डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

*

स्वाती,

न्यू जर्सी, अटलांटा, नॉर्थ कॅरोलिनांचा ऊत्साह बघून तुला असे नाही वाटत आपण DC च्या लोकांचा उत्साह कमी आहे म्हणून ? इन, मीन तीन टा़ळकी आपली जमली होती. जसे काही ५० डॉलरचे तिकिटच लावले होते ..... सर्वांचा उत्साह बघुन मी तर गप्पच बसलो होतो. नशीबाने host आपली लालु होती.. Happy

कार्टेकुमार, तुम्हाला, झक्कासांना आणि बाकी सगळ्यांना खुलं आमंत्रण आहे बारा ए वे ए ठी ला येण्याचे. आता जे पुढचं जीटीजी होइल त्याला नक्की या.

कार्टा, बाराच्या गटगला लालू आणि नितीन (रुनीला घेऊन अर्थातच) नेहमीच येत असतात. पुढच्या वेळी बारा, शिट्टी नी अटलांटाच्या नाकावर टिच्चून बस करुन या बरं.

अरे वा! आंधळा मागतो एक आणि... तशी काहिशी अवस्था झाली आहे एव्हढे सगळे वृत्तांत वाचुन. परदेसाई, स्वाती आंबोळे, नानबा, अमृता, विनायक, स्वाती दांडेकर आणि सिंडरेला या सगळ्यांचे मनःपुर्वक आभार! सविस्तर आणि सुरस वर्णन वाचुन अगदी गटगला हजर असल्यासारखं वाटलं... Happy

>>यावेळी राजेवाड्यात झालं पुढच्यावेळी तुमच्या 'राज'वाड्यात करु. <<
जरुर. पण आमच्या झोपडीत येण्याकरता गटगची वाट बघु नका. मायबोलीकरांसाठी दरवाजे कायम उघडे आहेत... Happy

कार्ट्या,
आपल्या भागात बरीच मंडळी सरकारी नोकरीत आहेत, त्यांना ऑफिसमधून मायबोलीवर येता येत नाही. मलासुद्धा कधीकधी :-(. घरी आल्यावर बरीच माणसे इमेलही बघत नाहीत, मग मराठी टायपींग करणे फार दूरची गोष्ट! होईल हळुहळू सुधारणा, मग लावू $५० तिकिट Proud

खरे तर ल्यान्ड लॉक्ड भागाच्या दृष्टीने दोन्ही किनारे चुकीचेच ! Proud

रच्याकने. फोटोत बोकडासारखी दाढी असलेला इसम कोण आहे? Uhoh

(हम यहां तहकिकात करने आये है...)

नमस्कार माबोकर,
माबोविषयी २-३ वर्षांपूर्वीच माहिती मिळाली होती. अधून-मधून कथा, ललित इ. सुद्धा वाचायचे. पण सभासद होण्याइतकी तीव्रता त्या वेळी वाटली नव्हती आणि मी माबो ला विसरूनही गेले...
पण मागच्याच आठवड्यात अचानक इकडे डोकावणं झालं आणि पाहते तर काय, माबो एकदम नवीन रूपात!
आणि पहिल्याच पानावर डि सी गटग ची योजना आखणे चालू होते. मग ते गटग सफळ-संपन्न झाले काय, त्याला उपस्थित असणार्‍या लोकांचे धो-धो वृत्तांत आले काय आणि त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया लिहिल्या काय...सगळाच प्रकार मजेशीर वाटायला लागला...आणि आपणही ह्या सगळयाचा भाग बनू शकतो ह्याची उशिरा का होईना, जाणीव झाली...
पण ह्या सगळ्याचा भाग व्हायचं म्हणजे ह्यातल्या खाचा-खळगा ओळखता यायला हव्या हेही लक्षात आलं. इथे बरंच संभाषण सांकेतिक भाषेत चालतं हे समजायला लागलं. आणि त्या सांकेतिक भाषेचे अर्थ लावतांना / शोधतांना नाकीनऊ यायला लागले तेव्हा ही माबो आणि हे माबोकर परग्रहावरचे वाटायला लागले. आणि लक्षात आलं इथे येणं सोपं आहे पण इथलं होणं मात्र अवघड आहे. माबोकर माझा हा ग्रह खोडून काढतील ही आशा आहे.
भेटत राहूच...ओळख करून देण्यासाठी एवढी प्रस्तावना पूरे, नाही का?

खरंय परदेसाई... निशान पडत पडत का होईना, ही रस्सी लवकर जमो हीच इच्छा ! Happy (रसग्रहणात चुकले असेन, तर कृपया समजून घ्यावे! आणि समजावून सांगावे!!)

सानी, समजून घ्यावे वगैरे एकदम नवागतांची भाषा हं, असं बोलु नये. आपल्या रोमात राहुन मिळवलेल्या ज्ञानाची झलक दाखवा पाहु Wink बाकी, मायबोलीवर वेलकम बर्का Happy

सिंडरेला, मला अगं-तूगं करु शकता हं...मी ही करु ना?
वेलकम बद्दल धन्स! ए.वे. भेटून बरं वाटलं...ए.ठी. कधी जमेल, बघूया. कशी वाटली झलक? अजून आठवेल तशी दाखवत जाईन Happy सिंडी... Happy

सानी.... दगड (सील) हा जरी दगड असला तरी त्यावर रस्सी येताना जाताना घासल्यामुळे (विहिरीतून पाणी काढताना) निशाण (खूणा) पडतातच.. तात्पर्य येत जात रहावे आपोआप कळते. आणि लिहीण्यासाठी कळायलाच हवे अशी अट कुठे आहे? Lol

हे बरंय की! एकाने अप्रत्यक्षपणे दगड म्हणायचं आणि दुसर्‍याने प्रत्यक्षपणे 'असं नाही' म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करायचं...:राग:

आणि सिंडी लब्बाड वगैरे नाही बरं...अजून तरी मी बापडी भोळी-भाबडी सज्जन आहे...माबो चे धडे गिरवते आहे...बाकी काही नाही Blush

आज अचानक आठवलं.. गेल्या वर्षीच्या कल्लोळाला काल १ वर्ष झालं.. !!!! म्हणून उकरून धागा वर काढतोय.. Happy

दहा वर्षं झाली या ऐतिहासिक कल्लोळाला.
कल्लोळाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने कल्लोळाला आलेल्यांनी हजेरी लावा जरा मायबोलीवर

Pages