IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे जिंकले एकदाचे. तो तेंडल्या २१३ रनचे बॅकप मिळाल्याने सारसबागेत फिरावे तसे आरामात ग्राउन्डवर फिरत होता. आप्ले नम्बर वन तुम इदर जाव, नम्बर २ तुम उदर जाव असे. (के एन सिंग सारखे.) युसूफ पठानच्या फास्ट शतकाने तेंडुलकराचे धोतर सुटावयास आले हो ! Proud

हातात धोतराचा सोगा धरून तो मैदानभर पळत सुटो लागला. पुढे धरावे तर मागचे सुटते की काय. मागचे आवळावे तर तर पुढचे निसटते की काय असा बाका प्रसंग! अन तो यवन युसूफ अबदाल्यासारखा कत्ले आम करों लागला की हो.... मुखचन्द्रमा पादत्राणांचा प्रहार केल्यासमान दिसों लागला. घशास कोरड पडली. 'तिकडे' जाण्याची भावना होऊ लागली. धोतराचा 'पीताम्बर' होतो की 'श्वेताम्बर' राहतो याचा घोर लागला...

अखेर मलिंग्याने पंच्याचं धडुतं फेकलं ते कसंबसं गुंडाळून माईक पुढ आला.....
(आयपीएलची बखर मधून. )

Proud Proud Proud

>>> युसूफ पठानच्या फास्ट शतकाने तेंडुलकराचे धोतर सुटावयास आले हो !

पठाण जबरी खेळला. शेवटच्या १० षटकात विजयासाठी १४४ धावा हव्या असताना त्याच्यामुळे RR ना १३९ धावा करता आल्या. फक्त ५ धावा कमी पडल्या.

भज्जी जायबंदी असल्यामुळे गोलंदाजी करू शकला नाही. फक्त झहीर व मलिंगावर सगळा भार पडला. बाकीचे सर्व गोलंदाज फालतू निघाले. पठाण लेगसाईडला तगडे फटके मारत असताना व तेंडल्याने ऑफसाईडला जास्त क्षेत्ररक्षक लावले होते तरी सर्वजण त्याला लेगला पायावर फुल्टॉस देऊन षटकारांची मेजवानी देत होते. जयसूर्याने सुद्धा आपले सर्व ६ चेंडू लेगवरच टाकले. अशा गोलंदाजांसमोर तेंडल्या काय करणार बिचारा !

हा पठाण नक्की काही उपयोगाचा आहे काय? २०-२० मधे आणि बर्‍याच देशी मॅच मधे मध्यमगती गोलंदाजी धू धू धुतो. पण आंतरराष्ट्रीय मॅचेस मधे आणि जेथे खरी फास्ट बोलिंग आहे तेथे फारसा काही करताना दिसत नाही. त्याच्याकडे खरे स्किल असेल तर पुढच्या वर्षी वर्ल्ड कप मधे भारतात प्रचंड उपयोगी ठरेल, पण अजून वन डे मधे चमकला नाही फारसा असे दिसते (लक्षात नाही). प्रत्यक्ष खेळताना बघितलेल्यांचे काय मत आहे?

टोणगा, बखर छान. अशी बखर लिहीलीत तर प्रत्यक्ष सामना बघण्यापेक्षा बखर वाचण्यातच मनास अधिक संतोष पावेल.
Happy

>>> हा पठाण नक्की काही उपयोगाचा आहे काय? २०-२० मधे आणि बर्‍याच देशी मॅच मधे मध्यमगती गोलंदाजी धू धू धुतो. पण आंतरराष्ट्रीय मॅचेस मधे आणि जेथे खरी फास्ट बोलिंग आहे तेथे फारसा काही करताना दिसत नाही.

पठाण, रोहित शर्मा इ. Super Star हे IPL च्या गल्लीतले दादा आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अजून त्यांना फारसे काही करता आलेले नाही.

आंतरराष्ट्रीय दादानी तरी काय दिवे लावलेत तिथे ? टेन्दुलकर, ड्रविड, युवराज, गंगूबाई,कुम्हळे,शाइवाघ, इल्ले.....

आंतरराष्ट्रीय दादानी तरी काय दिवे लावलेत तिथे ? टेन्दुलकर, ड्रविड, युवराज, गंगूबाई,कुम्हळे,शाइवाघ, इल्ले.....

>>>
हाहाहा ....बहुतेक मल्ल्या आता द्रविडची 'कम्बलपिटाई' करेल असे वाटते. (कम्बलपिटाई म्हणजे अंधारात काम्बळे अंगावर टाकून बुकलून काढणे . म्हणजे बुकलणारे ओळखता येत नाहीत :फिदी:)

निदान सचिन आणि दादाची कप्तानी तरी ठीक झाली....

