IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनीजी,
<<मॅच फिक्स असो वा नसो!!!> माझंही असंच आहे; मॅच पाहून आनंद घ्यायचाच असेल तर त्यांत "फिक्सींग"चा मिठाचा खडा आपणच कां टाकायचा ?
आजच्या मॅचमध्ये मला विशेष कुतूहल आहे -
१] सचिनसाठी [ तो खेळलाच तर ] धोनीची व्यूहरचना काय असेल ? सचिनच्या "अप्पिश" जाणार्‍या
कव्हर ड्राईव्हची प्रतिक्षा कीं आणखी कांही.
२] मलींगाच्या यॉर्कर सदॄश चेंडूंचा समाचार घेण्यासाठी धोनीच्या फलंदाजानी कांही कल्पक 'स्ट्रोक"
शोधला आहे का ? [आजच बहुधा स्टीव्ह वॉने त्याला टी-२० चा जगातला सर्वोत्तम गोलंदाज म्हटलं आहे !]
३]बोलिंजर वि. सचिन या द्वंद्वापेक्षाही रायुडू, तिवारी इ. नवोदित आक्रमक खेळाडू त्याला कसे खेळतात ?
४] मागची मॅच पोलार्डची तशी ही डुमिनीची असेल का ? अजिबात दिखाऊपणा नसलेला हा प्रतिभावान
खेळाडू मलातरी खूप आवडतो.
५] आजची खेळपट्टी कशी असेल ? मॅचला रंगत यायला पहिल्या बारीच्या किमान १७० धावा व्हायलाच हव्यात, असं वाटतंय.
वगैरे, वगैरे.
[आणि हो. टोणगाजी, गंभीर लिहीणं खरंच माझा पिंड नाही. पण या खेळांच्या येडापायी माझा असा तोल जातो, हेही खरं ! आणि, कुणाकडून तरी थप्पड खाईपर्यंत लिहीत रहाणार हेही आहेच ]

टि व्ही एन स्पोर्ट्स चं २० डॉलर चं कनेक्शन घेवुन सुद्धा मॅच काही दिसत नाहीये....टू मेनी कनेक्शन्स म्हणे....

अरे युट्यूबर HD मध्ये आहे. youtube.com/ipl

बद्री गेला. जय हो!

अरे कुलशेखर्‍या काय टाकतोय. बघायला अप्रतिम. ही पूर्ण ओव्हरच महान ! मे बी बेस्ट इन IPL.

हो, यु ट्युब वरतीच बघतो आहे.....पण परत एकदा भारतीय कंपन्यांच्या अव्यावसायिकतेचा (अन प्रोफेशनल) अनुभव आल्याने पोस्ट टाकावे वाटले...वाजवुन पैसे परत घेतले पाहीजेत....असो....हेडन तर गेला...आता धोनी गेला म्हणजे झालं....

धोनी कुठे रैना मस्त खेळतोय. Happy दोनदा ड्रॉप केलं त्याला. धोणीचा सिक्स कसला सही होता.

रैना सिक्स मारताना बॉलच्या खाली इतक्या लवकर येतो की क्या बात है हेच म्हणावे लागते.

हो सचिन च सर्वात जास्त टेन्स्ड दिसतोय .
धोनी गेला पण चांगला स्कोअर करेल चेन्नई.

आय पी एल ची मजा, धोनी गेला कि अरेरे च होतं आणि रैना चे शॉट्स पहातना आपण मुंबई ला सपोर्ट करतोय हे विसरूनच जातो :).
रैना चं जीवदान महाग जातय मुम्बईला.
पण अगदी परफेक्ट प्लेयर्स राहिले चेन्नईला शेवटच्या ओव्हर्स साठी.

रैना मला आवडतो. Happy एकदम भरोश्याचा गडी आहे.

नायर, रायडु, तिवारी ह्यांना खेळने मस्ट आहे. Happy ओव्हरऑल १५ रन जास्त झाले.

ooops.. किती गोंधल होतोय माझा रंगा वरून.. राहुल बोस मुंबईलाच करतोय सपोर्ट Happy
आणि गीता बासरा पण आलीये भज्जीला सपोर्ट करायला , पाहिली का Proud

नायरने आडवे तिडवे मारायला पाहिजे. तो गेला तर त्याच्या जागी रायडु न येता तिवारी आला पाहिजे. नाहीतर अवघड आहे.

Pages