शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या न्यायाने मी पुढील काही शब्द सुचवतो -
टायपीट (काल माबोवर फार टायपीट झाली, आता बोटे दुखतायत),
भरपीट (व्वा ! आज पार्ल्यावर भरपीट चर्चा झाली),
सालपीट/फोलपीट (हे पहा, 'शेंगदाण्यातील पोषक द्रव्ये' हा विषय असताना त्यांच्या आवरणाला सालपट म्हणायचे की फोलपट यावरच तुम्ही लोक भांडायला लागलात... विषयाचं हे सोलपीट/फोलपीट थांबवा आणि कृपया विषयाला धरून बोला.)
लोलपीट (= ऑफीसमध्ये विनोदी वाचणे आणि आजूबाजूच्या लोकांनी आपल्याकडे विचित्र नजरेने बघणे -> हे वाचून लोलपीट झालं यार !)
टोलपीट (= येता जाता 'दिवे'घाटाचा टोल भरणे -> तुम्ही का चिडताय एव्हढे ? मी टोलपीट केलाय ना !!)
गूळपीट (आले लगेच त्यांची बाजू घेऊन भांडायला नेहमीप्रमाणे. एकत्र यायचं आणि कुणाला तरी झोडायचं... एवढं काय गूळपीट आहे कोण जाणे !)

  ***
  We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus

  अरे असे हसण्यावरी काय नेता. मी खरच हे शब्द ऐकले आहेत आणि म्हणूनच वापरले देखील आहेत.

  उदाहरण देतो एक.

  खेड्यावर माझी एक बहिण राहते. तिच्या कडे गेलो असता तिने मला विचारला कसा आलास तर मी उत्तरलो..

  सिंगापूरहून, आधी विमानपीट, मग ट्रेनपीट, मग बसपीट, मग रिक्षापीट, मग बैलगाडीपीट आणि मग शेवटी पायपीट करत करत तुझ्याकडे आलो. तर तिला बरोबर कळले मी काय म्हणत आहे. कुठलही वाहन इथे तुम्ही वापरू शकता. लुनापीट, ट्रक्टरपीट Happy

  बी,
  माझ्या मते 'खूप चालणे' या अर्थी पायपीट हा शब्द वापरला जातो.
  त्यामुळे तू वापरलेले इतर शब्द मला बरोबर वाटत नाहीत. खरं म्हणजे मी ते पूर्वी कोणाला वापरताना ऐकलेलं नाही.

  नाही स्लार्टी, फक्त वाहनच हवीत.

  बी, तुझ्या बहिणीला कळणारच, तू तिच्या प्रश्नाला दिलेले उत्तर हा संदर्भ आणि पायपीट हा सर्वज्ञात शब्द यावरून त्या शब्दांचे अर्थ लावता येतात. 'राजगडावरून पुण्यात कसे आलात ?' याचे उत्तर 'आधी घोडदौड, मग सांडणीदौड, मग हत्तीदौड आणि शेवटी खेचरदौड करत आलो' असे दिले तर तेही प्रश्न विचारणार्‍यास कळेलच. पण म्हणून ते शब्द मराठी भाषेत 'आहेत' असा अर्थ होत नाही. आता तू ते शब्द तयार करून प्रचलित करणार असशील तर तो भाग वेगळा.

   ***
   We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus

   नाही रे स्लार्टी, बीला स्लार्टीच म्हणायचे आहे.:-)
   तू तयार केलेले शब्द त्याच्या पसंतीस उतरले नाहीत..

   बी, पायपीट मधे पीट चा अर्थ नेमका काय हे माहित नसतानाच तू विमान पिट, बसपिट असे शब्द बनवून वापरलेस, वर लोकांना कळतात असंही म्हणतोस मग पीट चा अर्थ कशाला हवा Happy

   हो, ते कळले मला, म्हणूनच लगेच संपादन केले Happy त्या 'पीट' मधून 'खूप वापरामुळे झालेला त्रास/वेदना' असे सुचवायचे आहे. बसपीट झाली तर बस थकत नाही. 'पिट्ट्या पडणे' असाही एक शब्दप्रयोग. उदा. रंधा मारून मारून हातांचा पिट्ट्या पडला. इथे हातपीट झाली असे म्हणत नाहीत.

    ***
    We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus

    बी , काहीच्या काही लॉजिक हं!! कुठल्याही वाहनाला पीट लावा म्हणे!! Happy विनोदाच्या BB वर तरी टाका हे!

