Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13
आजपासून तिसर्या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
यंदा सर्वाना (USA वगळ्ता
) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही 
इथे पहा http://www.youtube.com/ipl
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
११.५ धावा प्रति षटक पाहिजेत.
११.५ धावा प्रति षटक पाहिजेत. एकेरी ने काही होणार नाही.
मी अगदी खाल्ल्या मिठाला जागून
मी अगदी खाल्ल्या मिठाला जागून जागून फायनल बघतेय. झोपू का मी?
आणि मी हे लिहीत असताना नायरने 2 षटकार मारलेले आहेत
आत्ता स्कोअर दाखवत आहेत तर
आत्ता स्कोअर दाखवत आहेत तर सच्या नायरला म्हणतोय, अरे चेन्नई पण ५८ वरच होती, आपण काढू. जय हो !
नायर गेला
नायर गेला
सचिन रागात येतोय. नॉट गुड.
सचिन रागात येतोय. नॉट गुड. मेंटल गेम मध्ये जिंकायला हवय.
सचिन ने बॅट आपटली.....
सचिन ने बॅट आपटली.....
हरभजन पण हजेरी लवुन गेला
हरभजन पण हजेरी लवुन गेला
हरभजन पण गेला
हरभजन पण गेला
भज्जी आला आणि गेला..
भज्जी आला आणि गेला..
रैना रॉक्स .
रैना रॉक्स :).
डिजे, तुला दिसलेली गीता
डिजे, तुला दिसलेली गीता भज्जीला दिसली नाही बहुतेक

पोस्टर लाव !!!! सचिन सारखं
पोस्टर लाव !!!!
सचिन सारखं लेग साईडला का मारतोय..?
लागलंय ना हाताला..
लागलंय ना हाताला..
(No subject)
सचीन गेला आता झोपयला हरकत
सचीन गेला
आता झोपयला हरकत नाही..
सचिन गेला दुकान बंद
सचिन गेला
दुकान बंद
मंजु, भज्जीला पण दिसली
मंजु,
भज्जीला पण दिसली म्हणूनच लवकर पळाला, जसा रवी शास्त्री जायचा अमृता सिंग ला बघून
हे पग्या साठी
हे पग्या साठी

संपल.. !! that was a good
संपल.. !!
that was a good final though.. !!
(No subject)
सोडलेले कॅचेस भोवले...
सोडलेले कॅचेस भोवले...
MI हरले पण Pollard चा खेचून
MI हरले पण Pollard चा खेचून आणण्याचा प्रयत्न अप्रतिम !
धोनीज ब्रिलियन्ट कॅप्टन्सी आणि सुरेश रैना ची चौफेर खेळी.. Very well deserved victory !
धोनी सचिनपेक्षा उत्तम कॅप्टन
धोनी सचिनपेक्षा उत्तम कॅप्टन आहे म्हणूनच चेन्नई जिंकले, इपडी पोडे पोडे पोडे
पोलार्डला एवढ्या उशीरा का
पोलार्डला एवढ्या उशीरा का पाठवला ? याबद्दल सचिनला कोणी काही विचारलं का? ९ वी विकेट गेल्यावर मी पाहिलच नाही.
अर्थात च बेटर कॅप्टन जिंकला
अर्थात च बेटर कॅप्टन जिंकला आणि बेटर टिम वर्क पण.. !
तसाही मुंबई इंडियन्स चा कॉन्फिडन्स अजिबात दिसत नव्हता, अगदी सुरवाती पासून सचिन सकट सगळे बिचकत च खेळले.. भरपूर मिस फिल्डिन्ग, कॅच ड्रॉप्स सगळ्यामुळे सचिन आधी पासूनच फ्रस्ट्रेट झाला होता !
या उलट धोनी नी कसलही टेन्शन, एक्साइटमेन्ट चेहेर्यावर न दाखवता थंड डोक्यानी कॅप्टन चे उत्तम डावपेच वापरले.. मॅथ्यु हेडन ची फिल्डिंग पोझिशन चेन्ज केली आणि तिथेच मॅच पूर्ण पणे चेन्नाईच्या खिशात गेली :).
रैनाला दिलेलं जीवदान फार महागत गेलं, रैनानी त्याचा फायदा घेऊन मुम्बईला जाम झोडपलं.
एक पोलार्ड सोडून मुंबई वाल्यांपैकी कोणीही आक्रमक खेळी केली नाही.
