Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13
आजपासून तिसर्या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
यंदा सर्वाना (USA वगळ्ता
) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही 
इथे पहा http://www.youtube.com/ipl
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राश तुम्हाला इलेक्ट्रॉनिक
प्राश तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मिडिया मधे खूप वाव मिळेल. इन्व्हेस्टिगेटिव्ह कम इमॅजिनेटिव्ह जर्नलिज्म छान जमेल.
गुरुजींनी काढलेल्या निष्कर्शाशी पूर्ण सहमत.
पण मुंबई सामना हरले जेव्हा हेडन बाद झाला...तो जसा खेळत होता ते पाहून त्याला २० षटके खेळू दिले असते तर चेन्नईच्या धावाच झाल्या नसत्या आणि बाकीचे फलंदाज चरफडत बाद झाले असते. हे कवित्व आता पुरे, नाही का?
श्रीयुत भरत मयेकर - मी फक्त
श्रीयुत भरत मयेकर - मी फक्त माझे मत मांडले होते. मला जे जाणवले ते लिहिले. इथे मनातील मत मानन्यास मनाई आहे का?
न मलाही गुरुजीं चे मुद्दे पटत आहेत. पण ज्या सचिन ने पूर्ण स्फर्धा seriously घेतली. ज्याने कोणत्याही मैच मधे प्रयोग केले नाहीत तो अंतिम सामन्यताच असे का करेल? न मला वाटते की जे आपल्याला समजते की पोलार्ड ला आधी पाठवायला हवे होते किंवा बाकीचा क्रम तो सचिन ला समजत नसावा का ? अरे ज्याचे आयुष्यच क्रिकेट आहे त्याला एवढे समजले नसेल का? आणि तेथे टीम चे बाकीचे players न कोच ही होतेच की. माला फक्त एवढेच म्हणायचे होते की सचिन चा चेहरा च बरेच सांगुन जात होता. मला सचिन ला काहीही म्हणायचे नाहीये . तेवढा मला अधिकार ही नाहीये. न मी आयुष्यात त्याला कधीच बोलू शकणार नाही. शेवटी त्याच्यावर ही बाहेरून दबाव आला असेल तर ?
बाकि बुकीचा सट्टाचा पेपर मधील आकडा १५०० Cr होता. अनाधिकृत किती असेल कोणास ठावुक??? याचाही विचार व्हावा
>>> मला सचिन ला काहीही
>>> मला सचिन ला काहीही म्हणायचे नाहीये . तेवढा मला अधिकार ही नाहीये. न मी आयुष्यात त्याला कधीच बोलू शकणार नाही. शेवटी त्याच्यावर ही बाहेरून दबाव आला असेल तर ?
हा सामना फिक्स केला असावा अशी पुसटशी शंका सुद्धा वाटत नाही. सचिनने क्रिकेटला भक्तीभावाने वाहून घेतलेले आहे. तो स्वप्नात सुद्धा असे करणे शक्य नाही. सामना ठरवून हरायचा असता तर तो हाताला टाके पडल्याचे सबळ कारण सांगून अंतिम सामन्यात खेळलाच नसता.
मुम्बईचे खराब क्षेत्ररक्षण व सचिनचे फलंदाजीतील क्रमाचे अनाकलनीय प्रयोग यामुळे मुम्बईवाले हरले. विशेषत: नायरला ३ र्या क्रमांकावर रायडुच्या ऐवजी पाठविणे ही घोडचूक होती. नायरची समजूत असावी की मी एक बाजू लावून धरतो व दुसर्या बाजूने सचिन मारामारी करेल. तर सचिन बरोबर उलटे समजत असावा. त्यामुळे दोघेही फलंदाजी करताना चेंडू जवळ पुश करून एक धाव घेऊन दुसर्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्या ८ षटकात फक्त ४० धावा फलकावर लागल्या होत्या. दोघांनीही महत्वाची षटके वाया घालविली. ते दोघेही षटकामागून षटके वाया घालवित असताना रायडू, तिवारी आणि पोलार्ड सारखे फटकेबाज आपल्या संधीची वाट पहात हात चोळत बसले होते.
