पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नि बुलेट सारखी मोटर सायकल??>>>
झक्की बुलेट लाखभर रुपयात नवीन येइल.

जमीन घेवुन घर बांधणे हे प्रचंड चिकाटीच काम आहे.
सध्या जमीन मिळणे खुप मुश्किल आहे.
आमच्या ग्रुपने ३ महिने जोरदार प्रयत्न केले होते. कुठे रेट कैच्या काय (१५ लाख १००० स्क्वेअर फुटास)
तर कुठे जमीनीची कागदपत्रांची लफडी, कुठे जमीन एनए नाही ती करुन घ्यायच तुम्ही बघा असा डाव.
कंस्ट्रक्शन कॉस्ट स्टॅन्डर्ड साधारण ९०० रु प्रती स्क्वेअर फुट्च्या आसपास येइल.
शिवाय बिल्डर लॉबीला तोंड द्यायची शक्ती पाहिजे.
आम्ही पिम्परी चिन्चवड येरीयात बघत होतो.

अजुनही अशा ग्रुपमध्ये सहभागी होण्यास मी तयार आहे. Happy

नानबा: मला काय कुठेही चालेल की. तुम्हा सर्वांची सोबत असली तर काय हवे. त्यात मी अतिशय कॉआपरेटिव आहे. तुम्ही तिथे राहायला आलात कि किल्ली वगैरे संभाळेन, निरोप, दुधाची पिशवी वगेइरे ठेऊन घेइन. गुड नेबर ओवर ऑल. फार महाग नका बघू.

ITWAP म्हणून याहू ग्रूप आहे... संगणकक्षेत्रातील लोकांनी चालू केलेला...
त्यांनी स्वतःचा एक प्रोजेक्ट चालू केलेला सुस मध्ये 'आरोही' म्हणून... जागा घेणे आणि बिल्डर शोधून बांधून घेणे... तो बर्‍यापेकी प्रगतीपथावर आहे...
काही अडचणी त्यांना आल्या आणि अजूनही येत आहेत पण बर्‍यापेकी यशस्वी झालाय प्रयोग... ते अजून एक प्रोजेक्ट चालू करयाचा विचार करत आहेत..

असे करण्यात कष्ट आहेत पण पैसे नक्कीच वाचतात... रेट मार्केट पेक्षा ७५% पडतो आणि त्यातही अभूतपूर्व अश्या सोयी असे त्यावेळेला होते...

त्या ग्रूप वर अजूनही लोक एक्मेकांना ग्रूप बुकिंगसाठी संपर्क करतात तिथे तुम्हाला जास्ती लोक मिळतील ग्रूप बुकिंगसाठी...

सिंहगड रोडवर जमीन हवी असल्यास मला सांगा. अपुनके पासभी थोडाबहुत माल है बेचनेके लिये.

Location Area UOM Rate Amt Status
Anand Nagar 3,000 Sq. Ft. 3,333.33 10,000,000.00 Collector NA
Sinhgad Road (Suncity) 3,200 Sq. Ft. 2,031.25 6,500,000.00 Collector NA
Sinhgad Road (Nityanand Hall) 3,000 Sq. Ft. 2,500.00 7,500,000.00 Collector NA
Kothrud (Mahesh College) 3,000 Sq. Ft. 4,000.00 12,000,000.00 Collector NA
Wadgaon BK (Sinhgad College) 3 Gunthe 450,000.00 1,350,000.00 Hill Top ( No NA)
Wadgaon BK (Sinhgad College) 3 Gunthe 1,500,000.00 4,500,000.00 R-Zone (Gunthewari)

सेफ मोड ऑन
वरिल सगळ्या जागा माझ्या ओळखीच्या वेगवेगळया इस्टेट एंजटांकडे आहेत. मी तुमची व त्यांची गाठ घालुन व्यवहारातुन बाहेर पडणार.
कुठल्याही व्यवहारात माझा प्रत्यक्ष सहभाग राहणार नाही. सगळ्या गोष्टीची निट चौकशी करुनच व्यवहार करावे. कुठलही फसवणुक झाल्यास मला जबाबदार धरु नये.
सेफ मोड ऑफ.

