शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार, गदर्भ म्हणजे गाढव?! थोडी शंका आहे मला याबद्दल.

बी, कर्तृत्व हा मूळ संस्कृत शब्द आहे खरा, पण मराठीत, विशेषतः जुन्या मराठीत कर्तुत्व हा शब्द पण आला आहे. त्यामुळे तो त्याचा अपभ्रंश मानायला हरकत नाही.
उदाहरणार्थ, दासबोधाच्या दहाव्या दशकात एक ओवी आहे,
जरी म्हणो भूतीं केली । तरी ते भूतांचीच वळली । म्हणावें जरी परब्रह्में केली । तरी ब्रह्मीं कर्तुत्व नाहीं ॥

बाकी तुझे लॉजिक बरंच मनोरंजक आहे.. Happy

बी:
१. 'कर्तृत्व' हे लेखन बरोबर आहे. 'कर्तृ' या ऋकारान्त पुल्लिंगी नामाला 'त्व' हा भाववाचक प्रत्यय जोडून 'कर्तृत्व' हे भाववाचक नाम तयार होतं. अशीच समांतर उदाहरणं म्हणजे दातृत्व(दातृ), पितृत्व(पितृ), मातृत्व(मातृ), भ्रातृत्व(भातृ).
२. 'नुमजून': गजाने दिलेलं स्पष्टीकरण बरोबर. 'न+उमजून = नुमजून'. तसंच दासबोधात, गणपतीच्या आरतीत 'नुरे', 'नुपेक्षी', 'नुरवी' असे शब्द आहेत. तेदेखील 'न+उरे = नुरे', 'न+उपेक्षी = नुपेक्षी', 'न+उरवी = नुरवी' अशा पद्धतीने जोडून बनवले आहेत.

केदार, रुनी, बी:
'दर्भ' म्हणजे वाळलेले गवत. लग्नात लाजाहोमाच्या वेळी, किंवा घरात मुंज, ग्रहमख, वास्तुशांत इत्यादी पूजांमध्ये हवनाकरता हे वापरले जातात.
गाढवाकरता ’गर्दभ’ हा शब्द आहे; ’गदर्भ’ नव्हे. Happy

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

क्ष आणि फ, तुम्ही दोघेजण व्याकरणाचे गाढे अभ्यासक दिसता. शक्य असल्यास मायबोलिवर नियमित येत चला रे.. किती छान माहिती देता. हे ज्ञान असे तुमच्यापर्यंत सिमित राहता कामा नये.

मी दर्भासन असा शब्दप्रयोग वाचला. म्हणजे वाळलेल्या गवतापासून केलेले आसन असाच अर्थ होईल त्याचा असे वरील महितीवरून वाटते.

दोघांचे मनःपुर्वक आभार.

गाढवाकरता ’गर्दभ’ हा शब्द आहे; ’गदर्भ’ नव्हे>>> हेच परत लिहायला मी ईथे आलो होतो. काल दर्भ, दर्भ करताना गर्दभ हे लिहीलेच नाही.

बी भाऊ चिडत नाहीयेरे. तु लिहीत जा.

मुमुक्ष/मुमुक्षत्व याचा अर्थ काय?
अनादी चा अर्थ काय?
"सॄष्टी अनादी है,उसका कोई निर्माता नही." असं वाक्य ऐकलं. पण अनादी म्हणजे ज्याचा कोणी निर्माता नाही असा....... अर्थ पटत नाहीये.हाचं आहे का?

मुमुक्षू म्हणजे जिज्ञासू असे वाचल्याचे आठवतेय.
अनादि म्हणजे ज्याची सुरुवात नाही असा, म्हणजेच कायम अस्तित्वात असलेला, कधी निर्माण न झालेला,कोणी निर्माता नसलेला हे पटण्यासारखे आहे की.

मुक्ती मिळवणे हे जिचे ध्येय आहे त्या व्यक्तीला मुमुक्षू म्हणतात.

