डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऐन वसंतात एका वेळी...

कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-

१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्‍यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्‍या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.

विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357

वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344

आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359

डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360

लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363

डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365

वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406

डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्‍यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435

कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405

आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665

विषय: 
प्रकार: 

एका हत्तीवर एवढी लोकं मावायची नाहीत. फारतर बसवर हत्तीचा फोटो लावायची विनंती करता येईल. Wink फक्त गाडी हत्तीच्या स्पीडने जाऊन चालायचं नाही.

सायो, अगं हत्तींची कपॅसिटी असते खूप वजन उचलायची आणि सगळ्यांनी कुठे एका हत्तीवर बसायचंय, ३-४ हत्ती करायचे. हाकानाका. हत्तीवर माबोचा लोगो पेंट करून टाकायचा.

असा जिटीजी गेल्या १० हजार वर्षात झाला नाही.>> अच्छा म्हणजे ऋतू जरी वंसत असला तरी बाकी सर्व जख्ख म्हातारे होते Happy

फार्फार्फार्फार धम्माल केली. लालू आणि कुटुंबियांना अनेकानेक धन्यवाद. खूप मस्त व्यवस्था होती.

शिट्टीकरांचे शुक्रवार संध्याकाळपासून सुरु झालेले गटगचे अनेक राउंड्स झाले. (बहुतेक) शेवटचा अजून सुरु आहे Happy आमचा 'शिट्टी' वृत्तांत लवकरच येइल Happy

जबरी मजा आली. लवकरच सगळ्यांची पुन्हा भेट होइल अशी आशा. आता पटापट वृत्तांत येऊ द्यात Happy

अरे बी थाम्ब ना, धीर धर थोडा, अजुन सविस्तर वृत्तान्त यायचेच आहेत, कळेल सगळे! Happy
>>>अजुन सविस्तर वृत्तान्त यायचेच आहेत,>>><<< या ऐवजी मी चूकुन "अजुन पोत्यात जाऊन बसायचेच आहे", अस लिहील होत आधी Proud Light 1

६० मायबोलीकर्स!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ग्रेट!!!

खरच कल्लोळ उडाला असेल तिकडे.

लालु अभिनंदन Happy

लालु अभिनंदन Happy
तुझ्या पुढच्या देशवारीत एक महागटग मायदेशातही व्हावे हीच आमची सदिच्छा Happy (रैना, घे मनावरच आता :फिदी:)

लालू,

खूप मजा आली परवा. मी आलो तुझ्याकडे ते नवीन मित्र आणि पांढर्‍या रश्शाच्या वेडाने. काय छान कार्यक्रम झाला. कोण कसे दिसते ते तरी कळले. सर्वच आता आठवत नाहीत, पण बरेच नावाने आठवत आहेत. काढलेले 'फोटू' जरा कोणी वर चढवा की हो... त्याखाली नावे/टोपण नावे लिहिली तर बरे होइल.

लालू, एक धककाच बसला मला. चक्क झक्कासने पांढरा रस्सा भातावर ओतुन खाला. त्याला तरी मी सांगीतले की ती गुजराथी 'कढी' नाही, चिकनचा रस्सा आहे म्हणुन.... तरी....

बागेतल्या लोकांनो, कधी तुम्ही बागेत काही आयोजले तर सांगा आम्हाला. आम्ही येउच तिकडे. आम्हाला एक गाडी खूप झाली.

असेच आपण भेटत जाउया.

तुमच्या सर्वांचं,

कार्ट....

नमस्कार.
ठिकठिकाणाहून आलेले मायबोलीकर आपपल्या घरी व्यवस्थित, सुखरूप पोचले ना? तब्येति ठीक आहेत ना? सुमॉ, तुमच्या लेकीची तब्येत सुधारली का?
बाकी धमाल मजा आली. लालू व श्री. लालू यांची कमाल!! सगळे जण त्यांचे घर मोठे होते म्हणताहेत, पण त्या दोघांनी तयारी किती जय्यत ठेवली होती, किती कष्ट केले असतील याचाहि विचार करावा. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. जवळपास रहाणार्‍यांनीहि त्यांना मदत केली असेलच, त्यांचेहि आभार.
विशेष म्हणजे वेबमास्टर व अ‍ॅडमिन सुद्धा आले होते. त्यामुळे कार्यक्रमाला एकदम भारदस्तपणा आला. (माझ्या वागण्यावर पण जरा वचक आला, फार नाही, पण थोडा तरी!)
इतक्या दुरून केवळ मायबोलीवरील प्रेमाखातर इतके लोक इतके कष्ट घेऊन आले, फार फार आनंद झाला. केवळ आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे असेच वातावरण होते तिथे.