साधारण अशीच परिस्थिती सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या २०-२० च्या दुसर्या विश्वचषकाच्यावेळी आली होती. कुठल्या तरी संघाविरूद्ध १५० च्या आसपास टार्गेट्चा पाठलाग करताना धोनीने ३ र्या क्रमांकावर रविंद्र जडेजाला पाठविले होते. त्याने संथ खेळत ३५ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. परिणामी भारताला सामना घालवावा लागला होता.
अंतिम सामन्यात प्रयोग करण्याची रिस्क घ्यायची नसते. सचिनला प्रयोग करायचे होते तर त्याने मुम्बईने ११ वा सामना जिंकल्यावर व मुम्बईचे उपांत्य फेरीत स्थान नक्की झाल्यावर उर्वरीत ३ सामन्यात प्रयोग करायचे होते.
कोणतीही अनाकलनीय गोष्ट
कोणतीही अनाकलनीय गोष्ट संशयास्पद वाटु शकते!
"सामना ठरवून हरायचा असता तर
"सामना ठरवून हरायचा असता तर तो हाताला टाके पडल्याचे सबळ कारण सांगून अंतिम सामन्यात खेळलाच नसता. "..अगदी अगदी....
सचिन खेळून आणि विशेषतः कर्णधार या नात्याने सर्व निर्णयांना जबाबदार असताना
मुंबईने सामना फिक्स केला होता आणि त्याला सचिनचा नाइलाज होता...असे म्हणणे ह अंतर्विरोध आहे.
मुंबई हरल्याचे दु:ख आहेच, पण या संशयाचे अधिकच आहे.
सेमीफायनल पासून इथे मॅच
सेमीफायनल पासून इथे मॅच फिक्स, मॅच फिक्स असेच म्हणनार्या लोकांची मला कमाल वाटते. काहीही मनाविरुद्ध झाले ते फिक्सच असते का?
सचिनच्या चुका.
१. एकच स्पिनर खेळवला. माझ्यासारखा अज्ञ माणूस पण काल इथे लिहीतो की आता दुमनीला ओव्हर द्या, सचिन व टीमला कसे सुचले नाही ते माहित नाही. धोणीने चार स्पिनर खेळवले.
२. बॅटिंग मध्ये नायर नंतर भज्जी आला, त्यावेळी तिवारीने येणे आवश्यक होते.
३. दुमनी ऐवजी पोलार्ड येणे आवश्यक होते.
पोलार्ड सारखा माणूस प्रेशर खालीच व्यवस्थित खेळू शकतो, हिटर आहे म्हणून ओपनींगला पाठवून फायदा नसतो, हे न कळन्या इतका सच्या मूर्ख नाही.
४. सचिनचे शॉट सिलेक्शन इतके बधिर मी कधिही पाहिले नाही. एक रन घेण्यासाठी मारलेला बॉल पण डायरेक्ट फिल्डर कडेच जायचा. ह्यावरुन तो किती माणसिक तणावाखाली असेल हे लगेच कळते. त्याचा शेवटचा शॉट तर बकवास होता. त्याला तो सिक्स पर्यंत जाईल असे वाटत नव्हते. नव्हे तो सिक्स शॉटच नव्हता, त्याला फक्त लाँग ऑफच्या बर्याच अलिकडे तो बॉल खाली पाडायचा होता, पण त्याने पुढे येऊन मोशन मध्ये मारलेला शॉट आहे, त्यामुळे कदाचित नको तितके प्रेशर बॉलला मिळाले व तो डायरेक्ट हातात, जर लगेच त्याने शॉट करेक्ट केला असता तर कदाचित तो सिक्सही गेला असता.
५. सचिन मेंटल गेम खेळू शकला नाही, धोणी इतका चांगला कॅप्टन त्यामुळे उर्वरित जगात कोणी नाही, ही डज मिरॅकल्स समटाईम्स.
आयपीएलच्या निलंबित कमिशनरची
आयपीएलच्या निलंबित कमिशनरची कुंडली इमेल मधुन फिरतेय . ती इथे देतोय .
क्रिकेट 'कमिशन'र!