मलाही बाणेर ते वारजे या पट्ट्यात एक फ्लॅट घ्यायचा आहे. एकत्र घेण्याच्या दृष्टीने मध्ये मी काही प्लॉट सुद्धा बघितले होते, आर्किटेक्ट, बांधकाम कंत्राटदारांशी बोललो होतो. पण तो एक खूपच मोठा उद्योग होऊन बसेल आणि तेवढा वेळ नाही. पण एकत्र बिल्डरशी बोलण्याची कल्पना चांगली आहे.

सध्या पुन्हा संगनमत करून मनमानी पद्धतीने भाव वाढवणे चालू आहे बिल्डर लॉबीचे, आणि अनेक जण पुढे वाढतील असे म्हणत वाटेल त्या किमतीला घर घेत आहेत. मात्र नोव्हेंबरमध्ये पुन्हा सगळे मार्केट खाली येईल असा अंदाज आहे.

जाता जाता...

वीकएंड लिविंगसाठी पुण्यापासून एक दीड तासाच्या अंतरावर असेल अशी भरपूर झाडे लावलेली आणि लावता येतील, छोटेसे टुमदार शेतघर बांधता येईल अशी जमीन घेण्यात रस आहे का कुणाला ? असल्यास मला विपु /मेल टाका, मी एक प्रोजेक्ट करतो आहे त्यासाठी एक वेगळा धागा उघडेन मी लवकरच...( इथे विषयांतर नको )

बालेवाडी भागाचा कोणी विचार करतय का (स्टेडीयम च्या जवळ) ? (का तो बाणेर मधेच धरतात?) त्या भागात रेट जरा कमी आहेत (२५००-२८००). पण हिंजवडीला जवळ असल्याने स्ट्रॅटेजीकली चांगला भाग आहे.

शनिवारी टाइम्स ची खास पुरवणी असते. त्यात बर्‍याच जागांच्या (एन ए) जाहिराती असतात. त्यात प्लॉट्स उपलब्ध असल्याचे नेहमी वाचतो. तिथे एकत्र जागा घेउन मग एखाद्या बिल्डरला कॉन्ट्रॅक्ट देणे असे करु शकतो का? झकासरावानी दिलेल्या माहितीनुसार ९०० + (जागीची किंमत ६००) धरली तरी १५००/स्क्वे फुट पडेल का?
मध्यंतरी पिरंगुट इथे आदित्य निसर्ग इथे प्लॉट्स उपलब्ध होते.

मला वाटते या बाफची कल्पना खुप उत्तम आहे. पण पुण्यातील कोणा जाणकाराने नेतृत्व घेउन प्रयत्न केल्यास ती आकाराला यायला बराच वाव आहे. (खासकरुन ज्याच्याकडे अशा नेतृत्वाचा अनुभव आहे अशा).
या नेतृत्वाला वेळ्/प्रयत्नासाठी आर्थिक मोबदला देण्यावरही विचार करता येउ शकेल. ही समाजसेवा नाही :))

मला वाटते या बाफची कल्पना खुप उत्तम आहे. पण पुण्यातील कोणा जाणकाराने नेतृत्व घेउन प्रयत्न केल्यास ती आकाराला यायला बराच वाव आहे. (खासकरुन ज्याच्याकडे अशा नेतृत्वाचा अनुभव आहे अशा).
या नेतृत्वाला वेळ्/प्रयत्नासाठी आर्थिक मोबदला देण्यावरही विचार करता येउ शकेल. ही समाजसेवा नाही
>> mansmi18 -अगदी छान विचार मांडलात..

मध्यंतरी पिरंगुट इथे आदित्य निसर्ग इथे प्लॉट्स उपलब्ध होते.
>> नवरा हे बघून आला - ते सांगतात की ७-८ किमी वर हिंजेवाडी आहे.. पण प्रत्यक्षात १७-१८ किमी

बालेवाडीचा विचार चांगला वाटतो.

मी सध्या पुण्यात नाही - साधारण १५ दिवसात जाईन असे वाटते. तिथे गेल्यावर सगळे 'गावाबाहेरचे' (वारजे/बावधन/बाणेर/बालेवाडी/सुस) हे भाग पिंजून काढायचा विचार आहे - सध्या नेटवरतीच शोधमोहिम सुरु केली आहे..
जसजशी माहिती मिळेल तशी कळवत राहिन.. पण मानस्मि१८ म्हणाले, तसं कुणी जाणकार असेल तर जास्त बरं पडेल.

