IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०११ पासून अजून दोन टीम.

पुणे- सहारा
कोचि- रान्देवू स्पोर्ट्स. Happy

दादा आपला फेवरेट आहे. आयएपीएल मधे त्याची टीम जिंकत नाहई कारण तो नतद्रष्ट शारूख. त्याच्यभ पापाचा भार दादाला घ्यावा लागतोय.

दीपांजली प्रचंड अनुमोदन.
काल शेन्वार्न च्या चेहर्‍यावर टेन्शन पाहिलंत? जिंकवले एकदाचे रॉयल्स.
काल नीतावहिनी नव्हत्या. का बरे? काय विकेटी पड्ल्या मुम्बैच्या? जयसूर्याला ग्रहण लागले आहे का? लगेच आवट होतो बरें!

कर्णधार बदलल्याचा दिल्ली आणि पंजाबला फटका बसतोय. युवराज तीनही सामने अयशस्वी ठरलाय. सेहवाग ५ पैकी दोनच सामने चांगले खेळलाय. तो आणि सेहवाग दुर्मुखलेल्या चेहर्‍याने खेळत आहेत. त्यांच्यात अजिबात उत्साह दिसत नाही. युवराजच्या जागी आणलेला संगक्कारा सुद्धा तीनही सामने अयशस्वी ठरलाय. निदान गंभीर जखमी असताना तरी सेहवागला कर्णधार करायला पाहिजे होते.

मुंबईइंडियन्सच्या ११ मधे २ नाही ३ मराठी आहेत्..झहीर खान...श्रीरामपूरकर.
४ परदेशी सोडले तर उरलेल्या ७ मधे ३ . हे मुंबईतल्या मराठीच्या प्रमाणातच आहे. शेवटी (की आधी?) ते मुंबई इंडियन्सआहेत.
मनसे वाले जागे आहेत पण घोकताहेत..VT नाही छत्रपती शिवाजी.
शाहरुख जिंकणार की सौरभ?KKR जिंकले तर, दीपांजली, केदार, अश्विनी मामी तुमचा शाहरुखवर राग का? क्रिकेट्बाह्य कारणांमुळे का?

जॅक कालिस वर ब्लॅक मॅजिक करायला हवे. ४ मॅचेस पण अजून नाबाद.
अजित आगरकर आहे अजून रणजीत बॅट जास्त बॉल कमी चालला. लॉर्ड्स वरचे शतक तो पण विसरला नाहिये.
चामिंडा वास ने काय केले रिटायर झाल्यावर? हे रिटायर खेळाडू इथे कसे मस्त चालताहेत् हेडन, गिली, कुंबळे, वॉर्न (जादू कमी झाली), सायमंड्स्,आता वास. फ्लिंटॉफ कुठे गेलाय? ब्रेट्ली परत रिटायर्ड हर्ट मैदानात उतरण्यापूर्वीच.
गुरुजी गंभीर ची जागा भरयला दिल्शान का नको? तो लन्केचा २०-२० च कप्तान आहे.

काल नीतावहिनी नव्हत्या. का बरे? >> नीता वहिनी होत्या की. मुकेश दादा पण होते.
कटरीना दिसेल अशी खूप अपेक्षा होती पण ती आली नव्हती बहुतेक.

बाकी IPL मैदानात बघायला मजा आली. मॅच थोडी थरारक झाली असती तर अजून मजा आली असती. रॉयल चॅलेंजर्स सहज जिंकल्याने आणि रात्री १० नंतर मैदानातलं संगीत बंद झाल्यानं नंतर थोडी कंटाळवाणी झाली मॅच. १० नंतर मुंबइच्या झांजपथकानं थोडी रंगत आणली. मल्ल्याच्या चीअरलीडर्स (मिसचीफ गर्ल्स) मस्तच wink.gif. पण १० नंतर DJ बंद झाल्यानं त्याही कंटाळल्या. DJ शिवाय काय चीअरलीडिंग करणार?

सचिन अगदी ९८ मधल्यासारख खेळतोय

बिचर्या केकेआर ची दया येते कधी कधी Happy

कॅप्टनच प्रत्येक मॅच घालवायला लागलाय

मान्झी जो नाव डुबोये उसे कौन बचाये Sad

मस्त जिंकले मुंबई इंडियन्स... साहेब पुन्हा एकदा फॉर्मात येऊन खेळले.. कसले सहज शॉट मारत होता सचिन..कुठेही एक्स्ट्रा एफर्ट्स नाहीत.. बिच्चारा इशांत शर्मा!! सचिनने सगळ्यात जास्त धुलाई केली त्याची..
मुंबईची बॉलिंगही चांगली झाली...

