IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी जखमी झालाय. १० दिवस खेळणार नाही. १० दिवस रैना कर्णधारकी करणार. मद्रासच्या संघाला धोनीच्या अनुपस्थितीचा जबर फटका बसेल. काल त्याच्यामुळेच तर १४ षटकात ३ बाद ८१ वरून ते १६४ पर्यंत पोचले.

आज दिलो दिमाग में जंग है! मी मुंबई इंडीयन्सच्या बाजुला आहे पण दिल्ली डेअरडेव्हीलस खरच चांगली टीम आहे. असो.
राज ठाकरे सोडुन सगळे तिवारीचा गेम enjoy करत असावेत! Happy

.

रोहन गावसकरला सुनील गावसकरच्या 'दहशती' मुळे घेतात का? याने इतिहासात कुठे दिवे लावलेत???>>>>

तो आय सी एल चा हीरो होता!!! आय सी एल बद्दल अधिक माहिती कुठेही मिळणार नाही.. शोधू नका Proud

मुंबई रॉक्क्स!!!! आजच्या मॅचमधे २१९ चे टारगेट दिले आहे. दिल्लीच्या सहा विकेट्स गेल्या आहेत.

कोलकाताच्या टीमची कौन बनेगा कोच टाईपच्या अ‍ॅड बघितल्या का??? धम्माल आहेत. शाहरूख रडून रडून अब मुझे चाहिये पूरे इंडिया का साथ वगैरे बोलतोय..

(एलबीडब्ल्यू संदर्भात) टोणगा, हो अंपायर ची लाईन ऑफ साईट कॅमेर्‍यात अजूनही अचूक येत असेल असे वाटत नाही. आता बर्‍यापैकी त्याच्या डोक्यावरून घेतात तरीही. दुसरे म्हणजे तोच कोन जरी मिळाला तरी तेवढी माहिती डोक्यात घेउन प्रत्येक बघणारा विचार करेलच असेही नाही - म्हणजे बोलर ने स्टंपच्या जवळून टाकला की क्रीजच्या कडेने, स्विंग किती होउ शकला असता वगैरे माहिती चांगले अंपायर बरोबर लक्षात ठेवतात. तो नंतर ग्राफिकल व्ह्यू दाखवतात त्यात या गोष्टी किती अचूक "सिम्युलेट" करत असतील माहीत नाही.
रेफरल मधे आता एलबी सुद्धा करतात बहुतेक. नक्की माहीत नाही. पण तो अंपायर वर अन्याय आहे. अंपायरला नीट दिसू न शकणार्‍या किंवा नीट ऐकू येउ न शकणार्‍या गोष्टींबद्दल ठीक आहे.

यावरून ही एक लिन्क बघा - अक्रम चा बॉल राउंड द विकेट आणि तिरप्या हाताने टाकलेला, शेवटी शेवटी स्विंग झाल्यामुळे बहुधा एल बी डब्ल्यू होता असे ही क्लिप बघताना वाटते, पण त्या वेळेस रिव्हर्स स्विंग फारसा प्रचलित नव्हता तेव्हा अंपायरला कदाचित वाटले असेल जुना बॉल असा स्विंग होणार नाही, किंवा नजरेत पकडता आला नसेल. एकूण एकदम इंटरेस्टिंग आहे.
http://www.youtube.com/watch?v=FQOzWn_WlCQ

मुंबै जिंकले... Happy सचिन जबरी खेळला..ब्रावो च्या २ विकेट्स महत्वाच्या ठरल्या..
पण गंभीर जखमी झालाय.. Sad

गम्भीरच्या गैरहजेरीत दिल्लीकर फारच गांगरून गेलेले दिसले. वास्तविक गम्भीर समजा शून्यावर आ ऊट झाला असता तर काय केले असते? त्यांनी एकदम दिल टाकले. मुम्बैवाले चांगलेच खेळले. आता नवीन दोन खेळाडूंमुळे मुम्बै स्ट्रॉन्ग झाली आहे. आगरकरला घेतलेले नाही का? सध्या मुम्बैवाल्याना तोड नाहीए.

मुंबई इंडियन्सची टिम आता मस्त टिम झाली आहे... नव्याजुन्यांचे उत्तम मिश्रण,विविध प्रकारची गोलंदाजी करणारे गोलंदाज , तुफान मारणारे फलंदाज,उत्तम क्षेत्ररक्षण,तेंडुलकरचे प्रगल्भ आणि प्रेरणादायी नेतृत्व... या वेळी नक्की मारणार आयपीएल... Happy

आगरकर केकेआरच्या टिममध्ये गेले दोन आयपीएल होता.. यावेळची परिस्थिती माहित नाही..

नाहीतर २० ओव्हर्स मधे २५०-३०० पण करतील
>>
भारताच्या पहिल्या टी२० सामन्यातलं पहिलं षटक आगरकरनी टाकलं होतं...
आणि ते निर्धाव होतं...

सतत संघातून आतबाहेर करवल्यानी सडलेला खेळाडू = अजीत आगरकर...

तेंडल्या फुल्ल फॉर्म मधे आज...
जयसूर्याचा कॅच ... निव्वळ अशक्य..... खरखुरा कार्बन कमाल कॅच...>> अनुमोदन. सही बॅटिन्ग का शान दार
प्रदर्शन. एक बेहतरीन म्याच. मनो वैज्ञानिक दबाव आलाच नाही कारण मुम्बैच जिंकणार हे समजलेच. काय सिक्सर्स व फोर्स वा वा. आज रॉ वर्सेस रॉ. दळण म्याच असेल काय?

आज रॉ वर्सेस रॉ. दळण म्याच असेल काय? >> अशीच भिती वाटतेय. फक्त पठाण जरी पेटला (आणि टिकला) तरी डोळ्यांचे पारणे फिटेल.

जयसूर्याचा कॅच ... निव्वळ अशक्य..... खरखुरा कार्बन कमाल कॅच...>> खरय आणि साहेबांचा पहिला चौकार, निव्वळ अफलातून Happy

काल मुंबईने कितीही धावा केल्या तरी भिती होतीच. सेहेवाग नावाचा दैत्य काल जास्त काळ टिकला नाही (गंभीरही नव्हता त्यात) म्हणून सामना जिंकण्यास कमी त्रास पडला असावा.

दळण म्याच असेल काय >> दळणचं. पण मनिष पांडे, विराट कोहली मुळे थोडी सुसह्य. ह्या दोन्ही टिम मला आवडत नाहीत.

अरे मल्याच्या लोकांना एवढे गये गुजरे समजू नका... कॅलिस ऑरेंज कॅपचा नं १ कंटेंडर आहे... तो सध्या सुटलेला आहे... धुतोय नुसता.. आज काय करेल ते मात्र माहित नाही..

Pages