पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

http://www.manogat.com/node/10467

शुभा मोडक या नावांने इथे ३ वर्षापुर्वी तुम्ही लिहीलेल्या आहेत का त्या चारोळ्या ? असतील तर क्षमस्व !

च्या मारी..........
उलट माझ्याच चारोळ्या कुणीतरी चोरुन स्वतःच्या blogspot वर टाकल्या आहेत.........
ही बघा link
http://anandkshan.blogspot.com/2007_06_10_archive.html

कोण हा उपटसुंभ आनंदक्षण ????
माझ्या या चारोळ्या माझ्या स्वतःच्या नावाने मी मनोगत.कॉम वर टाकल्यात्...शिवाय कधी एके काळी माझ्या नावाचा blogspot बनवला होता. त्यावरही टाकल्यात मी. हे बघा :
http://smodak.blogspot.com/

या आनंदक्षण नावाच्या व्यक्तीच्या blogspot वर जाऊन निषेध कसा व्यक्त करावा कुणी सांगेल का? निदान कवी/कवयित्रीचे नाव तरी mention करायचे ना Angry

हो ती लिंकही पाहीली होती मी. आधीही काही ठीकाणी वाचल्यासारख्या वाटल्या मला तुमच्या चारोळ्या! म्हणून गुगलून पाहील्यावर मनोगतवरचा धागा सापडला. खरं तर आधी मी विचारायला हवं होतं की 'शुभा मोडक तुम्हीच का ?'

आपली स्वत:ची मालकीची हक्काची वस्तु "चोरलेली" आहे असा आरोप झाल्यामुळे पित्त खवळलं हो माझं.... म्हणून अगदी रागीट प्रतिक्रिया दिली. त्याबद्दल sorry हां प्रकाश भाऊ.....
<<<चलो मंडळी, गैरसमज दुर झालेत.. आता पुढच्या चारोळ्या लवकर येवू देत निंबुडा. >>
माझी कवितांची वहीच हरवली आहे रे........ म्हणून पूर्वीच्या पोस्टलेल्या चारोळ्या इथे नव्याने पोस्टल्या ..... माहेरी गेले की शोधून पाहीन वही सापडते का ते....... Uhoh

माझी कवितांची वहीच हरवली आहे रे......>>>>

आधी काही लिहीलच नव्हतं असं म्हणायचं आणि नव्याने लिहायला सुरुवात करायची....

कविताची वही हरवली
तरी वृत्ती हरवत नसते...
हाती लेखणी घेतली की..
कविता आपोआप स्फुरते !

सो पुलेशु Happy

विशाल, तु दिलेल्या motivation मुळे हे काल सुचलं.........

मन हे असं
खुळ्यागत वागतं
भावना पोचल्या तरी
शब्दांची साथ मागतं

जिवावर उदार होऊन
वार्‍यावर स्वार होऊन
दिपवणार्‍या एका क्षणासाठी
आकांत लाटेवरच्या थेंबाचा

त्याचेच नाते सांगताना
माझी मात्र घोषणा
" आयजीच्या घामावर
चमकण्याची ... ! "

बिचार्‍या शब्दांना का कोसावं,
ते तर फक्त भावना व्यक्त करतात,
सुखात स्मिताचे कारंजे होऊन,
दु:खात मात्र गालावरून ओघळतात...

निंबूडे, मंद ती इतकी पाऊसवेडी आहे कि निर्वस्त्र होऊन भिजणार आहे तेव्हा ती पावसाला सांगते आहे की.. तु येशील तेव्हा बिन्धास्त होऊन बरस अन माझी लाज राख.

कळलं का..

जमणार नाही मला,
पाऊस होऊन येणं,
मला तर आवडेल फक्त,
तुझ्यासोबत चिंब ओलं होणं...

सुकी,

देह झाकला नाही मी,
फक्त तू येशील म्हणून,
शुभ्र थेंबांच्या गर्दित
जाशील ना माझी लाज राखून...

या चारोळीचा मला क्लिक झालेला अर्थ सांगू??? हसू नकोस हं का!!

प्रियकर मेला आहे आणि त्याचा आत्मा त्याच्या प्रियेला उद्देशून हे म्हणतो आहे की
देह झाकला नाही मी,
फक्त तू येशील म्हणून,
>>
शव न झाकता तसेच ठेवले आहे त्याची शेवटची इच्छा म्हणून!!

शुभ्र थेंबांच्या गर्दित >> शवाच्या शेजारी जे लोक जमले आहेत ते अश्रु ढाळत आहेत (पण माझी लाज झाकायला ते समर्थ नाहीत.)

जाशील ना माझी लाज राखून >> तू आलीस तरच अर्थ आहे.....

कै च्या कै नै??? Wink

म्हणूनच म्हटलं तुलाच विचारावं.

निंबूडे तू महान आहेस. मी असला विचार केलाच नाही.इतका गहन विचार करशील वाटलंच नव्ह्तं.

सुरवंटाला गरूड केलसं की तू...

तू नेमका तेव्हाच आलासं,
जेव्हा तो मला सोडून गेला,
बघ ना जाता जाता सुद्धा,
या चिंबवेडीला चारीत्र्याचा दोष दिला..

Pages