- अपर्णा पाटील
ललित मोदी
आयपीएलचे संयोजक
गाजियाबादच्या जवळच्या गावात १९३३मध्ये रायबहादूर सेठ गुजरमल मोदी यांनी पहिली शुगर फॅक्टरी सुरू केली. ती घटना त्या गावाचा कायापालट करणारी ठरली. त्यानंतर त्यांनी तिथे असंख्य कारखाने, संस्था उभारल्या. त्याचमुळे या गावाला मोदीनगर हे नाव मिळालं. त्यांचा मुलगा कृष्णकुमार (केके) मोदी आणि सून बीना यांनीही या उद्योगाचा पसारा वाढवला. पण त्यांचा मुलगा ललित मात्र याला अपवाद ठरणार, असं वाटत होतं. कारण त्याची लक्षणचं तशी होती.
केके मोदींना तीन मुलं, दुसरा ललित. अभ्यासात त्याला कधीच रस नव्हता. शाळेतून तो कितीदा पळाला आणि किती शाळा बदलल्या, हे त्याच्या घरच्यांनाही सांगता येणार नाही. शिमला आणि नैनितालच्या बोर्डिंग स्कूलमधून पळून जाण्याच्या नव्यानव्या शकला तो लढवायचा. ड्रायव्हिंग लायसन्स नसताना दिल्लीच्या रस्त्यांवरून वडिलांची मसिर्डीज बेफाम पळवायचा. त्याच्या अशा वागण्याने शाळेचा दाखला मिळणं अवघडच झालं. भारतातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये त्याला अॅडमिशन मिळणार नव्हतंच. अशा वेळी त्याला अमेरिकेला पाठवायचं ठरलं. त्याने सॅट (स्कॉलॅस्टिक अॅप्टिट्यूट टेस्ट) पास केली तेव्हा आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. त्याची रवानगी ड्यूक युनिव्हसिर्टीत झाली. पण ललितचं बेफाम वागणं कायम राहिलं, ते आजतागायत.
अमेरिकेत असताना मर्सिडिज हवी, असा हट्ट ललितने धरला. मोदी घराण्यात पैशाला तोटा नव्हता. वडिलांनी खूप समजावलं पण तो अडून बसला. शेवटी वडिलांनी त्याला पाच हजार डॉलर्स दिले आणि कोणती तरी साधी गाडी घेऊन टाक, असं सांगितलं. त्या पैशात हफ्त्यावर मसिर्डिज आणणारा मोदी घराण्यातला तो पहिला मुलगा ठरला. आपलं म्हणणं कोणत्याही परिस्थितीत खरं करणारे ललित मोदी आजवर तेच करत राहिलेत.
अमेरिकेतही त्याचं अभ्यासात कधी लक्ष लागलं नाही. अशातच 'उद्योगपती मोदींचा मुलगा ललित ड्रग्ज प्रकरणात अटकेत' ही बातमी भारतातल्या मीडियापर्यंत पोहोचलीच. ते वर्षं होतं १९८५. डरहॅम कोर्टात त्याच्या विरुद्ध ड्रग्ज बाळगणं, अपहरण आणि फरार होण्याच्या आरोपाखाली खटला दाखल झाला. शिक्षा कमी व्हावी, म्हणून त्याने स्वत:हून आरोप मान्य केला. त्या प्रकरणात त्याला दोन वर्ष तुरुंगवास आणि दंड सुनावला गेला. तो आणि त्याचे कुटुंबीय अजाण वयात झालेली चूक म्हणून ते प्रकरण विसरा, असं सांगतात. पण ललितचे विरोधक आणि मीडिया तसं होऊ देत नाही.
ललितने आणखी एक धक्का घरच्यांना दिला. मीनलवर माझं प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार, असं त्यानं जाहीर केलं. घरच्यांनी याला विरोध केला. कारणही तसं होतं. मीनल ही त्याच्या आईची मैत्रीण होती. ती त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठी होती. आणि ती लंडनमध्ये पती आणि मुलीबरोबर राहत होती. मीनलशी लग्न करण्यातही ललितने मोठी दूरदृष्टी दाखवली होती. मीनल ही मुंबईतील कोट्याधीस मीलमालक धनजीभाई यांची मुलगी. ललितने जे ठरवलं होतं, ते तो करणारच हे सगळ्यांनाच माहीत होतं. त्यामुळे मुंबईत झालेल्या लग्नाला त्याच्या कुटुंबियाला जावंच लागलं.