काही उपयुक्त साईट्स:

चांगला आणी अ‍ॅक्टिव फोरमः http://www.indianrealestateforum.com/f-pune-25.html/

रवी करंदीकरांचा ब्लॉगः http://ravikarandeekarsblog.blogspot.com/

पुण्यातील वेगवेगळ्या भागांची माहिती आणी तेथिल स्किम्सची यादी: http://www.punerealestate.com/

या नेतृत्वाला वेळ्/प्रयत्नासाठी आर्थिक मोबदला देण्यावरही विचार करता येउ शकेल. ही समाजसेवा नाही<<
अगदी अगदी!

नानबा,

हो त्यांचीच. त्यांचे प्लॅनिंग चांगले असते.

आम्ही जुनम्धे पुण्यात कायमचे परत जात आहोत. (मी चार वर्षानी चाललोय). मीही तिथे गेल्यावर सर्वे करणार आहे तुम्ही उल्लेख केलेल्या भागांचा. काही माहिती मिळाली तर लिहीन. ऐकीव माहितीपेक्षा त्या भागांमधे फिरुन ते भाग (जो दर आहे त्याला लायक आहेत का हे) पाहिले पाहिजे.

केदार धन्यवाद ! मी जूनमध्ये देशात येत आहे ३ विक्स साठी. तेवा काही बघता आले तर फारच छान. आणि नानबाने सुचवल्याप्रमाणे मोबदला द्यायाला काहीच प्रोब्लेम नाही.

मला एक विचारायचे आहे... कोणी जाणकार असल्यास प्लीज मदत करा..

रीसेल फ्लैटच्या सोसायटी ट्रान्फर ची काय प्रोसीजर असते...
शेअर सर्टीफिकीट आपल्या नावावर कसे करायचे...

पण पुण्यातील कोणा जाणकाराने नेतृत्व घेउन प्रयत्न केल्यास ती आकाराला यायला बराच वाव आहे. (खासकरुन ज्याच्याकडे अशा नेतृत्वाचा अनुभव आहे अशा).
या नेतृत्वाला वेळ्/प्रयत्नासाठी आर्थिक मोबदला देण्यावरही विचार करता येउ शकेल. ही समाजसेवा नाही >>> अरे ITWAP वाल्या लोकांनी हे आधीच केले आहे... तिथे ज्यांनी काम केले त्यांना आता बर्‍यापेकी अनुभव आला आहे... नव्याने तेच करण्यापेक्षा त्यांचा अनुभव उपयोगात आणता येऊ शकेल असे मला अजूनही वाटते... म्हणूनच त्याविषयी मी वर लिहिले होते...

http://groups.yahoo.com/group/ITPWAP/
ITPWAP-subscribe@yahoogroups.com

रवी करंदीकरच्या ब्लॉग वरचे 'आरोही' विषयीचे पोस्ट
http://ravikarandeekar.blogspot.com/2009/10/aarohi-at-sus-tirth-develope...

अर्थात तरीसुद्धा तुम्हाला नविन तसाच ग्रूप स्थापन करायचा असेल तर मग चालू द्या Happy

मंगेश,

सोसायटी ट्रान्सफर साठी प्रत्येक सोसायटीच ठरवलेले नियम असतात... पहिलेच ट्रान्सफर असेल तर त्याची रक्कम ठराविक असते आणि त्यापुढच्या प्रत्येक ट्रान्सफरसाठी वेगळी रक्कम असते.. साधारण पणे ही रक्कम दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त असते.. अर्थात हे प्रत्येक सोसायटीवर अवलंबून आहे..

ट्रान्सफर फीचे पैसे भरल्यावर सोसायटी स्वत:हूनच शेअर सर्टीफिकेट देणे अपेक्षित आहे.. तसेच ट्रान्सफर साठी भरलेल्या पैश्यांची रितसर पावती ही देणे आवश्यक आहे..

