पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेधा, लसूण पात, कोरडे खोबरे, लाल तिखट मीठ मिक्सरमधुन काढ. मस्त चटणी होते.
लाल ढबू, टोमॅटो+ पात एकत्र भाजून मस्त चटणी होते - ती इथे मिळेल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/08/tomato-bell-pepper-and-garl...

लसूण पात भरपूर घालून भाजणीची थालिपीठे कर. मस्तच होतात.

लसूण पात दह्यात घालून मीठ, मिरची/लाल तिखट, हवी असल्यास फोडणी घालून मस्त चटकाही होतो तयार!
त्यात कच्चा कांदाही झक्कास लागतो.

बेळगावचा कुंदा अर्धा किलो आहे. त्याचे काय करता येइल ?

हाये.... Sad माझा एवढ्यात खाऊन संपला असता..

मग शांतपणे स्वतःला शिव्या देत बसले असते किती क्यालरी ढकलल्या पोटात म्हणुन.... Happy

साधना Proud

लसणीच्या पातीचे पिठले (कांद्याच्या पातीचे करतो तसेच) पण खूप छान लागते. जरा वहाते करायचे. भाताबरोबर खूप मस्त लागते. पात असल्याने वेगळा लसूण घालायची गरज नाही पण लसणाची चव आवडत असल्यास फोडणीत ४-५ पाकळ्या मस्त लाल तळून घ्यायच्या आणि मग पीठ ओतायचे.

पातीची चटणी तोंपासु बाफवर दिली आहे Happy

ईथे मागे आंबा केक रेसीपी पाहीलेली आठवते आहे. आज सर्च केल तर मिळत नाही. आंबा केक, मँगो केक,आंब्याचा केक या तिन्ही नावानी सर्च केल आहे. ती रेसीपी कशी शोधायची? यावेळेस मला लिंक नको प्लीज सर्च कसे करायचे ते लिहा.

त्याच्या शब्दखूणां मधे केक हा शब्द नाहिये म्हणुन मिळत नाहीये बहुतेक. पण मी आत्ताच तांदळाच्या भाकरी मधे 'तांदळाची भाकरी' ही शब्दखुण टाकली तरी सर्च केल्यावर मिळत नाहिये. Sad

मंजुडी, धन्स ग ! मला बर्याच वेळेस रेसीपी मिळत नाहीत सर्च केल्या तरीही Sad म्हणुन या वेळेस म्ह्टल की मला लिंक नको.. मला सर्च कसं करता आहे ते सांगा!!! पण तुलाही मिळत नाही म्ह्णजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असेल!

स्लो कूकर साठी देशी किंवा देशी इंस्पायर्ड रेसिपीज ( ट्राईड अ‍ॅंड टेस्टेड ) आहेत का कोणाकडे

मेधा, माझी एक मैत्रिण बासुंदी करते. सकाळी दूध त्यात घालून चालू करुन ठेवते तो कुकर. साधारण १२-१५ तासात बासुंदी होते असे तिचे म्हणणे आहे. नक्की प्रमाण वगैरे हवे असेल तर सांग तिच्याकडून मागवते.

मला अजुन कुणितरी साग आणि छोले पण छान होतात असे सांगितले होते. पण मी खाल्ले नाहीये.

इथे वैशालीने लिहिलेली एक रेसिपी आहे बघ - http://earthvegan.blogspot.com/2010/03/ushas-slow-cooker-dal-makhani.html

मेधा, माझी पंजु मैत्रीण स्लो कूकरमध्ये छोले करते. रात्री कांदे, टमाटे, चणे घालून कूकर लावून टाकते, सकाळी छोले तयार!

ऑल परपज फ्लोर, मैदा आणि सेल्फ रायसिंग फ्लोर यात फरक काय आहे.
मला चॉकलेट चिप्स कुकिज करायच्या आहेत. घरात सेल्फ रयसिंग फ्लोर आणि मैदा आहे.
पण सर्व रेसिपीत ऑल पर्पस फ्लोर वापरायला सांगितलय.त्याऐवजी सेल्फ रायसिंग किंवा
मैदा वापरुन कुकिज केल्या तर हालेल का?

ऑल पर्पज फ्लोअर च्या ऐवजी साधा मैदा चालेल. त्या कृतित बेकिंङ पावडर वापरायला सांगितले असेलच.
सेल्फ रेझिंग फ्लोअर मधे ती आधीच मिसळलेली असतो.
सेल्फ रेझिंग फ्लोअर वापरुन, भटुरे चांगले होतात !

कुणाला कैरीचे गुजराथी पद्धतीचे गूळ व बडिशेप घातलेले लोणचे येते का? कृपया पूर्ण रेसिपी द्याल का?
कैर्‍या फोडून आणून हळद मीठ लावून तयार आहेत.
दिनेशदा ?

थंड आणि मानुषी, आता घरि गेल्यावर म्हणजे आणखी ४ तासानी लिहितो. !! हैद्राबादी बिर्यानी असणार इथे.

वरती कुणीतरी कुंद्याचा प्रश्न लिहलाय तसलाच माझा एक प्रश्न आहे.
मावा पेढे उरले आहेत(पांढरे) ते घालुन वड्या,लाडु अस टिकणार काहि बनेल का?रेसिपि किंवा लिंक द्या!सध्या आंबा रस प्रेमाने त्याला नो डिमांड!

त्याच्या पोळ्या करता येतील. शिरा, कुठलीही ग्रेव्हीवाली भाजी, यात घालता येतात. आंब्याच्या रसातहि घालून खाता येतील.
रव्याच्या लाडवात घालता येतील, पण ते फार टिकणार नाहीत.

रव्याच्या लाडवात घालता येतील, पण ते फार टिकणार नाहीत.
>> ओला नारळ + रवा का? फ्रिज मधे टिकतिल का? कधि घालायचे मग, रेसिपी विपुत दिलि तरी चालेल, आभार.

प्राजक्ता साटोर्‍या करता येतील पेढ्याचं सारण भरून. बासुंदीलाही पेढा लावतात दाटपणा आणी गोडव्या साठी.

सगळे ऑप्शन्स एक्दम यम्मी यम्मी आहेत! पण, तेच की आधिच पेढे म्हणजे गोड त्यात बांसुंदी,हलवा,शिरा म्हणजे तुप अ‍ॅड आणी लवकर संपवणे आले, तेव्हा टिकणारा (फ्रिजमधे का होईना) पदार्थ रोज थोडा खाता येतो आणी कमि गिल्टि वाटते म्हणून तो ऑप्शन विचारत होते
बघते, साटोर्‍या किंवा लाडु करेल,धन्यवाद सगळ्यांना!

Pages