Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13
आजपासून तिसर्या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
यंदा सर्वाना (USA वगळ्ता
) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही 
इथे पहा http://www.youtube.com/ipl
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महाराष्ट्र सरकारने आय पी एल
महाराष्ट्र सरकारने आय पी एल ला करमाफी दिली आहे. हा कर आहे कमीतकमी ३५० कोटि. त्यामुळे आपल्या राज्याचे ३५० कोटि॑चे नुकसान झाले आहे. जर आपण राज्यावरचे कर्ज बघीतले तर आपल्या सरकारने खुप मोठि चुक केली आहे. कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र प्रथम येतो.
गांगुली हा एक सुदैवी कप्तान
गांगुली हा एक सुदैवी कप्तान आणि स्वार्थी, आत्मकेंद्रित खेळाडू होता! >>>
सुदैवी कप्तान ? काय राव ?
त्याच्या स्वभावाबद्दल काहीही बोला , पण जिन्कण्याचा तेही भारताबाहेर विश्वास त्याने मिळवून दिला .
मार्क टेलर ने ऑस्ट्रेलियासाठी जे केल ( आणी ज्याची फळ पॉन्टिन्ग अगदी कालपरवा पर्यन्त खात होता )
ते त्यान भारतासाठी केलय .
केदार याना अनुमोदन.. आता ढोणी
केदार याना अनुमोदन.. आता ढोणी गांगुलीच्या कष्टांची फळे चाखतोय.. सेहवाग,युवराज, हरभजन, जहीर खान वैगेरेंना प्रचंड सपोर्ट केला..त्याना पुढे आणले, जॉन राइट-गांगुली आणि त्या वेळची टीम १ नंबर होती.
रच्याकने हा विडिओ पहा.. जय महाराष्ट्र....होस्ट टीम इज जंपिंग,जंपिंग,,जंपिंग ऑन मराठी ठेका..
http://www.youtube.com/watch?v=xnLWyWN6bAc
नवीन खेळाडूच्या मगे खंबीरपणे
नवीन खेळाडूच्या मगे खंबीरपणे उभा राहणारा तो कप्तान होता.हरभजन, युवराज, झहीर्...साक्ष देतील. विरुद्ध संघाच्या डोळ्याला डोळा भिडवायला त्यानेच शिकवले.
स्वार्थी आत्मकेंद्रित असेलही...पण या दोषांनी त्याचे गुण पुसत नाहीत.
<जर आपण राज्यावरचे कर्ज
<जर आपण राज्यावरचे कर्ज बघीतले तर आपल्या सरकारने खुप मोठि चुक केली आहे. >
म्हणजे??? महाराष्ट्र राज्यावर कर्ज? असे कसे होईल? मुंबई, पुणे इथे एव्हढे मोठमोठे उद्योगधंदे असताना, कित्येक श्रीमंत लोक मुंबईत रहात असताना, महाराष्ट्र राज्याला कर्ज का व्हावे?
असो. ती चर्चा इथे नको.
अजूनतरी मुंबई आघाडीवर आहे. तेंडूलकर लवकरच बरा होऊ दे अशी प्रार्थना. त्याच्याखेरीज इतर फलंदाज धावा काढत नाहीत की काय? तो बाद झाल्यावर सर्वजण निराश का होतात? निदान आज तरी जिंकायलाच पाहिजे, नाहीतर दोन तीन संघ मुंबईच्या पाठीला नाक लावून धावताहेत, ते पुढे जातील.
>>पण जिन्कण्याचा तेही
>>पण जिन्कण्याचा तेही भारताबाहेर विश्वास त्याने मिळवून दिला
कुणाच्या जीवावर?... सचिन, लक्ष्मण, द्रविड आणि कुंबळेच्या जीवावर ना?.... त्याला चांगली टीम मिळाली म्हणुन जिंकण्याच क्रेडिट त्याच्याकडे जात नाही.... उलट ज्या ज्या वेळी त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार्या वेळा आल्या त्या त्या वेळी त्याने पळपुटेपणाच केला!