मामी बंगलोरला मुळात जिंकायचेच नव्हते. तसे ते ठरवूनच आले होते. त्यामुळे कलकत्त्यावाल्याना जिंकन्याशिवाय काही इलाजच राहिला नव्हता. बंगलूरवाले बहुधा किंग फिशरचे मद्य पिऊन बॅटिंग करत असावेत. टेस्ट मॅचसारखा खेळ केला त्यानी. म्हणे पिच स्लो होते आणि बॉल बॅटवर येत नव्हता . तिथेच कलकत्त्यावाल्यांनी कशा लाथा घातल्या यांच्या पेकाटात? तेही दुसर्‍या खेळीत. मुळात कुम्बले आणि कं. च्या चेहर्‍यावर मैदाना वर मर्तिकाला आल्यासारखे भाव होते. ही टीम जेवढी लवकर बाहेर पडेल तेवढे बरे होईल....

कुम्बले आणि कं. च्या चेहर्‍यावर मैदाना वर मर्तिकाला आल्यासारखे भाव होते >>>
प्रचंड अनूमोदन Happy , IPL मधली टेस्ट टीम (कलिस, कुंबले, द्रविड)

पैसा परी पैसा, अन पैसे नाही पण वेळ वाया घालवायचा अन तो कसा वाया गेला हे लोकांना पण सांगायच....भले शाब्बास!

असो. मला या खेळात अजिबात रस राहिला नाही.... ह्या खेळाचा 'धंदा' झाल्याने त्या दृष्टीने काही रस पिता येतो का ते बघायला पाहिजे! Happy

फार ये(न)डा, भारतात लई पर्चन्ड रेस्पोन्स आहे बघ. स्टेडियम फुल आहेत. आणि घराघरात फक्त डोळे उघडे ठेवण्याचे श्रम घेतले की झाले. टीव्ही कडे डोळे वळवले की आपोआप प्रेक्षक तयार होतो. मग तो चहा पीत असेल, जेवत असेल. भाजी निवडत असेल, सोफ्यावर कलंडलेला असेल्.इनवॉलन्टरी प्रेक्षक... Proud
चक्क थियेटरात तिकीट लावूनही शो चालू आहेत. आता तू विचारशील त्याले कोन जाते रे बाप्प्पा त्यचे उत्तर. नातू कार्टून च्यानेल ज्याना बदलून देत नाहीत, बायका/सुना ज्याना सासूच्या सिरियल बदलायला लागले की अंगावर धावून येतात. असे 'किक्ड आऊट" सत्पुरुष विरक्तीने थेट्रात जाऊन बसतात. तिथला प्रतिसाद माहीत नाही. भारतीय प्रेक्षकाना (काहीही) पहायला आवडते. दर्जाच्या बाबतीत तो कधीही आग्रही नव्हता /नसनार. फक्त काहीही विषेश्तः हलणारे त्याला पहायला आवडते. मग तो गारुड्याचा खेळ असेल, बंद पडलेली मोटार असेल, रस्त्यावर घसरलेली मोटारसायकल असेल, फुटलेले गटार असेल ,ती रस्त्यावरची बाचाबाची / मारामारी असली तरी चालेल. ती लवकर बंद होउ नये म्हणून लोक हल्ली त्यात हस्तक्षेप करायचे टाळतात Proud

डेक्कन चार्जर्स सर्व क्षेत्रात उत्तम खेळले. ब्याटिंग , फिल्डिंग. आणि विशेषतः बोलिंग. चमिंडा वास फारच भेदक. रोहित शर्माची बोलर म्हणून नव्यानेच ओळख झाली. गिलख्रिस्तने धोनी बाबाची पार नाकेबन्दी केली त्यामुळे चेन्नै वाल्यानी वेळोवेळी बंड करून पाहिले पण ते मोडून काढण्यात आले. एक उत्तम मॅच .

क्कन चार्जर्स सर्व क्षेत्रात उत्तम खेळले. ब्याटिंग , फिल्डिंग. आणि विशेषतः बोलिंग. चमिंडा वास फारच भेदक. रोहित शर्माची बोलर म्हणून नव्यानेच ओळख झाली. गिलख्रिस्तने धोनी बाबाची पार नाकेबन्दी केली त्यामुळे चेन्नै वाल्यानी वेळोवेळी बंड करून पाहिले पण ते मोडून काढण्यात आले. एक उत्तम मॅच .>> अनुमोदन साहेब.
आणी किती सिक्ष व फोर्स मारल्या नाहीका? दोन्ही साईड ने जोरात खेळ झाला.

