डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

लालू तू उद्या गटगचे जेवण (भेळेसारखे) कागदावर द्यावस असे माझे मत आहे, त्यामुळे खरे खोटे वाचक कळण्यास नक्की मदत होईल.

लेटेस्ट स्टेटस :

अटलांटा कंपू १ संध्याकाळी मार्गस्थ होऊन शार्लटच्या जवळ पोचलाय..
अटलांटा कंपू २ : उद्या एकरपोर्टवर कुठे भेटायचं हे ठववून झालं आहे..
शिट्टी कंपू : सिंडीच्या घरी जमून पुरणपोळ्या करतायत म्हणे.. Uhoh
बारा कंपू : अजुन कोणी/कुठे/किती वाजता भेटायचं हे ठरवतायत..

अजुन एक लेटेस्टः
लॅकँस्टर कंपु: बॅग भरुन तयार आहे, सकाळी कूच करणार.
(रच्याकने: या कंपुत एकच कुटुंब आहे :फिदी:)

सगळॆ मज्जा करा. माझी बहिण राजश्री कुलकर्णी सुद्धा येणार आहे विनय देसाई सोबत असं कळवलंय तिनं......!!
वृत्तांत येऊ द्या सगळा Happy

तुम्हा कुणाकडे ल्यापटॉपला वेबक्याम वगैरे नाही का? असेल तर चालू करा की! Happy
आम्ही पण बघु इकडून याची देही याची डोळा!
अन तेवढच हायटेक जीटीजी केल्याचा पहिला मान मिळेल!

ढॅण ट्डॅण, गटग संपवून येत आहे. हे म्हणजे अगदी ट्विट केल्यासारखं लिहितो आहे. सविस्तर वॄत्तांत जाणकार लिहितीलच. पण थोडक्यात पण महत्वाचे म्हणजे ढम्म्माल आली हां सॉलिड.

-झक्कास.

आणी हो. एक खुलासा. तसं पाहिल तर गटग पूर्णपणे संपला असं म्हणता येत नाही कारण चुकीच्या किनार्‍याची मंडळी, दूर दूर होऊन आलेले मायबोलीकर अजून लालूकडे आहेत. पण काय आहे की सूर्य ऊगवला हे कस समजायच? तर कोंबड आरवल की सूर्य ऊगवला. तस गटग एकझॅट सुरू कधी झाल अस समजायच? तर बागराज्याचा मोठा कळप आला की गटग सुरू झालं. आणी गटग कधी संपल अस समजायचं तर बागराज्याचा मोठा कळप परतीला लागला की गटग अधिकॄतरित्या संपल. तसा तो कळप आय ९५ च्या मार्गाने निघाला आहे म्हणून म्हट्ल की गटग संपल. हां. म्हणजे ट्रक भरून माणस आणली होती अनिलभायनी. शक्तीप्रदर्शन केल जोरदार! मायबोलीच्या हिलरी बाय - लालूताय खूष झाल्या एवढी माणसं बघून.

-झक्कास

आम्हीही आत्ताच परत घरी पोचलो. लालूने अतिशय सुंदर व्यवस्था केली होती. जेवण, अगत्य भरपूर होतं Happy . बरीच मंडळी भेटली. बाकिची जाणकार मंडळी लिहतीलच. आम्हाला तासभर(?) उशीर झाला पोचायला, त्यात माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणीकडे ठेवलं होतं म्हणून लवकर निघावं लागलं. मस्त जमलेली मैफिल मोडून यायचं जीवावर आलं होतं. तसंच मैफिल disturb होउ नये म्हणून कोणाला न सांगताच निघालो. Sad मागाहून वाटलं पटकन सगळ्यांना bye म्हणायला हवं होतं. लालूच घरही अतिशय छान आहे Happy खूप मजा आली.