जो जबाबदारी टाळुन केवळ यशात मिरवु पहातो तो कधीच चांगला कर्णधार होउ शकत नाही!
>>सेहवाग,युवराज, हरभजन, जहीर खान वैगेरेंना प्रचंड सपोर्ट केला
म्हणजे नेमके काय केले? द्रवीडच्या नेतृत्वाखाली ढोणी आणि इरफान फलंदाजीत चमकु लागले म्हणुन त्याचे क्रेडिट द्रविड्ला जाते काय?
उलट गांगुलीच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत हे तरुण खेळाडु संघात आले, वरिष्ठ खेळाडूंचा अनुभव आणि तरुण खेळाडूंचा उत्साह असा योग्य संगम झाला म्हणुनच गांगुलीच्या नावावर विजय लागले....
संघ जिंकत होता म्हणुन त्याचा माज हा अॅग्रेशन म्हणुन कौतुकला गेला.... आणि जेंव्हा राईटसारखा प्रसिद्धीपरामुख माणुस जाउन त्याच्या जागी चॅपेल सारखा अजुन एक माजोरडा आला.... तेंव्हा संघर्ष अटळ झाला!
पैसा कोणाचा ? सरकारचा नाही
पैसा कोणाचा ? सरकारचा नाही आणि भांडवलवाल्यांचाही नाही. पैसा नेहमीच सर्वसामान्य माणूस निर्माण करतो त्यावर हक्क फक्त त्याचाच, तो त्याच्यासाठीच खर्च व्हायला हवा. हाच समाजवाद बाकी सारे ढोंग.
दुसर्याच्या पैशावर, जिवावर चैन करणारे हे कोण. करमाफी कोणाला कोट्याधीशाला की कर्जबाजरी शेतकर्याला. तुम्हाला काय वाटते ?
गांगुली त्याच्या आक्रमक,
गांगुली त्याच्या आक्रमक, शैलीदार फलंदाजीमुळे व सचिन-गांगुलीच्या अविस्मरणीय, अगणित भागिदार्यां मुळेच कायमचा लक्षांत राहील, निदान माझ्यातरी . कप्तान म्हणून तो खूपच चिडचिडा, कांहीसा दिखाऊ
व मैदानावर अकारण "खुन्नस" फडकावत असायचा, असं आपलं माझं प्रामाणिक मत ! अनेक यशस्वी कप्तानाना असं वागण्याची कधी गरज भासली नाही !! ["पण जिन्कण्याचा तेही भारताबाहेर विश्वास त्याने मिळवून दिला " हे वाडेकर, कपिल याना ऐकू जाणार नाही याची कॄपया काळजी घ्यावी !]
ऑफिसची सगळी जबाबदारी खरंच
ऑफिसची सगळी जबाबदारी खरंच तुमच्या एकट्याच्याच डोक्यावर असते, मुंबई इंडीयन्सच्या सचिनसारखी ?
आय पी एल ला करमाफी देण्याचा
आय पी एल ला करमाफी देण्याचा प्रस्ताव मान्य झाला का? फक्त आय पी एल या कंपनीलाच कर माफ की संघांचे मालक, खेळाडू यांनाहि करमाफी?
>>>
अहो झक्कीसाहेब, आयपीएलचे सामने पहाणार्या प्रेक्षकाना करमाफी आहे ती.
म्हणजे असं की, कर लावला की तो ते आयोजक तिकेटावर लावणार. म्हणजे पहाणार्याना अधिक पैसे द्यावे लागणार. कर माफ झाला की हे अधिकचे पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजे प्रेक्षकानाच ते माफ होणार . हाकानाका?
छ्या ह्या अमेरिकन लोकाना काहीही समजायला फारच वेळ लागतो बुवा...
महाराष्ट्र सरकारने आय पी एल
महाराष्ट्र सरकारने आय पी एल ला करमाफी दिली आहे. हा कर आहे कमीतकमी ३५० कोटि. त्यामुळे आपल्या राज्याचे ३५० कोटि॑चे नुकसान झाले आहे. जर आपण राज्यावरचे कर्ज बघीतले तर आपल्या सरकारने खुप मोठि चुक केली आहे. कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र प्रथम येतो.