पूर्ण स्पर्धा इतकं चांगलं
पूर्ण स्पर्धा इतकं चांगलं खेळुन फायनल हरल्यामुळे वाईट वाटलं. पोलार्डला इतक्या उशिरा पाठवायचा निर्णय खरच अनाकलनीय होता. तेंडल्या आऊट झाला तेव्हाच पोलार्ड आला असता तर कदाचित त्याने मॅच आवाक्यात आणली असती.. अर्थात आता जर तरचा काही उपयोग नाही.. :).
आशा आहे की रैना आणि धोनी यांचा हा फॉर्म टी२० विश्वचषक स्पर्धेतही तसाच असेल..
मॅच संपल्या संपल्या मोदीसाहेबांना बीसीसीआयकडुन निलंबनाचा घरचा आहेर मिळाला.. आता पाहुयात पुढे काय होतय ते..
धोनीचा संघ कागदावरच नव्हे तर
धोनीचा संघ कागदावरच नव्हे तर मैदानावरही नि:संशय वरचढ होता व कोणतीही कारण मीमांसा न करता त्यांच अभिनंदन करणंच योग्य. रैना विश्वचषकाचाही हीरो ठरो !!
सचिन संघाला हात धरून पुढे नेऊ शकतो, त्याला कडेवर घेऊन नाही !
शिवाय,सचिनने सांगून ठेवलंय, मी आधी इंडीयन व मग मुंबईकर ! मग टी-२० विश्वचषकाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेल्या धोनीला तो अपयशाचा अपशकून होऊ देईल का !
चेन्नई जिन्कल्याबद्दल आधी
चेन्नई जिन्कल्याबद्दल आधी त्यांचे अभिनन्दन .....
पण ही मैच बघताना मला मात्र ही मैच फिक्स असावी असेच वाटत होते , बरेचसेच प्रश्न पडलेत. न मला आशा आहे की त्याची उत्तरे मला येथेच भेटतील
१) सचिन पहिल्यापसुनच मूड मधे दिसत नव्हता , न चेहरा पैन किलर घेताल्यामुले खुप सुजल्यासरखा दिसत होता , सचिन ने पाच टाके असताना एवढी रिस्क का घ्यावी?
२) मुम्बैचा एक ही खेलाडू जिन्कान्यासाठी खेळत असावा असे वाटत नव्हते. (त्यांच्या बॉडी लैंग्वेज वरून असे वाटत होते की ते हरन्यासाठीच खेळत असावेत).
३) सचिन ही पूर्ण मैच मधे एकदाही हसताना दिसला नाही, अगदी सुरुवातीला विकेट पडल्यावरही तोच काय कोणीच सेलेब्रेट करताना दिसले नाही. तो नेहमी पेक्षा खुपच स्लो खेळत असावा असे वाटत होते (कमीत कमी त्याने नायर ला तरी हिटिंग करायला सांगायला हवे होते). तो आउट झाला तो ही अनाकलनीय फटका मारूनच . मी कधीही त्याला असा मारताना हात आखाडता घेवून आउट झालेले पाहिले नाही. असे वाटत होते की मैदानाबाहेर जाणारा चेंडू त्याने स्वताहून हात आखाडता घेवून आत आणला. तसेच नेहमी प्रमाणे आउट ज़ल्यावर तो डग आउट मधे न बसता आत का जावून बसला? एवढी चांगली त्याची रनिंग बेटवीन द विकेट असताना त्याने नायर ला किती तरी वेला का रोखले ? न आउट झाल्यावर तर त्याचा आतील चेहरा तर बघवत ही नव्हता. असे वाटत होते की त्याला मैच चा निकाल माहिती होता पण तो काहीच करू शकत नासल्यामुले असमर्थ वाटत होता. खुप कसतरी झाले त्याला तसे बघताना (कारण तो सचिन आहे (God of Cricket)).
४) २६ चेंडू राहिले असतानाही डुमिनी ला पाठ्वान्याची काय गरज होती न तोही त्या वेली चेंडू फक्त ढकलायला पाहत होता. एकच फटका त्याने वरून मारला तो ही क्याच होता.
५) पूर्ण स्फर्धे मधे नेहमी तिवारी ला जास्तीत जास्त स्ट्रैक देणारा रायडू , पोलार्ड का स्ट्रैक देत नव्हता . एकोनिसव्या षतकात दोन धावा होत असतानाही तो का पलाला नाही (धाव पूर्ण झाली नास्ति तरी पोल्लार्ड ला स्ट्रैक देण्यासाठी तरी त्याने धावायला हवे होते. )
६) रैनाचे आधी क्याच सोडाल्याचे आधी काही वाटले नव्हते पण नंतर कुठे तरी तेहि जास्त मनाला टोचू लागले.