    जाऊ दे.. इथे पुणेकर इतके सांगत आहेत तेंव्हा आजपासून फक्त 'पायपीट' हाच एक बरोबर शब्द, बाकी वरचे शब्द मी माझ्या शब्दकोशातून काढून टाकत आहे.

    मैत्रेयी, किती दिवसानंतर दर्शन दिलेस. श्रावणात मायबोलिवर यायचेच नाही असे व्रत वगैरे घेतलेस की काय Happy

    श्रावणात मायबोलिवर यायचेच नाही असे व्रत वगैरे घेतलेस की काय >>>
    बी !आता काही खरं नाही, ऍडमिन फटके टाकणार तुला! श्रावणात न येण्याइतकी "नॉन व्हेज" साईट आहे का मायबोली Proud

    शब्दार्थाच्या बीबीवर किती चुकीचा अर्थ लावलास माझ्या वरील शब्दांचा Happy

    ______

    शुभेच्छा चा नक्की अर्थ काय?

    मला वाटायचे शुभेच्छा म्हणजे Contratulations, किंवा हितचींतन.
    त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा पटतात, पण स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा हे पटत नाही.

    स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा चा माझे ईंग्रजी मन "Contratulation on Independence Day" असा अर्थ घेते. हे translation बरोबर आहे का चुकीचे ?

    Congratulations : अभिनंदन
    शुभेच्छा : best wishes

    भाषांतर जरा गडबड! Best Wishes" ठीक वाटतं. 'on' हे 'preposition of location' आहे. ' ते Congratulations नंतर वापरावं का? बहुतेक नाही! (रेन अँड मार्टीन चं व्याकरणावरचं पुस्तक डोळ्यापुढून घालून बरीच वर्ष लोटली).

    'बस' हा शब्द कधीकधी 'बैस' असाही वापरला जातो. 'बस्'चे रुपांतर 'बैस'मधे कसे झाले त्यामागची माहिती माहिती आहे का?

    १) किनखापी
    २) दर्भ/दर्भासन

    या शब्दांचे अर्थ हवे आहेत.

    <<'बस' हा शब्द कधीकधी 'बैस' असाही वापरला जातो. 'बस्'चे रुपांतर 'बैस'मधे कसे झाले त्यामागची माहिती माहिती आहे का?" >>
    मला वाटत होतं की बस हे बैस चं बोलीभाषेच्या सोयीसाठी केलेलं (झालेलं) सुटसुटीत रुपांतर आहे. बैस हा जुना किंवा पद्यवाला अवतार वाटतो जसे - "गरुडावर बैसोन माझा कैवारी आला ...".

    दर्भ म्हणजे गवत. किंवा कोवळे गवत जसे दुर्वा.

    किनखापी ला समांतर शब्द लक्षात येत नाहीये.

    किनखापी म्हणजे कापडाचा प्रकार नं? भरजरी कापड.

    दर्भ म्हणजे गवत.
    बर झाले केदार तू सांगितलेस मला दर्भ म्हणजे गाढव वाटले होते की ते गर्दभ आहे गाढवासाठी. माझा गोंधळ उडालाय.

    'धन्स' या शब्दाचा अर्थ काय होतो? हल्ली मी हा शब्द खूपदा वाचतो आहे. खास करून पुणे-मुंबईची माणसं हा शब्द खूपदा वापरतात.

    केदार धन्यवाद.

    पुशिंच्या एका कवितेत मी 'किनखापी पडदे' असा शब्दप्रयोग वाचला आहे. माहिती नाही कापडाचा प्रकार आहे की चटईसारखे पडदे पण असतात ना तसे काहीसे असेल. गजूभाऊ, अंदाज बरुबरं वाटतो..

    बी माझ्या मुलीने, तु जसे नवनविन शब्द आणतोस तशी आणखी ऐका शब्दाची निर्मीती केली आहे.
    आम्ही घरी "घरगुती" हा शब्द कधी तरी वापरला तर ती आज म्हणाली की मी घरगुती जेवनार नाही "बाहेरगुती" जेवनार. मला तुझीच आठवन झाली हा नविन शब्द ऐकल्यावर.

    केदार, गर्दभ .. गदर्भ नव्हे. गदर्भ हा शब्द माझ्या तरी ऐकण्यात नाही.

    केदार, अप्रत्यक्षरित्या केलेल्या प्रशंसेबद्दल धन्यवाद :). तुझी लेक नक्कीच logically बरोबर वाटते. लिहिताना जर कुणी घरगुती-बाहेरगुती असे लिहिले तर वाचताना मजा येईल.