हीही एक ओरडण्याची फ्याशन आहे.सरकारने इन्फ्रास्ट्र्क्चर उभारण्यासाठी कर्ज काढून पायाभूत सुविधा निर्माण केल्यानन्तर त्या आधारे खाजगी उद्योजक अथवा व्यावसायिक त्यातून सम्पदा निर्माण करतात ती सम्पदा कर्ज फेडण्यासाठी वापरली जात नाही . ते सम्पदा त्यात्या वैय्यक्तिक मालकांच्या, शेतकर्यांच्या, व्यावसायिकांच्या स्वतःच्या मालकीची होते. त्यामुळे सरकारचे कर्ज दिसत राहते पण वैयक्तिक उत्पन्न व त्यामुले राष्ट्रीय सम्पत्तीत पडलेली अप्रत्यक्ष भर याचा विचार अज्ञानी लोक करत नाहीत. पण देशापरदेशातले अर्थक्षेत्रातले लोक त्याचा सारासार विचार करून परफॉर्मन्स इन्डिकेटर ठरवत असतात.
उदा.सरकारने कर्ज घेऊन एखादे धरण बांधल्यास त्यापाण्यातून होणारे शेती उत्पन्न , औद्योगिक उत्पन्न हे खाजगी क्षेत्रात विभागले जाते. त्यातला काही वाटा ते कररूपाने देतात व तो कर्जफेडीसाठी वापरात येतो हा भाग वेगळा. शिवाय नागरिकांच्या पिण्यासाठी प्पाणीपुरवठ्याचा फायदा आर्थिक उत्पनात मोजता येत नाही. रस्त्यासारख्या प्रकल्पातून शेतीसारखा थेट फायदा निर्माण होत नाही पण त्यामुळे वाहतुक, मार्केटिंग , पुरवठा याना चालना मिळून व्यवसाय वृद्धी, शेतमालाचे वितरण, पणन यात वाढ होऊन अंतिमतः राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते.
महाराष्ट्र कर्जात पुढे आहे याचा अर्थ विकासप्रक्रियेतही पुढे आहे असाच त्याचा अर्थ होतो.
आयपीलमधू येनारे उत्पन्न या सगळ्या भानगडीत फार मोठे आहे अशातला भाग नाही . पण एकदा त्यात शरद पवार आहेत म्हटल्यावर वेगवेगळ्या खर्या खोट्या भूमिका घेऊन विविध हितसंबंधी लोक त्यात उतरणे आलेच.
आपन आपले, सामने बघून आनन्द लुटावा अथवा त्यांचा अनुल्लेख कराव हे उत्तम . क्या?
की धोतर सुटले रे .......
की धोतर सुटले रे .......
उद्या "मी सचिन ला घाबरत नाही"
उद्या "मी सचिन ला घाबरत नाही" वॉर्न वि. सचिन
वॉर्न वि. सचिन याची खरी रंगत
वॉर्न वि. सचिन याची खरी रंगत भारत वि. ऑस्ट्रेलिया या रणभूमीवरच ! आयपीएलमध्ये वॉर्न आणि सचिन या दोन शैलीदार शिलेदारांच्या खेळाचा आनंद लुटणे हेच खरं.
पंजाब मुंबई सामन्यानंतर
पंजाब मुंबई सामन्यानंतर पंजाबचे सगळे खेळाडू उड्या मारत उठले. पण युवराजच्या खुर्चीला कुणीतरी फेविकॉल लावले होते.
बंगलोर -कोलकता सामन्यानंतर राहुल द्रविड्ची मुलाखत घेताना आयुषमान आधी थरथरत होता.मग इतका वाहवत गेला की पारितोषिक वितरण समारंभ सुरू होणार हे विसरून गेला.आणि राहुल उत्तर देत असताना त्याला सरळ कापून टाकले. नंतर राहुलने त्याला बुकलून त्याचा जॅम केला असेल.
