डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

मी आणायच्या वस्तू:
बाई: आर्डी सीडी
रुनी: बोरकुट
मो: अमृतवेल
झक्की: कागद
मेधा: मराठी गाण्यांच्या सीडी
आर्जे: पानिपत

आणि शिट्टीकर Proud

अजून काही नाही ना ? Happy

मी लालू, शोनू आणि आर्जे ची पुस्तकं आणतेय.
स्वाती दतेम मी देते तूला.
शोनू, मालवणी मसाला मला पण चालेल. (अगदी एका वेळेपुरता दिलास तरी आनंदाने घेईन Happy )

कोणाला घरचा गोडा मसाला / काळा मसाला हवाय का?

सिंडे, माझ्याकरता अमृतवेल व्यतिरिक्त तुझ्या आवडीचे अजुन एखादे पुस्तक (म्हणजे मला तु कशा प्रकारची पुस्तके आवडीने वाचतेस, प्रगल्भ वाचक आहेस का फुटकळ हे कळेल :फिदी:). आवडीचा म्हणून तू भेळ खाल्लेला कागद आणला नाहीस म्हणजे मिळवले!!

कोणी कसलाही मसाला (इन्क्लुडिंग मसालेदार बातम्या/गॉसिप) आणला तरी मला नक्की हवाय !! Happy

गोडा मसाला मला चालेल. मालवणी आणते तुझ्यासाठी पण .

मी संध्याकाळीच जाणार आहे. मै, मो, रुनी यांनी मागितलेली अन आर जे , स्वाती यांची परत करायची पुस्तकं पडली ब्यागेत. अजून कोणाला हवी असल्यास लवकर सांगा

स्मृतीचित्रे वाचणारे का कोणी ?

>>>> कसलीही विनंती झक्कींना करावी लागत नाही.. ते बोलतच असतात नॉनस्टॉप<<<<
आश्चर्य आहे! माझा तर बोवा असा अनुभव नाही! Happy
उलट झक्की कसे, मितभाषी, तोलुन मापुन बोलणारे, समोरच्या व्यक्तीचे बौद्धिक अन शारिरिक वय विचारात घेऊनच सन्वाद साधणारे, दूर्जनः प्रथम वन्दितम की कायशा श्लोकाप्रमाणे वागणारे (झक्की श्लोक तुम्हीच सान्गाहो नेमका), कुठेही कसलीही तक्रार म्हणून वा कपाळावर आठी म्हणून न आणता अ‍ॅडजस्ट होणारे असेच अनुभवलेत आम्ही! Happy आमच्या इथे तर त्यान्ना बोलते करायला मला जन्ग जन्ग पछाडावयास लागले होते! Happy
आमच्या पोरीन्ना, तेव्हा खूपच लहान होत्या त्या, हे गोरेगोमटे आजोबा खूपच आवडले होते, इतके की त्यान्च्या आताही लक्षात हेत Happy
बाकी वरच्या त्या श्लोकाला अनुसरुनच ते या लिम्ब्यासमोर जास्त बोलले नस्तिल तर काय माहीत? Wink
असो.
लालू आणी मन्डळी, सर्व सन्योजक्/स्वयन्सेवक/सहभागी, तुमच्या जीटीजीला मनःपूर्वक शुभेच्छा Happy
माझी आठवण काढा हे वेगळे सान्गणे न लगे Happy माझी आठवण काढलीत , तर मला पोच होईल! Happy

अंगाला मसाज करायला>> मसाज करुन यावा गटगला येताना, ईफेक्ट बघुन मसाला वापरावा की नाही ठरवण्यात यील Lol
पन्ना तुच सांग गं.

मज्जा करा!

लाल्वाक्कांच्या शेजार्‍यांचा विचार करून वागा! Proud

झक्कींना जास्त पिडू नका (हे उलटं देखिल!)

धावता वृत्तांत अज्जीबात टाकू नका.

खिशातला/पर्समधला फोन वाजल्यास 'मृण्मयी'चा असं पाहून सायलेंटवर टाकू नका.

धम्माल करालच. पण माझ्या आठवणी वगैरे काढू नका. Proud

रिक्षा हा शब्द 'टाबू' ठेवा! Proud

>> 'मृण्मयी'चा असं पाहून सायलेंटवर
कसं शक्य आहे ते? हे दोन शब्द एका वाक्यात येऊ तरी कसे शकतात? Proud

Pages