असताना पास मागण्यासाठी व्हॅलडॅनो हाक मारायचा. मी त्याला पास देईन, अशा समजुतीत ब्रिटिश बचावपटू काहीसे संभ्रमित होत. त्याच एका क्षणाचा फायदा उठवून त्यांना चकवीत मी चेंडू पुढे नेत असे. गोलरक्षकही अशाच संभ्रमात पडला आणि मी चेंडू जाळ्यात फटकावला. आता मला सांगा, पास मागण्यासाठी व्हॅलडॅनो प्रत्येक वेळेस माझ्यासमवेत पळाला नसता तर मी गोल करू शकलो असतो का! मॅराडोनाच्या याच प्रश्नात फुटबॉलच्या यशाचे रहस्य आहे. Happy

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=748...

पूर्ण लेखच मस्त आहे.

पोर्तुगालला पण अगदी शेवटच्या क्षणी धक्का बसलाय.. त्यांचा भरवश्याचा खेळाडू.. नानी दुखापतीमुळे ह्या स्पर्धेत खेळू शकणार नाहीये.. त्यामुळे ख्रिस्तीयानो रोनाल्डो वरच दडपण नक्कीच वाढेल...

यंदाची स्पर्धा चांगले चांगले खेळाडू न खेळल्यामुळे लक्षात रहाणार असं दिसतय.. पण त्याच बरोबर त्यांची जागा घेतलेल्यांनी जर गाजवली तर मग अजूनच धमाल येईल..

नानी बाहेर गेलाय हे पोर्तुगाल साठी त्रासदायक आहेच.

बेकेनबोरने दावा केलाय की जर्मनी यंदा फायनलला पोहोचेल, पण कुठल्या निकषांवर ते मात्र नीट कळाले नाही. तसेच मॅरॅडोनाने यंदाचे विश्वछषक मेस्सीचे असेल असे भाकित केलय.

कालच वाचल की आफ्रिकन पोलीस, अमेरिकेचा संघ बाद फेरीतच बाद व्हावा, नाहीतर ओबामा आफ्रिकेत येईल व सुरक्षेवर ताण पडेल Happy

आणखी एक म्हणजे जर ब्राझीलने यंदाचा विश्वचषक जिंकला तर सर्व खंडात विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम करतील (एक शंका : ऑस्ट्रेलिया पण खंडच आहे ना??)

<<यंदाची स्पर्धा चांगले चांगले खेळाडू न खेळल्यामुळे लक्षात रहाणार असं दिसतय..>> आजच बेकेनबोरची मुलाखत वाचली. तो म्हणतो " दुखापतीमुळे वेगवेगळ्या संघांतून बाहेर झालेल्या खेळाडूंचाच एक जबरदस्त संघ बनू शकतो !". त्याच मुलाखतीत फुटबॉलमध्ये आलेल्या प्रचंड पैशांवरून तो म्हणतो, "फुटबॉलने आतां धनिकांची रणभुमी व्हायचं सोडून जरा पूर्वीसारखं रस्त्यावरच्या सामान्य माणसाच्या आनंदाचं स्फुर्तिस्थान होणं आवश्यक आहे". आपल्या क्रिकेटसाठीही हे किती फिट्ट बसतं !

काल-परवा कॉन्फेडरेशन्स कपच्या स्पर्धेतील न्युझीलंड वि. द.आफ्रिका सामना ईएस्पीएनवर दाखवला. त्याच स्पर्धेत, इराकविरुध्दच्या सामन्यात जाणवलेला द.आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीतील समन्वयाचा अभाव नाहीसा होवून खेळाडूना उत्तम लय व समज गवसलेली दिसली. "फिनीशींग"च्या कमतरतेमुळेच द. अफ्रिका केवळ २-० नेच [दोनही गोल पार्करचे] जिंकली .नंतर,उपांत्य फेरीतही ब्राझील विरोधात ०-१ हरतानाही त्यानी ब्राझीलला सतावलंच. असाच फॉर्म, घरच्याच हवामानाची संवय व प्रेक्षकांचा प्रचंड पाठींबा याच्या जोरावर मेक्सिको ऐवजी द.आफ्रिकाच फ्रान्सबरोबर "अ"गटातून वरच्या फेरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाऊ, यावेळी पण एखादा अफ्रिकन संघ काही चमत्कार करतोय का हे पाहणे मजेदार ठरेल. कॉन्फेडरेशन्स कपच्या स्पर्धेतील अमेरिकेची कामगिरी पण जबरदस्त आहे.