साहेब ५९ बॉलमध्ये ८९
साहेब ५९ बॉलमध्ये ८९

झहीर्,मलिंगा,भज्जी चमकले तर राजस्थानचं पानिपत
साहेब प्रथम येऊन शेवटपर्यंत
साहेब प्रथम येऊन शेवटपर्यंत एकटेच लढले, नेहमीप्रमाणे ! राजस्थान रॉयल्स १२ ला ३ गडी बाद !!
मुंबई जिंकले
मुंबई जिंकले
टोणग्याला अनूमोदन. करमाफी
टोणग्याला अनूमोदन. करमाफी सामान्य जनतेचा तिकीटांवर आहे. लोक कशालाही धोपटत बसतात.
मुंबई, पुणे इथे एव्हढे मोठमोठे उद्योगधंदे असताना, कित्येक श्रीमंत लोक मुंबईत रहात असताना, महाराष्ट्र राज्याला कर्ज का व्हावे? >>> जसे कॅलिफोर्निया राज्यात अनेक शिरीमंत लोक असूनही ते राज्य कर्जबाजारी, डबघाईला आलेले आहे अगदी तसेच !
अजून एक ओव्हर आधी मारधाड चालू केली असती तर शतक झाले असते. जय हो!
दादाला नाव ठेवन्यानार्यांनी जsssरा मागे जाऊन कर्तबगारीही बघावी. १०००० धावा फक्त माजावर होत नाहीत.
आणि लॉर्डसवर जर्सी काढून भिरकवणार्यासाठी जिगर लागते. ते दादात होते. त्या एका कार्यासाठी त्याने १०० रन्स फिल्डींग न करता सोडले तरी बेहत्तर ! दादा तुस्सी ग्रेट हो.
कालची द्रविडची इनिंग बघून तर मला गहिवरुन आले होते. त्याची ती सुपरफास्ट तेंडल्यासोबतची भागीदारीच आठवली एकदम.
'दादाला नाव ठेवन्यानार्यांनी
'दादाला नाव ठेवन्यानार्यांनी जsssरा मागे जाऊन कर्तबगारीही बघावी. १०००० धावा फक्त माजावर होत नाहीत." दादाच्या आक्रमक, शैलीदार फलंदाजीला तोड नाहीच पण म्हणून तो आदर्श कप्तान ठरतो का ?
हरणार्या संघांचे कप्तान स्वतःच्या व संघाच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करतातही पण आजच दादाने स्वतःच्या संघावर केलेली जाहीर आगपाखड काय दर्शवते ?
चला.. मुंबई इंडियन्सचा
चला.. मुंबई इंडियन्सचा उपांत्य फेरीत प्रवेश झाला.. आता बाकी तीन स्थानांसाठी फुल्ल टू मारामारी होणार....
ऑसीजच्या mental
ऑसीजच्या mental disintegration ला कसे तोंड द्यायचे हे शिकायला सौरभ तिवारीला दुसर्या सौरभकडे पाठवायचे की इथेच मास्टर ब्लास्टरची स्पेशल शिकवणी ठेवायची?
सचिन्+झहीर > (शेन X शेन).
मुंबई इंडियनमधले भावी श्रीलंकन खासदार एवढे दिवस आउट ऑफ फॉर्म होते म्हणून आउट ऑफ टीम होते की की लंकेत प्रचार करत होते?
सायबांचा विजय असो! वॉर्नला
सायबांचा विजय असो! वॉर्नला काय शिस्तित झोडपलाय.शेवटच्या ओव्हरमधे बोलिंग टाकणारा कोण होता तो? रडायच्या घाईला आला होता. सायबांनी ४थ्या बॉलवर सिंगल न काढता स्ट्राईक स्वतःकडे ठेवला आणि पुढच्या दोन बॉलवर एक डबल आणि एक ठरवून चौकार, काय कंट्रोल,काय कॉन्फिडन्स!