७) नेहमी उपस्थित असणार्या नीता ताई काल फायनल असुनही का हजर नव्हत्या ? (मला तर असे वाटले की त्या निकाल माहित असल्याने आपल्या टीम ला हरताना पाहू शकत नव्हत्या कारन मुकेशजी पेक्षा त्यांची टीम शी अटैचमेंट जास्त होती).
मैच फिक्स असती तरी मला काहीच वाटले नसते, पण सचिन साठीच खुप दुःख होत होते. असे वाटत होते की त्याला न आवडनारी गोष्ट त्याला करावी लागत आहे. त्याचा चेहरा बघवत नव्हता.
मला जे वाटले ते मी लिहिले जर कोणाला वाईट वाटले असेल तर क्षमा करावी ही विनंती .... पण लिहिन्यापासूनस्वताला नाही रोखू शकलो.
From Now I hate IPL .....
But Sachin is always God of Cricket for Me ......
मुंबई हरली.. चेन्नई जिंकली.
मुंबई हरली.. चेन्नई जिंकली.
श्रीनिवासनने खर्च केलेले दोन कोटी वसूल झाले
या माणसाने विजयासाठी प्रचंड मोठा यज्ञ आणि बळी वगैरे केलेले होते. म्हणे!!!!
सचिनच्या फलंदाजीच्या क्रमातील
सचिनच्या फलंदाजीच्या क्रमातील अनाकलनीय निर्णयांमुळे व मुम्बईच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे व खराब गोलंदा़जीमुळे ते हरले. रैनाच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीमुळे व त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे (चेन्नईने एकही झेल सोडला नाही व मुम्बईच्या तिघांना धावबाद केले) चेन्नई जिंकले.
१६९ धावांचा पाठलाग शक्य होता. चेन्नईविरूद्धच्या पहिल्या सामन्यात मुम्बईने १८० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. धवनने पहिले षटक निर्धाव खेळून मुम्बईवर दडपण आणले. मुम्बईच्या योजनेनुसार सचिन एक बाजू लावून धरणार होता व दुसर्या बाजूने मारामारी करणे अपेक्षित होते. धवनने ८ चेंडू वाया घालविल्यावर नायरसारख्या संथ फलंदाजाला ३ र्या क्रमांकावर आणणे ही मोठी चूक होती. नेहमीप्रमाणे रायडू किंवा तिवारीला ३ र्या क्रमांकावर आणायला पाहिजे होत. आवश्यक धावगती भराभर वाढत असताना नायर व सचिनने संथ फलंदाजी केली. रायडू किंवा तिवारीने मारामारी केली असती. नायरने बरीच षटके वाया घालविल्यावर तो बाद झाला. त्यानंतर ४ थ्या क्रमांकावर भज्जीसारख्या मटका फलंदाजाला आणणे ही दुसरी मोठी चूक. रायडु, तिवारी सारखे फटकेबाज आपला क्रमांक कधी येईल याची वाट बघत हात चोळत बसले होते. जेव्हा आवश्यक धावगती १२ च्या पुढे गेली व सचिन आणि तिवारी बाद झाले होते तेव्हा अंदाजे ५ षटके शिल्लक होती. तेव्हा सुद्धा पोलार्डला न आणता ड्युमिनीला का वर आणले कोणास ठाऊक? शेवटी पोलार्ड आला तेव्हा ३ षटकात ५५ धावा अशी अशक्यप्राय परिस्थिती होती. कोणताही सुपरमॅन असा सामना जिंकू शकणार नाही.
अंतिम सामन्यासारख्या महत्वाच्या सामन्यात प्रयोग करायचे नसतात. सचिनने असे प्रयोग का केले त्यालाच ठाऊक !
रैनाचे सोडलेले २ झेल, शेवटच्या काही षटकात मुम्बईने केलेली खराब गोलंदाजी (चेन्नईने शेवटच्या ८ षटकात १०० धावा चोपल्या. भज्जीने १९ व्या षटकात पहिले ३ चेंडू व मलिंगाने २० व्या षटकात पहिले ४ चेंडू निर्धाव टाकले, पण उरलेल्या २-३ चेंडूत प्रत्येकी ११ धावा दिल्या.) आणि सचिनचे फलंदाजीच्या क्रमातले अनाकलनीय प्रयोग यामुळे मुम्बईला हार पत्करावी लागली.
Pages