ललितने शिक्षण तर पूर्ण केलं नाही पण फिलिप मॉरिस ही सिगारेट कंपनी आणि स्टी लॉडर या कॉस्मेटिक कंपनीशी सौदेबाजी करण्यात यश मिळालं. आयटीसी कंपनीचा संचालक होईपर्यंतची त्याची वाटचाल म्हणजे धंद्यातले खाचखळगे शिकण्याचे दिवस होते. पुढे तो एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्रीत शिरला. डिस्नेच्या सहकार्याने त्यानं इएसपीएनला भारतात आणलं. त्यानंतर तर थेट स्टारचे सवेर्सर्वा रूपर्ट मरडॉकशी टक्कर देण्याचंही धाडस केलं.
क्रिकेट हा देशात सगळ्यात जास्त पैसा मिळवून देणारा खेळ आहे, हे त्याच्या लक्षात आलं ते तेव्हाच. आजही त्याचे आवडते खेळ फूटबॉल आणि टेनिस आहेत. आजही त्याचा आवडता खेळाडू कोण असं विचारलं त्याचं उत्तर असतं, पेेले आणि बियॉन बोर्ग. क्रिकेटचं तंत्र त्याला कळत नाही पण त्यातले 'इन्स आणि आऊट' पुरते माहीत आहेत!
क्रिकेटचा सवेर्सर्वा होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासठी त्याने सारे मार्ग अवलंबले. बीसीसीआयपर्यंत पोहोचण्यासाठी फसवेगिरी केल्याचे आरोप झाले. बीसीसीआयने दरवाजा दाखवल्यावर त्याने राजस्थान क्रिकेट असोशिएशनमध्ये शिरकाव केला. स्वत:ची ओळख लपवण्यासाठी मोदी हे आडनावही लावलं नाही. राजस्थान क्रिकेट असोशिएशनमध्ये त्याने केलेल्या या फसवणुकीचं प्रकरण अजूनही कोर्टात आहे.
अर्थात, आजोबांच्या काळापासूनची ग्वाल्हेर घराण्याशी ओळख मोदीला मोठं होण्यात कामी आली. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या निकटवर्तियांमध्ये त्याचा समावेश झाला. जयपूरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मोदी उतरला असं कळताच लाल दिव्यांच्या गाड्या, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या रांगा दिसत. राजस्थानात त्याचा उल्लेख 'सुपर मुख्यमंत्री' असा व्हायला लागला. त्यामुळेच २००८ची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या 'ललित मोदी कोण आहे?' या पोस्टरबाजीने रंगली. मोदीचे जमीनघोटाळे निवडणुकीत बाहेर आले. भाजपच्या पराभवाचं मोदी हे प्रमुख कारण ठरलं.
मोदी म्हणजे नेमकं कोण, या प्रश्नाला तेव्हाही उत्तर मिळालं नव्हतं. ते मिळालं ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा पराभव झाल्यावर. त्यासाठी शरद पवारांशी हातमिळवणी करणंही मोदींना फायद्याचं ठरलं. त्यांनी बोर्डाचा महसूल सातवरून सत्तर कोटींवर नेल्यावर तर ही मैत्री आणखी घट्ट झाली.
मोदीने बीसीसीआयला पैशाचा छापखाना बनवला. क्रिकेटचं माकेर्टिंग कसं करायचं, हे त्याला ठाऊक आहे. म्हणूनच तर इंग्लडचा संघ भारत दौऱ्यावर आल्यावर कॉमेंटेटर्सना, टीका करायची नाही, वाद होतील असं बोलायचं नाही अशी इशारावजा सूचनाच केली. त्याच्या याच वृत्तीमुळेच माइक आर्थरटर्नने त्याच्यावर 'रूथलेस' अशी टीका केली होती.