हाय सगळ्याना, खुप मज्जा आली गटगला. Happy
मी मनात विचार केल्या प्रमाणे सगळे मायबोलीकर दिसत नव्हते. मी मनात कसा विचार केलेला ते आता मला फार सांगावस वाटतय पण आता राहुदे. Proud

लालु आणि धनंजय या दोघांच्यावर कौतुकाचे शब्द लिहिण्याठी मला शेवटी एक लेखनिक हायर करावा लागेल अस वाटतय. कारण कितीही लिहिल तर कमीच वाटतय आणि आता माझे हात दुखताहेत. :)(तीन दिवस आयत जेवुन , निवांत राहुन काम करण्याची सवय मोडली.:P)
ए आणि मला पाच तास लागतात डॅल्लस हुन पोहोचायला. तीन नाही. Happy

बिंधास सांग सीमा. (सीमाकडे बघून तिला इतके सुबक गुलाबजाम आणि कुक्या करता येत असतील असे मला पण नाही वाटले :फिदी:)

लालु आणि अँडी तुम्ही आयोजित केलेल्या गटग त संमिलित होवुन फार मजा आली. नविन लोकांना भेटले.
सीमा, सोया, अनिलभाई, झक्कस, झक्कि, स्वाती आ, स्वाती दां, वैद्यबुवा, वृंदा, पन्ना, शोनू तुमच्याशी तोंडओळख झाली. बर्‍याच गप्पा मारल्या. आता ओळख विसरु नका. लिहिणे माझे कमीच पण वाचत रहाणार आहे.
सीमा तुझ्याकडुन घेतलेल्या बीया कालच कुंडित टाकल्या. रुजल्या कि कळविन. Happy

लई मज्जा आली..
लालू आणि श्री. लालूंनी मस्त ऑरगनाईझ केलेलं... इतकी लोकं आहेत म्हणून कुठे गोंधळ नाही (जमलेल्या लोकांनी केला म्हणजे गोंधळ - पण व्यवस्था एकदम चोख!)

बादवे, मी झक्कींची फॅन झालेय गटग पासून... मिनी ही आहे माझ्या बरोबर.. झक्की फॅन क्लब सुरु करावा म्हणतोय दोघी मिळून... कुणी जॉईन करण्यात इन्टरेस्टेड असेल तर इथे/विपूत लिहा.. Happy

मला सायोच लिहायचे होते, पण म्हटलं बघुया तु वाचतेस कि नाही. हा हा हा. मला चेहरे कसे टाकावे ते महित नाही अजुन. Sad

धमाल आली. Happy
लोकल माबोकर रुनी, नितीन, स्वाती, झक्कास, सुमंगल, कार्टा आणि काही इतर माबोकर नसलेल्या मैत्रिणींचीही खूप मदत झाली. त्यांना आणि उपस्थित राहिलेल्या सर्वांना धन्यवाद!
कालपासून एकदम सुनं सुनं वाटत आहे.
लिहीन अजून...

कालपासून एकदम सुनं सुनं वाटत आहे.>>>> ऐका रे लालू काय म्हणतेय. पुढच्या वेळेपासून आपण सगळी गटग तुझ्याकडेच करुन घरं जागतं राहील ह्याची खबरदारी घेऊ. Proud
आमच्याकडे भविष्यात एक मायबोलीकर होऊ घातलाय. माझी लेक. काल विचारत होती की आपल्या घरी मायबोली गटग कधी ठेवायचं म्हणून. Happy
रोमातल्या परंतु गटगला आलेल्या मेंबरांना दोन शब्द लिहून आपली उपस्थिती आणि अनुभव लिहिण्याचं आवाहन.

Pages