सुप्रिया: ’मुमुक्षु (/मुमुक्षू)’ हे लेखन शुद्ध आहे; ’मुमुक्ष’ नव्हे. तसेच, ’मुमुक्षत्व’ असा शब्द सहसा वापरला जात नाही; त्याऐवजी ’मुमुक्षा’ असा शब्द योजला जातो.
संस्कृतातील ’मुच्‌ (मुञ्च्)' (अर्थः (बंधनातून/गाठीतून)सुटणे, मोकळे होणे) या धातुपासून वरील दोन व 'मोक्ष' या शब्दांची उत्पत्ती होते. "'मोक्ष' साधू इच्छिणारा(री)" हा 'क्ष'ने सांगितलेला अर्थ बरोबर आहे. 'मोक्ष साधण्याची इच्छा' म्हणजे 'मुमुक्षा' (जसे 'पा (पिब्)' या 'पिणे' अर्थाच्या संस्कृत धातुपासून "(काहीतरी) पिण्याची इच्छा" अशा अर्थाचा 'पिपासा' हा शब्द तयार होतो, तसेच हे! अशीच समांतर उदाहरणे म्हणजे जिज्ञासा, जिगीषा). ’मुमुक्षा’ या भाववाचक नामापासून ’मुमुक्षू’ हे व्यक्तिवाचक नाम बनतं. त्याच न्यायाने ’पिपासा’पासून ’पिपासु/पिपासू’, ’जिज्ञासा’पासून ’जिज्ञासु/जिज्ञासू’, ’जिगीषा’पासून ’जिगीषु/जिगीषू’ हे शब्द उपजतात.
मूलतः संस्कृतात ’मुमुक्षु’, ’पिपासु’, ’जिज्ञासु’, ’जिगीषु’ अशी उकारान्त रूपे शुद्ध मानली जातात. परंतु मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार अशा शब्दांचे लेखन सहसा ऊकारान्त केले जाते(तसेच मूळ उकारान्त रूपेही चालतात; पण क्वचितच तसे प्रचलन दिसते). त्यानुसार ’मुमुक्षू’, ’पिपासू’, ’जिज्ञासू’, ’जिगीषू’ असे लेखनदेखील शुद्ध मानले जाते.

अनादी शब्दाचा मैत्रेयीने सांगितलेलाच अर्थ आहे. 'आदि' या शब्दाला 'अन्' हे नकारवाचक पूर्वपद जोडून 'अनादि(/अनादी)' हा विरुद्धार्थी शब्द बनतो.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

मुमुक्षु आणि युयुत्सु हे शब्द एका ठिकाणि बरोबर वाचले होते युयुत्सु चा अर्थ काय? मृत्यंजय कादंबरित अधिक्षेप हा शब्द वाचल्याच आठवत त्याचा नक्कि अर्थ काय?

अधिक्षेप म्हणजे दुसर्‍याच्या कामात, अधिकारात ढवळाढवळ..
युयुत्सु म्हणजे युध्दाला उत्सुक?

बापरे फ, किती detail मध्ये सांगितलत. खरचं महान!! Happy

शोनू मला वाटत्ते

तू हस्तक्षेपचा अर्थ सांगितला आहे.अधिक्षेप म्हनजे अवमान . कंटेम्ट या अर्थाने.
तसेच
अनादि आणि अनन्त हे परमेश्वराला मानतात . गम्मत म्हणजे विश्व देखील (युनिव्हर्स) असान्त आहे असे मानले जाते. अन्त , सान्त म्हनजे अन्त असलेला, असान्त म्हनजे सान्त नसलेला म्हनजेच पुन्हा अमर्याद. इन्फायनाईट या शब्दासाठी. आपल्या फिलॉसॉफीत 'पिंडी ते ब्रम्हांडी 'असे एक तत्व आहे. बघा अणूची आणि विश्वाची (युनिव्हर्स) रचना अगदी सारखी आहे. म्हनजे एलिप्टिकल ऑर्बिट्स , न्युक्लिअस आणि सूर्य. ग्रह आणि एलेक्ट्रोनची तुलनात्मक स्थिती.

इश्वराची जी अमूर्त संकल्पना वर्णन केली आहे ते वर्णन अणूरचनेस आणि वैश्विक रचनेस अगदी लागू पडते

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

टोणग्या, देवाला मध्ये आणलेस?
घटोत्कच चा अर्थ काय? डोक्याने मोठा असलेला का?

अर्र, जरासा चुक्याच. अधिक्षेप म्हणजे निंदा, हेटाळणी अवमान असं म्हटलंय आपट्यांनी ( विस्तारित शब्दरत्नाकर ) .

असान्त? हा नवीन शब्द कुठून आला? जवळजवळ "पायपीट तशी बसपीट"सारखं लॉजिक झालं हे!
>>गम्मत म्हणजे विश्व देखील (युनिव्हर्स) असान्त आहे असे मानले जाते.
कुठे? असे कुठे आणि कोण म्हणाले आहे याचा संदर्भ द्याल तर बरे होईल.

हो अपमान हा अर्थ वाक्याच्या अर्थाच्या दृष्टिने हि बरोबर वाट्तोय. मृत्यंजय मधिल वाक्य काहिस अस होत.

माझा राज्याभिषेक हा खर म्हणजे माझा अधिक्षेप होता. मत्रांच्या गजरात सुगंधि पुष्पे उधळुन केलेला अधिक्षेप! कितिहि दुर्बल मनुष्य असला तरि तो आपला अधिक्षेप सहन करु शकत नाहि मग मी तर स्वतःला पराक्रमी समजत होतो.........