मोदी कुटुंबातल्या या पराभूतपुत्राला स्वत:ला प्रूव्ह करायचं होतं. त्यामुळे तो भन्नाट कल्पना वास्तवात आणण्यासाठी काहीही करायला तयार असतो. ते करण्याची पद्धत मात्र प्रत्येकाला पटेल अशी नाही. मोदीबाबत तो 'दोस्त का दोस्त, दुश्मनों का दुश्मन' असं म्हटलं जातं. शाहरूख खान, प्रिटी झिंटा अशा स्टार्सशी त्याची दोस्ती आहे. पण त्याने पाहिलेला शेवटचा सिनेमा 'शोले' आहे. तो पाहून आता पंचवीस वर्षांपेक्षा जास्त वर्षं झालीत. शाकाहारी आणि निव्यर्सनी असलेल्या मोदीला बहुधा तारे पाहण्याचा छंद असावा. कारण जुहूच्या अलिशान बंगल्याच्या हॉलमध्ये त्याने मोठ्ठी दुबीर्ण ठेवलीये.
त्याचा मुलगा रूचिर मुंबईत शिकतोय तर मुलगी अलिया स्वित्झर्लंडमध्ये. त्याच्या सावत्र मुलीचा नवरा म्हणजे जावई गौरव बर्मन आणि मेव्हणा महेश चेलाराम 'राजस्थान रॉयल'चा स्टेकहोल्डर आहे. त्याच्या पत्नीला लोकांनी पाहिलं नाही, पण जेव्हा दक्षिण अफ्रिकेत आयपीएल स्पर्धा झाली तेव्हा ती न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी गेल्याचं मीडियापर्यंत पोहोचलं होतं. त्याची आई बीना दिल्लीत रेस्टाँरट चेन चालवते. तर भाऊ समीर औद्योगिक ग्रुपचा संचालक आहे. मोठी बहीण चारू भारतीया दिल्लीत अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने खासगी युनिव्हसिर्टीची संचालिका झाली आहे. पण सगळ्यांपेक्षा आपण 'वेगळे' आहोत, हे ललित मोदी सतत दाखवत असतो. मोदीने क्रिकेटमध्ये कोट्यवधींची... नव्हे कोट्यवधी डॉलर्सची उड्डाणं घेतलेली पाहून 'अंडरवर्ल्ड'चं लक्षही स्वाभाविकच त्याच्याकडे गेलं. मध्यंतरी दाऊद इब्राहीमच्या सांगण्यावरून त्याच्या हत्येचा प्लॅन शिजला होता, असं म्हणतात. आता तर यात गुंतलेला पैसा तर अंडरवर्ल्डचा नाही ना, अशी शंका घेतली जाते.
नागपूरमध्ये जमीन घोटाळा प्रकरणात त्याला काही महिन्यांपूवीर्च जामीन मिळालाय. त्याच्याकडे 'फॅशन टीव्ही इंडिया'ची मालकी आहे. या चॅनलची अध्यक्षा मिशेल अॅडम्स लवकरच त्याच्यावर फसवणूक, खंडण्या, कॉपीराइटचं उल्लंघन यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत आहे. शिवाय राजस्थानमधल्या क्रिकेट अकादमीतल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. पण पैसा आणि पॉवर असली की मोठं होण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही. मोदीच्या बाबतीत ते खरं ठरलं इतकंच!
>>नायरची समजूत असावी की मी एक
>>नायरची समजूत असावी की मी एक बाजू लावून धरतो व दुसर्या बाजूने सचिन मारामारी करेल. तर सचिन बरोबर उलटे समजत असाव>><<
हे निरिक्षण काही झेपलं नाही बुवा. एव्हढा मोठा कम्युनिकेशन गॅप दोन्ही फलंदाजात असेल असं तुम्हाला वाटतं? असो.
मला तरी मॅच फिक्स झाली असं वाटत नाही. ज्यांना मॅच फिक्सींग विषयी स्पेक्युलेट करायचं आहे त्यांना करुध्या. माझ्या मते "बेटर कॅप्टंसी" आणि "कॅचेस विन मॅचेस" होल्ड्स गूड फॉर एनी फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. अँड टी-२० इज नो एक्सेप्शन...
श्री, धन्यवाद माहिती येथे
श्री, धन्यवाद माहिती येथे टाकल्याबद्दल.
भारतातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये त्याला अॅडमिशन मिळणार नव्हतंच. अशा वेळी त्याला अमेरिकेला पाठवायचं ठरलं>>>
आतापर्यंतच्या सामन्यात मुंबई
आतापर्यंतच्या सामन्यात मुंबई जास्त करून प्रथम फलंदाजी करीत होते (नाणेफेल जिंकून)..शेवटच्या ५ षटकात जबर टोलएबाजी करून प्रतिस्पर्धी संघाचे मनोबल खच्ची होत होते. त्यात एक -दोन झेल सुटल्याचे बोनस ही मिळायचे.
अगदी हेच फायनल मधे मुंबईच्या बाबत झाले. रैनाचे सुटलेले दोन झेल आणि त्याने लुटलेल्या धावा यामुळे 'आज आपला दिवस नाही' असे वाटू लागले असावे.
पोलार्ड बहुधा फिरकी चांगली खेळत नसावा हेच त्याला उशिरा पाठवण्याचे एक कारणे दिसते..पण तो येईपर्यंत बाकीच्या फलंदाजांनी हवी असलेली धावगती अवाक्याबाहेर जाऊ दिली.
राज अनुमोदन! >>नायरची समजूत
राज अनुमोदन!
>>नायरची समजूत असावी की मी एक बाजू लावून धरतो व दुसर्या बाजूने सचिन मारामारी करेल. तर सचिन बरोबर उलटे समजत असाव>> ते दोघे एकमेकांना एकदम मैदानात भेटले की काय? आणि अगदी मैदानात भेटले, तरी २ बॉलच्या, २ ओव्हरच्या मधे वेळ असतोच ना बोलायला. सुरुवातीपासूनच धावांचा वेग कमी पडला हे सत्य!
शिवाय, >>अंतिम सामन्यात प्रयोग करण्याची रिस्क घ्यायची नसते>> ही गोष्ट २० वर्षे क्रिकेट खेळणार्या सचिनला माहिती नसेल का? त्याने इतक्या फायनल्स खेळल्या आहेत!...
असो...झाले ते झाले....
मुंबईची टीम "आपली" केवळ सचिन मुळेच वाटत होती, म्हणुन एवढे दु:ख!
रैनाचे सुटलेले दोन झेल आणि
रैनाचे सुटलेले दोन झेल आणि त्याने लुटलेल्या धावा यामुळे 'आज आपला दिवस नाही' असे वाटू लागले असावे.>>>>>>>>>>>>> फायनलला असं वाटुन कसं चालेल?
>>नायरची समजूत असावी की मी एक
>>नायरची समजूत असावी की मी एक बाजू लावून धरतो व दुसर्या बाजूने सचिन मारामारी करेल. तर सचिन बरोबर उलटे समजत असाव>> ते दोघे एकमेकांना एकदम मैदानात भेटले की काय? आणि अगदी मैदानात भेटले, तरी २ बॉलच्या, २ ओव्हरच्या मधे वेळ असतोच ना बोलायला. सुरुवातीपासूनच धावांचा वेग कमी पडला हे सत्य!
नायर व सचिनचा खेळ बघून तरी तसेच वाटत होते. दोघांनीही चेंडू उचलून मारण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. बहुतेक वेळा ते चेंडू जवळ ढकलून १ धाव घेऊन दुसर्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करीत होते.
>>>> शिवाय, >>अंतिम सामन्यात प्रयोग करण्याची रिस्क घ्यायची नसते>> ही गोष्ट २० वर्षे क्रिकेट खेळणार्या सचिनला माहिती नसेल का? त्याने इतक्या फायनल्स खेळल्या आहेत!...
म्हणून तर सचिनने फलंदाजीच्या क्रमवारीत केलेले विचित्र बदल पाहून आश्चर्य वाटले.
सगळे लोक धावांचा वेग वाढवला
सगळे लोक धावांचा वेग वाढवला नाही असे म्हणत आहेत.. पण चेन्नै ने बॉलिंग पण चांगली केलीच कि..
बॉलिंजर, आश्विन, जकाती, मुरली.. सगळ्यानीच.. धोनीचे फिल्ड प्लेसिंग पण चांगले होते..
कॅच सोडायच म्हणाल, तर हेडन ने धवन चा कॅच दुसर्या ओव्हर मधे सोडला होता.. रन आउट चान्सेस मिस केले होते पण त्याचा फायदा उठवता आला नाही मुंबैला..
