पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

इथे काव्य संपले दोन ओळीत सारे
चालीत त्या मग वाचले पुढचे उतारे

सगळ काही चालीत वाचण्याची सक्ती कशाला
गझल नावाचा वेगळा विभाग केलाय ना त्याला

चालीत शब्द गाता गाता मुळ अर्थच विसरलो
आयुष्याचा अर्थ कळायची वेळ आली तेव्हा जीवनात नाही उरलो

वादळाने तुझी छत्री उडाली, वाटलं द्यावा तुला आधार
पण माझ्या छत्रीलाही भोकेच होती म्हणून घेतली माघार.

पहाटेच्या स्वप्नामध्ये तुझे चुंबन घेतांना
बायको ओरडली चला उठा, ऑफिसला जाताय ना!

सुरात सुरांना गुंफवुनी
तिने छानशी वेणी घातली
झटक्यात उडवता हातानी
वेणी पाठीवरती नाचली

हसताना तुझ्या गालावर
छानशि खळी पडते
आणि तुला पाहताना
माझी नजर तिथेच अडखळते
----- तुषार

लग्न झाल्यावर

तो बायकोचे नांव बद्लतो
नवराच हुषार भारी
साद बायकोला
मनात प्रेयसीलाच स्मरतो

---- तुषार

चार पायांच्या चारोळ्या
दोन पायांच्या दोळ्या

एक पायाच्या पांगोळ्या
काहिच नाही त्या वाटोळ्या

सत्यजित
तुझ्या वेणी च्या चारोळीने
माझी एक कविता तयार झाली

कविता मधे जाउन पहा

---- तुषार

निरोप तुझा घेतो म्हणालो तरी
पाऊल तिथून निघत नाही,
शरीर कदाचित ऐकेलही पण
मन मात्र मानत नाही.

*****

विसरायचा प्रयत्न फार केला
परत परत समोर येतेस,
सहवासातल्या धुंद क्षणांचे रंग
अचानक उधळून जातेस.

*****

प्रीतीची कबुली दिली नाहीस तरी
एक चूक नेहमी होते
शब्दांना कितीही रोखलस तरी
नजर सारं काही सांगून जाते.

*****

उत्तरे शोधायच्या नादात
अनेक प्रश्न निर्माण झाले,
पुरता रिता झालो आज मी
जे होते ते सर्व गेले.

प्रदिप राणे.

केवळ अप्रतिम! एकदम सही. लगे रहो!

एका बेसावध क्षणी
अचानक ती समोर आली,
लपवलेल्या वेदनांची
क्षणात सुंदर गझल झाली....

******

तुझ्यासवे पाहिली आहेत
भविष्याची स्वप्ने नवी,
वाट खडतर असली तरी
चालताना तुझी साथ हवी.....

******

सांगायचे होते बरंच काही
शब्दच सापडत नव्हते,
अखेर विचार सोडून दिला
तुला ते केव्हाच उमगले होते....

******

तार छेडीली कोणीतरी
एका निद्रिस्त सतारीची,
पुन्हा आठवण झाली
त्या क्षणाची,त्या मनाची....

******

प्रदिप राणे.

त्या क्षणाच्या आठवणीने
अंग अंग मोहरले
तार छेडता सतारीची
जीवनगाणे बहरले...

छेडल्या तारा तिने
लावुनि खोटी नखे...
उमटल्या सुरांसवे मी
कुरवाळीली माझी सुखे...

छेडु नको तारा नखे लाउन
हळुवार बोटांची अपेक्षा आहे
सुरात तुझ्या बेभान होण्यासाठी
माझ्या तालांची साथ आहे.

तालामध्ये माझ्या हरवताना
तु आपले मीपण विसरुन जा
हळुवार स्पर्श होऊदे तुझा मनाला
अर्थ मीळुदे माझ्या जगण्याला

मी विसरीनही माझे "मी"पण
पण तुझ "अहं" कसा मरेल ...
मी जळेन, विझेन, सरेनही
आणि तुझा मात्र प्रकाश उरेल ...

तु जळुन, विझुन, सरल्यावर
अर्थ काय उरेल माझ्या प्रकाशाला
फिरत राहीन अनंतात या
ज्योतीवीना उरलेल्या दिव्यासारखा

अरे दिव्या तुला काय
दुसरी ज्योत मिळुन जाईल...
उरलीसुरली आठवण माझी
माझ्यासारखीच जळुन जाईल...

इथल्या प्रत्येक घराचा
तोच इतिहास आहे,
कैकयीच्या हट्टापायी
रामाच्या नशिबी वनवास आहे.

******
समानता तुझे ब्रीद
भेदाभेद आम्ही करतो,
एखाद्या व्ही.आय.पी. साठी
भक्तांवर अन्याय करतो.

******
आजकाल सर्वत्र
कुत्र्यांचीच चर्चा आहे,
उद्या त्यांचा आझाद मैदानावर
जंगी मोर्चा आहे.

******
शेळी म्हणाली वाघाला
आपण दोघे बहिण-भाऊ,
कितीही भूक लागली तरी
दादा,मला नको खाऊ.

******
काल रात्री स्वप्नात
माझ्यावर ओरडत होतीस,
सकाळच्या भांडणाचा राग
रात्रभर काढत होतीस.

******

प्रदिप राणे.

अहा.. मस्त स्वरूप .. बन्डोपन्त
चांगलं चाललंय...:)

चांदण्यांच्या कळ्या नभी
उमलल्या गीतातुनी
चांदणे झरले तुझ्या
स्वप्नातल्या स्मितातुनी

तुझे स्मित स्वप्नातले
वेड लावुन गेले जीवाला
स्पर्श होताच तुझा मनाला
विसरुन गेलो मी या जगाला

ती :

नुसती रंगवु नकोस्स स्वप्ने
करुन दाखव काही वेगळं...
उद्या कदाचित उशीर होइल
यायला लागलीत मला स्थळं...

तो :

वेगळे करायचे असते काही
तर केले असते मी कधीच
पण माझ्यामध्ये गुंतली आहेस तुही
तेव्हा माझी जाहली आहेस तु आधीच

नको सोडउस नात्यामधिल गुंतागुंत
अनुभवशिल तु रखरखीत एकांत
प्रेम भरल्या माझ्या सोबतिने
जाळे विणु आपण नखशिखांत

आता इथला प्रत्येक किल्ला
तसा जुना झाला...
प्रेमवीरांनी इतिहास पुसून त्यावर
त्याच्यां नावाचा चुना लावला.
: गणेश(समीप)

Pages