सायबांबद्दल म्या पामरान काय
सायबांबद्दल म्या पामरान काय बोलावं ? जॅक कॅलीस आज द्रविडची स्तुति करताना त्याच्या सदरांत म्हणतो कीं द्रविडची महानता तो सचिनच्याच काळात खेळल्यामुळे झाकली गेली; पण याबाबतीत तसा तो एकटाच नसून भारतातील व भारताबाहेरचे आम्ही सारेच सचिनच्या सावलीतच [झाकाळले ] आहोत .
"मुंबई इंडियनमधले भावी श्रीलंकन खासदार एवढे दिवस आउट ऑफ फॉर्म होते म्हणून आउट ऑफ टीम होते की की लंकेत प्रचार करत होते?" - पवारसाहेबांची निवडणूक तंत्रावरची शिकवणी चालू असावी !!
मुंबई इंडियन्स उपान्त्य फेरीत
मुंबई इंडियन्स उपान्त्य फेरीत पोचले म्हणून सगळे आराम करताय का?
सेहवाग आणि गंभीरवर काय दिवस आलेत? दोघात मिळून एक मोबाईल वापरताहेत.
चेन्नई आज हरले तर धोनीला त्याच्या मोबाईलच्या रिकामा खोका घेऊन संघाबरोबर डब्बा ऐसपैस खेळायला लागेल.
बंगलोरची फलंदाजी मुंबईपेक्षा जास्त संतुलित वाटतेय. कालिस गेला तर उथ्थप्पा, पिटरन, द्रविड,रॉस टेलर, कोहली असे बर्च आहेत. पोलार्डचा फॉर्म असाच राहिला तर बरे.
आपली टीम तर सचिनची
आपली टीम तर सचिनची
पीटर्सन हा शैलीदार, प्रथितयश
पीटर्सन हा शैलीदार, प्रथितयश व माझा आवडता खेळाडू आहे. पण काल स्वतःच्याच चुकीमुळे धावचीत होऊनही त्याने मैदानावर कोहलीवर केलेली आगपाखड गोर्या कातडीचा माज दाखवून गेली, असं वाटलं.
[ नंतर त्याने कोहलीला गोंजारलं पण.. बुंदसे गयी ओ हौदसे नही आती ! ]
आयपीएलमुळे सचिन -वॉर्नचा
आयपीएलमुळे सचिन -वॉर्नचा सामना पाहायला मिळाला.
आणि केव्हिन पिटरसन कालिस आणि डेल स्टेनला टाळ्या देताना कुठे दिसला असता?
पण काल स्वतःच्याच चुकीमुळे
पण काल स्वतःच्याच चुकीमुळे धावचीत होऊनही
>>
चूक कोहलीचीच होती...
जेंव्हा क्रायसिस सिच्युएशन येते तेंव्हा सेट बॅट्समन ला वाचवणं हे भिडूचं काम असतं... कॉल कुणाचाही असला तरी...
पीटरसन ज्या प्रकारे चेंडू फटकावत होता ते पहाता त्याला वाचवणं हे कोहलीचं काम होतं, ते न करता तो उर्मटपणे डोळे वटारून क्रीजवर थांबून राहिला... हे कोहलीच्याच अखिलाडूवृत्तीचं प्रदर्शन झालं...
पीटरसन क्रीजवर राहिला असता तर बँगलोरचा विजय किमान दीड शटक आधी झाला असता...
पीटर्सन हा शैलीदार, प्रथितयश
पीटर्सन हा शैलीदार, प्रथितयश व माझा आवडता खेळाडू आहे. पण काल स्वतःच्याच चुकीमुळे धावचीत होऊनही त्याने मैदानावर कोहलीवर केलेली आगपाखड गोर्या कातडीचा माज दाखवून गेली, असं वाटलं.
[ नंतर त्याने कोहलीला गोंजारलं पण.. बुंदसे गयी ओ हौदसे नही आती ! ]
हर्ष भोगलेने त्याच्या लेखात म्हटलेय की कोहली जर भारताच्या संघात तेव्हा खेळत असता आणि समोर त्याचा ज्येष्ठ सहखेळाडू असता तर तो असाच वागला असता का?
कोहलीनेच पीटरसनला धाव घ्यायला बोलावले आणि मग बघत राहिला.
Pages