ट्रान्सफर फीचे पैसे फ्लॅट विकणारा व फ्लॅट घेणार्‍या ह्यांच्यातील संगनमताने कोणी भरायचे हे ठरवले जाते.. बहुतेक वेळेस हे पैसे फ्लॅट घेणाराच भरतो..

पुन्हा एकदा हेच सांगणे आहे: १ ते १०:
http://www.maayboli.com/node/2118

latest addition: वारजे, पाषाण, वगैरे ईथे नविन कॉम्प्लेक्स वगैरे असतील तर पाणी पुरवठ्याची योजना तपासून घ्या.. बिल्डर २४ तास पाणी सांगेल प्रत्त्यक्षात २४ थेंब असू शकतात.. Happy
सर्वांन्ना शुभेच्छा!

मी ही एका खोलीची जागा बघते आहे,सोसायटीत अथवा काँप्लेक्स मधे , साधारण १२ बाय १२ , फक्त लहान मुलांसाठी लायब्ररी सुरु करण्यासाठी हवी आहे मला. कोथरुड, पौडरोड, डहाणूकर, अथवा पेठेत ( हा प्रश्न विषयाला धरून आहे न ? ) जागा विकत / भाड्याने पण चालेल, कोणाच्या ओळखित असल्यास कृपया सांगावे

वर कोणीतरी insignia groupचा उल्लेख केलाय त्याबद्दल थोडी अधिक माहीती:

त्यांनी बालेवाडी-सुस भागात एक प्रोजेक्ट launch केलाय.. विलास जावडेकर असो. सोबत. २,३ bhk फ्लॅट्स आणी रोहाउसेस.. २४०० रेट लावताहेत ते लोक (पण आजुबाजुच्या बाकी स्कीम्स पेक्शा ४००-५०० रु नी कमी) पण सुरवातीला २०% डाऊनपेमेंट करावे लागेल.

अधिक माहीतीसाठी ग्रुप जॉईन करु शकता. insignia_pune@yahoogroups.com

हम्म्म्म, आम्ही पण पुण्यात घर घ्यायच्या विचारात आहोत. डिसें०९ मध्ये थोडाफार सर्व्हेपण केला. पण पुण्यात किमती अशक्य वाढल्यात. केलेल्या सर्व्हेनुसार आमच्या बजेटमध्ये हवं तसं घर पिं.सौदागर वगैरे भागात मिळू शकेल आम्हांला. पण त्या एरियाबद्दल काहीच माहिती नसल्याने जरा विचारात आहोत.
या बाफच्या माध्यमातून आम्ही काही मदत करू शकलो किंवा आम्हांला काही मदत झाली तर बरेच होईल.
आम्ही सिंहगड रोड, वारजे, कोथरूड (हे आऊट ऑफ बजेट आहे खरं तर :)), बावधन, पिं. सौदागर, अगदी हडपसर सुद्धा बघत आहोत. जर असा ग्रूप जमवून काही करायचे असेल तरी तयार आहोत.

योगनी म्हटल्याप्रमाणे, पाणी-लाईट सारख्या मुलभूत सोयींची चौकशी करणे गरजेचे वाटते. त्याचप्रमाणे, बिल्डर किती भरवशाचा आहे याचीही चौकशी आवश्यक वाटते. आम्ही पुण्यात राहत नसल्याने एखाद्या एरियाबद्दलही विशेष माहिती नसते. तेव्हा एखाद्या जाणकार व्यक्तीची मदत झाली तर उत्तमच. Happy

धन्स नानबा. Happy

नांदेड सिटी बघितले आम्ही. पण मला कंस्ट्र्क्शन क्वालिटी नाही आवडली विशेष. शिवाय प्लानही जरा विचित्र वाटला.

विचित्र म्हणजे? आम्ही नान्देड सिटीचा विचार करतोय म्हणून विचारलं.
नां. सि. म्हनजे मगरपट्टावाले आहेत आणि म.प.चे रेपोर्ट चांगले आहेत.

tonaga, मला नाही आवडला प्लॅन. कदाचित तुम्हांला आवडेलही. डिटेल्स इथे देत नाही. कारण, बाफचा विषय तो नाही. मी मेल करेन.

Pages