नी,

तुझ्या B'day चा केक आम्ही जायच्या आधीच कापला होता का नाही माहित नाही, पण तुझी आठवण मात्र काढली. Happy

महागटग पार पडलं !!!!!!!
मी ही आत्ता पोचलो घरी.. अशक्य धमाल आली.. झक्की फुल फॉर्म मधे होते.. !!
वृत्तांत येतीलच.. Happy

झक्की फुल फॉर्म मधे होते.. !!>>>>>>>>>>>>>>> ते कधी फुल फॉर्म मधे नसतात? Proud
आधीच GTG त्यात हातात माईक मग काय होणार Proud झक्की, दिवे घ्या हं Light 1

महागटग अप्रतिम, महान झालं !
ही झलकः यावरून गटग च्या महानतेची कल्पना यावी Wink
**एकूण हजेरी (सुमारे) ६०
**वयोगट ० ते ६५+ वर्षे
** माबोवरील आयडींचे कालावधी किमान १ दिवस (कालच आयडी काढलाय असा एक!) ते कमाल १४ वर्षे !!
**अमेरिकेतील ११ राज्यातून उपस्थिती - न्यू जर्सी, न्यू यॉर्क, कनेक्टिकट, मॅसेच्युसेट्स्,पेन्सिल्वानिया, डेलावेअर्, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलायना,टेक्सस, कॅलिफोर्निया, आणि व्हर्जिनिया.
**लोक गटग च्या ठिकाणाहून किमान ५-१० मैल ते कमाल २७००+ मैल अंतरावरून (किमान १० मिनिटे ते कमाल सुमारे ८ तास) प्रवास करून आले होते , त्यातल्या ८०% लोकांनी ३०० मैल् किंवा त्याहून जास्त प्रवास केला. Happy
अजून डीटेल्स येतीलच.... .. Happy
पण लालू आणि कुटुंबीयांनी अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली होती. सग्ळ्यांना भेटून जाम मज्जा आली. लालूचं घर सही आहे एकदम. बहुतेक अजून ५० लोक पण सहज मावले असते तिथे ! Happy
खाण्यापिण्याचा मेनू :
बाराची बस ७ ला निघाली शेवटच्या स्टॉप वरून (विनय च्या घरून) , तिथेच खादडीला सुरुवात झाली. बस मधला मेनू:
वडापाव, कचोर्‍या, हरभरा डाळीचे स्टफिंग घातलेल्या खमंग तिखट पुर्‍या, रिकोटा चीज घातलेल्या गोड पुर्‍या, बाकरवडी , चोकोलेट कव्हर्ड स्ट्रॉबेरीज, द्राक्षे, डार्क चॉकोलेट, फ्रूट केक, आलेपाक, बडीशेप, (तरी पोहे आणि सोनपापडी खायचे राहिली वेळेअभावी!!)

मग लालूकडचा समाचार :
स्टार्टर्स :
चिप्स . मँगो साल्सा, पालक भजी, खेकडा भजी, कचोर्‍या, चटण्या

पेये:
सोडा, ज्यूस, बिअर, मार्गारिटा,मोहितो वगैरे वगैरे

जेवणः
रायता ,बघारे बैंगन, भेंडी मसाला, लालू फेम पांढरा रस्सा, दही वडे, पुलाव, साधा भात, नान
डिझर्टः
रुनि फेम तिरामिसु , मँगो पाय, गुलाब जाम, पराग स्पॉन्सर्ड सकस खव्याच्या पोळ्या.

आणि दुपारी चहा , कॉफी.

क्रमशः Happy

खरंच अशक्य झालं गटग. लालूचं घर अतिशय छान आणि प्रशस्त. एवढी माणसं होती पण कुठेही गर्दी जाणवली नाही. तसंच व्यवस्थाही एकदम चोख. श्री. लालू मस्त रंपा बनवून सगळ्यांना देत होते. शोनूने जाचक आणि खटकणार्‍या प्रथा मोडून बायकाही कमी नाहीत हे दाखवून दिलं. परागलाही लुगडं ब्रिगेडने फैलावर घेतलं. (का ते तो सांगेलच) झक्कींनी पेपरवर लिहिलेलं आहेच की कोणी कुंकु, मंसु,जोडवी घालून संस्कृती पाळली नी ते न करुन कुणी बुडवली. Proud तसंच 'प्रतिकांनाच मुल्य समजण्याची चूक करु नये' हा गटगमधला आवडता कोट होता.
आमचं गटग सकाळी ५.२० पासूनच सुरु झालं. झक्की, स्वाती, नयनीश, मंगेश एकदम वेळेच्या आधीच माझ्याकडे पोचले. तेव्हापासून ते रात्री १२.४५ पर्यंत आमच्या गप्पांना आणि हसण्याला जराही ब्रेक मिळालेला नाही. सगळ्यांना भेटून मजा आली पण खूप जणांशी साधं बोलणंही झालं नाही. देसाईंच्या उ उ वि, स्वाती, मो, नयनीश, झारा यांची गाणी, झक्कास, स्वाती, वेबमास्तर,राजश्री कुलकर्णींच्या कवितांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना बहार आणली. (कुणी राहिलं असल्यास क्षमस्व) बाकी डिटेल वृत्तांत नंतर.