मामी बंगलोरला मुळात जिंकायचेच नव्हते. तसे ते ठरवूनच आले होते. त्यामुळे कलकत्त्यावाल्याना जिंकन्याशिवाय काही इलाजच राहिला नव्हता. बंगलूरवाले बहुधा किंग फिशरचे मद्य पिऊन बॅटिंग करत असावेत.>> अगदी अगदी. मी मनात म्हण्ले पण बीअर जरा ज्यादा हो गया दिख ता है Happy इतका लॅकलस्टर खेळ
पहिल्याच म्याच मध्ये का बरे? त्याच्या पेक्षा जास्त उत्साह मला आत्ता लास्ट क्वार्टर मध्ये पण आहे.

फारेन्ड, मला लेग बिफोर विकेट हे कसे धरतात हे मराठीत हवे आहे तसेच क्रिकेटची माहिती व ग्लॉसरी देणारी साइट आहे का कोणची? क्रुपया लिन्क द्या. घरी समजावून सांगायचे काम शिरावर पड्ले आहे. शेवटी लगान दाखविणार. दुसरे काय Proud

या बया ! आज देल्ही डेअर डेविल्स शी मुकाबला हाये. तुमास्न्ही काय वाट्टे? कोन जिहिंकेल?

दिल्लीवाल्यातही दम नाही वाट्त,..... गम्भीरच्याही तोंडाला फेस आला त्या दिवशी.
खरी कॉम्पिटेटिव्ह मॅच झाली तेन्डूबाबाची आणि राजस्थानवाल्याची.... बाकी इतरत्र एक पार्टी सारखी कुंथत असते...

अपुन तो शेन वार्न का फ्यान है.

अगदी अगदी. कसे शेवट्ची ओवर शेवट्च्या बॉल परेन्त टेन्शन राहावे म्याचेत. नाहीतर काय सपशेल पाडाव लै बोरिन्ग रे बाबा.

काल बंगाली बाबू हरले Proud , मस्त झाली मॅच..

मागच्या वर्षीच्या IPL मधे http:\\fakeipl.blogspot.com म्हणुन एक भन्नाट ब्लोग येत होता..
यावर्षी तो लिहित नाही... Sad

http://en.wikipedia.org/wiki/Fake_IPL_Player
त्याने प्लेयर्स आणि त्यांच्या ओनर्स ना दिलेली टोपण नावे भन्नाट होती..
http://www.ananthkannan.com/2009/05/fake-ipl-players-nick-names-revealed...

मामी हे घ्या लेग बिफोर विकेट. लोकहो काही गडबड असेल तर सुधारा.

सर्वसाधारणपणे स्टंपकडे जाणारा बॉल बॅट्समन च्या अंगाला, पॅड वगैरे ला (बॅट आणि बॅट धरलेल्या हातांतील ग्लोव्ह्स सोडून बाकी काहीही) लागला तर तो एलबीडब्ल्यू. येथे स्टंपकडे जाणारा म्हणजे त्याला जाउ दिले असता स्टंपला लागला असता असे अंपायरला खात्रीशीररीत्या वाटते असा.

अंपायरची खात्री सर्वात महत्त्वाची. त्यामुळे त्याने बरेच नाबाद दिले तर त्यात काही चूक नाही. शेकडो बाद फलंदाज सुटले तरी चालतील पण एक नाबाद फलंदाज बाद होउ नये Happy

पण यात सूक्ष्म गोष्टी खूप आहेत. काही बाबतीत बाद देण्याची शक्यता जवळजवळ नसते:
१. लेगस्टंप च्या (सरळ रेघेच्या) बाहेर टप्पा पडला
२. बॅट्समनला बॉल लागला तेव्हा ती जागा ऑफस्टंपच्या सरळ रेघेच्या बाहेर होती. म्हणजे अंपायरच्या बाजूने बघताना ऑफच्या बाहेर पॅडला बॉल लागला. मग नंतर तो जरी स्टंपवर गेला असता तरी काही फरक पडत नाही.
३. बॅटसमन चा पाय क्रीज च्या बराच पुढे होता. येथे अंतर खूप असल्याने शंकेला जागा असते.

वरती नं २ मधे बॅट्समन ने बॉल खेळण्याचा प्रयत्न करणे जरूरी आहे. म्हणजे नुसताच पाय मधे घालून अडवतात तसे चालत नाही. नाहीतर तो बाद होउ शकतो. पण आयपी एल मधे जर असे 'पॅडिंग' केले तर तो परतल्यावर संघातील इतरांकडून मार खाईल Happy

नियम वाली साईट शोधतो.