    आणि मी आणि फक्त तुझ्या लेकीनेच असे शब्दांचे logic ओळखले नाहीतर ह्यात अजून बरेच जण आहेत.

    जसे की काल एक कविता वाचताना त्यात एक ओळ होती 'पंचक्रोशीपासून दशक्रोशीपर्यंत', परवा एक लेख वाचताना त्यात शब्द होते 'समजून्-उमजून्-नमजून'.

    आपण फक्त पंचक्रोश हा शब्द ऐकला असेल पण logic वापरून कुठलाही आकडा तिथे टाकता येतो. उदा. शंभरक्रोश

    नमजून हा शब्द आहे का.. नाही ना.. पण तरीही लिहिणार्‍याने शब्दांचे गणित लक्षात घेतले असेल.

    मला हे logic बरोबर वाटते. बहुतेकांना ते चुक वाटेल.

    क्ष तसा शब्द आहे.

    मला हे logic बरोबर वाटते. बहुतेकांना ते चुक वाटेल>>> मलाही चुकच वाटतेय.

    तुझी लेक नक्कीच logically बरोबर वाटते. लिहिताना जर कुणी घरगुती-बाहेरगुती असे लिहिले तर वाचताना मजा येईल. >>>> ( कपाळावर हात मारुन घेताचे चिन्ह. ) लेका बी अरे ती प्रशंसा न्हवती रे. ते साध वाक्य होत. तुझा गटन्या होऊ घातलाय. तुला सरळ लिहीतोय म्हणुन राग येऊ देऊ नको.
    घरगुती-बाहेरगुती ? बाहेरगुतीचा अर्थ काय मग?
    पंचक्रोश (नाही पंचक्रोशी ) - शंभरक्रोश ??
    नमजुनचा अर्थ काय म्हणे?

    आणखी उदा साठी तु म्हणशील आपण दोन ला बे म्हणतो ( बे ऐक बे, बे दुनी चार) मग तिन ला काय ते, चार ला आणी काय असे शब्द शोधत जाणार का?

    केदार, कृपया असा चिडू नकोस मित्रा. हे पहा वरील शब्दातील गम्मत ओळख तर तुला निदान मजा येईल. जर तू तिथे शब्दकोश घेऊन बसलास तर तुला चुक वाटेल. मी तुझ्या लेकीचे कौतूक करतो कारण तिने तिचा मेंदू लवचिक करून तसा शब्दप्रयोग केला. मायबोलिवर दिवे घेणे-देणे आणि आम्ही अमक्याचे 'पंखे' आहोत हे तरी कुठे खरे-खुरे मराठी शब्द आहेत पण तरीही इथे ते शब्द आपण वापरतोच ना. बाहेर देखील तसे शब्द ऐकायला येत आहेत हल्ली. तसेच आवडेश, खावेश, भावेश हेही शब्द तयार झालेले आहेतच ना. सर्वच शब्द तसे करता येत नाहीत. जे आपोआप जिभेवर येतात तेच शब्द कुणी लिहितो/उच्चारतो.

    असो.. कपाळावर हात मारून घेणे मला भावले नाही. एक पिता म्हणून तुला काळजी वाटली असेल कन्येविषयी तर ती तुझी भावना मी समजू शकतो.

    घरगुती जेवन म्हणजे घरी बनवलेलं जेवन. 'बाहेरगुती' जेवन म्हणजे बाहेर हॉटेलात बनवलेलं जेवन. होतो ना त्याचा अर्थ..

    जे समजले नाही .. उमजले नाही ते नमजून. होतो ना अर्थ. शब्दकोशात हे शब्द घाला असे मी म्हणत नाही, तसे कुणी करू देखील नाही फक्त त्याची मजा चाखा इतकीच अपेक्षा. जर मराठी भाषेला ते हाणीकारण असतील तर तिथेच त्याचा पायबंद करा.

    बी, तो शब्द 'नमजून' नसावा, 'नुमजून' असेल (न + उमजून). मी असा शब्द गौरी देशपांडेंच्या पुस्तकात वाचला होता.

    केदार, बाहेरगुती LOL!

    १) कर्तुत्व
    २) कर्तृत्व

    वर शब्द पहिला बरोबर आहे की दुसरा? मी आजवर नेहमी पहिलाच वापरला आहे.

    पार्ल्याच्या आजच्या बातमी फलकावर टुलिप ने २रा शब्द सांगितला आहे.

    Pages