>>"फुटबॉलने आतां धनिकांची रणभुमी व्हायचं सोडून जरा पूर्वीसारखं रस्त्यावरच्या सामान्य माणसाच्या आनंदाचं स्फुर्तिस्थान होणं आवश्यक आहे". आपल्या क्रिकेटसाठीही हे किती फिट्ट बसतं !<< Happy

विक्रम३११,
सुंदर लिंक. धन्यवाद.
आत्ताच एनडीटीव्हीच्या बातम्यात कोलकत्याचं चटर्जी दांपत्य दाखवलं. दोघांचाही फुटबॉल हा ध्यासच नाही तर श्वासही असावा. दोन खोल्यातला पेन्शनवर चालणारा त्यांचा संसार फुटबॉलच्या फोटोनीच सजवला आहे. चटर्जी महाशयांच वय आहे ७८ वर्षं व सहचारिणीचही त्याच्या आसपास. तुटपुंज्या पेन्शनमध्येही खाण्यापिण्यातही खर्चाची काटकसर करून हे दांपत्य पैसे साठवतं.उद्देश एकच - चार वर्षातून एकदा फुटबॉलच्या विश्वचषकाचं थ्रिल प्रत्यक्ष अनुभवणे ! १९८२ पासूनच्या आठही विश्चषकाच्या स्पर्धा या दांपत्याने प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जावून पाहिल्या आहेत, यावर्षी द.आफ्रिकेत जाण्याची जय्यत तयारी झाली आहे व २०१४च्या विश्वचषकासाठी नियोजन सुरू आहे !
Truly, "Magnificent Obsession" ! सलाम, सौ.व श्री. चटर्जीबाबू !! द.आफ्रिकेच्या भेटीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

विक्रम, लिंक सही आहे.

'जाबुलानी' या चेंडूमुळे गोलरक्षकांना प्रचंड मेहेनत करावी लागणार आहे व या स्पर्धेत विचित्र प्रकारचे गोल्स बघायला मिळतील असे भाकीत फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लॉरीस याने वर्तविले आहे. या जाबुलानी चेंडूवर भरपूर खेळाडू व प्रशिक्षकांनी टिका केलीय.

यंदा नेल्सन मंडेला यांची उपस्थिती हे एक प्रमुख आकर्षण व चर्चेचा विषय ठरतोय.

>>Truly, "Magnificent Obsession" ! सलाम, सौ.व श्री. चटर्जीबाबू !! द.आफ्रिकेच्या भेटीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.<< अगदी, सौ.व श्री. चटर्जीबाबूंना मनःपूर्वक शुभेच्छा Happy

चला उद्यापासून महिनाभर मज्जा, त्यात २१ जून पासून विम्बलडन पण सुरू होतय.

रंगासेठ.. द.आफ्रिका आणि उरुग्वेला अगदीच कमी लेखू नका... वर्ल्डकप आहे.. काहीही घडू शकत....

बरोबर आहे रे, मी माझी पसंती सांगितलीय Happy , आज कुठला का संघ जिंकेना आपण तर फूटबॉलचाच आनंद घेणार आहोत.

आणि दंगा चालू झालेला आहे.....

पहिला हाफ तरी तसा शांतच झाला.. मेक्सिकोनी दोन - तीन चाली चांगल्या केल्या पण यश काही मिळाले नाही.. आणि शेवटी शेवटी द.आफ्रिका पण जोरात खेळली...अर्थात यश मिळालेले नाहीच

दुसरा हाफ मध्ये बघुया काही घडतय का???

यजमान १-० अशा आघाडीवर
जोरदार...हाच निकाल कायम राहिला पाहिजे

एक नंबर गोल होता तो... दुसर्‍या हाफ मध्ये सुरुवातीलाच त्यांना एक - दोन चान्सेस मिळाले होतेच.. पण ५५व्या मिनिटाला योग्य चान्स मिळाला आणि जबरदस्त गोल झाला...

Pages