शोनु आणु टोणगा दोघांनाहि धन्यवाद.

फ खूपच छान.. मुमुक्षू चा अर्थ अगदी उत्तम समजावलास..

>>> आपल्या फिलॉसॉफीत 'पिंडी ते ब्रम्हांडी 'असे एक तत्व आहे. बघा अणूची आणि विश्वाची (युनिव्हर्स) रचना अगदी सारखी आहे...
देवा !! (होय 'तिथला'च) Proud नाही हो नाही.... भारतीय तत्वज्ञानाचा आणि आधुनिक विज्ञानाचा असा अधिक्षेप करू नका !!
केदार,
घटो हास्योत्कच इति माता तं प्रत्यभाषत । अब्रवीत्तेन नामास्य घटोत्कच इति स्म ह ॥
या महाभारतीय श्लोकात व्युत्पत्ती दिली आहे. पण अर्थाबाबत माझा गोंधळ उडाला आहे. ज्याचे हसणे ऐकून डोक्यावरचे केस उभे राहतात तो अशी एक शक्यता वाटते. कृ.जा.प्र.पा.

    ***
    Skating away on the thin ice of the new day...

    १)कडूजार
    २)कडूजहर

    वरील शब्दांपैकी कुठला शब्द बरोबर आहे की दोन्ही बरोबर आहेत? खूप कडू या अर्था कडूजार, जसे खूप आंबट असेल तर आंबटढोण्/ढोन म्हणतो, खूप तिखट असेल तर तिखटजाळ म्हणतो.

    मला आठवतेय त्याप्रमाणे घटोत्कच जन्माला आला तेंव्हा त्याच्या हसण्याचा आवाज मडक्यामधे बोलल्यासारखा/हसल्यासारखा होता म्हणून ते नाव. CBDG.

    मी कडूजार हा शब्द ऐकला आहे बहुतेकांच्या तोंडी.. पण हा शब्द उच्चारताना जा आणि र मध्ये ह चा हलका उच्चार होतो..

    बोली भाषेत तो जार झाला असेल. पण तो शब्द कडुझ्झर असावा.

    कडुजार म्हणजे ज्यात कडु गोष्टी ठेवल्या आहेत ते भांडे. Happy आणि कडुजहर म्हणजे ते जहरच कडु पण हा शब्द जहर घेतल्यावर म्हणता येईल की नाही हे माहीत नाही.

    हो कदाचित तसेही असेल. त्याची उकल करता घट हा शब्द येतो त्यामुळे मडक्याचा संबध असावाच. मला उगीच ते डोक्याने मोठा असलेला (घटासारखे डोके) माणूस असे वाटत होते.

    ह्म्म्म... उत्कच चे मला सापडलेले अर्थ असे - १. केसविरहीत, २. उभे केस असलेला, ३. full blown
    यातील कुठला अर्थ या व्युत्पत्तीत घ्यावा आणि कसा ?

      ***
      Skating away on the thin ice of the new day...

      घटोत्कचाची कथा बहुतेक "कथा कल्पतरू" मध्ये वाचली होती. नक्की कुठे ते आठवत नाही, मात्र त्याचे डोके मडक्यासारखे गुळगुळीत (केशविरहित) असल्यांमुळे त्याचे नाव घटोत्कच ठेवले असा एक संदर्भ आहे.

      श्रीमान योगी मधे सील करणे असा शब्दप्रयोग आला आहे. ह्याचा अर्थ काय ? अफजल वधाच्या आधी राजे वेषाची तयारी करत असताना हा शब्द आहे. तसेच जिजाबाईंच्या सासुबाईंचे नाव दिपाबाई आहे असा पण उल्लेख आहे. त्याकाळी "दिपा" नाव रुढ होते ?

      सील करने म्हणजे शब्दश: सिल. अगं पुर्णे चिलखताने झाकुन घेणे, हाताला पण वेगळे चिलखत व डोक्याल जिरेटोपा मध्ये शिरस्त्रान. ईंग्रजी शब्द का वापरला ते कळले नाही.

      दिपाबाई हे जिजाऊ च्या आतेसासुचे नाव होते.

      दिपा हे नाव प्रचलित असावे बहुदा कारण व्यंकोजिराजांच्या (महाराजांचे सावत्र भाउ) पत्निचे नावहि दिपाबाई होते, जिला जिंजिचा किल्ला जिंकल्यावर महाराजांनि काहि गावांचे उत्पन्न बक्षिस दिले होते असा काहितरि उल्लेख आहे.

      क्ष, मग त्या 'हास्य' चा संदर्भ कसा लावायचा ?
      सील हा शब्द फार्सी असण्याची शक्यता आहे.

        ***
        ...s a Moebius signature. This is a Moebius signature. Th...

        Pages