आज मस्त मॅच आहे... आमची मुंबै विरुद्ध दिल्ली.. Happy
मुंबै मधे ब्रावो किंवा पोलार्ड (चॅम्पियन्स लिग चा हीरो.. Happy ) खेळण्याची शक्यता.. मुंबै जिंकेल असे वाटतेय

ह्या एल बी डब्ल्यूचा एक लोच्या आहे. त्याला 'फिजिकल लोच्या ' म्हणता येईल. फिजिक्समध्ये ज्याला 'पॅरलक्स' (parallux) म्हणतात तो. म्हणजे प्रत्येक डोळ्याने वेगळे वेगळे पाहिले असता वस्तु वेगवेगळ्या थिकाणी भासते ते. अम्पायरचे डोळे साधारण जमीनीशी समान्तर कोनातून पहात असल्याने त्याला जसे दिसते तसे आपल्याला दिसत नाही कारण कॅमेर्‍याचा अँगल थोडा वेगळा असतो. शिवाय ही पॅरलक्स नावाची भानगड पहाण्याच्या अंतरावरून /कोनावरूनही बदलते. फिजिक्समध्ये ऑप्टिक्सचे प्रयोग करताना पहिली पायरी हे पॅरलक्स रिमूव्ह करण्याची असते नाहीतर रीडिंग चुकीचे येतात हे बहुतेकाना आठवत असेलच्.काही कॅमेरे अम्पायरच्या कोनाबरोबर असू शकतात. त्यामुळे आपल्याला एल्बीदब्ल्यू वाटलेला अम्पायरला वाटतोच असे नाही (आणि व्हाईस वर्सा) मग्'ढापला' वगैरे. आता तर नन्तर काल्पनिक अ‍ॅनिमेशनही दाखवून अम्पायरच्या अब्रूचे खोबरेही केले जाते. पण त्या क्षणाला तर जजमेन्ट देणे अवघडच असते. त्यामुळे एल बी डब्ल्यूचा निर्णय सापेक्ष असल्याने वादग्रस्तही असतो. खरे तर त्यालाच तिसर्‍या अम्पायरची जास्त गरज आहे पण नेमके त्यालाच ही मदत घेतली जात नाही. नवीन रेफरल मध्ये आहे का ही सोय?

फारेन्ड, टोणगा धन्यवाद. या बदल्यात मी तुम्हाला एक चित्र काढुन देउ शकते. किंवा गाणे म्हणुन दाखवू शकते.
लहानपणी किशोर मासिकात थोर क्रिकेटर्स बद्दल लिहून येत असे. रणजी वगैरे. तुम्ही वाचले आहेत का ते लेख?
एक स्पोर्ट स्टार मासिक यायचे ते ही बरे होते. ( त्यात गेट फोल्ड ऑफ इम्रान खान येणार तो इश्यू घ्यायला पैसे जमविले होते! - आम्ही मराठी शाळेत त्यामुळे गेट फोल्ड चा अर्थ खूप शोधला पण सापडेना. मग कळले मोठा फोटो! Happy )

लेट कट, हुक, तर्‍हे तर्‍हेच्या ड्राइव्ज काय मजा येत असे बघायला तेव्हा. विशी व वेंगी ची तर मी लै फ्यान.
२०/२० मध्ये तसे चांगले फटके दिसत नाहीत. जस्ट हाणामारी.

चेन्नैच्या राजांनी धूळ चारलीच नाइट रायडरांना. धोनी झिन्दाबाद. आज आपण सचिन रंगी रंगणार. देल्ही बद्दल काही वाट्तच नाही.

मुंबै टीम फक्त सचिन मुळेच जिंकाविशी वाटतेय.. पण दिल्ली खरोखर भारी आहे..
नॅनिस जबरी फॉर्म मधे.. बॉलिंग पहाताना मजा येते.. सेह्वाग-गंभीर-दिलशान-एबी.. सगळेच एक से एक..

रोहन गावसकरला सुनील गावसकरच्या 'दहशती' मुळे घेतात का? याने इतिहासात कुठे दिवे लावलेत?

बेन्गलोर सगळ्यात स्ट्रॉन्ग वाटतेय
तरुण्/अनुभवी , Batsman/Bowler , hitters/anchors balance छान साधलाय .
महत्वाचे म्हणजे त्यान्चे ७ही होम प्लेयर्स इन्टरनॅशनल लेव्हल्चे आहेत .
Pande , Dravid , Kohli , Uttapa ( ?) , Kumble , Pravin , VinayKumar

Pages