तळटिपः नवीन, जुन्या अ‍ॅडमिनची भेट झाली काल. पण दोघांपैकी कुणीही 'तारेत' वाटले नाहीत बाबा. कुणाला तसं काही जाणवलं असल्यास बिनदिक्कत इथे लिहावं. अ‍ॅडमिन त्यांना मोठ्या मनाने क्षमा करतील अशी आशा नव्हे, खात्रीच आहे.

नेहमी ऐकायची कि गेलेली वेळ परत येत नाही. पण कालच्या ग ट ग ला गेले आणि वाटले कि शाळेच्या सहलीला गेलेय किंवा महाविद्यालयाच्या ग ट ग ला आलेय.अशी भुतकाळात रमतांना थोडी बावरले, नवीन होतेना. पण हळु हळु बोलती झाले, गाणे गायले, कोट्या केल्या. कधी गोंधळ्ले, कधी गडबडले. पण सगळ्यांनी सांभाळुन घेतले. अगदी माहेरी आल्यासारखे वाटले.
काल पहिल्यांदा मायबोलीकरांना समक्ष भेटले. नावांना चेहरे मिळाले. आता लिहितांना थोडी सहजता येइल.

तुम्हांलाही भेटून आनंद झाला. आता नेहमीच इथे येत, लिहित रहा. आणि अधेमधे तुमच्या मिस्टरांना त्यांचं प्रॉमिसची आठवण देत रहा.

मस्तच. वाचते आहे सगळ्यांचेच वृत्तांत. ऐश केलीत लेको. आमची आठवण तरी काढलीत का?
बापरे मैत्रेयी- ८ तास प्रवास?
झक्कास कोण आहे ते कळलं नाही.
सायो- मस्त वृ. परागला का फैलावर घेतलं ? स्वाती आणि झक्की आणि तू निघालात हा मेसेज काल वाचला आणि जीव भांड्यात पडला. तुम्ही एकाच वेळी निघुन भेटु शकाल असं तुमच्या पोस्टींवरुन अजिबात वाटत नव्हतं Proud

लालु- अभिनंदन.

रैना, सगळ्यांची आठवण काढली. कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली. ह्यात कोण कोण आलं ह्याची मेल नंतर करते.
बाराहून आम्ही साधारण ७,८ तास प्रवास केला. शिट्टीहून येणार्‍यांचा प्रवास त्यापेक्षा थोडा जास्त. अट्लांटाहून येणार्‍यांचाही बहुतेक तेवढाच असावा. लॉस एंजलिस, कॅल. हून येणारे अ‍ॅडमिनदादा, झाराकाकू, आणि सशल युवती हे उडत उडत आले. डॅलसहून सीमा तसंच अ‍ॅट्लांटाहून परागही उडत आला. अंजलीही फ्लाय करुन आली होती का? काहीही असो, सगळ्यांनी अगत्याने येऊन महागटग यशस्वी करण्यात हातभारच लावला.
झक्की, नयनीश आपापल्या घरातून सकाळी ४.४० लाच निघाले होते आणि अगदी वेळेत मजह्याकडे पोचले. त्यामुळे शिट्टीकरांच्या बसच्या आधी बाराकर पोचून सेटल झालेही होते, हे काय सांगायला हवं. त्यामुळे एक प्रॉब्लेमच काय झाला की झक्कींना ओवाळायला शिट्टीतल्या सात सुंदर सुवासिनी हजर नव्हत्या त्यामुळे ते जरा खट्टु वाटले. Proud

अंजली आणि सिमा मधे माझा अजूनही गोंधळ होतोय..
अंजली म्हणजे तिच ना.. जिला मी तू सिमा का असं विचारलं होतं ?? Proud

आम्हांला काय माहित? Wink
अंजली म्हणजे ब्लू सलवार कमीजवाली आणि सीमा म्हणजे ती, जी सारखी कपडे बदलत होती नी मला दोन प्रॉब्लेम आहेत असं म्हणाली. Proud

Pages