गांगुलीने घेतलेला कॅच कमाल...

एकुणात मजा आली मॅच पहाताना Happy

गो इंडियन्स. काल वहिनी दिसल्या. मुंबैची टीम जिंकायला हवी यावर्शी. चार्जर्स पण जिंकले. डीडी ला काय झालेय?

मला मॅच बघताना लै बोर झाले.. Sad गेल, गांगुली टेस्ट मॅच अस्ल्यासारखे खेळत होते..
सचिन तर फॉर्म मधे आहेच.. पण बाकी मजा आली नाही..

खरी मॅच झाली ती पंजाब आणि चेन्नै.. एकदम मस्त.. सुपर ओव्हर, मुरलीच्या विकेट्स, युवीची रिव्हर्स स्वीप.. क्या बात है..

लोकहो desilive.tv वर फक्त ४ $ मध्ये जे सर्व सामने आणि ४१ देसी चॅनेल्स दिसतात. दर्जा ही चान्गला आहे

त्यादिवशी वॉल द्रविडने आणि काल चक्क दादामहाराजांनी हनुमान उडी मारून एकहाती झेल घेतला. क्या बात है. झेल घेतल्यावर राहुलचे भाव म्हणजे गौतम बुद्धाचा नृसिंव्हावतार व्हावा तसे.
सचिनला कोणीही डोईजड झालेले चालत नाही. काल त्याने मुरली कार्तिकला पुढे येऊन त्याची जागा दाखवली. दुसरा कोणी असता तर् म्हणाला असता याची षटके सोडून देऊ.
but sachin is too good a human being to be a captain. तो टीम मेंबर्सना ओरडणार कसा . बरं ओरडला तर आवाज असा की ओरडतोय असे वाटणार नाही. डोळे दाखवणे पण त्याला जमत नाही.(बघा कुंबळेकडे)
झहीरचे यॉर्कर बघून नॉस्टल्जिक होतो आपण. मी त्याचा पंखा आहे, आणि त्याला २०-२० मधे मार खातान बघून जीव जळायचा इतका की त्याने २०-२० खेळू नये असे वाटावे. पण तरी त्याची एकॉनॉमी ७ पेक्षा कमी आहे.
बंगळूरविरुद्ध शेवटच्या चेंडूवर २ धावा घेताना तो इतका जोरात पळाला की मला काळजी की कुठे लचक भरली तर.. भारताकडे सध्या तो एकच बोलर आहे. बाकी इशांत, श्रीसंत, आरपी,प्रवीण्कुमार नेहरा ४-५ महिन्यात कधीतरी एकदा ४-५ चांगले चेंडू टाकतात. बाकीचा वेळ ते धुणीभांडी करायलाच बरे!

गेल, गांगुली टेस्ट मॅच अस्ल्यासारखे खेळत होते...>> ही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कमाल होती असे मला वाटते.. त्यांनी व्यवस्थित ब्लॉक होलमध्येच बॉलिंग केली त्यामुळे कोलकातावाल्यांना ते झेपले नाही. गेलसारखा फलंदाज मिळालेली संधी उगाच सोडणार्‍यातला नाही.. त्याला तशी संधी फार क्वचितच मिळु दिली मुंबईवाल्यांनी... काल मुंबई इंडियन्स्च्या बॉलर्सनी यॉर्कर डे साजरा केला.. Happy

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कमाल होती >> हो. सगळे बॉल लो फुलटॉस किंवा यॉर्क ते ही लेग स्टम्पवरच ही स्ट्रॅटेजी होती, त्यामुळे रन्स कमी झाले.

सचिनच्या धोतराची उठाठेव करणारे सचिनद्वेष्टे आज कुठे गेले? त्याचे धोतर धुवायला गेले का?

साळवी जी , ते माझ्याबद्दल बोलत आहेत. कालच्या म्याचीत साहेबांचे धोतर एकदम टाईट...

गुर्जी , आणि कृष्ना मी साहेबद्वेष्टा नाही हो. मी सायबाचा फ्यानच आहे. ती अपली एक गम्मत असते.... Happy

सचिन राव, असं काय करता राव. अजून IPL संपायची आहे अन अगोदरच मुंबई इंडियन्स ने ट्रॉफी कशी काय जिंकली?

राजस्थान मस्त खेळले काल... शॉन टेट ने चांगली बोलिंग केली.
युसुफ पठाण ने बोलिंग कडे लक्ष द्यावे.. काल पण २ विकेट्स मिळाल्या त्याला.

Pages