सचिनच्या फलंदाजीच्या क्रमातील
सचिनच्या फलंदाजीच्या क्रमातील अनाकलनीय निर्णयांमुळे व मुम्बईच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे व खराब गोलंदा़जीमुळे ते हरले.
तर रैनाच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीमुळे व चेन्नईच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे (चेन्नईने एकही झेल सोडला नाही व मुम्बईच्या तिघांना धावबाद केले. तसा नायरचा एक झेल हेडनने स्लीपमध्ये सोडला होता. पण त्या सुटलेल्या झेलाचा चेन्नईला फायदाच झाला.) चेन्नई जिंकले.
ता.क.- माबो वर क्रिकेट
ता.क.- माबो वर क्रिकेट (प्रत्यक्ष) खेळणारी मंडळी असतील तर त्वरित संपर्क साधा, "पुणे सहारा वारीयर्स" मध्ये भरती चालु आहे, नाही झाली तरी निदान आपलं आपण तरी कधीतरी, कुठेतरी नक्की खेळुन हौस फेडु ! (शेवट्च्या ९ जागाच शिल्लक )
श्री मोदीची बरीच माहिती
श्री मोदीची बरीच माहिती दिलीत.
पण मला अजुनही एक कळाल नाही जे घडल त्याला एकच व्यक्ती कसा जबाबदार??
मोदी थरुर प्रकरण हे हिमनगाच एक टोल असेल.
असो.
मुंबै वाइइट्ट खेळली म्हणुन हारली.
नेहमीचा अग्रेसेव्हनेस दिसलाच नाही.
कुक्काबुरा बॉल हा पहिल्या ५/६
कुक्काबुरा बॉल हा पहिल्या ५/६ शटकात unpredictable असतो. यामुळेच सचिन नायर हळु खेळले( It was not only Sachin all experienced players like Gilchrist, Hayden, Kallis played slow in 5-6 overs). ते जरा जास्त सावध्पणे खेळले हा प्रोब्लेम झाला. Pollard ला लव्कर पाठ्विले असते आणि खेळि अयशस्वि ठरिलि असती तरिहि टिका झालिच असती. Duminyने हल्लिच १८ चेन्डुत ४२ धावा केल्या होत्या. शिवाय पोलार्ड येणार आहे या विचाराने मधलि फळी आत्म्विश्वासाने खेळन्याची शक्यता जास्त होती.
१) रायडु उत्क्रुश्ठ आनि थन्ड डोक्याने खेळला. ९ बॉल राहिले अस्ताना ति तिसरी धाव घेण्याची त्याची कल्पना बरोबर होती, पोलर्ड ने उगाचच नको म्हट्ले.
२) फिल्डिन्ग मध्ये आपण मार खाल्ला. आपण २ easy catches सोड्ले आणि चेन्नइ ने २ कठिन catch पकड्ले.
आत्ताच तहलका वर वाचले "MOST
आत्ताच तहलका वर वाचले
"MOST OF SUNANDA PUSHKAR’S 4.9 PERCENT FREE EQUITY ACTUALLY BELONGS TO TWO ICONIC CRICKETING GREATS. ONE OF THEM PLAYS FOR THE MUMBAI INDIANS"
अजुन पुर्ण लेख वाचला नाही पण त्या लेखाची /बातमीची लिंक
http://www.tehelka.com/story_main44.asp?filename=Ne240410the_indian.asp
महागुरु, लिंक दिल्याबद्दल
महागुरु, लिंक दिल्याबद्दल धन्यवाद!
कमाल आहे खरच! आता म्हणजे कुठे ही भरपुर पैसा असला की हेरा फेरी असणारच, फक्त त्यात हात असलेल्यांपैकी एखाद्याचे डोके फिरले की आलं प्रकरण बाहेर.
>>"MOST OF SUNANDA PUSHKAR’S
>>"MOST OF SUNANDA PUSHKAR’S 4.9 PERCENT FREE EQUITY ACTUALLY BELONGS TO TWO ICONIC CRICKETING GREATS. ONE OF THEM PLAYS FOR THE MUMBAI INDIANS"<<
बापरे नको नको त्या शंका येतायत
Pages